Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 14, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 14, 2007 « Previous Next »

Nandini2911
Monday, August 13, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, चिन्या. सुंदर मुलाखत.मलापण एकदा तरी वारी करण्याची इच्छा आहे. कुणीतरी असा उपक्रम सुरू करण्याबद्दल सुचवलं होतं... बघू या. त्याच्या मनात असेल तर वारी पण होईल..
"वारी" फ़क्त स्वत्:साठी केली जात नाही. वारीला जाणारे लोक फ़ार थोडे असतील पण प्रत्येक गावामधे त्याच्यासाठी स्वयंपाक करणारे आणि मुक्कामाची व्यवस्था करणारे कितीतरी लाख लोक असतात. कुणाचीही बळजबरी नसते, तरी इतके सारे लोक का बरं त्या अनोळखी लोकाना मदत करतात? गाडी बस इत्यादी वाहने उपलब्ध असतानाही ते पायी का जातात?


आणि पंढरपूरची वारीच नव्हे तर जगन्नाथाची यात्रा, वैष्णो देवी, अमरनाथ, हज, जेरूसलेम या सर्व ठिकाणी लोक जातच असतात.

मझ्या मते, गर्दीमधे मिसळून गेल्यानंतर स्वत्:चं असं जे एक अस्तित्व असते ते विसरून जायला होतं. पु लचं एक वाक्य आहे "दूर माळरानावरचं एकच एक मोठं झाड होण्यापेक्षा गर्दीतला एक ठिपका व्हावासा वाटतो."

त्याच धर्तीवर. यामधे परंपरेपेक्षा श्रद्धेचा भाग महत्वाचा आहे.


Santu
Monday, August 13, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे गेलि २० वर्षे माझे कुटुम्बिय
वारितिल किमान ३० लोकाना एका मुक्कामात जेवन देतात


Santu
Monday, August 13, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे हि आठवतय कि फलटण च्या
राणी लक्ष्मी बाई या सुध्दा वारि बरोबर चालत येत असत.


Chyayla
Monday, August 13, 2007 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, तु तर एकदम सिक्सरच मारलास. खुपच छान मुलाखत आहे.

अध्यात्म व विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत हे केवळ विधान असल्याचे स्लार्ती म्हणाले होते. त्यासाठी पुरावा नाही असे काही तरी म्हणाल्याच आठवतय... मला पहिली गोष्ट हीच नव्हती कळाला याला पुरावा म्हणजे काय? असो जयंत नारळीकरान्नी खालील शब्दात स्पष्ट केलेले आहे.


संत आणि शास्त्रज्ञ हे दोघेही शोधक आहेत. फक्त ते वेगवेगळ्या दृष्टीनं बघतात. संत हे शोधक होते , त्यांनी जे शोधलं ते लोकांना सांगितलं. शास्त्रज्ञदेखील काही नियम सापडले की लोकांना सांगत असतात. सायन्सचे नियम का आहेत ? ते नियम नसते तर काय झालं असतं ? याच्यावर विचार केल्यास त्याचं उत्तर सापडत नाही. पण हे प्रश्ान् विचार करायला लावतात , अंतर्मुख करतात

Slarti
Monday, August 13, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> अध्यात्म व विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत हे केवळ विधान असल्याचे स्लार्ती म्हणाले होते. त्यासाठी पुरावा नाही असे काही तरी म्हणाल्याच आठवतय...

?? असे काही मी कधीच म्हणालो नाही.

Aschig
Monday, August 13, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्या नाण्याच्या?

दोन विभागांमध्ये गोष्टी मोडतात - (१)आपल्याला कळलेल्या आणी (२) आपल्याला न कळलेल्या. एक तिसरी विभागणी केल्या जाते, आणी ती म्हणजे, (३) आपल्याला indirectly कळलेल्या.

काही लोक पिशवी नं २ मधुन वस्तु एक्-एक करुन पिशवी नं ३ मध्ये टाकु पहातात, तर काही लोक त्या पिशवी नं १ पर्यंत कशा पोचवता येतील याचा प्रयत्न करतात.

शास्त्राच्या दृष्टीने personal experiences/delusions च्या द्वारे कळलेल्या गोष्टी नं ३ मध्ये जाण्यालायक नसतात. mathematical modelling permissible असते. कारण त्यामुळे एका वरच्या स्तरावर जावुन इतरही phenomena explain करता येतात.


Maanus
Monday, August 13, 2007 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वांग्यामधे देव सापडला.

Delaware woman story

A Delaware County woman says an eggplant has reminded her that God can be found anywhere, and anytime.

Chinya1985
Monday, August 13, 2007 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु,नंदिनि,अश्विनि,च्यायला धन्यवाद.

science without religion is lame, religion without science is blind ... a legitimate conflict between science and religion cannot exist."
Einstein.
Einstein argues that conflicts between science and religion "have all sprung from fatal errors." However "even though the realms of religion and science in themselves are clearly marked off from each other" there are "strong reciprocal relationships and dependencies"

असो. अशीग, तु तुझ अद्वैताच मॉडेल दुरुस्त केल का??
अणुची रचना, रेणुची रचना,बॉंन्ड फ़ॉर्मेशन तसेच इतर अनेक गोष्टी शास्त्रानी indirectly सिध्द केलेल्या आहेत. खगोलशास्त्रात तर बर्‍याच गोष्टी गणिताने सिध्द केल्या आहेत. हे पण एका दृष्टीने indirectly सिध्द करण झाल. त्यापण तुम्ही चुकिच्या मानता का??

वारित काहि घोळ होत नाहित शिस्तित सगळ होत याच राधाला दु:ख झालेल आहे अस दिसत.


Aschig
Tuesday, August 14, 2007 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, model चुकिचे नसते तर जिथे ते apply करायचा प्रयत्न करतो ते match होईलच असे नसते. G3 model ठिकच आहे. मायेबद्दल वाचुन असे जाणवले (म्हणगे ते ग्राह्य धरले तर) की G3 म्हणजेच अद्वैतवाद या जगाला लागु होत नाही.

Einstein च्या त्या वाक्याच इतका उदोउदो का केल्या जातो कळत नाही. नारळीकर तर बर्‍यापैकी neutrally बोलले आहेत. चांगल्या वातावरणाचा, संस्कारांचा फायदा कुणाला होणार नाहि? प्रश्न हा आहे की तो एकच (श्लोक, मंदिरे इ.) मार्ग आहे का? मला स्वत:ला देखिल library इतकेच चांगल्या मंदिरामध्ये प्रसन्न वाटते. पण मंदिरांशिवाय मी जगु शकेन. library शिवाय जगणे जरा जास्त कठीण जाईल.


Chetnaa
Tuesday, August 14, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिश, हे मात्र पट्ले...
प्रसन्न दोन्ही कडे वाटते... पण लायब्ररीशिवाय जगणे कठीण...
२ पैकी एकाच वेळी निवड करायची झाल्यास, पाय आपोआप लायब्ररी कडे वळतील...


Aschig
Tuesday, August 14, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना, बाकी काही पटलेले दिसत नाही :-)

चिन्या, तुम्ही म्हंटलेल्या सगळ्या mathematical truths ना माझा पाठींबा आहे. mathematical truths हे या जगात खरे असो वा नसो, abstract स्वरूपात खरेच असतात. त्या उलट जे केवळ personal experiences मधुन येते आणी mathematically prove करता येत नाही (इथे मी logically असे म्हंटलेले नाही) ते खरे असेलच असे नाही.


Chetnaa
Tuesday, August 14, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिश, अजुन सर्व वाचले नाहीय, वाचायला खुप वेळ लागतोय...
बाकी काय पटलं की नाही हे महत्वाचं नाही...
पण हे जग चालवणारी जी शक्ती आहे, ती मी मानते.
इतक्या मोठ्या विश्वापुढे आपण एक य:किंचीत प्राणी जिथे जिथे मनाला उदात्तता वाटते तिथे मन आपोआप झुकते.

आणि वर म्हटल्या प्रमाणे मंदीर आणि लायब्ररी दोन्हीत तितकेच छान वाटते. देव वा ती महान शक्ती मी माझ्या मनात अनुभवु शकते. मंदिरात जायलाच हवे असे नाही. पण पुस्तकांसाठी लायब्ररीत जावेच लागेल ना? :-)


Chinya1985
Tuesday, August 14, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, model चुकिचे नसते तर जिथे ते apply करायचा प्रयत्न करतो ते match होईलच असे नसते. G3 model ठिकच आहे. मायेबद्दल वाचुन असे जाणवले (म्हणगे ते ग्राह्य धरले तर) की G3 म्हणजेच अद्वैतवाद या जगाला लागु होत नाही.
हीच तर बेसिक चुक आहे. अद्वैतवाद हा G3 मॉडेलच्या आधी आलेला आहे त्यामुळे G3 त तो बसत नाहि म्हणुन तो जगात apply होत नाहि म्हणने म्हणजे फ़ारच मोठि चुक आहे. समजा २+२ हे कोणितरि चुकुन ५ count केले. आणि मग हे ५ धरुन पुढे कितिहि बरोबर calculations केली तरि उत्तर चुकणारच आहे. हे मॉडेलहि तसेच आहे. आणि मायेने cover झाल्यावर ते G1,G2 मधे कुठे बसते हे तुच विचारले होते. म्हणजे ते G3 नाहि अस तुझ म्हणन होत. त्यामुळे अशा चुकिच्या मॉडेलवरुन कुठल्या conclusion वर येणे चुकिचे आहे.

चिन्या, तुम्ही म्हंटलेल्या सगळ्या mathematical truths ना माझा पाठींबा आहे. mathematical truths हे या जगात खरे असो वा नसो, abstract स्वरूपात खरेच असतात. त्या उलट जे केवळ personal experiences मधुन येते आणी mathematically prove करता येत नाही (इथे मी logically असे म्हंटलेले नाही) ते खरे असेलच असे नाही.
mathematics फ़ारच limited आहे. देव तर सोडाच माणसाच्या भावना सुध्दा शास्त्राला पुर्णपणे समजलेल्या नाहित. मग त्या भावना पण चुकिच्याच मानता का तुम्ही??कारण त्या पण personal च असतात आणि गणितानि सिध्द पण होत नाहित

Radha_t
Tuesday, August 14, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण माणसाच्या भावना या त्याच्यापुरत्याच मर्यादीत असतात. तो संपला की भावनाही संपतात. अध्यात्म तर सगळ या भावनांभोवतीच गुंफलय. मग, मृत्यूनंतर काय यावर अध्यात्म इतक ठामपणे कस काय सांगू शकत. उदाहरणार्थ पुनःर्जन्म, पाप पुण्याचा हिशोब इत्यादी.
assumption प्रेम, भक्ती अनूभूती निर्विकार मन, मोक्ष इत्यादी सगळच भावनांचा खेळ. -- चूक असल्यास दुरुस्त करावे.


वारित काहि घोळ होत नाहित शिस्तित सगळ होत याच राधाला दु:ख झालेल आहे अस दिसत.
दुःख त्याच नाही. वारितली शिस्त धाकामुळे असते याच दुःख आहे. आपण देवाच्या दारी निघालो आहोत आपल्या हातून काही पाप होउ नये हा धाक किंवा सद्भावना म्हणा हव तर.
पण धाकामुळे का? समजून उमजून का नाही? ही तर अंधश्रद्धा झाली ना. समजून उमजून केली तर शिस्त फक्त वारीतच न रहाता अख्या आयुश्यातच येईल ना, समाजात येईल देशात येईल.


Ashwini_k
Tuesday, August 14, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अध्यात्म तर सगळ या भावनांभोवतीच गुंफलय.

- पूर्णपणे चूक. भावना ही मानसिक अवस्था आहे. भावना ही मनाच्या आधिन आहे. अध्यात्मात प्रगती ही मनावर (सु)बुध्दीचा ताबा मिळवण्याच्या प्रयासांवर अवलंबून असते.

-----
मृत्यूनंतर काय यावर अध्यात्म इतक ठामपणे कस काय सांगू शकत. उदाहरणार्थ पुनःर्जन्म, पाप पुण्याचा हिशोब इत्यादी.

- आपल्या आयुष्याच्या कालखंडातील बाल्यावस्था व चरमावस्था या पुनर्जन्मानंतर काही काळ आपल्या स्मृतीत असतात (पुर्वजन्म अल्पायुष्याचा असेल तर त्या जन्माचा एक तृतीयांश कालखंड स्मृतीत असतो. म्हणूनच लहान मूल कधीकधी प्रथमच पाहीलेल्या व्यक्तीस विनाकारण घाबरते किंवा खुष होते. लहान अर्भक देखिल लक्षात येण्याजोगे तापट किंवा शांत असते (पुर्वजन्मीचा स्वभाव अंशतः संक्रमित झालेला असतो).

समजा, आपल्याला ४० आकडे, क्रमवार न सांगता, कुठल्याही क्रमाने भराभर सांगितले. त्यानंतर तशाच रितीने बोलून दाखवायला सांगितले, तर आपले सुरवातीचे काहि व शेवटचे काही आकडे बरोबर येतात आणि मधले खूपसे चुकतात किंवा आपण ते विसरतो.
-----

पाप पुण्याचा हिशोब

- प्रत्येकजण अनुभवतो. कोणाला लक्ष्यात यायला खूप उशीर होतो. पाप पुण्याचा हिशोब मेल्यानंतर नाही, तर आयुष्याचा प्रत्येक क्षण उलतून गेल्यावर (क्षण मृत झल्यावर) लागलीच ठेवला जातो. म्हणून तर म्हणतात की आयुष्यभर पाप करून शेवटी पुण्य करून भरपई होत नाही. प्रत्येक क्षण आचार विचार चांगले ठेवण्याचा प्रयास झाला पाहिजे. कूकर्मावर तोडगा सत्कर्मच असतो.

----

"धाक" या शब्दाचा अर्थ एखाद्या गुंडाचा धाक या अर्थाने न घेता आईवडिलांचा धाक (यात मूल चूकू नये याची काळजी असते आणि "तो" किंवा "ती" -:-) सगळ्यांचेच मायबाप आहेत) असा घ्यावा. आणि हा धाक वारीतच नाही तर इतरत्रही असतो (जेथे जातो तेथे तू माझा सांगाती).

वरच्या सर्व बाबतीत वेगवेगळ्या लोकांची मते वेगवेगळी असू शकतात.




Slarti
Tuesday, August 14, 2007 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भावनांचे 'mathematical proof' म्हणजे काय अपेक्षित आहे ? भावना आहेतच. मेंदूच्या अभ्यासावरून बर्‍याच गोष्टी कळत आहेत. उदा. जीवाला धोका निर्माण झाला तर भिती वाटते. तेव्हा कुठली रसायने ( epinephrine, a type pf adrenaline ) मेंदूत / शरीरात निर्माण होतात, त्यांचा शरीरावर काय परिणाम होतो, इतकेच नव्हे तो परिणाम का होतो हेही माहिती आहे. उदाहरणार्थ, ज्ञानेंद्रिये जास्त संवेदनशील होतात. त्वचेवरचे केस उभे राहतात जेणेकरून अंगावर किडा चढला तर लगेच जाणवेल, डोळ्याची बुबुळे प्रसरण पावतात जेणेकरून जास्त प्रकाश घेता येईल व दृष्टी सुधारेल इ. इ. शिवाय निर्मित रसायनांचे प्रमाणानुसार परिणाम हळूहळू कळत आहेत.
थोडक्यात, भावनांना 'समजून' घेण्याचे शास्त्रीय प्रयत्न सुरु आहेत, त्यात यशही येत आहे. या सर्व संशोधनात प्रयोगांइतकाच mathematical modelling, simulation यांचाही हातभार आहे, किंबहुना mathematical modelling शिवाय हे संशोधन पुढे जाणे अशक्य आहे. मानसशास्त्रज्ञांनासुद्धा शेवटी statistics चा आधार घ्यावा लागतो हे लक्षात घ्यावे.


Slarti
Tuesday, August 14, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> म्हणूनच लहान मूल कधीकधी प्रथमच पाहीलेल्या व्यक्तीस विनाकारण घाबरते किंवा खुष होते. लहान अर्भक देखिल लक्षात येण्याजोगे तापट किंवा शांत असते (पुर्वजन्मीचा स्वभाव अंशतः संक्रमित झालेला असतो).

या वर्तनाला इतरही कारणे असू शकतात. sensory information processing कधी सुरु होते, अर्भकांमध्ये ती कशी आहे हे बघावे लागेल. त्यासाठी cognition म्हणजे आपण कसे शिकतो हे बघावे लागेल. शिवाय genetics च्या दृष्टीकोनातून बघणे तर आवश्यकच आहे. या संशोधनाकडे दुर्लक्ष करून पुनर्जन्म असा कार्यकारणभाव लावणे थोडे घाईचे वाटते.

Chinya1985
Tuesday, August 14, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती, भावना काय आहेत हे शास्त्र समजावुन घ्यायचा प्रयत्न करत आहे पण अजुनहि बेसिक स्टेजेसवरच आहे. डोळ्याची बुबुळे मोठि होतात हे तर फ़ारच जुन ज्ञान आहे त्यात भावना नाहि. touch sensation मुळे किडा चढला तर कळते,आपल्या शरिरात receptors असतात touch साठि त्यामुळे हे कळते. या गोष्टी वेगळ्या आहेत भावनांचा तसा संबंध नाहि. आणि या गोष्टी शास्त्राला बर्‍याच पुर्वीपासुन माहित आहेत. भावनांवर अभ्यास चालु आहे. यात कुठले mathematical modelling होते??किति enzymes वगैरे सोडले जातात विशिष्ट भावनेला हे काहि mathematical modelling होत नाहि. शिवाय statistics पण mathematical modelling मधे मोडत नाहि. विज्ञानाची limits दाखवायला हा मुद्दा मांडलेला नाहि. भावनांच्या बाबतित अस mathematical model सध्या तरि तयार नाहि. त्यामुळे भावना पण personal असतात. मग मॉडेल नाहि विज्ञानाला खुपच अपुरि माहिति आहे म्हणुन अशिग त्या नाकारेल का??

Chinya1985
Tuesday, August 14, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाहि वाटत की वारितलि शिस्त धाकामुळे असते. ति शिस्त जबाबदारिच्या जाणिवेतुन असते म्हटले तर ठिक आहे. कारण धाकामुळे घाबरलेले,बिथरलेले असे वारकरि मी तरि कधी पाहिलेले नाहित (फ़ोटो पण नाहि पाहिला कधी). मला तर वाटत की ते तर अतिशय आनंदात असतात गात नाचत असतात. त्यामुळे भितित असलेले माणुस इतका आनंदि झालेला मी तरि कधि पाहिलेला नाहि. जबाबदारिचि जाणिव असणे मी चुकिचे मानत नाहि. लोक रस्त्यानी गाडि व्यवस्थित चालवताना धाकात असतात का जबाबदारिच्या जाणीवेत असतात???जास्तकरुन जबाबदारिच्या जाणिवेतुन असतात. आपण काहि चुक केलि तर आपल्याला दंड होईल,पोलिस अटक करतिल असा थोडासा धाक असेलहि. पण तो तर कुठेहि असतोच.

Slarti
Tuesday, August 14, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> या गोष्टी वेगळ्या आहेत भावनांचा तसा संबंध नाहि.

तुम्ही माझी post नीट वाचली नाही का ? एक तर मी म्हटले की ज्ञानेंद्रिये 'जास्त' संवेदनशील होतात. तुमच्या त्वचेवरचे केस सतत उभेच असतात काय ? दुसरे म्हणजे बुबुळे मोठी होणे वगैरेत नावीन्य नसून ती भिती वाटल्यावर का मोठी होतात हे माहिती असणे हे नवीन. तिसरे म्हणजे adrenaline चा शोध लागला तो १८८५ च्या सुमारास. सव्वाशे वर्षे म्हणजे 'फार पूर्वीपासून' होत नाही विज्ञानाच्या दृष्टीने. त्यानंतर भिती व epinephrine च्या संबंधाचा शोध लागला. अर्थात 'वेदात adrenaline चा उल्लेख आहे' असे म्हणायचे असल्यास बोलणे खुंटले.

मला असे म्हणायचे आहे की सध्या चालू असलेल्या संशोधनात math modelling वापरले जाते. ते मुख्यतः खालील प्रकारे :
१.
Systems biology मध्ये.
२. Computational neuroscience मध्ये.
math model म्हणजे कागदावरची आकडेमोड, समीकरणे एवढेच नव्हे, computational models सुद्धा त्यात येतात.

माहिती अपुरी आहे, computational model नाही हे आशिष किंवा कोणीच नाकारत नाही. मग भावनांचे अस्तित्व का स्विकारावे ? हा interesting प्रश्न आहे. १. स्वानुभव २. शारिरीक परिणाम इतरांना दिसतात. उदा. राग आल्यावर चेहरा लाल होणे ३. परिणाम वागण्याबोलण्यात दिसुन येतात आणि हे सर्वांनच दिसून येतात. ४. मेंदूच्या अभ्यासाद्वारे त्या भावनांचा रासायनिक आधार कळत आहे. ५. प्राणीपक्ष्यांमध्येही भावना दिसून येतात.
माहिती अपुरी आहे म्हणूनच 'भावना म्हणजे रसायनांच्या खेळापेक्षा जास्त काही आहे' असा सरसकट निष्कर्ष काढला जात नाही. कादंबरीचा शेवट माहिती असल्याचा दावा शास्त्रज्ञांचा नव्हे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators