Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 13, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 13, 2007 « Previous Next »

Chyayla
Friday, August 10, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंकराचार्यांनी बौद्ध विचारांचा पराभव केला असे इथे लिहिले गेले. मग बुद्ध चूक होता का ? त्याला निर्वाणपद मिळाले नाही का ? तो खोटारडा, अंधश्रद्धा पसरवणारा होता का ? माझाही एक भा. नि. प्र.

मनुश्य तसाच समाज ही एका सत्यापासुन दुसर्या सत्याकडे सरकत जातो...

म्हणुनच अध्यात्म हे पुर्ण पोहोचलेले आहे त्याने एक प्रवास पुर्ण केला आहे चिन्या ने प्राणायाम, योग बद्दल जे म्हटले ते अगदी योग्य आहे. भारतिय शास्त्रे, कला छन्द हे सगळे अध्यात्मातुन निर्माण झाले आहेत अगदी संगीत, नाटक, योगासन, प्राणायाम वैगेरे. तुम्हाला जर उत्तम शिल्पशास्त्र बघायच तर देवाच्या मंदीराना भेट द्यावी लागेल. वेदान्मधे ६४ कला, आणी शटशास्त्रांचे वर्णन केले आहे. हे तर केवळ बाह्य उपचार आहेत पण त्या सगळ्यांचा मुळ उद्देश हा भगवंताची प्राप्ती हा आहे.




Slarti
Saturday, August 11, 2007 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते सर्व ठिक आहे, पण माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाहीच. बुद्ध चूक होता का ? एका सत्यापासून दुसर्‍या सत्याकडे... या विधानाचा यासंदर्भातील अर्थ कृपया स्पष्ट कराल काय ? बौद्ध विचार अपूर्ण होता असे म्हटले तर मग बुद्धाला निर्वाणपद कसे मिळाले ? चिन्या, काय मत ?

Lukkhi
Saturday, August 11, 2007 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असो राधा व ईतरांचे पोस्ट वाचुन एक रुपक कथा आठवली... वाळवंटामधे एक उंट जात असताना त्याच्या गळ्यात घातलेला दोर खाली लोंबकळत असतो तितक्यात एक उंदीर टुणकन उडी मारुन बाहेर येतो व तो दोर तोंडात धरुन चालु लागतो आणी छाती फ़ुगवुन म्हणतो बघा मी ह्या उंटाला चालवत आहे मीच खरा सर्वशक्तिमान.

>>खूप छान कथा आहे...
उंट म्हणजे प्रयत्नवादी माणसे आणि उंदीर म्हणजे देव असे तुम्ही म्हणू इच्छिता ना?

की तुमचे असे म्हणणे आहे, जे काही होते ते सगळे देवच करतो आणि मूर्ख माणसांना असे वाटते की हे ते स्वत्:च करताय?


Slarti
Saturday, August 11, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Interpretation of quantum mechanics is a hotly debated area where not even all the physicists tread. These are very deep waters. Does Gita say anything about decoherence ? For your argument's sake, it is dangerous to go there. e.g. Leggett thinks that decoherence is not enough to explain the quantum-classical gap and it is at least possible that QM actually breaks down at some macroscopic level and can no longer describe what's happening.
What if it turns out to be just a highly successful mathematical construct for explaining reality and not reality itself ? विनोबांचे 'देव = क्ष' (गणितातील, इथला नव्हे)उदाहरणासारखे होईल...

Tanyabedekar
Saturday, August 11, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अध्यात्माने एक प्रवास पुर्ण केला आहे म्हणजे काय? त्यामध्ये जे काही संशोधन करायचे होते ते करुन झाले, आता आणखी काही करायला उरले नाही असे आहे का? उरले आहे ते फक्त स्वत अनुभव घेणे? आणि हा प्रवास नेमका कधी संपला? वेद लिहिले तेव्हा? गीता लिहिली तेव्हा? शंकराचर्यांनी सन्यास घेतला तेव्हा? का वेद हे मानवनिर्मीत नसल्यामुळे अध्यात्माचा प्रवास हा जगाच्या जन्माबरोबरच पुर्ण झाला होता? की जगाचा एका विशिष्ट वेळी जन्म झाला नसल्यामुळे अध्यात्म हे उणे इन्फिनिटी ते अधिक इन्फिनिटी पर्यंत पुर्णच आहे? पुर्णात पुर्ण मेवाय म्हणजे हेच काय? अध्यात्म हेच अंतिम सत्य आहे का? तसे असेल तर मग प्रगती कोणत्या दिशेत करायची? केवळ अध्यात्माचीच अनुभूती घेत बसायचे का?
आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अध्यात्माने एक प्रवास पुर्ण केला आहे या विधानाला आधार काय? की अनेक गोष्टी संपूर्णपणे ज्ञात व उकलल्या गेल्या नसल्याने जी मुलभूत अनिश्चितता आहे त्यापेक्षा हे आहेच ही निश्चितता मानुनच जगायचे?


Chinya1985
Saturday, August 11, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रफ़्फ़ुल, अनुमोदन.
चला, स्लार्तिंना माझे काहि मुद्दे तरि पटले. यात subjectivity का?? धर्म इतक्या वेगवेगळ्या गोष्टी का सांगतो याचेहि मागे उत्तर दिले होते. कारण हे की देवाला अनेक रुपे आहेत त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळि रुपे दिसलि. मी परत तेच लिहित बसत नाहि कारण मागेही यावर मी सविस्तर उत्तरे दिलि होति. ख्रिश्चन,इस्लाम धर्म पण देवाकडुन आलेले आहेत म्हणुन त्यांनाहि तसे अनुभव येतात. पण सर्व धर्मांचे रुप वेगवेगळे असुनहि गाभा एक आहे हे लोक विसरतात त्यामुळे काफ़िरांना मारा वगैरे येत. बुध्द चुकिचे नव्हते. मुळात हा विष्णुचा ९वा अवतार आहे. निर्वाणपदापर्यंत ते गेले होते. त्या काळात धर्माच्या नावाखाली प्राण्यांचे नाहक बळि घेतले जात एक विचारधारा म्हणते की या animal killers ना मुळचा धर्म कळुच शकत नाहि. त्यामुळे वेदांच्या नावाखाली चालणारी प्राण्यांना बळि देण्याची पध्दत थांबवण्यास बुध्दांनी जन्म घेतला. त्यामुळे साहजिकतेनेच त्यांनी वेदांची authority मान्य केली नाहि. त्या जन्माच तेच purpose होत जे सिध्द झाल्यानंतर भगवान शंकराने शंकराचार्‍यांचा जन्म घेतला आणि वेदिक धर्माचे पालन करायला सांगुन बुध्द धर्मियांना परत वेदिक धर्माकडे आणले. या सर्व देवाच्या लीला आहेत. भिष्म पितामह जेंव्हा शेवटच्या घटका मोजत होते तेंव्हा त्यांनी अतिशय महत्वाचे बोल काढले 'की भगवान कृष्णांच्या मनात काय असेल हे कोण सांगु शकतो??ते अस काहि घडवुन आणतात की ज्याप्रमाणे ढगांना वारा कुठेही घेउन जातो तसे आपणही त्यांच्या मर्जितच असतो'. त्यामुळे या देवाच्या विविध लीला समजवुन घेणे अतिशय गरजेचे आहे. बुध्दजन्म तशिच एक लीला होति. मग बुध्द धर्माला आता काहि महत्त्वच नाही का??त्याचे followers चुक करतात का??तर नाहि. बुध्द धर्माचे पालन करुनहि (आंबेडकरांचा बुध्द धर्म नाहि)तुम्ही आध्यात्मिक प्रगति करु शकता. कारण भगवान बुध्दांनी पण अनेक सत्ये आपल्याला दिलेली आहेत. त्यामुळे या अवताराच्या धर्माचे पालन केलेल्यांची फ़सवणुक होणार नाहि.

तन्या,माझ्यामते आध्यात्माने प्रवास पुर्ण केला आहे याचा अर्थ असा की वेदिक ज्ञान खरे आहे हे पटण्याइतकि उदाहरणे आहेत. तितक्या लोकांनी त्याची सत्यता पडताळुन पाहिलि आहे. कारण वेद हे स्वत्: देवाकडुन आलेले आहेत.


Vijaykulkarni
Saturday, August 11, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,
तुमच लेख मी वाचला आहे आणी तो सुन्दर आहे.
पण ते राधा च्या प्रश्नाचे उत्तर नाही असे नम्रपणे सान्गावेसे वाटते.

स्वामी विवेकानन्द तुम्हाला दिसले का? या प्रश्नाचे उत्तर तीन प्रकारे देता येइल.

१ एका समारम्भात मी त्याना पाहिले.
२ त्यान्च्या साहित्यातून मला त्यान्चे दर्शन घडले.
३ एकदा ध्यान करत असताना ते आले आणी मला आशिर्वाद दिला असा भास झाला.

राधाला यातले पहिल्या प्रकारचे उत्तर अपेक्षीत आहे.

कारण वेद हे स्वत्: देवाकडुन आलेले आहेत.
आता यावर काय लिहिणार?


Chinya1985
Saturday, August 11, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव,तुम्ही काय लिहायचे हे पण मीच सांगु का??लिहा काय हवे ते.

Santu
Sunday, August 12, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
तुमचे बरोबर आहे. योग प्राणायम हे काहि नुसते व्यायाम नाहित. हे व्यायाम मानणे म्हणजे western संक्लपना आहे. योग हा त्या पेक्षा खोल आहे.

actualy जेव्हा तुमचा केवल कुम्भक आपोआप लागतो. श्वास effortlessly थाबतो. ओम ची आवर्तने आपोआप तोन्डात तुन बाहेर पडतिल तेव्हाच तुमचा प्राणायाम सिध्द झाला असे मानता येइल
नुसते (मिलिटरी छाप) एक दोन एक दोन करत प्राणायम केला तर तो नुसता व्यायाम होईल
अशावेळी तुम्हाला मुलधारा चक्रात throbbing. होईल.
मुलबन्ध,उड्डियान बन्ध आपोआप लागतिल तेव्हाच प्राणायम सिध्द झाला असे होईल.
प्राणायम म्हणजे व्यायाम नव्हे हे साधकाने लक्षात ठेवले पाहिजे.

मुळात प्राणायाम करायचा असतो तो मुलधारा चक्रातिल कुन्डलीनी जाग्रुत करण्यासाठी


Vijaykulkarni
Sunday, August 12, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात प्राणायाम करायचा असतो तो मुलधारा चक्रातिल कुन्डलीनी जाग्रुत करण्यासाठी

कुन्डलिनी म्हणजे काय?


Chyayla
Sunday, August 12, 2007 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती, मला वाटलेच तुम्ही मला याबद्दल विचारालच पण चिन्यानी अगदी माझ्याच मनातल उत्तर सुन्दर शब्दात मांडले तुमच्या प्रमाणे मला पण चिन्याची पद्धत आवडते.

ईथे कुणी तरी म्हटले की संकट आले असता देवाचे नाव घेण्यापेक्षा मी प्रयत्न करेन.. त्याना समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक वाचण्याचा सल्ला देता येइल "यत्न तो देव जाणावा"

असो देवाविशयी अजुन थोडे..
चिन्याच्या म्हणण्याप्रमाणे देव निर्गुणही आहे व सगुणही ह्याची प्रचिती आपण सर्वत्रच पहातो. जसे ईश्वर हा निर्गुण जरी असला तरी तरी तो सगुण स्वरुपात प्रगट झाला आहे. याला आधार म्हणजे तुम्ही आम्ही, हे विष्व, जीव, सृष्टी सगळच ही सगळी देवाचीच व्यक्त रुपे आहेत.

झक्की म्हणतात की जसे गुरुत्वाकर्षण म्हणजे एक शक्ति अशी कल्पना असे मानुन मग त्यावर सम्शोधन झाले पुढे त्याचे सुत्र, प्रमेय मांडण्यात आले तसेच देवाबाबत झाले असु शकते पण ज्याप्रकारे गुर्त्वाकर्षण ही कल्पना नाही हे सिद्ध झाले तसे संतांच्या उदाहरणातुन देव ही कल्पना नाही हे सिद्ध होते.

जर कुणी म्हणेल की नाही आम्हाला गुरुत्वाकर्षण भौतिक स्वरुपातच दाखवाच तरच आम्ही मानु तर त्याला आपण मुर्खच समजु तसेच कुणी देव आहे हे भौतिक स्वरुपात दाखवा म्हणणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण ही शक्ति पहाता येत नाही पण त्याचे परीणाम आपण पाहु शकतो तसाच निर्गुण ईश्वर आपण पाहु शकत नाही पण हे विष्वच त्याचा सगुण परीणाम आहे असे आपण दाखवु शकतो. अर्थात वैज्ञानिक अंधश्रद्धेचा चष्मा दुर सारला तरच.

अर्थात देव समजण्यापर्यंत मेहनत घेण्याची तयारी हवी कुणाची ती नसते म्हणुन मग देवच नाही अशी पळवाट काढुन स्वता:ची फ़सगत करुन समजुत काढण्यात येते... मला माझ्या शिक्षणाच्या काळी एका नातेवाइकाने म्हटलेले आठवते अरे कशाला अभ्यास करतोस अभ्यास करुन नौकरी मिळते का आज काल? अर्थात तो काळही तसा होता.. असो मुद्दा लक्षात आला असेलच.

अध्यात्म शास्त्रात भारतात जितके सन्शोधन झाले तितके कुठेच झाले नाही हे लक्षात येत. याचा अभिमान प्रत्येक भारतियाने बाळगण्यासारखा आहे. पण आता असे वाटते की ही संशोधक वृत्ती भारतापेक्षा आज तिकडे अधीक आहे. उद्या त्याना अध्यात्माची अनुभुती येइल तेन्व्हा आज आपल्याच अध्यात्माला अभ्यास न करता नावे ठेवणरे त्यांच्या "हो" ला "हो" म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत. जसे योगशास्त्र, विमानशास्त्राच्या बाबतित झाले आहे.


God, to us is not the creator who lives apart from the Universe but has manifested Himself as the Universe and pervades everything within. Thus, He is the indweller in all beings, material and energy. He has no form but at the same time, all forms are His. Linga Purana states, 'The foremost Linga which is devoid of smell, color, taste, hearing, touch, etc, is spoken of as prakriti (nature).

The Linga is only the outward symbol of the formless being, Lord Siva— Lord Siva incarnate, who is the indivisible, all-pervading, eternal, auspicious, ever-pure, immortal essence of this vast universe, who is the undying soul seated in the chambers of one's heart, who is one's Indweller, innermost Self or Atman and who is identical with the Supreme Brahman.



Vijaykulkarni
Sunday, August 12, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण ही शक्ति पहाता येत नाही पण त्याचे परीणाम आपण पाहु शकतो तसाच निर्गुण ईश्वर आपण पाहु शकत नाही पण हे विष्वच त्याचा सगुण परीणाम आहे असे आपण दाखवु शकतो.

कसे बरे?


Santu
Monday, August 13, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय
तुम्हि सकाळी सकाळि जिथुन रात्रि खाल्लेल्या अन्नाचा
विसर्ग करता तिथे आत चार बोट अंतरावर हि कुन्डलिनी असते.
तुम्हि चाचपुन बघु नका ति स्थुल अर्थाने तिथे नसते.तर मनाने
जाणुन घ्यावि लागते


Radha_t
Monday, August 13, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या त्याना अध्यात्माची अनुभुती येइल तेन्व्हा आज आपल्याच अध्यात्माला अभ्यास न करता नावे ठेवणरे त्यांच्या "हो" ला "हो" म्हणायला मागे पुढे पाहणार नाहीत
यात कुणाला कुठे कडवापणा जाणवतो का? किती अवीट गोडवा आहे, नाही का?
या BB वरच्या सगळ्या POST काढून त्यातले गोडवे शोधायला मला वेळ नाही. फक्त उदाहरणादाखल एक दिले.

योग या शब्दाचा अर्थ आहे a mean to connect u with divine
divine म्हणजे काय? योगांचा आणि देवाचा काय संबंध? योग आहे म्हणजे देव आहे अस तर नाही ना?

Chinya1985
Monday, August 13, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगांचा आणि देवाचा काय संबंध????योग हे तर देवाकडे जायचे मार्ग आहेत. ज्याला तुम्ही व्यायाम म्हणता तो हठयोग आहे. याशिवाय इतरहि योगप्रकार आहेत्-हठयोग,राजयोग,ज्ञानयोग,भक्तियोग,कर्मयोग,सांख्ययोग,सहजयोग इत्यादी.
योग आहे म्हणजे देव आहे अस तर नाहि ना???याचा काय अर्थ झाला????देवहि आहे आणि योगहि आहे. देव म्हणजे एखाद शहर समजा आणि त्या शहराला जाण्याचे हे विविध मार्ग आहेत. शहरहि आहे आणि मार्गहि आहेत. मार्गाशिवाय शहर असु शकते पण शहरच नसेल तर त्याच्याकडे नेणारे मार्ग असतिलच कसे??

च्यायला,धन्यवाद.


Chinya1985
Monday, August 13, 2007 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराष्ट्र टाईम्समधे आलेली जयंत नारळिकरांची मुलाखत्-
डॉ. जयंत नारळीकरांशी बातचीत-

पुणे विद्यापीठाच्या प्रशस्त आवारातील ' आयुका ' त पाऊल टाकताच एक धीरगंभीर शांतता पसरलेली दिसते. बौद्धिक वारं वाहणाऱ्या या वास्तूच्या आवारात जाताच पिनड्रॉप सायलेन्स म्हणजे काय , याची प्रत्यक्ष अनुभूती आल्याशिवाय राहात नाही. सर्वत्र हिरवळ आणि त्यामध्ये उभारलेले जगभरातील शास्त्रज्ञांचे पुतळे पाहात डॉ. जयंत नारळीकर या जगविख्यात शास्त्रज्ञाच्या ऑफिससमोर आलो.

आता पीए वगैरे मंडळींना भेटून सर्व सोपस्कार करावे लागणार , असं मनात आलं ; पण चक्क ऑफिस उघडं आणि डॉ. नारळीकर शांत चित्तानं टेबलावर काही जुनी कागदपत्रं घेऊन लिहीत बसलेले दिसले. त्यांना कामात व्यत्यय कसा आणावा , या विचारानं मी आणि एमआयटीचे मनोहर गणपुले थोडावेळ बाहेर थांबलो. त्यांचं लक्ष जाताच भेटीबाबत विचारलं. ' पाच मिनिटं थांबा! ' हे त्यांचं मवाळ भाषेत उत्तर. बरोबर पाच मिनिटांतच डॉ. नारळीकर स्वत: ऑफिसबाहेर आले आणि हसतमुखानं ' या ' म्हणताच आत गेलो. ' पंढरीची वारी ' हा विषय निघताच त्यांच्या स्मितहास्यानं मुलाखतीला आरंभ झाला...

सर , आपल्याकडे कुटुंबात मुलांवर लहानपणापासून धामिर्क संस्कार केले जातात. देवापुढे दिवा लावावा , प्रार्थना म्हणावी असं बिंबवलं जातं. करून घेतलं जातं. या सगळ्याचा काही फायदा होत असतो , असं तुम्हाला वाटतं का ?

- हो! नक्कीच होतो. त्यामुळं एक सांस्कृतिक पीठिका लहान मुलाच्या मनात तयार होते.

आपल्यावरही असे संस्कार झाले का ?

- हो. माझी आई सकाळी उठल्यावर संत तुकारामांचे अभंग म्हणायची. ते मी सतत ऐकायचो. आई माझ्याकडून रामरक्षा म्हणून घ्यायची. ' शुभम् करोती कल्याणम् ' म्हणायचो. यातून लोकांचं भलं व्हावं , ही वृत्ती दिसते. माझे वडील बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक असल्याने माझं बालपण बनारसमध्ये गेलं. विद्यापिठातील कॉलेजेसच्या इमारतीवरील शिखरं मंदिरासारखी बांधलेली आहेत. त्यातून आध्यात्मिक वारसा आधुनिक स्वरुपात जपला गेला आहे असंच वाटतं. विद्यापिठात छोटंसं मारुतीचं मंदिर होतं. आयुवेर्द शास्त्रातले डॉ. घाणेकर विद्यापीठामध्ये राहात होते. बनारस सोडल्यावर ते पुण्यात स्थायिक झालेे. त्यांनी ते मंदिर बांधलं. माझी आई मला त्या मंदिरात घेऊन जायची. बनारसमध्ये ' संकटमोचन मारुती ' प्रसिद्ध आहे. त्या मंदिरातही लहानपणी आईबरोबर जायचो. तिथल्या रामाच्या मंदिरातही जात असे. लहानपणी मी भगवद्गीतेचे चार ते पाच अध्याय पाठ केले होते. त्यांचा अर्थ जाणून घेतला होता. वयाच्या तिसाव्या वषीर् संपूर्ण भगवद्गीता मला मुखोद्गत होती. लहानपणी झालेले संस्कार हे मोठेपणीही टिकून राहातात. भगवद्गीतेत शिकण्यासारखं बरंच आहे , असं माझ्या लक्षात आलं. माझे आई-वडील भागवत पारायण करायचे. आमच्या घरी भागवत गंथ होते.

आपण कोल्हापूरला गेल्यावर आवर्जून महालक्ष्मीच्या मंदिरात जाता. ' देव ' या संकल्पनेबाबत आपणास काय वाटतं ?

- अंबाबाई हे आमचं कुलदैवत आहे. त्यामुळं कोल्हापूरात गेल्यावर मी महालक्ष्मीच्या मंदिरात जात असतो. देवाकडे काही मागितलं की देव देतो , अशी माझी भावना नाही. आपण माणुसकीनं जगावं , जी कोणती शक्ती असेल ती आपली काळजी घेईल , असं मला वाटतं. लोकांनी देवाकडे काहीतरी मागून देवाला कमीपणा आणला आहे.

आपण अंतराळाचा वेध घेणारे शास्त्रज्ञ आहात ; पण अंतर्मनाचा वेध घेण्यासाठी अध्यात्मिक शास्त्रावर आधारित ' पंढरपूर वारी ' चा उपयोग होतो , असं आपणास वाटतं का ?

- माणसामध्ये एक शक्ती आहे , त्या शक्तीचा विधायक कामासाठी उपयोग झाला पाहिजे. बंद आणि संपाच्या काळात जी मोडतोड होते , त्यातून शक्ती वाया जाते , असं मला वाटतं. पंढरपूरच्या वारीत चांगल्या भावनेनं लोक सहभागी झालेले असतात. वारीत एक शिस्त असते. एखाद्या ठिकाणी कुठे गदीर् झाली की तिथे काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आपल्याकडे असते ; पण वारीत लाखो लोक असतानाही तिथे गोंधळ होत नाही. एक आंतरिक शिस्त असते तिथे. मला ही एक मोठी घटनाच वाटते. वारीत कोणी स्वयंस्फूर्तपणे जात असेल , तर चांगलंच आहे. त्यातून वेगळा अनुभव मिळू शकतो.

आपण कधी वारीत सहभागी झाला होता का ?

- नाही. पण वारीत जायला मात्र आवडेल मला. वारीत जाऊन लोकांचे अनुभव ऐकावेत , असं वाटतं.

लाखो वारकरी दरवषीर् आषाढी-कातिर्कीला भक्तीभावाने पंढरीच्या वारीला जातात. याचा सामाजिक आशय काय असावा ?

- वारीत समपिर्त भावनेनं इतके लोक जातात. परत आल्यावर आपल्या कामाला लागतात. यातून कुठेना कुठे निकोप आणि निविर्कल्प समाजाची निमिर्ती होत असते , असं मला वाटतं.

' अणुरणीया थोकडा। तुका आकाशाएवढा।। ' असं तुकाराम महाराज म्हणतात. या उक्तीविषयी आपल्याला काय वाटतं ?

- संत आणि शास्त्रज्ञ हे दोघेही शोधक आहेत. फक्त ते वेगवेगळ्या दृष्टीनं बघतात. संत हे शोधक होते , त्यांनी जे शोधलं ते लोकांना सांगितलं. शास्त्रज्ञदेखील काही नियम सापडले की लोकांना सांगत असतात. सायन्सचे नियम का आहेत ? ते नियम नसते तर काय झालं असतं ? याच्यावर विचार केल्यास त्याचं उत्तर सापडत नाही. पण हे प्रश्ान् विचार करायला लावतात , अंतर्मुख करतात.

संशोधन करत असताना संतवाङ्मयात असे विज्ञानाशी संबंधित किंवा विज्ञानाला पूरक असे काही संदर्भ मिळाल्याचं आढळलं का ?

- हो! विश्वाचं वय किती याचा हिशोब लावताना ' ब्रह्मादेवाची एक रात्र ' या कोष्टकाचा संदर्भ उपयोगी पडला. त्यात सांगितलेला हिशोब तंतोतंत जुळतो. आपल्याकडच्या वाङ्मयात असे काही काही संदर्भ लागत जातात. म्हणूनच मी भागवत , विष्णूपुराणातील संदर्भ चाळत असतो.

पंढरीचा वारकरी पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवताच कृतार्थ होतो. त्याला मोक्षप्राप्तीचा आनंद होतो. एखाद्या वैज्ञानिकाने शोध लावल्यावर त्याला होणाऱ्या आनंदाची या क्षणाशी तुलना होईल काय ?

- एकादृष्टीनं होईल. आकिर्मिडीज ' युरेका युरेका ' म्हणाला. यातून त्याला झालेला आनंदच प्रकटला. मात्र , वारकरी भक्तिभावानं वारीला जात असतात. त्यांचं समाधान हे वेगळं असतं.

अनेक शतकं टिकून राहिलेल्या वारकरी परंपरेबद्दल काय वाटतं ?

- लोक झपाट्यानं बदलू लागले तरी ही परंपरा टिकून आहे. या परंपरेत ' आतली शक्ती ' आहे. रेडिओ आले , टीव्ही आले , तरी लोक पायी वारीला जातात. यातून ' आतली ओढ ' दिसते. त्यामुळे ही परंपरा टिकून राहिली पाहिजे.

विज्ञान आणि तंत्रयुगात वाढणाऱ्या तरूण पिढीनं वारीकडे कोणत्या दृष्टीनं बघावं ?

- मनाला शांती पाहिजे असल्यास तरूण वारीत सहभागी होऊ शकतात. मात्र त्यासाठी आतून इच्छा निर्माण झाली पाहिजे. फतवा काडून हे काम होणार नाही. याचा अर्थ तरुणांनी वारीला जायलाच हवं , असं मी म्हणणार नाही. संत वाङ्मयाचं वाचन करून तरूण ज्ञान प्राप्त करू शकतात. त्यातून माणुसकीची प्रेरणा घेऊ शकतात.


Radha_t
Monday, August 13, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्‍याच दिवसांपूर्वी एक कथा मी इथे post केली होती. काळाच्या ओघात ती कदाचीत वाहून गेली असावी. पण थोडक्यात अशी होती

एका गावात एक मास्तर पाण्याच्या समस्येवर तोडगा म्हणून सर्व गावकर्‍यांना श्रमदान करण्याचे आर्जव करतो. पण त्याचा plan फोल जातो. कुणिही तयार होत नाही. हे काम आपल नाही आम्ही का आमचे श्रम वाया घालवावे इत्यादी. पण तिथेच जेव्हा एक साधू येतो आणि एक मंदीर बांधण्यासाठी सर्वांना श्रमदान करण्याचे आवाहान करतो तेव्हा सगळे जण लगेच तयार होतात.

वारीमधे सगळे कित्ती शहाण्यासारखे वागतात. पण जर हेच लोक दुसर्‍या उद्देशाने दुसरिकडे कुठे एकत्र आले तर त्यांचे वर्तन कसे असेल, निर्विकल्प समाजाची निर्मीती वगैरे खरच होइल का हा संशोधनाचा भाग आहे.


Santu
Monday, August 13, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वारी मधे हे लोक शहाण्यासारखे वागतात))))) महिनाभर दहा लाख लोक
लोक शाहाण्यासारखे वागतात. ही फ़लश्रुती तरि काय कमी अहे काय. ग्यानबा तुकारामाचा गजर करत हे वारकरी जेव्हा पंढरिची वात चालतात हि काय साधी गोष्ट नव्हे.
व हि परम्प्परा आता जवळ जवळ आता ७०० वर्षे विना विलम्ब चालु आहे. व काळाच्या कसोटिला उतरली आहे.
व यात काहि फ़क्त अडाणि शेतकरि असतो असे नव्हे तर चांगले शिकले सवरलेले लोक पण असतात.
तसेच लोक पटकन मंदिर बाधायला तयार होतात कारण त्याना त्याना साधुचा जास्त विश्वास वाटत असणार.


Santu
Monday, August 13, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या
तुका आकाशाएवढा यात तुकोबाला हेच सांगायचे
आहे की जिवात्मा व परमात्मा यांचे मिलन झाले आहे.
व एवढासा जिव ही आख्खे आभाळ व्यापुन राहिला आहे.

शेवटि योग म्हणजे सुध्दा जिवात्मा ते परमात्मा असा प्रवास आहे

योग म्हणजे मनाचे विचार थांबवणे व मन निर्विकल्प करणे.
असे निर्विकल्प झालेले मन झाल्यानंतर च समाधि लागते.


Ashwini_k
Monday, August 13, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वारी म्हणजे ट्रेकिंग, पिकनिक, नुसते एक थ्रिल न समजता जे खरोखरच्य भक्तिभावाने ऊन पाऊस, घाट ह्या अडचणींवर मात करून पंढरपूर किंवा शिर्डी गाठतात त्यांची निष्ठा व धैर्य अचाट असते. त्यांच्या अंगी निर्माण झालेली सात्विकता त्यांना समुहात किंवा एकएकटे असताना देखिल चांगलेच वागायला भाग पाडते (मनात देवाचा धाक असतो व तो धाक त्यांना जास्तीतजास्त चांगले वागायला भाग पाडतो).

तसेच वारीत सहभागी न होताही जो देवाचे अस्तित्व सतत आपल्या अवतीभवती अनुभवतो त्याच्याही मनात धाक असतोच.

जसे देवळात चप्पलचोर असतात तसे वारीतही दुसर्‍याच उद्देशाने सहभागी झालेले असू शकतात त्यामुळे जनरलाइज करु शकत नाही. पण जो खरा वारकरी असतो तो नक्कीच कुठेही चांगलाच वागायचा प्रयत्न करेल.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators