Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 13, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through July 13, 2007 « Previous Next »

Ksha
Wednesday, July 11, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मि,
तुमचा मुद्दा योग्य आहे, भा.पो. :-)

पण इथे तर्काबद्दल चर्चा चालली आहे आणि आपण दिलेले सर्व मुद्दे ही या मंडळींची वैयक्तिक मते आहेत. त्याला ठोस असा काही आधार नाही.
असो.
श्रिनी, माझं जरा तुझ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झालं होतं. पण आता परत त्याकडे वळलो आहे. आता दुसर्‍या कुठल्या पोस्टला उत्तर देणार नाही :-)


Aschig
Wednesday, July 11, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manoj, funny you should mention that quote. I had written about it in my March 8 2005 rangbirangi posting:

/hitguj/messages/58489/113166.html?1145510231

Mansmi18
Wednesday, July 11, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष,

अहो मला ते अ=ब्=क वगैरे काय भानगड आहे ते कळत नाही. देव आहे हे गणिताद्वारे किंवा प्रयोगाद्वारे सिद्ध वगैरे करता येते हे ज्ञान या BB वर मला मिळाले.:-)
पुलंच्या भाषेत म्हणायचे तर सुसंगतापेक्षा सुसंगती आम्हाला जास्त कळते.

वरील काही posts वाचुन मीही जरा godel वगैरेवर search मारली. शेवटी einstein साहेबाना देवाबद्दल काय वाटते या कुतुहलाने search केले तेव्हा हा लेख दिसला. यातील पुढील वाक्ये मला फ़ार आवडली.
म्हणुन तो post केला.
--------------------------------------
a person who is religiously enlightened appears to me to be one who has, to the best of his ability, liberated himself from the fetters of his selfish desires and is preoccupied with thoughts, feelings and aspirations to which he clings because of their super-personal value ... regardless of whether any attempt is made to unite this content with a Divine Being
---------------------------------------
Accordingly a religious person is devout in the sense that he has no doubt of the significance of those super-personal objects and goals which neither require nor are capable of rational foundation ... In this sense religion is the age-old endeavour of mankind to become clearly and completely conscious of these values and goals, and constantly to strengthen their effects.
-------------------------------------------------

बाकी तुमचे चालु द्या:-)





Ksha
Thursday, July 12, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वसूचना: माझी पोस्ट मराठीत असणार आहे त्यामुळे इंग्रजी शब्दांचे समानार्थी शब्द तंतोतंत तसेच असतील याची खात्री देता येणार नाही.

श्रिनी,
मला खूप प्रश्न पडला होता खरं तर तुमचं आणि अश्चिगचं लॉजिक वाचून. एकीकडे पटत होतं पण दुसरीकडे कळत होतं की काहीतरी गडबड आहे.
आज बराच विचार केल्यावर थोडासा प्रकाश पडला डोक्यांत! असो, आता आपल्या एक एक प्रश्नांची उत्तरे बघूया.
(नमनाला घडाभर नको! :-))

मी पूर्ण परत वाचल्यावर मला हे लक्षात आलं की सर्वशक्तीमान यांतल्या "शक्ती"च्या अर्थामध्ये गफलत होतेय. आपण (आणि प्रथमतः मी ही) शक्तीचा अर्थ "कार्य करण्यासाठी लागते ती उर्जा" असा घेत होतो. पण इथेच सगळी गोम आहे.
आणि मग जरा विचार केल्यावर "देव सर्वशक्तीमान आहे" या वाक्याचा अर्थ कळला, तो असा की

१. एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे देव हा सर्वव्यापी आहे. प्रत्येक अणूरेणूंत देव आहे. म्हणजेच प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव, या विश्वातील सर्व चराचर देवाने व्यापले आहे. आणि त्यामुळेच जर अशी कल्पना केली की एक अतिशय मोठ्ठा दगड जर देवाला उचलायचा असेल तर तो पूर्ण दगडच देव असल्याने त्याला हे सहज शक्य आहे. आणि त्या अर्थी तो सर्वशक्तीमान, रूढार्थाने नव्हे. आणि हाच सिद्धांत "सर्वज्ञ" या उपाधीबाबतदेखील मांडता येईल.

२. आता यांतलाच तुमचा दुसरा मुद्दा असा की जर देव सर्वव्यापी असेल तर ते हेच सिद्ध करते की देव सर्वशक्तीमान नाही (आपण अग्नि / वायु चे उदाहण दिले होते की जर त्यांत देव असेल तर ते सर्वशक्तीमान असायला हवे पण ते नाही वगैरे वगैरे)
पण एक महत्वाची गोष्ट अशी की ती म्हणजे ही प्रत्येक गोष्ट विधीच्या नियमांनी बांधली गेली आहे हा नियम विसरता कामा नये. आणि त्यामुळेच ते त्या वस्तूचे वा गोष्टीचे बंधन आहे. जर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव सर्वशक्तीमान परमेश्वरस्वरूप असेल तर मायेचे अस्तित्व सिद्ध होणार नाही कारण माया मुक्तीपासून दूर करते आणि परमेश्वराशी एकरूप होणे हीच मुक्तीची स्थिती आहे. पण आपण सर्वशक्तीमान नाही जे मायेचे अस्तित्व सिद्ध करते आणि त्यामुळे हे ही सिद्ध होते की परमेश्वर सर्वव्यापी आहे आणि सर्वशक्तीमानदेखील आहे पण मायेच्या बंधनामुळे त्याचे स्वरूप आपल्याला समजत नाही.

३. आता पुढचा मुद्दा असा होतां की जर देव सर्वशक्तीमान असेल तर त्यांला त्याची शक्ती कुठेतरी मर्यादीत करता यायला हवी. आणि ते खरेच आहे. परमेश्वराने हे मायेच्या सहाय्याने साधले आहे. हे सारे जगत् मायेच्या डोलार्‍यावर निर्माण करून त्यांतल्या प्रत्येक वस्तूला, जीवाला दिलेले बंधन ही त्यांतली एक प्रकारची मर्यादा.

पण त्याही पुढे जाऊन एक उदाहरण असे बघू जिथे हे अधिक स्पष्ट होईल.
उपनिषदे "तत्वमसि" असे म्हणतात. "तो तू आहेस". याचा अर्थ ते जे ब्रह्म, ते मी आहे. तो जो परमात्मा तो मीच.
आता असे असले तरी याचे मला ज्ञान (आत्मभान) नाही. याचे कारण त्याभोवती मायेची पुटे चढली आहेत. पण तरीही परमेश्वराने हे स्वातंत्र्य जीवाला दिलेले आहे की तो "मी कोण" या प्रश्नाचे उत्तर कधी विचारायचे ते ठरवू शकतो. परमार्थाची पहिली सुरुवात जीवाला करावी लागते. याचा अर्थ ही एका दृष्टीने देवाची देवावर असलेली मर्यादा म्हणता येईल की तो जीवाला परमार्थासाठी प्रवृत्त करू शकत नाही

पण याचा अर्थ तो मर्यादा घातल्यामुळे सर्वशक्तीमान ठरत नाही का? तर याचे उत्तर सुद्धा नाही.
ते असे,
"मी कोण" या प्रश्नांचे उत्तर शोधायचे स्वातंत्र्य जरी जीवाकडे असले तरी जीव हा मूलतः परमात्म्याचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे तो ही देवाचा अंश आहे. आणि त्यायोगे ते स्वातंत्र्य देखील देवाचेच आहे. आणि त्यामुळे या मर्यादेला एक pseudo-limit म्हणता येईल.
आणि यामुळे मर्यादा निर्माण केल्या तरीही देव सर्वशक्तीमानच राहतो.

मी तुमचा कुठला मुद्दा वगळला असेल तर कृपया कळवावे.


Shrini
Thursday, July 12, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

For your #1, 'potency' is the ability to do something. So your point doesn't answer if God can create a stone that's too heavy for Him to lift... because here're we're considering two entities: the God and the stone.

As for the other points, the moment you get 'maya' into picture, we're out of the realm of logic; because then it's a non-falsifiable hypothesis that can't be proven either way.

Do you have any other explanations that stick to logic/falsifiable hypothesis ?

Radha_t
Thursday, July 12, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पुरे हा शब्द्च्छ्ल. मला या सगळ्यातून एकच समजल, मानला तर देव नाही तर दगड.
ज्यांना मानायचा त्यांनी खुशाल दगडाला किंवा दगडातल्या देवाला कुरवाळत बसा आणि नाही त्यानी दगडाशी ठेच लागणार नाही याची काळजी घ्या ..

जे मानतात त्यांना नका मानू म्हणण्यात अर्थ नाही आणि न मानणायांना देव समोर आला तरी विश्वास बसणार नाही. मानायच मानू द्या नाही तर नाही ..

फक्त ...
१. आस्तिकांनी नास्तिकानां नावं ठेवू नका आणि vise versa
२. आस्तिकांनी नास्तिकानां आस्तिक व्हायची जबरदस्ती करू नका आणि vise versa
३. आस्तिकतेच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासू नका
४. नास्तिकतेच्या नावाखाली आस्तिकांच्या भावना दुखावू नका

म्हणजे झाल तर !!

आपण सगळेजण मिळून कशाला अंधश्रद्धा म्हणायच आणि कशाला श्रद्धा, ती पुसट सिमारेषा ठळक करायचा प्रयत्न केला तर ??

आता कोण तरी आस्तिक येऊन म्हणेल नास्तिकांनी श्रद्धेबद्दल ते काय आणि का बोलाव ? माझ्याकडे याच उत्तर नाही .. :-(

Chyayla
Thursday, July 12, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा, मला नाही वाटत ईथे कोणी आस्तिकाना नास्तिक व्हा किंवा नास्तिकाना आस्तिक व्हा म्हणतय.. सगळ्याना स्वता: काय वाटत ते विचार मान्डत आहे. त्यातल्या त्यात कोणी मत मांडायचा ऐवजी जीवनातल्या निराशा, अपयशाच खापर देव न समजुन घेता फ़ोडतात ते थाम्बवावे.

Slarti
Thursday, July 12, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shrini, let me try to interpret Ksha's argument. I think, there are really no two different entities. Suppose, God does create the Stone that s/he is unable to lift. But according to the argument of omnipresence, that Stone is also a part of god. (This may be crucial. The argument is that the "stone is part of God" and NOT "part of stone is god.") You are assuming that there will be something called God independent of that Stone. There isn't. So when you say "God is unable to lift the Stone" you are excluding the Stone from the concept of God which can't be done because of omnipresence. So what you are calling God in this sentence is actually not God but is an incomplete picture of God, something that is "God minus Stone." God is NOT God without the Stone. So since the Stone is a part of God (and NOT the whole God), God still has control over Stone. (The whole will always have control over its part. Is this a reasonable assumption ?)
By this same token, my assumption or your question of cration of Stone itself is challenged in terms of formation of a logically meaningful statement/question. What exactly am I refering to by the term God in that assumption ? How can you then form such a question logically ? I think by God (pun not intended !!) I mean to convey something that is much more than the Stone. When I say God in that sentence, I don't mean it as a separate entity than the Stone. I think this may be a problem of semantics and not necessarily of logic.

Now the question is : Can God create something that doesn't have God in it ? Is the omnipotent God capable of relinquishing omnipresence ?
What do you say, Ksha and Shrini ?

Mansmi18
Thursday, July 12, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यातल्या त्यात कोणी मत मांडायचा ऐवजी जीवनातल्या निराशा, अपयशाच खापर देव न समजुन घेता फ़ोडतात ते थाम्बवावे.
----------------------------------------------
chyayala

Perrrrrrrrrrrrrrrrrfect!!!!!


Slarti
Thursday, July 12, 2007 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PS I just realised that my post above will lead to the conclusion that God is unable to create the Stone in the first place. How about this : God can choose to relinquish the omnipresence while creating the Stone (doing which s/he is also impairing his/her omnipotence to certain extent) and then choose to have it later so that the Stone is but one of his/her part etc etc. By choosing to have his/her omnipresence back, s/he also regains his/her omnipotence. So in a way, s/he can limit his/her own omnipotence, too.
Does this sound too contrived ? The assumption I am making here is that the omnipotence works through the omnipresence (or that's a matter of choice for God). Consider the following possibilities -
1. The omnipresence is the fundamental property and the rest of the attributes are its logical 'by-products' which are equally potent. The derived ones can change the fundamental one (because of their own potency) and get altered themselves because of the change they initiate. If altered, how can these attributes retain their defining characteristics ? Well, the fact that omnipotence can alter itself is consistent with its definition, isn't it ? Anyway, the more I think about it, the more it reminds me of fractals and Escher's art.
2. The three core attributes are omni-presence/potence/science. None on its own takes precedence over any other, but two of them can 'control' the remaining one. (very familiar, right ? )

Ksha
Thursday, July 12, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं राधा,
इतकी excite होऊ नकोस. आम्ही इथे फक्त मुद्देसूद चर्चा करतोय आणि मुद्यांची गोष्ट गुद्यांवर तरी आलेली नाही (... अजूनतरी )

असो.
slarti , माझा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. माझा जितपत तर्क चालला तितपत मी हे सांगितले. पण तुमचा तर्कवाद वाचून बुद्धीला चांगले खाद्य मिळते आहे हे नक्की :-)

तुम्ही आधी विचारलेल्या प्रश्नासाठी (देव तर्कातीत आहे) काही उदाहरणे देत आहे, ही वेदांतील वा उपनिषदातील नाहीत. गीतेतील व ज्ञानेश्वरीतली आहेत.

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते
तस्मादेवं विदित्वैन नानुशोचितुमर्हसि|

-श्रीमद्भगवत्गीता

हा तर्काचिये दिठी
गोचर नोहे किरीटी
ध्यान याचिये भेटी
उत्कंठा वाहे|

हा सदा दुर्लभू मना
आपु नोहे साधना
नि:सिमु हा अर्जुना
पुरुषोत्तमु|

हा गुणत्रयरहितु
अनादी अविकृतु
व्यक्तीसी अतीतु
सर्वरूप|

अर्जुना ऐसा हा जाणावा
सकळात्मकु देखावा
मग सहजे शोक आघवा
हरेल तुझा|

-भावार्थदिपिका

अस्चिग (आशिष),
तुमचा वेदांचा आणि उपनिषदांचा अभ्यास चांगला दिसतो. तुम्हांला कुठे याची उदाहरणे दिसली आहेत का?


Slarti
Thursday, July 12, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदाहरणांबद्दल धन्स. पण मला उदाहरणांपेक्षाही त्यामागची मीमांसा जाणून घ्यायची होती. म्हणजे हे जे काय स्वरुप आहे ते असे का असावे यावर काही विचार झाला आहे का ? की ते खुद्द कृष्ण सांगतो म्हणून खरे मानले जाते ? बाकी 'देव तर्कातीत आहे' हे तुमचे मत असूनसुद्धा या स्वरुपाच्या चर्चेत भाग घेण्याचा उत्साह (आणि मोकळेपणा) दाखवल्याबद्दल धन्यवाद.

Mansmi18
Thursday, July 12, 2007 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा,

इथे देवाचे अस्तित्व न मानणार्‍या काही इतर लोकांची पण posts आहेत पण त्यांच्या आणि तुमच्या posts मधे मला तरी हा फ़रक जाणवला(हा माझा भ्रम आहे का माहीत नाही) की तुमच्या पोस्ट मधे बराच कडवटपणा आहे.
उदा.
----------------
ज्यांना मानायचा त्यांनी खुशाल दगडाला किंवा दगडातल्या देवाला कुरवाळत बसा
-----------------

मी आधीही हा प्रश्न विचारला होता, बहुतेक ते तुम्ही वाचले नाही( archive झाले बहुतेक). तुम्हाला देव किंवा देव मानणार्‍या लोकांबद्दल इतका तिरस्कार कसा निर्माण झाला?

aschig आणि vijay ने सांगितले होते कि over period of time त्याना देव या संकल्पनेबद्दल प्रश्न निर्माण झाले. त्यांच्या posts मधे असा तिरस्कार जाणवत नाही जितका तुमच्या posts मधुन जाणवतो.

मी परत एकदा सांगतो कि मला नास्तिकतेबद्दल आदर आहे आणि कुतुहलही. मी कधीच कोणा नास्तिकाला आस्तिक बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही. केवळ कुतुहलापोटी विचारतोय.

धन्यवाद.


Ksha
Friday, July 13, 2007 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीमांसा मला बहुतेक शक्य होणार नाही. कारण इतके वाचन / मनन माझे नाही. पण प्रयत्न नक्की करेन.

खुंटा हलवून बळकट करतोय, बाकी काही नाही :-)


Vijaykulkarni
Friday, July 13, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्न इथे विचारावा की नाही याची खात्री नाही पण,

सातारा जिल्ह्यात काही वर्षान्पुर्वी एका देवीच्या यात्रेत चेन्गराचेन्गरी होवून शेकडो लोक म्रुत्युमुखी पडले, नाशिकच्या कुम्भमेळ्यातही अशीच घटना घडली, मक्केच्या हज यात्रेत तर दर तीन चार वर्षानी चेन्गरा चेन्गरी होवून शेकडो लोक जातात.

या घटनान्ची सन्गती कशी लावायची?
या घटनान्चा अन्दाज देवाला असतो का?
मग त्या टाळण्याची शक्ती त्याच्याकडे असते का?

कुणालाही दुखविण्याचा मझा तिळमात्र्स हेतू नाही. फक्त प्रामाणीक कुतुहल.





Mansmi18
Friday, July 13, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंभमेळा जत्रा मक्केची यात्रा

तिन्ही ठिकाणी कायदा, सुव्यवस्था, नियोजनाची व्यवस्था त्या त्या यात्रेच्या नियोजन समितीकडे असते. त्यान्ची ती जबाबदारी आहे. यात्रेकरुनी शिस्त पाळुन यात्रा सफ़ल करायची जबाबदारी प्रत्येक यात्रेकरुची आहे. ही जबाबदारी पाळली गेली नाही आणि दुर्घटना घडल्या तर त्यासाठी देवाला जबाबदार धरणे कितपत योग्य आहे?

दुर्घटना टाळण्यासाठी तारतम्य बाळगण्याची बुद्धी प्रत्येकाला देवाने( for argument's sake, let us assume god gives everyone knowledge, common sense )दिलेली आहे. त्याचा वापर केला नाही आणि निष्काळजीपणाने चेन्गराचेन्गरी झाली हा सरळ सरळ माणसाचा दोष आहे तर तो देवावर कसा टाकता येइल?

on a lighter note....

Once there was heavy downpour and a man's house was in danger..but he refused to leave his house..few hours later the water rose to the knee height...there was a fire truck outside and fire seargants offered him to evacuate..he refused saying GOD will rescue him..
after a few hours water rose to his head level..a rescue bot came and offered him to rescue..he refused saying no..GOD will rescue me..
after a few hours his whole house was submerged with water and he was on roof..so a rescue helicopter offered him help but again he refused saying GOD will rescue him...
at last the water rose even above the roof and he died.
When he went to heaven he said to GOD..Oh GOD why did not you help me?
God answered ---
"But I did send you a fire truck...a boat and a helicopter.... :-)


धन्यवाद.


Radha_t
Friday, July 13, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोज तुमचा भ्रम बरोबर आहे, कडवटपणा आहे, माझ्याही आत्ता ते लक्षात आल पण त्याला तशी कारणही आहेत.-- काही वैयक्तिक इथे सांगण बरोबर नाही.पुढे मात्र हा कडवटपणा येणार नाही याची काळजी घेईन

Aschig
Friday, July 13, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष, slarti प्रमाणे मलाही वाटतं की तुम्ही केली आहेत ती statements आहेत, उदाहरणे नाहीत. maximum ठिकाणी देव सर्वशक्तिमान आहे या गृकितकानी सुरुवात झाली असणार (नाही तर तो काय कामाचा?). मग तसा जेंव्हा तो सापडला नाही तेंव्हा एक तर द्वैतवादात सापडुन तो logic किंवा tangibility च्या पलीकडे आहे असे म्हंटल्या गेले (उदा. नेती नेती not this, not that (this) ) नाहीतर अद्वैतवादात शिरुन 'अहम ब्रह्मास्मी' म्हणुन कसा तो आपल्यातच आहे असे म्हंटल्या गेले. एकुण काय तर omnipotence ई. हे concepts मुळात logical नाहीत. ते जर गृहीत धरल्या गेले तर अनेक paradoxes निर्माण होतात.

मनोज, तुम्ही जे उदा. दिलेत त्यावरुन असे वाटते की देव आजुबाजुच्या लोकांमध्येच असतो. तो त्यांच्याद्वारेच आपल्याला भेटतो, आपली मदत करतो. त्याला भेटण्याकरता वेगळे मंदिरात जाण्याची गरज नाही, घरी देखील पुजा-अर्चा करण्याची गरज नाही. शक्यतो इतरांना मदत करावी म्हणजे ती त्याच्या-द्वारे इतरांना पोचते. नास्तिक देखील नेमके हेच म्हणतात. ते एक पाउल पुढे जाउन middleman ची आवश्यकता नाही असे म्हणतात.


Radha_t
Friday, July 13, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Exactly आशिष मलाही तेच म्हणायचय. मनोज तुम्ही दिलेल्या उदहरणाला मराठीत एक चपखल म्हण आहे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. आता एक सांगा त्या माणसाने केली तिला तुम्ही अंधश्रद्धा म्हणणार का मूर्खपणा. काहिही असो. पण त्याच जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केल असत? देवाच नामस्मरण आणि तिथून सुटण्याची धडपड दोहिही बरोबर ?
मग तुमच्यात आणि त्या मणासात काय फ़रक? एकच. तो सगळच देवाच्या भरोशी टाकुन गप्प बसतो. आणि तुम्ही मात्र देव मानणारे देवावर विश्वास असुनही सुटण्याची धडपड करता. आणि समजा मी तिसरी तिथे आहे मी सुद्धा सुटण्यासाठी धडपड करते पण मला देव म्हणजे काय माहित नाही.

आपण दोघही वाचतो. आता मला सांगा देवाचा काय उपयोग झाला? just moral support तो तर मीही तुमच्य शेजारी उभी राहून तुम्हाला देऊ शकले असते, पण मी देव नाही

राहून राहून मला एकच शंका सारखी येते, ज्याला आपण ओळखत नाही ज्याच्याशी संवाद साधू शकत नाही आणि याची आपल्याला खात्रीही आहे त्याचा धावा का करायचा फ़क्त धावाच अस नाही त्याच्याशी कुठल्याही प्रकारच्या भावना कश्या काय असू शकतात?

हे जग कस निर्माण झाल कुणी केल? कोण त्याचा पालन हार तो कसा आहे हे माहित असण्याचा दावा करणारा कुणिच नाही ते माहित करून घ्यायची कुवत कुणाच्यात नाही, मग कशाला त्याच्या फ़ंदात पडायच? जर त्याच्या इच्छेशिवाय गवताच पानही हालत नाही तर आपण त्याला विनवण्या केल्या काय आणि नाही केल्या काय, नामस्मरण केल काय आणि नाही केल काय जे व्हायच ते होणारच आहे मग कशाला बिचार्‍याला संकटात टाकायच त्याच्या मनाने तो जे काय करतोय ते करुद्या.

ये माझ वैयक्तीक मत, कुणावरही लादण्याचा प्रयत्न नाही


Savyasachi
Friday, July 13, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा, तुझ्या पोस्टशी मी सहमत आहे. जेवढा माणूस भित्रा, तेवढा तो देव देव करतो. देवानेच जर विधिलिखीत लिहीले आहे, तर मग त्याला वाटले तर तो वाचवेल नाही तर बुडवेल, आपण कशाला धावा करायचा.
तो खेळ करतोय तर करत बसू दे. धावा केला तर तो वाचवेल अस असेल तर ते म्हणजे त्याला लाच देणे, किंवा त्याच्याशी व्यवहार करणे आहे. मग मी तो मला खरच गरज वाटेल तेंव्हा करेन. कारण नसताना नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators