Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 08, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through August 08, 2007 « Previous Next »

Radha_t
Tuesday, August 07, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीतर राम कृष्णांसारखे हेही काल्पनिक म्हणाले असता म्हणुन यांचीच उदाहरणे देत आहे
राम कृष्ण काल्पनीक नसतीलही कदाचीत,पण मूळ कथा बाजूला राहून दंतकथा वाढिला लागल्या नसतील कश्यावरून?

जर हनुमान अमर आहेत तर तो कुठे आहे? कुणालाच दिसत का नाही? असे अनेक प्रश्न उभे रहातात ज्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. शक्ती आणि भक्तीच प्रतीक असणारा हनुमान मान्य आहे. पण सूर्याला गिळायला निघाला, इंद्राने अस्त्र फेकले, पवन देवाने पृथ्वीवरचा सगळा प्राण वायू काढुन घेतला या सगळ्या दंतकथा वाटत नाहीत काय?


Ashwini_k
Tuesday, August 07, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हनुमंत अर्थात "महाप्राण" आपल्या सुषुम्ना नाडीत खेळत असतात व आपल्याला बळ पुरवत असतात. हनुमंत सप्तचिरंजीवांपैकी एक असले तरी आपण पाहू शकत नाही (दर्शनासाठी आपली भावावस्था तशी असली पाहिजे). तरीही जे लोक पूर्ण श्रध्देने हनुमंताची उपासना (हनुमान चलिसा, मारुती स्तोत्र इ.) करतात त्याना नक्कीच अपेक्षीत चांगले बदल दिसतात.

Limbutimbu
Tuesday, August 07, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> जर हनुमान अमर आहेत तर तो कुठे आहे? कुणालाच दिसत का नाही?
अग राधे, हनुमान म्हन्जे काय डोम्बार्‍या कडच माकड वाटल का तुला की चवली पावली फेकली तर त्याच्या तालावर नाचुन दाखवेल???? DDD (हे दिवे हनुमानाला बर का, देवा लाईटली घ्या, मी तुमचाही भक्त हे!):-)

अश्विनी, वरची नावान्ची पोस्ट सुन्दरच!

नन्दिनी, व्यक्ती तितक्या प्रकृती!
एकात्मिक इश्वराचे किन्वा त्याच्या एकमेव चेल्याचे अस्तित्वा पासुन काही कोटी सन्ख्येने असलेल्या देवापर्यन्त,
त्याचबरोबर केवळ अन केवळ निसर्गाला प्रमाण मानणारे,
देव नाहीच म्हणणारे,
देव असेल पण मला दिसला नाही अस म्हणणारे,
मला दिसला नाही म्हणुन देव नाही अस म्हणणारे,
नैमित्तिक पुजा अर्चा करायला वेळ नाही किन्वा लाज वाटते म्हणुन देवाला नाकारणारे,
नैमित्तिक पुजा अर्चा करुन काही "व्याजा" सारखे राहुदेच, "मुद्दलातच" काही मिळाल नाही म्हणुन देवाला नाकारणारे.....
अग असे कित्येक प्रकार हेत, गोन्धळ उडणार नाहीतर काय होणार?


Satishmadhekar
Tuesday, August 07, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> नन्दिनी, व्यक्ती तितक्या प्रकृती!
एकात्मिक इश्वराचे किन्वा त्याच्या एकमेव चेल्याचे अस्तित्वा पासुन काही कोटी सन्ख्येने असलेल्या देवापर्यन्त,
त्याचबरोबर केवळ अन केवळ निसर्गाला प्रमाण मानणारे,
देव नाहीच म्हणणारे,
देव असेल पण मला दिसला नाही अस म्हणणारे,
मला दिसला नाही म्हणुन देव नाही अस म्हणणारे,
नैमित्तिक पुजा अर्चा करायला वेळ नाही किन्वा लाज वाटते म्हणुन देवाला नाकारणारे,
नैमित्तिक पुजा अर्चा करुन काही "व्याजा" सारखे राहुदेच, "मुद्दलातच" काही मिळाल नाही म्हणुन देवाला नाकारणारे.....

अजून एक प्रकार . . .

आपण ज्या धर्मात (अपघाताने) जन्माला आलो त्या धर्मातले देव हे खोटे आहेत पण इतर धर्मातले देव मात्र खरे आहेत असे मानणारे!

म्हणजे "जगात फक्त अल्ला हा एकच देव असून महंमद त्याचा प्रेषित आहे" आणि "देवाचे मानवावर इतके प्रेम आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र मानवाच्या उद्धारासाठी पृथ्वीवर पाठवून दिला" हे संपूर्ण खरे मानणारे पण श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीगणपती इ. भ्रामक कल्पना आहेत हे मानणारे!

हा प्रकार फक्त भारतातच आढळून येतो. भारतातले निधर्मान्ध या प्रकारात मोडतात.


Deshi
Tuesday, August 07, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेव्हा भक्ती हा एकच मार्ग आहे अस नाही. ज्ञान हाही एक मार्ग आहेच की. मग इतर मार्गाने जाणारे म्हणतात भक्ती आंधळी असते. देव बीव काही नाही तर त्यांच चुकल कुठे>>>>>>.

म्हणजे तु ज्ञान मार्गाने जात आहेस का? निदान तुझी पोस्ट तसे सांगते.

देव आहे की नाही माहीत नाही पण तिन्ही मार्गाने सत्या कडे जाता येते. ज्ञान, कर्म व भक्ती.

ईतर मार्गाने जाताना दुसर्यांचा मार्गांची हेटाळनी का करावी?

तुझ्याच पोस्ट प्रमाने त्या भाकड कथा होत्या. हे मान्य केले तरी देव नाही वा आहे हे सिध्द होत नाही रादर तो मुद्दाच नाही. तु अंधश्रध्दा व भक्ती याची गल्लत करत आहेस का? अंधश्रध्दा वाईटच. त्या कथा बाजुला केल्या तर बाकी जे पटते ते घ्यायला काय हरकत आहे?

जसे सत्यनारायनाची कथा भाकड आहे यावरुन १५ दिवसांपुर्वी मी एका सत्यनारायन करनार्याला बोललो व त्या वरुन वाद केला. जर देव असेल तर लिलावती नी प्रसाद खाल्ला नाही यावरुन नाव बुडविने वाईट कारन साधु वान्याने काहीही केले न्ह्वते. ही झाली भाकड कथा. पण त्यामुळे देव आहे वा नाही हे सिध्दच होत नाही असे वाटते. त्यामुळे श्रध्दा व अंध्श्रध्दा यात आपण फरक करायला पाहीजे.




Chinya1985
Tuesday, August 07, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनि, तु केलेल ज्ञान आणि भक्तिच वर्णन खुपच सुरेख. त्याबद्दल मन्:पुर्वक धन्यवाद.

देशी इथल्या लोकांच म्हणन आहे की देव मानण म्हणजेच अंधश्रध्दा आहे. तुम्ही देव आहे म्हणता ना मग तुम्ही अंधश्रध्दाळु आहात अस हे लोक म्हणतात.

लिंबु अनुमोदन.

राधा, तुला माझा भाऊ दिसत नाहि म्हणुन तो नाही अस सर्वांनी मानायच का??हनुमान आहेत ते कुणालाच दिसत नाहित हे चुकिचे. रामदासस्वामींना ते दिसले होते तुझ्या शाळेतिल शिक्षिकेला कोणी सांगितले की ओव्या लोकांनी लिहुन काढल्या म्हणुन??ति शिक्षिका तिथे उपस्थित होति का???ज्ञानेश्वरांनी रेड्यासारखी बुध्दी असणार्‍याकडुन वेद म्हणवले हेहि कोणि ठरवले?? तुझ्या शिक्षिकेने घरबसल्या ठरवायला ती पात्र आहे का???काहिहि पुरावा नसताना तिने असे म्हणने अंधश्रध्दा नाहि का?? याबद्दल लॉजिकल उत्तर माझ्याकडेही नाहि पण जगात इल्लॉजिकल बर्‍याच गोष्टी असतात. मी या सगळ्या दंतकथा का नाहित याबद्दल इतकच सांगतो की world is full of misteries जे योगात प्रवीण होतात त्यांना अशा काही शक्ति प्राप्त होतात. देवाच्या कृपेने भक्तांनापण अशा शक्ति मिळु शकतात. शेवटी हे सर्व वेगवेगळे नियम देवानेच निर्माण केलेले असल्याने देवाला त्या नियम बंधनात ठेऊ शकत नाहित. मला या विषयावर फ़ार चर्चा करण बरोबर वाट्त नाही कारण ह्या गोष्टी लॉजिकच्या नियमांच्या बाहेर आहेत.


Chyayla
Tuesday, August 07, 2007 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी फ़ारच सुन्दर.. अशा या चर्चेमधुन कधी कधी अशा सुंदर पोस्टही वाचायला मिळतात.

तुकारामांच्या विठ्ठलावरील भक्तीला कुणीच challenge करणार नाही.
सगळ सगळ मान्य...

राधा, अस कस मान्य होइल हो ते तर जीवनभर "विठ्ठल विठ्ठल" करत बसलेत आणी भगवंताचे गुणगान करत होते ईतरही संत महात्मे तेच करत होते मग ते सगळे खोटारडे नाहीत का? एवढ्या लोकान्ना देव आहे सांगुन त्यान्नी दीशाभुल केली नाही का? नुसती अंधश्रद्धा पसरवली नाही का? मग ते कितीही मोठे भक्त असेनात का..

कारण तुम्ही जर म्हणता देवच नाही तर मग हे देव आहे म्हणणारे तुमच्या लेखी महामुर्खच असावेत ना?
तरी तुम्ही नक्की काय ते ठरवुन सांगावे ही विनन्ती.

देशीनी म्हटल्याप्रमाणे ते भाकड कथा वैगेरे राहु दे त्याची ईथे कोणी चर्चाही करत नाही. तो भाग बाजुला ठेवुन द्यावा पण त्यामुळे या संतांचे महत्व कदापीही कमी होत नाही.

ज्ञान मार्ग व भक्ति मार्ग हे जरी वेगवेगळे दीसत असले तरी एक गोष्ट लक्शात घे भक्तितुनच शुद्ध, अहंकाररहीत ज्ञान मिळत. ही सर्व भक्त संत मंडळी भक्तिमार्गाचे वारकरी आहेत पण मुर्ख नव्हती तर असामान्य ज्ञानी होते असे ज्ञान ज्यापुढे सामान्य मनुष्य आपोआप नतमसतक व्हावा शिवाय तिथे कुठे गर्वाचा मागमुस नाही. नाहीतर भौतिकवादी मनुश्य अल्पश्या ज्ञानानेही कसा हुरळुन जातो व कृतघ्न होतो ते आपण ईथेही पहातच आहोत.

दुसर्या शब्दात.. जेंव्हा भक्तिचे ताक घुसळल्या जाते तेंव्हा त्यातुन ज्ञानाचे लोणी बाहेर निघते. दोन्ही वेगवेगळे नाहीत एकातच दुसर्याचे अस्तित्व सामावले आहे. म्हणुनच तुझे दोन नावावर पाय ठेवुन चालणे कोणत्याच संदर्भात बसत नाही.



Chyayla
Tuesday, August 07, 2007 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून खूप काही शिकायचे आहे, करायचे आहे, नि देवाच्या मागे लागून ते होणार नाही!

झक्की तुम्ही नेमक काय शिकत आहात? आणी त्याचे उद्दीष्ट काय? जगात एवढ वैज्ञानिक संशोधन का सुरु आहे? ते नेमक काय शोधत आहेत? मनुश्य सुखी होण्यासाठी का? मुळात शिकायचच कशाला? त्यानी काय मिळणार आहे?

अध्यात्म व विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत तेंव्हा भौतिकतेचे महत्व मी मुळीच अमान्य करणार नाही. त्याकडे दुर्लक्षही करणार नाही. पण जे ही नाण्याची दुसरी बाजु नाकारुन केवळ भौतिकवादाचा उदो उदो करत आहेत त्यांच्याकडुन मला हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे. भौतिक जीवन जगायला मी काय एखादा पशु होउनही जगु शकतो पण मग हे सगळे शिकणे, शोधणे काय आहे हे कळाले तर बरे होइल.

मी झक्कींच्या उत्तराची वाट पहात आहे.. देव त्याना लवकर उत्तर द्यायची बुद्धी देवो. त्यानी जर हे संत, देव आहे असे म्हणत खोटारडे, मुर्ख, अंधश्रद्धा पसरवणारे असे सिद्ध केले तर त्यांच्या नादी लागण्यापेक्षा हुडा पाठोपाठ मी पण झक्कीना त्रिवार वंदन करेन.



Zakki
Tuesday, August 07, 2007 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाही वाटत मी कधी संत हे खोटारडे. मूर्ख आहेत असे कधी म्हंटले. उलट हजार वर्षे जे तत्वज्ञान विकसित होत गेले नि इतक्या लोकांचा त्यावर विश्वास बसला, त्या अर्थी त्यात काही तथ्य असावे, पण हे जे इतर भोंदू लोक अंधश्रद्धा पसरवतात, त्यामुळे त्याचे खरे स्वरूप कळत नाही, नि संशय येतोच की खरे काय? बरे ते खरे आहे याचा पुरावा फक्त ज्याचा त्याला मिळतो, त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात, किंवा बराच काळ लागतो.
ते जर आपल्याला शक्य नसेल तर देव असला काय नि नसला काय?

प्रयत्न नि वेळ या दोन्ही गोष्टी शास्त्रातहि खर्‍या आहेत. शास्त्राची प्रगतीहि झटपट झालेली नाही, पण आश्चिगना विचारा, ती होत आहे. आजच वाचले की Casimir forces जर कमी करता आले तर गोष्टी तरंगू शकतात! अजून फक्त Nano स्केलवर आहे.
DNA, Genes या योगे बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो. एक दिवस 'चेतना' काय हेहि कळू शकेल, नाही कसे म्हणावे?

मी स्वत:ला वैयक्तिक रीत्या काही ज्ञान मिळवू इच्छित नाही, किंवा संशोधन करू इच्छित नाही. पण जे करत आहेत, त्यांना करू दे, त्यांनाहि एकचित्ताने काम करावे लागते, जसे देवाची भक्ति करतात तशी. त्यासाठी देव आहेच असे मानणे आवश्यक नाही!


Zakki
Tuesday, August 07, 2007 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फक्त एक दोन गोष्टी कळल्या देवाबद्दल. अत्यंत एकाग्र चित्ताने त्याची प्रार्थना करावी लागते. केवळ भक्तिमार्ग, नामस्मरण पुरेसे आहे, फक्त एकचित्ताने पाहिजे, म्हणजे तुमचे ऐहिक नि पारलौकीक जगातहि कल्याण होईल. त्याबद्दलच्या दोन गोष्टी:

टेनिसन लहानपणी भारतात आला, तेंव्हा तो फार थोडे शिकलेला, बिना नोकरीचा, नोकरी करण्यास आवश्यक गुण नसलेला असा होता. त्याचे आयुष्य जवळ जवळ फुकट गेलेले. पण एक दिवस त्याने भारतात लोकांना विचारले की मी काय करू म्हणजे माझे भले होईल? त्याला सांगीतले देवाची भक्ति कर, नामस्मरण कर. तो म्हणाला, एकतर माझा देवावर विश्वास नाही, नि तुमच्या देवांची नावे मला म्हणता येणार नाहीत. त्याला सांगितले, ठीक आहे तू टेनिसन, टेनिसन असे म्हणत रहा. त्याने इमानदारीने तसे केले. आणि त्यातून त्याला जे ज्ञान प्राप्त झाले, (पुण्य मिळाले), त्याच्या जीवावर पुढे तो मोठा कवी झाला, ऐहिक सुखे मिळाली. परलोकाबद्दल काय? कुणास ठाउक? आहे का परलोक? असला तर त्या नमस्मरणामुळे त्याला मिळेल का? का नाही? देव सर्वत्र आहे, एकच आहे, त्याला अनेक नावे आहेत, टेनिसन पण असू शकते! म्हणजे देव आहे असे न मानतासुद्धा त्याचे भले झाले. म्हणजे मनाची एकाग्रता हे मुख्य. देव आहे की नाही हे नाही!


Zakki
Tuesday, August 07, 2007 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरी गोष्ट माझी जास्त आवडती.
एकदा नारदाला गर्व झाला की आपणच देवाचे सर्वश्रेष्ठ भक्त, कारण आपण सतत नारायण नारायण म्हणत असतो! पण तरी खात्री करून घेण्यासाठी त्याने भगवंताला विचारले, देवा तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण? विष्णू हसले नि म्हणाले, चल तुला दाखवतो. गोंधळून नारद त्यांच्याबरोबर निघाला. ते पृथ्वीवर आले, तिथे एक शेतकरी शेत नांगरत होता, नि तोंडाने देवाचे नाव घेत होता. विष्णू म्हणाले, हा माझा श्रेष्ठ भक्त.
नारदाने म्हंटले, का देवा थट्टा करता गरीबाची? हा माणूस ब्राम्हणसुद्धा नाही, त्याच्या घरात देवाच्या मूर्ति नाहीत. त्याने कधी ब्राम्हण भोजन घातले नाही, की दक्षिणा दिली नाही. हा कसा तुमचा भक्त?
देव म्हणाला मी सिद्ध करतो. देवाने त्या माणसाला नि नारदांना एक काठोकाठ भरलेला पेला दिला, नि म्हणाले हा पेला डोक्यावर ठेवून इथून तिथे चालत जा. पण पाण्याचा एकहि थेंब सांडता कामा नये.

दोघेहि निघाले. माणूस आपला पेल्याकडे लक्ष न देता, देवाचे नाव घेत चालत गेला. त्याने एकहि थेंब सांडला नाही. नारद मात्र नामस्मरण सोडून त्या पेल्याच्या काळजीने अगदी हळू हळू चालू लागले. मग त्यांना मधेच देवाचे नाव घ्यायची आठवण झाली, नि मग त्या गोंधळात त्यांचे पेल्याकडे दुर्लक्ष झाले नि पाणी सांडले!

देव हसून म्हणाले, नारदा, तुला ना उद्योग ना धंदा. तू सारखे माझे नाव घेतोस यात काय आश्चर्य? हा बिचारा माणूस संसाराचा भार खांद्यावर घेऊनहि माझे नामस्मरण करतो, मग तोच माझ्या दृष्टिने श्रेष्ठ नाही का?

नारदाने देवाचे पाय धरले.

तात्पर्य: पुन: एकाग्रता, नि केवळ नामस्मरण पुरे आहे. देव असू दे किंवा नसू दे.


Slarti
Wednesday, August 08, 2007 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> consider a hypothetical organism who happened to have a new sensory organ by mutation or evolutionary processes. There ought to be generations of that organism with that sensory organ present but no data interpretation skills.
To all these generations this extra organ is nothing but a burden to carry with no apperant advantages how evolution explains this?


Evolution doesn't provide for future ie natural selection doesn't provide for modifications that might be advantageous in future. So an organism doesnt develop a fully functional organ without the organism knowing/using its function. What ashish has written is true. Progression in the evolution of an eye is a good example. It started with some random genetic mutation in the form of a photosensitive cell which was not entirely useless. As the tissue underwent genetic mutations the brain and the nervous system also changed gradually. Every stage of development of an organ such as eye is useful. Another feature of natural selection is that it always works in order to improve. "Unlike human designers, natural selection can't go downhill, not even if there is a tempting higher hill on the other side of the valley." So the mutations will always be in the direction of improvment. Plz see
Where d'you get those peepers

>>> to interpret data and to make decisions based on observations; how this is connected to biology?

Now, the question of info processing and decision making... This is being studied under a relatively new branch of science called cognitive ecology. Foraging is a very fertile and obvious area to study these processes. There are two aproaches. Evolutionary ecology focuses on hypothesis that under certain ecological conditions natural selection should favour foragers sensitive to variance in environment. e.g. the animal would consider the "energy budget"... how much energy it needs, how much it can gain with various foraging options. Behavioral psychologists, in contrast, focus on animals' observed response to environmental variance and hypotheses about cognitive mechanisms underlying their behaviour. Cognitive ecology tries to combine both the approaches.
Of course, these people work in tandem with neurobiologists as they are the people who research these processes at neural level.
As an aside, some linguists now propose that the evolution of language has also, among other factors, brought about evolution of brain. In other words, it's not just us who change/modify the language but the evolving language also brings about changes in our brain. It is a "two-way" street. May be, genetic mutations (natural selection) and the cognitive mechanisms also evolve in a similar way. (the last statement is just off the top of my head, btw. It may be that this line of thinking is fundamentally wrong.)



Chyayla
Wednesday, August 08, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नाही वाटत मी कधी संत हे खोटारडे. मूर्ख आहेत असे कधी म्हंटले. उलट हजार वर्षे जे तत्वज्ञान विकसित होत गेले नि इतक्या लोकांचा त्यावर विश्वास बसला, त्या अर्थी त्यात काही तथ्य असावे, पण हे जे इतर भोंदू लोक अंधश्रद्धा पसरवतात

झक्की तुम्ही सुद्धा... तुम्हाला कोणी म्हटले की भोंदु लोकांच्या मागे लागावे मी तर संत काय म्हणतात त्यावरुनच तुम्हाला विचारले. तुम्ही तर म्हणता की देव नाहीच म्हणुन मी तुम्हाला हा प्रश्न केला. आता तुम्ही म्हणता त्यात तथ्य असु शकत, म्हणजे आम्ही नेमक काय समजाव? मानणे न मानणे दुसरा भाग झाला, तो वैयक्तिक असु शकतो. तो न मानल्याने ही काय फ़रक पडणार? हेही एका अर्थी बरोबर आहे व तो अमुक स्वरुपातच मानावा असलाही अट्टाहास नाही. जीथे बुद्धी कुंठीत होते, जाणीव होते की या ईंद्रियांच्या आकलना पलीकडेही काही तरी आहे तिथे देव म्हणुन आपण सोय केली आहे व ते जाणण्याची धडपड हा नैसर्गिक मनुष्य स्वभाव आहे. नाहीतरी पशुन्ना तरी देव आहे नाही काय फ़रक पडतो.

अध्यात्म म्हणजे काय अविज्ञानवादी, भौतिक जगाचे दरवाजे बंद करुन बसलेली व्यक्ति हा भ्रम कसा काय झाला तुम्हाला?


नामस्मरण पुरेसे आहे, फक्त एकचित्ताने पाहिजे, म्हणजे तुमचे ऐहिक नि पारलौकीक जगातहि कल्याण होईल.

मग हे पारलौकिक जग कसे काय मानता तुम्ही? केवळ मन एकाग्र करणे हाच नामस्मरणाचा उद्देश आहे का? त्यापुढे काहीच होत नाही का? तुम्ही नामस्मरण म्हणता ते बरोबर आहे त्यात मी वाल्याचेही उदाहरण जोडतो. वाल्याला तर "राम राम" म्हणता येत नव्हते त्यानी "मरा मरा" असा जप सुरु केला व पुढे ज्ञानी होउन जगाला रामायणा सारखा ग्रंथ उपलब्ध करुन जगत्कल्याण केले.

तुमचाही राधाप्रमाणे निश्चित गोंधळ झाला असावा. उलट देव हा अनादी, अनंत, निर्गुण, सगुण आहे असे म्हटल्या जाते त्याला कोणत्याही नावाने बोलवले तरी चालते. तुम्ही जे देवाचे नाम म्हणता ते आपण आपल्या सोयीसाठी मर्यादेत शक्तिनी शब्दरुपाने व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे नेमके तेच "प्रचलित" नाम घेतले काय अन न घेतले काय काही फ़रक पडत नाही पण याचा अर्थ असा नाही की देव नाहीच.

असो शेवटी मला हे म्हणायचे की तुम्ही भोंदु बाबांचे ऐकुन देव नाही असे म्हणणार की संतांचे ऐकुन त्यांच्यावर श्रद्धा ठेवुन देव आहे असे मानाल? एकप्रकारे तुम्ही भोंदुगिरीलाच सहाय्य करत आहात व खरे स्वरुप जाणण्याला स्वता:च खीळ घालता आहात. या BB चे शिर्शक आहे देव म्हणजे काय? त्यावर तुम्ही भोंदु बाबान्वरुन बनवलेली मते मांडणार की संतांच्या शिकवणुकीवरुन मांडणार. परत म्हणतो तुम्ही जर देव नाही म्हणत आहात तर संत आपोआप खोटारडे आहेत हे सिद्ध होते.

त्यासाठी एक रुपक आहे तळ्याकाठी भ्रमर व बेडुक दोन्ही राहतात भ्रमर फ़ुलातला मकरंद चाखतो तर बेडुक चिखलातच लोळतो त्यामुळे तुम्हाला बेडुक व्हायचे की भ्रमर ते तुमच तुम्ही ठरवा. अर्थात हे रुपक आहे त्याला दुसरे कंगोरे असु शकतात पण ते मला ईथे या संदर्भात देणे योग्य वाटते.



Radha_t
Wednesday, August 08, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला भक्ती आणि देव यांचा काय संबंध? भक्ती आहे म्हणजे देव असलाच पाहिजे का?

Saavat
Wednesday, August 08, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>तुम्ही नामस्मरण म्हणता ते बरोबर आहे त्यात मी वाल्याचेही उदाहरण जोडतो. वाल्याला तर "राम राम" म्हणता येत नव्हते त्यानी "मरा मरा" असा जप सुरु केला व पुढे ज्ञानी होउन जगाला रामायणा सारखा ग्रंथ उपलब्ध करुन जगत्कल्याण केले.
नमस्कार च्यायला,

एक विनम्र सुधारणा,

वाल्या कोळी उलट्या रामनामाने तरला, हे आपण जे मानतो ते साफ़ चुकीच आहे. नारदमुनीनी, त्याला भ्रामरीप्राणायामावर आधारीत 'श्रीराम' या महामंत्राची दीक्षा दिली होती. यामध्ये 'राम' हे रेचकावर बसवलेल होत, आणि म्हणुनच 'श्री' आपोआप 'पुरक' करताना होत होता. बाहेरून ऐकताना 'मरा' अस वाटायच आणि तेच रूढ झाला. असो..

बाकी चर्चा छान चालली आहे.

अध्यात्म शास्त्र हे अनुभवाच शास्त्र आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी बारा वर्ष तपश्चर्या केली होती. तपा शिवाय काहीही हाती लागणार नाही. आपल्या शरीरावरच आपला अधिकार-हक्क नाही, आणि शरीर म्हणजे आपण नाही हे कळण जेवढ अवघड आहे, तेवढच सोपही आहे, पण नारदासारखे सद्गुरु भेटण अतिशय जरूरी आहे. तो पर्यंत नाही..... .




Limbutimbu
Wednesday, August 08, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> भक्ती आणि देव यांचा काय संबंध? भक्ती आहे म्हणजे देव असलाच पाहिजे का?
अगदी बरोबर प्रश्ण!
भक्ती काय मी ऐश्वर्या रायचीही करू शकतो! (अगदी याही वयात ) DDD

अजुन कोणी सन्जुबाबाची भक्ती करु शकतील, नव्हे नव्हे, करत असतीलही!

मात्र तत्व अस हे की मर्त्य गोष्टीन्ची भक्ती करण्यापेक्षा जगनियन्त्याची करावी ज्यान हे विश्व निर्माण केलय!

बाकी चालुद्यात! मजा हे!


Radha_t
Wednesday, August 08, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या प्रश्ण नाही रे प्रश्न. न न नळाचा, ण बाणाचा नाही.

Ashwini_k
Wednesday, August 08, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू, चिन्या, च्यायला,

श्रीराम. श्री साईसच्चरितावर आधारीत परिक्षा देताना व माझ्या सद्गुरूंच्या प्रवचनांतून, अग्रलेखांतून जे थोडेफ़ार माझ्या मडक्यात शिरले, हृदयाला भिडले त्यातलाच हा काही भाग होता. माझे स्वतःचे काही नाही.



Radha_t
Wednesday, August 08, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर्शनासाठी आपली भावावस्था तशी असली पाहिजे
' लगे रहो मुन्नाभाई ' कोणी पाहिला आहे का? त्यात जसे त्याला गांधिजी दिसतात तस म्हणायचय का तुम्हाला

Ashwini_k
Wednesday, August 08, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"दर्शनासाठी लागणारी भावावस्था" हा कोणताही केमिकल लोच्या नाही. कुठल्यातरी धुंदकीत रहाणे, कुठल्यातरी शारिरीक प्रॉब्लेममुळे हेल्युसिनेशन होणे, टेन्शनमुळे ध्यास घेणे (जसा मुन्नाभाईने गांधीजींचा घेतला) ह्यागोष्टी म्हणजे मी म्हणते ती भावावस्था नाही. कारण भक्ती ही पूर्णपणे भानावर राहून, नित्यकर्मे करता करता केली जाते. भक्ती जेव्हा पराकोटीला पोहोचते व जेव्हा मनाची शुध्दता खूप वाढलेली असते तेव्हा दर्शन होऊ शकते. नुसते रुपच नाही, तर काही अतर्क्य, अशक्य वाटणार्‍या गोष्टीही "त्या"चे अस्तित्व दाखवतात.

समर्थ रामदासांना केमिकल लोच्या झाला होता असे म्हणायचे आहे का? अगदी अर्वाचिन ग्रंथांमध्येही भक्तांना दर्शन मिळाल्याचे उल्लेख आहेत. मी, "दर्शन घेतले" असे नाही, तर "दर्शन मिळाले" किंवा "दर्शन दिले" असे म्हणते आहे कारण "दर्शन घेतले" म्हणजे भक्ताचा "मी" पणा आला व "मी पणा" गळल्याशिवाय दर्शन अशक्य.

जितके पीठ तितकीच भाकर बनते. तसेच जितका भाव व आचार विचार शुध्द तितकाच आणि तेवढावेळच "तो" जवळ.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators