Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 09, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 09, 2007 « Previous Next »

Chinya1985
Wednesday, August 08, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला मी झक्किंना मागेहि विचारल होत की तुम्हि नक्कि ठरवा देव आहे का नाहि ते. मग काल म्हणाले की चर्चेअंती मला कळाले की देव नाहि आज म्हणत आहेत की एकाग्रतेने त्याची प्रार्थना करावि.

स्लार्ति natural selection ही पण सर्वमान्य थिअरि नाहि. काही सायंटिस्ट म्हणतात की त्याला पण लिमिटेशन्स आहेत. नक्की आठवत नाहित कुठले पण माणसाची इंद्रिय प्राण्यांपेक्षा कमि ताकतवान का आहेत

सावट, भगवान कृष्ण भगवद्गीतेत सांगतात की-
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि
भगवद्गीता-३.२२
भाषांतर्-हे पार्था (अर्जुना) ,सार्‍या तिन्ही लोकात मला काहि कर्तव्य असे करायचे नसतें,तसेच मला काहि गोष्टींची गरजही नाहि, मला कोणती वस्तु प्राप्त करण्याचिहि आवश्यकता नसते. तरिसुध्दा मी कर्माचे आचरण करतो.

यदि ह्रहं न वर्तेय जातु कर्मण्यतन्द्रित्: |
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश:
भगवद्गीता-३.२३
भाषांतर्-कारण मी जर तसे केले नाहि तर सर्व लोक त्याचेच पालन करतिल.

त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी जर तप केल्याचे उदाहरण असेल तर ते जगाला मार्ग दाखवण्यासाठी केलेले आहे. तपाशिवायही कृष्ण भगवानच होते आणि तपापुर्विहि त्यांनी आपण भगवान आहोत हे दाखवणार्‍या लीला केलेल्या होत्या. भगवानांनी जन्म घेतला त्यावेळेस त्यांनी चार हात असलेल्या नारायणाचे रुप धारण केले. देवकिने त्यांना विनंति केलि की साधारण बालकाप्रमाणे रुप धारण करावे त्यानंतर त्यांनी तसे रुप घेतले. त्यामुळे तपामुळेच ते भगवान झाले म्हणने चुकिचे आहे.

राधा भक्ति देवाचिच होउ शकते फ़क्त. कारण मुळ प्रेम हे फ़क्त देवाबरोबरच होऊ शकते. इतर सर्व प्रेम (या जगातिल) हे त्या प्रेमाची नक्कल असते. या जगातिल प्रेम conditioned असते. एका दृष्टीने व्यवहार असते. मुला मुलिचे दूरच आई आणि मुलांचे प्रेमही conditioned असते. म्हणुनच आपण आई मुलांची भांडणे होताना बघतो, आई आपल्या मुलांना सोडुन निघुन जाते वगैरे वगैरे बघतो. कालच कोणितरि तुकाराम महाराजांचे बोल लिहिले होते की हे विठ्ठला, आम्हाला परतपरत या जगात जन्म दे मुक्ति नाही दिलिस तरि चालेल पण तुझा सहवास दे. गोकुळातल्या गोपि म्हणत हे कृष्णा तु आम्हाला बोलव, नको बोलवु, आमच्यावर प्रेम कर अथवा घृणा कर आमचे तुझ्यावरचे प्रेम कमि होणार नाहि. याला म्हणतात unconditioned love . जे फ़क्त देवाबरोबरच होउ शकते. यालाच म्हणतात भक्ति.


अश्विनि तरिहि हे विचार आमच्यापर्यंत पोहोचवलेस तु त्यामुळे तुलापण credit मिळणारच


Ashwini_k
Wednesday, August 08, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,

"राधा" म्हणजे कृष्णभक्ती (शुध्द भक्ती). -:-) जेव्हा वहावत जाणार्‍या मनाची "धारा" बुध्दीच्या आधिन होऊन "राधा" होते.


Radha_t
Wednesday, August 08, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण एखाद्याला केमिकल लोच्यामुळे देव दर्शन मिळाले आणि एखाद्याला तुम्ही सांगता त्या प्रमाणे खरोखरच भक्तीमुळे दर्शन मिळाले तर आपण त्यातला फरक कसा जाणावा? आम्हाला तर कुठलेच दर्शन मिळत नाही.
समर्थ रामदासांना केमिकल लोच्या झाला होता असे म्हणायचे आहे का?
कश्यावरून नाही?
भक्ती ही पूर्णपणे भानावर राहून, नित्यकर्मे करता करता केली जाते
संत गोरा कुंभाराने आपल्याच मुलाला तुडवले, याला काय म्हणावे?
संत तुकाराम ही शेताची राखण करता करता विठ्ठल नामात दंग झाले होते आणि गुरं सगळ रान साफ करुन गेली तरी त्यांना पत्ता नाही, हे कश्यात मोडते? केमिकल लोच्यात की मी पण हरवण्यात?

भ्रामरी मी रोज करते. ती करताना मला बरेच मोठे मोठे आवाज बर्‍याचदा ऐकू येत नाहीत. दारावरची बेल वाजलेली तर हमखास ऐकू येत नाही


Ashwini_k
Wednesday, August 08, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समर्थ रामदास आणि मुन्नाभाई यांच्यात काही फ़रक नाही का? हे राम! समर्थांनी "मनाचे श्लोक" लिहीले व पुढच्या पिढ्यांना "मन करा रे समर्थ" असा संदेश दिला. त्यातून तुम्हाला ते तात्पुरते मनोरुग्ण झाले होते असे वाटत असेल तर तुमची मर्जी!

मी भान हा शब्द मनाच्या असंतुलीत अवस्थेच्या विरुध्द अर्थाने वापरला होता. या अर्थाने, संत गोरा कुंभार हे पूर्ण भानावर होते परंतु ते किर्तन गजरात तल्लीन झाले होते व त्यांच्या हातून अपघात घडतो व त्यांना त्याचे वडिल म्हणून वाईट वाटतेच. (संतांना देखील दुःखाचे प्रसंग येतच होते पण त्यांच्या पाठीशी भक्तीची शक्ती असल्याने ते कोलमडून पडत नसत).


Limbutimbu
Wednesday, August 08, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> केमिकल लोच्या झाला होता
>>>> कश्यावरून नाही?
हा केमिकल लोच्या अन गडकर्‍यान्च बुधवार व्रत याच्यात काही साम्य असेल काय???? DDD

बाकी चालुद्या!


Zakki
Wednesday, August 08, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, अहो नुसता घोटाळा हो, प्रचंड घोटाळा. काऽही समजत नाही देव आहे की नाही?

मुख्य म्हणजे माझ्या पूर्वीच्या म्हणण्याप्रमाणे देव ही नुसती मनुष्याने निर्माण केलेली संकल्पना आहे, नि अध्यात्म म्हणजे ज्ञानी लोकांनी त्यावर केलेला उहापोह आहे. खूप logical आहे. पण ते म्हणजे कुठली तरी एक कल्पना घेऊन त्या अनुषंगाने तर्कपूर्ण विचार केले असता, काय काय सिद्धांत आपण मांडू शकतो ते म्हणजे अध्यात्म. त्याचा नंतर देव असण्याशी कितपत संबंध आहे? त्या तत्वज्ञानातून देवाबद्दल इतके निरनिराळे विचार नि वाद निर्माण होऊ शकतात, इतके अनेऽक मार्ग सापडतात ज्यायोगे देव प्राप्त होईल असे म्हणतात, की शेवटी कळेनासे होते, खरे काय नि खोटे काय?

म्हणजे एखाद्या दूरच्या ठिकाणी जायला अनेक मार्ग असावेत. एका मार्गावर सरळ जा, डावीकडे वळा उजवीकडे वळा, वगैरे. दुसर्‍या मार्गावर एकदम वेगळ्याच ठिकाणी वळा, किंवा सरळ जा. या Directions ची जर गल्लत झाली तर आपण कधीच इच्छित स्थळी पोचणार नाही.

माझे देवाच्या बाबतीत तसेच झाले. मग मी दुसरा विचार केला. देव नाही. आता काय करायचे, कुठे जायचे? उरलेले आयुष्य सुखात जगायचे एव्हढेच. उगीच बुद्धीला भ्रम व्हायला नको. जे आपल्याला समजत नाही, ते म्हणजे, Medicine, astrophysics, space, इ. गोष्टि खर्‍या असल्या तरी मी त्याचा नि आपला काय संबंध असे मानून राहू शकतो.





Slarti
Wednesday, August 08, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात कारण सांगायचे झाले तर मानवी मेंदू इतर प्राण्यांपेक्षा प्रगत झाला म्हणून. बुद्धीचा वाढता वापर झाला. दगडाच्या हत्याराने जर फळाचे कवच फोडू शकत असाल तर हात फार सशक्त होणार नाहीत, तेवढेच होतील जेवढी आवश्यकता आहे. The crux of evolution is that it doesn't aim to make you good, rather it aims to make you good enough.
हे limitations काय आहेत आणि कुठले शास्त्रज्ञ याचे काही संदर्भ देता येतील का ?

as an aside, do you think that the hindu theosophy is accepted by all the theists in the world ?

Tanyabedekar
Wednesday, August 08, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समर्थ रामदासांना केमिकल लोचा नसेलही झाला. पण त्यांनी ३५० वर्षांपुर्वी जे मांडले ते आज लागु पडेलच असे नाही. आता दासबोधातील मूर्खलक्षणे लागू पडतात (काही लोक असेही म्हणतील की मूर्खलक्षणे सर्वात जास्त आम्हालाच लागू होतात) पण म्हणुन जर रामदास म्हणाले की राम आहे आणि त्याची भक्ति करा आणि हे रामदास म्हणाले म्हणुन आपण हे मानायचे हे पटत नाही. काळानुसार, प्रगती नुसार संदर्भ, ज्ञानाचे क्वांटम, एखादी थेअरी प्रूव करण्यासाठी लगणार्‍या क्रॉस्-सायंटीफीक फॅकल्टीज हे बदलत नाही का?

अमुक एक गोष्ट गीतेमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, अमुक्-तमुक्-गुरु-बाबाचरित्रांमध्ये आहे म्हणुन ती प्रमाण मानणे ह्याला विरोध आहे. जसे १०० वर्षांपुर्वीच्या विज्ञानातील थेअरीज आज खोडुन काढण्यात येतात, त्यांना विरोध केला जातो तर आपण जुन्या पुस्तकांना मात्र बाबा वाक्यं प्रमाणं म्हणुन कवटाळुन बसतो. ३००, ४००, १००० वर्षांपुर्वीचे पुस्तके व त्यातील विचार हे जसेच्या तसे प्रमाण मानणे कारण केवळ त्या पुस्तकांना तत्कालीन समाजाने एक विशिष्ट दर्जा दिला आहे?


Chinya1985
Wednesday, August 08, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ति, तुम्ही दिलेला बुध्दिचा मुद्दा natural selection देतो का??मला वाटत की दुसर्‍या थिअरि याबद्दल लिहितात. natural selection प्रमाणे + ve गोष्टीच पुढे जातात. त्याप्रमाणे आपले हातही ताकतवान असायला हवेत. i don't think hindu theisist r accepted all over world.

अश्विनि मला माहित आहे राधा म्हणजे कृष्णभक्ति. मी पोस्ट लिहिणार्‍या राधाच्या प्रश्नाला उत्तर लिहिले होते.

राधा, केमिकल लोच्यानी देवदर्शन घडल्याच कुठल उदाहरण माहित आहे का तुला??तु भ्रामरि करतेस तर तुला बेलचा आवाज येत नाहि मग तुझ्या डोक्यात केमिकल लोचा झालाय अस तु म्हणते का??बाकी अश्विनिनी दिलेल उत्तर बरोबर आहे. याबद्दल मी असे सांगेल की आपण खुप विचार करत असतो त्या विचार करण्याची क्रिया २ पध्दतिने थांबवता येते १)जे विचार डोक्यात येतात ते witness करायचे. २) एकाग्रता. या गोष्टी परस्परविरुध्द आहेत. पहिली गोष्ट आहे awareness आणि १००% गोष्टींचा awareness. आणि दुसरी गोष्ट आहे एकाग्रता म्हणजे १% गोष्टीवर पुर्ण लक्ष केंद्रित करायचे आणि ९९% गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. विचारपध्दतिच्या पुढे जाउनच आध्यात्मात प्रगति होते. त्यामुळे awareness सकट भक्ति आणि तल्लिन होणे या दोनहि गोष्टी बरोबर आहेत. केमिकल लोचा झाल्यानंतर परिस्थिति अजुन खराब होत जाते इतर साइन्स दिसतात तसेच औषधे घेतल्यावर असे दिसणे कमि होते. हे देवाच्या बाबतित होत नाहि. त्यामुळे तो केमिकल लोचा नाहि.

झक्कि अहो घोळ होणार कसा नाही??कारण देव ही एक संकल्पना आहे असे ठाम मानुन तुम्हि पुढे जात आहात. तुमचे हे म्हणनेच चुकिचे आहे. तुमचि देवाबद्दलचि थिअरि हा फ़क्त कल्पनाविलास आहे त्याला पुरावा काहिच नाही. देव आणि astrophysics, space या भिन्न गोष्टी आहेत. दिशेच्या गल्लतिचि चिंता तुम्ही कशाला करता??हे अवघडच प्रकरण आहे. मी उद्या एका नव्या पत्यावर जाताना रस्ता चुकलो तर??म्हणुन घरातच बसुन रहायच??देवाचि भक्ति करा भगवान श्रीकृष्ण सांगतात की जर एखादा माणुस या भक्तिमार्गावर चालु लागला आणि काही कारणांनी तो मार्ग सोडुन परत ऐहिक सुखांकडे वळ्ला तरि त्याची भक्ति वाया जात नाहि. मी पुढच्या जन्मात त्याला परत माझ्याकडे येण्याचा मार्ग दाखवतो. त्यामुळे दिशेचा घोटाळा झाला तरि हरकत नाहि तुम्हि घरातुन निघा तर अगोदर!

तन्या, हजारो वर्षांपुर्वि सांगितलेल्या या गोष्टी आजहि लागु पडतात त्यामुळे त्या मानण्यात काहि चुक नाहि. या हजरो वर्षापुर्विच्या गोष्टींना समाजाने दर्जा दिला म्हणुन नव्हे तर त्या follow करुन आजही आध्यात्मिक प्रगती होते म्हणुन पाळाव्यात. या गोष्टी काय आहेत हे जाणुन न घेता त्यांना विरोध करणे कारण त्या जुन्या आहेत हे तर सरासर चुकिचे. skeptic लोकांच्या नादि लागणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.





Deshi
Wednesday, August 08, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके आपण ह्यावर बोलु.

त्यांचा सर्व पुस्तकातील जसे मनाचे श्लोक व दासबोध यातील आता काय लागु होत नाही हे सांगाल का?


Rachana_barve
Wednesday, August 08, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देह नश्वर आहे. ह्या जगात श्वाश्वत असे काही नाही. आलेला माणूस मरणारच आहे. सुख हे क्षणभंगुर असते. त्यामूळे त्याच्या पाठीमागे लागून आयुष्याचे नुकसान करुन घेउ नका. ई ई ई..
ह्या सगळ्या शिकवणी अनुभवाने का होईना माणसाला पटलेल्या आहेत. पण तरीही ह्या गोष्टी सतत सांगणारा ग्रंथ किंवा गुरु का लागत असावा? सतत सेम शिकवण सांगणारी पोथी ग्रंथ वाचून( पारायण ) काय मिळते?


Slarti
Wednesday, August 08, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुद्धीतून natural selection "येत" नाही, नैसर्गिक निवडीतून बुद्धी येते. हात 'ताकतवान' म्हणजे काय ? आता हात ताकतवानच आहेत. ते गोरिलाच्या हाताएवढे ताकतवान नाहीत कारण तेवढ्या ताकतवान हातांची गरजच भासली नाही. I reiterate, evolution gives you what's good enough, NOT what's good in absolute terms. दुसरी गोष्ट अशी की आपल्या पूर्वजांचे हात आपल्यापेक्षा सरासरीने जास्त ताकतवान होते e.g. neanderthal man, cromagnon man etc . मग ते हात अजुन अशक्त का झाले ? कारण काही विशिष्ट कामांसाठी ते हातांच्या शक्तीवर अवलंबून होते. नंतर साधने आली, हत्यारे आली, समूहातील जीवन अधिक efficient झाले ( communication सुधारत गेले). हातांद्वारे कमी शक्ती लावूनसुद्धा कामे होऊ लागली. This is evolutionary atrophy. साहजिकच एकूण अंगकाठीत फरक पडला.
दुसर्‍या theories कोणत्या ? तुम्ही जरा संदर्भासहित बोललात तर बरे होईल. मी आधीच्या post मध्येही संदर्भ विचारले होते.


Aschig
Wednesday, August 08, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या, विज्ञान जरी प्रगत होत असले तरी ते अनिश्चिततेच्या शब्दांमध्ये अडकलेले असते. आपल्याला अजुन सर्व समजले नाही, पण हळुहळु प्रगती होते आहे. या उलट हजारो वर्षांपुर्वी जी eternal bliss ची स्वप्ने दाखवल्या गेली त्यांच्यामागे लोक अजुनही आहेत यात आश्चर्य काय? slarti , याचमुळे विविधदेशीय theists कोणत्या ना कोणत्या प्रकारे या मृगजळामागे धावतात. विज्ञान चुकिच्या theories काढुन टाकतं, पण अध्यात्मिक theories ना मात्र आशेमुळे लोहचुंबकाप्रमाणे अधिकाधिक गोष्टी येऊन मिळतात. त्या mass movement मुळे इतरही लोक म्हणतात की पहा, इतके लोक कसे चुक असु शकतील? (अर्थात तुम्हाला हे सांगायची गरज नाही)

चिन्या, नदी-नाले आणी समुद्र यात common असे पाणी असल्यामुळे तुम्हि ती उपमा वापरलीत. ते सोडल्यास ते अद्वैत किंवा इतर कोणत्याही वादाला कसे लागू होते? एखाद्या astronaut ने थोडे पाणी मंगळावर नेले तर त्याबद्दल या संदर्भात तुम्हि काय म्हणाल? किंवा, extreme heat मुळे पुर्ण समुद्रच आटला तर? analogies मुळे फार काही साध्य होत नाही.

evolution चे काहीही ध्येय नसते (असु शकत नाही). त्यामुळे गोष्टी improve होतील असे मानणे चुकिचे आहे. कितितरी false starts नंतरच जीवन सद्य स्थितीला पोचले असावे. evolution is blind .


Slarti
Wednesday, August 08, 2007 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It's true that evolution is blind in the sense it doesnt have an aim per se. What I meant is written better in the later post. It works in such a way that there is always improvment. Evolution goes ahead with two legs viz. genetic mutation and natural selection. Among all the random genetic mutations only those which show some improvment sustain. The other mutations are a 'false start', but they are not selected, so they are not part of the evolution. Check out the information about the simulation by Nilsson and Pelger in the link given.

Zakki
Wednesday, August 08, 2007 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, उपदेशाबद्दल धन्यवाद.

मी माझ्या बुद्धीच्या मर्यादा सांगण्यासाठी त्या इतर विषयांचा उल्लेख केला होता.




Chyayla
Thursday, August 09, 2007 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, अतिशय उत्तम व माहितीपर पोस्ट लिहिलीस.

झक्की, तुम्हाला देव काय आहे ते माहिती करण्याच्या भानगडीत न पडता सुखी व्हायचे म्हणता भलेही त्यासाठी ईतर जग दुखी: होवोत, जसे जगातल्या ८०% साधन सम्पत्तीचा उपभोग २०% लोकसंख्या करते तर बाकीचे दरिद्री, अज्ञानी व अंधारात खितपत पडलेले असोत मला काय त्याच मला मिळाले बस याला म्हणतात भोगवाद. आणी ही भोगवादाच्या जाणीवेला एक अडसर आहे देव आणी तिथे पंढरी घाबरते कारण देव ईकडे तिकडे शोधण्याची गरजच नाही तो स्वता:तच आहे. माणुस भलेही जगाच्या चोरुन पाप करेल पण स्वता:पासुन कसा लपवु शकेल. म्हणुनच म्हटले आहे देव सगळ पहातो ते या संदर्भात. आणी यासाठी लोक स्वता:ला फ़सवुन देव वैगेरे काही नाही अशी स्वता:ची समजुत काढतात नव्हे प्रयत्न करतात.

दुनियासे बचोगे पर खुदसे बचकर कंहा जाओगे म्हणुनच इस्लाममधेही देवाला खुदा म्हटले आहे खुदा हा शब्द "खुद" या शब्दापासुन आला आहे आणी त्याचा अर्थ सगळ्यानाच माहित आहे.

असो मी तुमची सुटका करतो जरा विचार करा तुम्ही ज्या skeptic लोकांप्रमाणे विचार करत आहात. त्यानी देवाला निकालात काढले कारण काय तर Root of Evils is GOD हे त्यांच तत्वज्ञान आणी मी जर त्यांच्या जागी असतो Dawkin च्याही जागी तर मला सुद्धा तसेच वाटले असते कारण..
ही मंडळी जीथे पाश्चात्य देशात राहतात तिथल्या परिस्थिती व अनुभवानुसार त्यानी स्वता:चे मत बनवले जसे बायबल मधल्या अवैज्ञानिक गोष्टी व कित्येक निरर्थक गोष्टीमुळे त्यांचा काय कुणाचाही भ्रमनिरास होणे अगदी साहाजिक आहे. कारण त्यान्नी देवाला कोणीतरी भौतिक सुखे देणारी व्यक्ति बनवुन टाकली आहे. ठीक आहे अशा देवाची प्रार्थना केली की सुख मिळत म्हणतात पण मनुश्य कायम सुखी राहु शकत नाही दुख होतेच तेन्व्हा देवाला दोश जाउ नये म्हणुन Devil ची व्यवस्था केली आणी मग दे त्याला शिव्या.

ह्याला म्हणतात देवाबद्दलच्या संकल्पना आणी मग त्याला मिळते Mass movement कारण तिथे देवाच्या नावाखाली मृगजळ Eternal Bliss वैगेरे दाखवले जते त्यातुनच जे परीणाम निघतात त्यावरुन निश्कर्श निघतो Root of all eveils is GOD आणी ते वरच्या सन्दर्भात अगदी बरोबर आहे.

पण जेन्व्हा हीच Theory आंधळेपणे ( Bloody indians are good copier असे पाश्चात्यच आपल्याला शिव्या का घालतात हे लक्षात येइल..) असो जेन्व्हा हे भारतिय अध्यात्म शास्त्राला (संतान्नी सांगितलेले, भोंदु बाबांचे नव्हे) त्याला जाणुन न घेता लावली जाते तेन्व्हा आस्चिग, राधा व ईतर Skeptic मंडळींचा सपशेल गोंधळ उडतो. ते तुम्ही पण समजुन घ्या. भारतिय अध्यात्म शास्त्र बायबल ख्रिश्चन यांच्या देवाच्या संकल्पनेच्या अगदीच निराळे आहे. तिथे असे काही मृगजळ किंवा दीवास्वप्न नसते तर निसर्ग नियम, सुख दुख हे असणारच ही Practical वस्तुस्थिती स्विकारुनच सुरुवातीला स्वता:ला जाणुन घेउन पुढे अध्यात्मिक उन्नति करत जाण्याचे सांगतो.

असो तुमची सुटका करण्यासाठी अजुन एक मुद्दा. Skeptic लोक प्रत्येक गोष्टीम्ध्ये वैज्ञानिक कारण शोधत आहेत (वैज्ञानिक प्रगतीला माझा विरोध नाही) आणी त्याना विश्वास आहे हे सगळ रहस्य विज्ञानाद्वारे कळेल. जसे चिन्या, अश्विनीने जे प्रश्न टाकले ते ही कळेल असे त्यांचे म्हणणे पण सध्या काही बोलु नका जसे आहे तसे त्यावरच विश्वास ठेवा.. आयला म्हणजे श्रद्धा आलीच (खुलासा: ईथे श्रद्धा कुण्या मुलीच नाव नाही )

विज्ञान जरी प्रगत होत असले तरी ते अनिश्चिततेच्या शब्दांमध्ये अडकलेले असते. आपल्याला अजुन सर्व समजले नाही, पण हळुहळु प्रगती होते आहे

उदाहरणार्थ, आश्चिगचे वरील वाक्य... म्हणजे एका अनिश्चिततेतुन निघुन आपण दुसर्या अनिश्चतेत अडकत जातोय असाच अर्थ निघतो ना मग या असल्या अनिश्चेत अडकण्यापेक्षा जे आपल्याला सध्या जाणीवेपलिकडे आहे तो देव आहे असे मानुन डोक्याचा ताप कमी करुन सुखी होणे तुम्हाला जास्त सोयिस्कर वाटत नाही का? तरी विचार करावा...

Shendenaxatra
Thursday, August 09, 2007 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
खुदा हा शब्द इस्लाममधे नंतर आला आहे. तो शब्द अरबी नसून फारसी आहे. तो शब्द महंमदाने वापरलेला नव्हता. मुस्लिम लोक दैनंदिन प्रार्थनेत हा शब्द वापरत नाहीत. केवळ अल्ला. खुदाचा अर्थ सेल्फ्-एक्झिस्टिंग, ज्याचे अस्तित्व अन्य कुणावर अवलंबून नाही असा. आपण दिलेला अर्थ साफ चुकीचा आहे.
विज्ञानासारखे अध्यात्मात कुठलेही विचार मंथन होत नाही. अमक्या संताने तमके म्हटले आहे ते खोटे कसे असेल असले प्रश्न विचारून ते तथाकथित ज्ञान लोकांच्या गळी उतरवले जाते. पुरावा मागायचा नाही. शंका घ्यायची नाही. हे विज्ञानापेक्षा फार विपरित आहे. विज्ञान अपूर्ण असले तरी त्यात असले पोकळ डोलारे नसतात. न्युटनने असे सांगितले आहे ते खोटे कसे असेल असा प्रश्न वैज्ञानिक परिषदेत ऐकू येत नाही पण ज्ञानेश्वराने असे म्हटले आहे बाबा तुम्ही आम्ही त्याला विचारणारे कोण येरेगबाळे असे समस्त बाबा साधू अनेकदा सांगतात.


Aschig
Thursday, August 09, 2007 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रहस्य या शब्दावरुन्:

अध्यात्मीक stream मध्ये असे assume केल्या जाते की देवाने (म्हणजे जे काही जसे काही ज्याला समजायचे त्यानी समजावे) सृष्टी निर्माण केली आणी असे assume केल्या जाते की त्याला follow केल्याने (ज्ञान, भक्ति ई. मार्गांनी) की आपले कल्याण होते. यात रहस्य असे काही नाही (कारण assumptions/declarations आहेत).

विज्ञानात आपण कुठे जाणार या बद्दल रहस्य काहीच नाही ते आपल्यावर अवलंबुन आहे bomb टाका, किंवा गुण्यागोविंदाने रहा. कुठुन आलो (नेमके) हे रहस्य हळुहळु उलगडणे सुरु आहे.

झक्कींनी mention केलेल्या गोष्टी उदा. astrophysics, genes ई. हे त्या एका रहस्याचेच भाग आहेत. jigsaw puzzle प्रमाणे.

एखाद्या कादंबरीप्रमाणे जग वाचायचे सोडुन ( I hate analogies! ) लोक assume करतात की hero चाच वीजय होणार आणी सगळे मजेत रहाणार details च्या मागे कशाला लागा? मग कादंबरी वाचायची तरी कशाला?


Tanyabedekar
Thursday, August 09, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, अनिश्चिततेमुळे डोक्याला ताप होतो हे विधान सहज टाकलेस तु. पण सगळ्यांच्या डोक्याला ताप नाही होत. कुणाला मजा पण येते.

लोकांचा देवावर विश्वास असण्याचे अजुन एक कारण मला वाटते. ते म्हणजे अनिश्चिततेला घाबरणे. उदा. मी मेल्यावर काय? मग आत्मा, स्वर्ग अश्या गोष्टी येतात. मेल्यावर काय ह्याचा विचार कशाला. मेलो की संपले. फ्रेम ऑफ रेफरंस ओव्हर. समजा मेलो तरी आपला काही अंश उरणारच असेल तर त्याच्या बद्दल आपण ह्या जन्मात काहीही सांगू शकणार नाही. कारण परत तेच. फ्रेम ऑफ रेफरंस.

ह्या वरुन एक आरती प्रभूची कविता आठवली. तिचे शेवटचे कडवे मला फार आवडते:

खुपच मजा आला---

प्रारंभीच सूर मारून
ज्याने तळ गाठला
तोच फक्त जळत्या घरात
डाव मांडून बसला

नाहीच मनात असताना
ज्याने होकार दिला
नाहीपणाच्याच प्रतिध्वनीत
त्याचा उर फाटला

एक तर सहज आला गेला
त्याचा प्राण म्हणाला
शवही बेटे मस्त जळते
खुपच मजा आला


Radha_t
Thursday, August 09, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समर्थ रामदास आणि मुन्नाभाई यांच्यात काही फ़रक नाही का?
नक्कीच आहे. समर्थ संत होते, मुन्नाभाई गुंड. पण जर एखाद्या गोष्टिचा ध्यास घेतला तर दर्शन घडु शकते. तसच संतांनीही एखाद वेळी देव दर्शनाचा ध्यास घेतला असेल आणि त्यांना दर्शन झाले असेल. जिथे मोठ मोठ्या चुका होऊ शकतात तिथे केमिकल लोच्या झाला तर नवल ते काय?
संतांना देखील दुःखाचे प्रसंग येतच होते पण त्यांच्या पाठीशी भक्तीची शक्ती असल्याने ते कोलमडून पडत नसत
भक्तीची शक्ती की भक्तीची ढाल? देवच जाणे.
मग तुझ्या डोक्यात केमिकल लोचा झालाय अस तु म्हणते का
आजिबात नाही. नुसत्या भ्रामरीमधे सुद्धा माणसाचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटू शकतो, विठ्ठल नाम जपातही तो तुटला आणि चुका झाल्या तर नवल नाही. पण चूक ही चूकच असते. त्याला भक्तीच पांघरूण कशाला?
Aschig शेवटची post आवडली आणि पटलिही


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators