Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 11, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through July 11, 2007 « Previous Next »

Shendenaxatra
Tuesday, July 10, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती देव म्हणजे कसा मंगल, पवित्र, भेदभाव न करणारा
वगैरे वगैरे छान छान गोड गोड वर्णने दिली आहेत.

कट्टर मुस्लिम, कट्टर ख्रिस्ती लोकांना असला देव साफ नामंजूर आहे.
धार्मिक ख्रिश्चन असेच म्हणणार की ख्रिस्ताला शरण जाणे हाच
देवाचा मार्ग. मुस्लिम म्हणणार इस्लाम स्वीकारून अल्लाची प्रार्थना
करणे महंमद हा अल्लाचा शेवटचा प्रेषित आहे हेच अंतीम सत्य.
आत्मा अमर आहे, पुनर्जन्म, सगुण देव, सर्व प्राणिमात्रात देव आहे वगैरे
सिद्धांत ह्या देवाला मंजूर नाहीत असे हे लोक छातीठोकपणे
सांगतात. सूर्याला, गायीला, देशाला, आईला, गुरुला देव मानणे
म्हणजे देवाचा अपमान आहे असे ह्यांना वाटते (आठवा वंदे
मातरमला मुस्लिमांनी केलेला विरोध).

ह्या धर्माचे लोक छातीठोकपणे असेच म्हणणार की त्यांचा देव
त्यांना असेच करायला शिकवतो.

आता असे सांगा की त्यांचे चूक आणि तुमचे तेच बरोबर हे कशाच्या
आधारावर? देवाचा मामला असल्यामुळे तर्क, वैज्ञानिक पुरावे अन्य
काही मोजमापे ह्या कसोट्या निरर्थक आहेत असे अनेकदा सांगितले गेले
आहे. तर असहिष्णू देव तेवढा खोटा आणि छान छान गोड गोड प्रेमळ प्रेमळ देव तेवढा खरा हे कशाच्या आधारावर ठरवले?





Chyayla
Tuesday, July 10, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती... तुम्ही काय लिहिले आहे तुमच्या लक्षात आले का? कुणी कशाबद्दल तर्क का मान्डतो कारण ते तर्कसुसंगत आहे म्हणुनच ना, तरी तुमच्या लक्शात नसेल आले तर आणी अर्थातच तुम्ही विचारता आहात की असावा की नसावा? तर माझ उत्तर हो आहे शिवाय का असावा ह्याचेही उत्तर विविध पोस्ट मधुन दीले आहेच. आणी वर मी म्हणुनच त्याच्याबद्दल तर्क मान्डलेत. एक लक्शात घ्या देवाला तर्काची गरज नाही ती गरज असते माणसाला. असो बाकी तुमच चालु द्या...


Slarti
Tuesday, July 10, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तुम्ही लिहीलेले कळाले नाही म्हणून विचारले. असो. आता देव तर्कसुसंगत असावा हे का मानता ? तुमच्या मागील posts बर्‍याच आहेत, कृपया त्यात नक्की कुठे हे दिले आहे ते सांगू शकाल का ?


Slarti
Tuesday, July 10, 2007 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाला तर्काची गरज नसते याचा नक्की अर्थ काय ? म्हणजे एकदा देव तर्कसुसंगत आहे हे मानल्यावर परत देवाला तर्काची गरज नाही याचा अर्थ काय होतो ते समजले नाही. मला काही शक्यता वाटल्या, त्या इथे देतो. काही चूक असल्यास कृपया सांगा किंवा अजून काही अर्थ होत असतील तर तेही सांगा.
१. देवाला तर्काची गरज नाही = तो तर्क सोडून वागतो / वागू शकतो. पण मग तो तर्कसुसंगत कसा ?
२. देवाला तर्काची गरज नाही = देव तर्कसुसंगत आहे, पण त्याचे अस्तित्व सिद्ध करणे, त्याचे अस्तित्व जाणवणे तर्काच्या पलीकडे आहे, किंबहुना त्याचे अस्तित्वच तर्काच्या कक्षेत नाही. परत, मग देव तर्कसुसंगत कसा ?


Ksha
Tuesday, July 10, 2007 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषयाला खूप फाटे फोडले गेले आहेत. त्यामुळे हे स्पष्टीकरण देणे जरूरीचे वाटते की मी स्वत देव पाहीलेला नाही. आधी आणि आता पुढे मी जे हे लिहीले आहे ते वाचिक ज्ञान आहे (पोपटपंची म्हणा हवे तर). त्यांत अनुभवाचा संबंध नाही.

काही मुद्दे

१. माझ्या मते देव तर्कसुसंगत नसावा. पण या आधी कित्येक ज्ञानी व्यक्तींनी वेदांतावर चर्चा केलेल्या आहेत(बर्‍याच वेळा त्या चर्चांचा मुख्य विषय द्वैताद्वैतवाद असायचा) पण त्यांचा आधार घेऊन असे म्हणता येईल की तशी शक्यता नाकारता येत नाही.
२.देव ही एक शाश्वत शक्ती आहे. तिच्या सगुण किंवा निर्गुण रुपाचे ध्यान ज्ञानी आणि भक्त जन करतात. इथे तीन मतप्रवाह आहेत जे वेदांताच्या चर्चेत मुख्य विषय असतात. पण त्यांत माझे ज्ञान फार नाही म्हणून मी बोलणार नाही.
३. आपल्या शरिरात दोन entities असतात हे उपनिषदांमध्ये सांगितले गेले आहे. जीव आणि परमात्मा. द्वैतवादींच्या मतानुसार मी जीव आहे आणि त्याने परमात्म्याचे चिंतन करून त्याचे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करायचा असतो.
अद्वैतवादानुसार तो "मी" जीव नसून परमात्माच आहे. आणि जीव हे थोडक्यांत सांगायचं झालं तर केवळ परमात्म्याचे पडलेले प्रतिबिंब आहे.
४. आता हा "जीव" कर्म करतो. परमात्मा निष्क्रिय असून तो कर्मांपासून अलिप्त असतो. जीव मायेच्या विळख्यामुळे परमात्म्याचे मूळ स्वरूप जाणू शकत नाही आणि त्यामुळेच आहार, निद्रा, भय मैथुन यांच्याबाहेर पडू शकत नाही. याला कर्म म्हणतात. आता या कर्मांचे फळ देव देतो का? तर नाही. ही फळे विधिलिखित आहेत आणि ते अतिशय गुंतागुंतीच्या गणिताप्रमाणे आहे. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की एखादा दोर्‍याचा गुंता असावा तसे कर्मफळ असते. यांच्या पलिकडे जाऊन फलातीत पुण्य (ज्ञानेश्वर ज्याला "शुद्ध पुण्य" म्हणतात) असेल तर ते count होते.
५. मग जीवाचे नास्तिकत्व विधिलिखित आहे का? तर त्याचे ही उत्तर नाही असेच आहे. जीवाला इतके स्वातंत्र्य असते की तो परमात्म्याचे मूळ स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकतो. आणि यालाच जिज्ञासा म्हंटले आहे. टोपलीखाली भाकरी लपवून ठेवली असेल आणि कुत्रा त्या टोपलीला उलटून पहायचा प्रयत्न करत असेल तर त्या कुतूहलाची या जिज्ञासेसी बरोबरी करता येणे शक्य नाही. आता इथे प्रश्न पडू शकतो की "कशावरून नाही"? असेल की कुत्र्यांचा पण देव! त्यांना पण "अंतिम सत्य" समजत असेल. :-) पण मी इतके समजू शकतो की हे थोडं अति होईल. सूज्ञ माणसाला इतके कळायला हरकत नाही की कोणाची "जाणीव" किती तीव्र आहे.
६. आता हा जाणून घ्यायचा choice कधी मिळतो? तर "बहूत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी" असे संत म्हणतांत. यांत आपण पूर्वजन्मांमध्ये जी चांगली कर्मे करतो त्यांमुळे ही जिज्ञासा निर्माण होते असे सांगितले आहे. (यावरूंन हा विषय कृपया पूर्वजन्म खरा की खोटा यावर वळवू नये)
७. माझ्या मते देवाचे अस्तित्व नाकारणे ही सुद्धा एका प्रकारची जिज्ञासाच आहे. त्या विषयावर इतका विचार केल्याशिवाय नास्तिक बनणे सोपे नसते. बाकीचे जे त्रिशंकू आहेत त्यांचा प्रवास सुखाचा होवो!
८. धर्मांबद्दल चर्चा करून त्याचा कीस पाडता येईल खरा. पण यांच कर्मकांडात फसल्यामुळे देवाच्या मूळ स्वरूपाकडे लक्ष जात नाही हे लक्षात असू द्या. यालाच माया म्हणतात. त्यांतच आपले वैदीक पूर्वज फसले आणि बौद्ध धर्माची गरज पडली. (जाताजाता उल्लेख करायला हरकत नाही की बुद्धांना दहा अवतारांपैकी एक मानले गेले आहे. संदर्भ्: भागवत) वेगवेगळे लोक वेगवेगळे claims करतात. कित्येंक बाबा-माताजी तयार होत असतात. अनेक नवे धर्म तयार होतांत. पण त्यांच्याकडे बघून "मुळांत देवच नाही" अशी समजूत करून घेत असाल तर तुमची सद्सदविवेकबुद्धी काय कामाची? "ते खोटे आहे" हे जर का तुम्हांला कळत असेल तर "मग खरे काय आहे" हा प्रश्न साहजिकपणे पुढे येत नाही? खोटे पडताळून कसे बघायचे याबद्दल अभ्यास करणे महत्वाचे वाटंत नाही? आणि तोच अभ्यांस वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये केलेला आहे. जर काहीच न वाचता "सर्वकाही झूठ आहे" असं म्हणत असाल तर ठीक. तुम्ही अजून तो " choice " करण्याच्या वेळेपर्यंत आला नाहीत असे समजा.
९. आणि शेवटी the all knowing (and all stealing) J.K. Rowling has said correctly ..
After all its not about our abilities.. its always about our choice..


Vijaykulkarni
Tuesday, July 10, 2007 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेद आणी उपनिषदे कुणी खरोखर वाचली आहेत का?


Ksha
Tuesday, July 10, 2007 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा सद्ध्या थोडा थोडा अभ्यास चालू आहे. पण पूर्ण वाचायला बराच वेळ लागणार कारण मला "पारायण" करायचं नाहीये. खरंतर पूर्ण वाचून होईल की नाही ही शंकाच आहे आणि मुळात तो उद्देशही नाही (आणि बहुतेक ते शक्यही नाही). पण खूप interesting प्रकार आहे.

पण ती फक्त शोभेची पुस्तकं नाहीत हे ही खरे. माझ्या असे बरेच जण ओळखीचे आहेत (इथे आणि भारतातले) की जे यांचा व्यवस्थित अभ्यास करतात.


Shendenaxatra
Wednesday, July 11, 2007 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षने जे काही लिहिले आहे ते केवळ वेद, हिंदू तत्त्वज्ञान केंद्रस्थानी मानून लिहिले आहे. देवाबद्दल केवळ तेवढेच शाश्वत सत्य आहे हे कशावरून?
बाकीच्या प्रेषितांना ज्याने वा जिने काही सांगितले तो वा ती देव नाही काय? कशावरून?
हिंदूंचे तत्त्वज्ञान खोटे आणि इस्लामचे खरे हे का असू शकत नाही? तीच गोष्ट ख्रिस्ती व यहुदी लोकांची. त्यांचाही देव खरा असेल.


Ksha
Wednesday, July 11, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडे,
आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.
हा "आपले प्रश्न(शंकाकुशंका) आणि आमची उत्तरे" असा बीबी नसून "देव म्हणजे (तुमच्या दृष्टीने) काय" असा बीबी आहे.

बाकी मी कुठे म्हंटले आहे की त्यांचे देव खोटे आणि आमचे खरे?
जरा मला इस्लामच्या देवाबद्दल सांगा (धर्माबद्दल नको.) चला यहूदींच्या देवाबद्दल सांगा. तो कसा आहे? काय स्वरूप आहे त्याचं? निदान त्यांचे देवाबद्दलचे(परत धर्माबद्दलचे नको) काय सांगणे तुम्हांला पटत नाही ते सांगा.


Shrini
Wednesday, July 11, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chinya1985 wrote:
"shrini we have already had discussion on origin of life as states science. science states life comes from non livin things. but it has not proved it.u can check V&C ,political appro.15-20 days back there was discussion on this. that theory of life comes 4m non livin things is non sense. there r no proofs given by science . life cann't spring from non livin blocks. ur belief is totally wrong. u have written abt. some theorems .u r pressumin that theorems r right n r without faults. which is not true. may be 2morrow somr new theorem will replace the old one. abt. omniscient u didn't understand my point. what i say is if there is X man who knows abt. it's size etc.then he himself becomes omniscient. so only god knows about all the knowledge as all the knowledge has emanated 4m him. god is omnipotent as if he limits himself at a perticular place, he does it by his choice so his potency is there at that place but which is inactive by his choice. "


if you say "ilfe cann't spring from non livin blocks.", maybe you can give some reasonable explanation behind this...

Godel's theorem is a mathematical theorem which has been rigourously scrutinized before getting accepted. If you don't agree, perhaps you can try to disprove it... if not, why not accept it ?

Your explanation on omnipotence/omniscience doesn't answer the questions I've stated.

'ksha', I'm awaiting your post that will explain omnipotence.



Kanak27
Wednesday, July 11, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव आणि सध्या आपण जो धर्म म्हणतो त्याचा काहि एक सम्बन्ध नाहि आहे
देव सर्वव्यापि शक्ति आहे
तो कोणत्याच मानव निर्मित धर्माचा वगेरे कसा असु शकेल

That dharm is for to try to understand god , but that are very confusing for us .
आपण दोन वेळ्याच्या जेवनासाढी आयुष्य घालवणारे लोक व्यासानि लिहिलेल वेद कळनार तरि कस.
Our Wavelength doesn't match with that talented ancient. but we can try to reach that level with study (with belive in that )

क्ष तुम्हि सध्या कशाचा अभ्यास करत आहात Just Curiosity .

Deepa

Chyayla
Wednesday, July 11, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो कोणत्याच मानव निर्मित धर्माचा वगेरे कसा असु शकेल

अगदी बरोब्बर...
क्ष, ईथे सगळ्यानीच शेन्डेना समजावले आहे असो देवाबद्दल लिहिले म्हणजे ते इस्लाम आणी ख्रिश्चनान्विरुद्धच हे कशावरुन, त्याच्या साठी देवदुत म्हणजे काय असा BB काढा आणी अजुन एक धर्म म्हणजे काय तोही काढा आणी ही खाज तिकडे मिटवा अशी मी विनंती करेल. कारण ते देवापेक्षा देवदुताला जवळचे मानतात आणी देव म्हणजे सगळ्या भौतिक ईछा पुर्ण करणारा कुणी पुरुषच ही ठाम समजुत त्यामुळे त्यांच्यात एवढे अध्यात्मिक प्रगल्भता नसेल आली म्हणुन कदाचित देवाबद्दल त्यांच्याकडे असे ज्ञान नसेल पण या गोष्टींचा ईथे काही सम्बंध लावायची काहीच गरज नाही.

वेद आणी उपनिषद यांचा अभ्यास एकदम सुरु करण्याची गरज नाही त्यापेक्षा गीता जे वेदांच सार आहे आणी स्वामी विवेकानन्द वाचलेत तरी पुष्कळ आहेत देवाबद्दलची एखाद्या नास्तिकाचीही सगळी अंधश्रद्धा, गैरसमज निश्चित दुर होतात. कारण ते स्वता: अंधारातुन प्रकाषाकडे गेले होते.


Aschig
Wednesday, July 11, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, आधिचे post चांगले लिहिले आहे.

गीता एकांगी आहे. ती वेदांचे सार नसुन केवळ वेदांताचे सार आहे (६ आस्तिक शाखांपैकी केवळ एक). विवेकानंद, शंकराचार्य, माधवाचार्य हे देखील बर्यापैकी धर्माचे एकच अंग पुढे करत राहिले (त्यांना जे सर्वात जास्त पटले ते).

देव ही संकल्पना केवळ भक्तीयोग, राजयोग ई. च्याच पलीकडील नाही, तर पुर्ण योग, वेदांत, पुर्व मिमांसा ई. च्या ही पलीकडे जावुन सर्व धर्मांना transcend करते. त्यामुळे गीता किंवा एकाच धर्माची पुस्तके वाचुन खुप तोकड्या कल्पना तयार होतात.


Chyayla
Wednesday, July 11, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती वेदांचे सार नसुन केवळ वेदांताचे सार आहे
आश्चिग वेदांत म्हणजे उपनिषद जे वेदान्ना थोडे सोपे करुन सांगितले आहे तर गीतेमधे हेच थोडे सोपे करुन या दोहोतली सारभुत तत्वे, विचार थोडक्यात मांडली आहे ( Summary )त्यामुळे या तिघांचा विषय एकच. तुम्ही थोडी जुजबी माहिती जरी मिळवली असती तर असे चुकीचे विधान नसते केले. मला नक्की वाटतय तुम्ही केवळ एकांगीच विचार वाचलेत दुसरी बाजु कधीच प्रामाणिकपणे व मोकळ्या मनाने पाहिली नाही. माझे म्हणाल तर मी दोन्ही साहित्य वाचले आणी त्यांच्यासोबत चर्चा ही केली आहे.

गीताला कोणताच धार्मिक आशय नाही त्यात तर ईश्वर एक आहे व त्याला कोणत्याही नावाने, प्रकाराने पुजा शेवटी ते एकाच तत्वाला जाउन मिळत एकाच परमेश्वराला जाउन मिळत हाच वैश्विक सन्देश दीला आहे व मार्गाच्या निवडीचे स्वातंत्र्य व समर्थन केले आहे. त्यामुळे कोणाला तो एकान्गी, तोकडा वाटत असेल तर त्याच्या स्वता:च्या एकांगी, संकुचित विचाराचा परीणाम असु शकतो.

तरी तुमच्याकडे अजुन काही तोकडे, एकांगी नसलेले दुसरे विचार असतील तर वाचायला नक्की आवडतील तेवढीच माहितीत भर.




Mansmi18
Wednesday, July 11, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडेनक्षत्र,

"वरती देव म्हणजे कसा मंगल, पवित्र, भेदभाव न करणारा
वगैरे वगैरे छान छान गोड गोड वर्णने दिली आहेत. "
------------------------------------------
अहो देव हा असाच आहे. वेगवेगळे धर्म हे एकाच देवाकडे नेणारे वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही नाशिकहुन मुम्बईला गेलात किंवा पुण्याहुन मुम्बईला गेलात तरी शेवटी पोहोचता मुम्बईलाच ना?

तुम्ही एक विचार करा, एखादे बाळ जन्माला आले. त्याच्या आइवडीलाबद्दल जर माहिती नसेल तर आपण सांगु शकतो का ते बाळ हिंदु आहे का मुस्लिम आहे का ज्यु आहे ते? जन्माला येताना आपल्या कपाळावर शिक्का नसतो. तो नंतर मारला जातो.

धर्म याचा अर्थ हिन्दु, मुस्लिम वगैरे आपण घेतो. पण धर्म याचा अर्थ जे काही चांगले, मंगल, पवित्र आहे ते. वेगवेगळे प्रदेश, जाती, भाषा यामुळे वेगवेगळ्या चलिरीति निर्माण झाल्या पण हे जे धर्म तुम्ही समजता ती मानवाने स्वत:ची केलेली सोय आहे.
जे जे वाइट किंवा असहिष्णु आहे ते देवाचे सांगणे होउच शकत नाही.
असहिष्णु माणसे असतात. ती आपल्या सोयीप्रमाणे धर्माचा अर्थ लावतात हा देवाचा दोष असु शकतो का?

तुम्ही क्ष, आणि ईतर काही लोकानी लिहिलेले न वाचतासमजावुन घेता तेच तेच पालुपद परत लावताय. याचा अर्थ एकतर तुम्हाला कळलेले नाही.(ती शक्यता मला कमी दिसते कारण तुमच्या posts वरुन तुम्ही बुद्धीमान वाटता.) का फ़क्त वादासाठी वाद म्हणुन तुम्ही लिहिताय?






Aschig
Wednesday, July 11, 2007 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, २००६ च्या दिवाळी अंकात भारतीय तत्वचिंतनावर एक लेख लिहिला होत, त्याची ही link :


/hitguj/messages/118369/118185.html?1161387673

Chyayla
Wednesday, July 11, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्चिग, तुझा लेख वाचला त्यात १ ला भागात उत्तम माहिती दीलीस अर्थात ती जी सुची दीली आहेस त्यातुनच घेतली आहेस, तरी हे संकलन एका ठीकाणी केलेस ते स्तुत्य होय. पण भाग २ आणी ३ मधे वास्तविकतेपेक्षा तुझे स्वता:चे विचार आहेत, त्यावर मी नक्की मत मांडेल, लेखाचे नावच वेद ते वेड? असे ठेवले आहे त्यातुनच काय ते लक्षात येत.

तरी हे सांगु ईछितो की भारतिय तत्वज्ञान हे "सनातन" म्हटले गेले आहे याचा अर्थ तुम्हाला ठाउकच असेल गीताच म्हणते की परीवर्तन सन्साराचा नियम आहे तो काही थाम्बलेला प्रवाह नाही जसे जसे विज्ञान प्रगत होत जातय वेदान्ना पुष्टीही मिळत जात आहे हे कशाचे द्योतक आहे.
दुसरीकडे बायबल (टीका करायची नाही तरी एक वास्तव) त्यातल्या कित्येक गोष्टी ह्या पुर्णता: अवैज्ञानिक आढळुन आल्यात त्या अनुषंगाने वेद मात्र पुष्कळ बाबतित कसोटीवर उत्तरले. हे कशाचे द्योतक आहे.

याच तत्वज्ञानाच्या आधारे भारतात कित्येक सन्त महात्मे, विद्वान होउन गेलेत व वेळोवेळी वेदांच तत्व सिद्ध करत गेलेत. काही तर्क अर्थातच मागे पडलेत. तरी आपण वेद ईतके शतके टीकवुन ठेवु शकलो इस्लामचे आक्रमण, बौध तत्वज्ञानाचा उदय, ख्रिश्चन मिशनरी आणी गुलामी यामुळे भारत कित्येक शतके मागे गेला हे तुम्ही विसरलात राजकिय गुलामगिरीतुन देश बाहेर पडत नाही तोच तो मानसिक गुलामगिरीत अडकला ती गुलामगीरी अजुनही चालुच आहे. त्यामुळे भारतिय तत्वज्ञान म्हणजे मागासलेले अशीच समजुत कित्येकानी करुन घेतली त्यामुळे आधी ह्या गुलामगिरीतुन बाहेर काढाणे तितकेच आवश्यक आहे अर्थातच ईतिहास व श्रेष्ठ वैश्विक विचार त्याबद्दल अभिमान बाळगुनच. त्याचा दुस्वास करुन नव्हे.

याचकाळात अगदी याच गुलामगिरीमुळे समाज किती भ्रमित, आत्मविस्मृत झाले होता याच उदाहरण म्हणुन स्वामी विव्कानन्दांच देता येइल पाश्चात्य व ख्रिश्चन मिशनरी, भारताची हलाखी गरीबी, मागासलेपणा पाहुन त्यान्नाही भारतिय तत्व्ज्ञान मागासलेले किंवा खोटे वाटत होते. पण गुरुच्या आशिर्वादामुळे जेन्व्हा सत्याचा प्रकाष पडला तेन्व्हा त्यान्नीच जगाला ठणकावुन साम्गितले तुम्ही काय आम्हाला तत्वज्ञान सांगता आहात भारतिय तत्वज्ञानाचा महिमा व श्रेष्ठत्व पटवुन दीले. त्यानन्तर भारतिय समाज एक प्रकारे मरगळ झटकुन आज डोळसपणे कोणतीही आत्मग्लानी, न्युनगन्ड न ठेवता अभिमान बाळगुन विचार करु लागला.

आणी तुला वेड कोणाला म्हणायचे हेही लक्षात आले त्यामधे मला Politics आणी पुर्वग्रहदुषीत्पणा याव्यतिरिक्त काहीच दीसत नाही. आणी ईथेच सगळ प्रकरण बिघडले. ते तु जर टाळले असते तर तुझा आकस न दीसता, प्रामाणिकपणा व वैचारीक मोकळेपणा दीसला असता.


Aschig
Wednesday, July 11, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग ३ मध्ये माझी मते असणार हे मी सुरुवातीलाच म्हंटले आहे. भाग २ मात्र पुर्णपणे वस्तुस्थितीला धरुन आहे. त्यातील कोणतेही विधान चुकले असल्यास कृपया नजरेस आणुन द्यावे. references देखिल देवु शकाल अशी आशा आहे.

Slarti
Wednesday, July 11, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> माझ्या मते देव तर्कसुसंगत नसावा.

क्ष, तुमचे हे म्हणणे मला पटते. तो जर तर्कसुसंगत असेल तर omnipotence paradox, Goedel's theorem त्याच्या आड येतात. तरी जाता जाता नमूद करतो, using formal logic Goedel gave the ontological proof of existence of god as proposed by Anselm. Furthermore, I came across quite a few websites which try to prove the existence of god using Incompleteness theorem. Not being an expert in logic myself, I couldn't figure out whether there is any logical fallacy/loophole in those arguments. असो. हे माझे मत झाले. ते नकारात्मक आहे हे मी कबूल करतो. नकारात्मक अशा अर्थाने : there are only 3 statements viz 'a', 'b' and 'c'. Now I know that a is equal to either of the remaining two. The way I think right now (arguments mentioned above) is that a != b hence, a = c. But I don't have an argument which uses some inherent truth about 'a' and directly leads to 'a = c'. Do you see what I mean ? तुमच्याकडे असा काही विचार असेल, किंवा तुमच्या वाचनात असा काही विचार आला असेल तर तो जाणून घ्यायला आवडेल. त्याचवेळी जमले तर 'देव तर्कसुसंगत आहे, पण देवाला तर्काची गरज नाही' हे विधानदेखिल कृपया समजावून सांगा.

माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे 'देव तर्कापलिकडे आहे' असे प्राचीन भारतीय तत्वज्ञान सांगते. त्या तत्वज्ञांनी असे का मानले जाते याची कारणमीमांसा केली असेलच. ती कोणाला माहिती असेल तर कृपया सांगाल का ? म्हणजे देवाचे जे काय स्वरुप भारतीय तत्वज्ञान मानते ते समजून घ्यायला मदत होईल.


Mansmi18
Wednesday, July 11, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Religious views of einstein
------------------------------
The question of scientific determinism gave rise to questions about Einstein's position on theological determinism, and even whether or not he believed in God. In 1929, Einstein told Rabbi Herbert S. Goldstein "I believe in Spinoza's God, who reveals Himself in the lawful harmony of the world, not in a God Who concerns Himself with the fate and the doings of mankind." (Brian 1996, p. 127)

Einstein defined his religious views in a letter he wrote in response to those who claimed that he worshipped a Judeo-Christian god: "It was, of course, a lie what you read about my religious convictions, a lie which is being systematically repeated. I do not believe in a personal God and I have never denied this but have expressed it clearly. If something is in me which can be called religious then it is the unbounded admiration for the structure of the world so far as our science can reveal it."[37][38]

By his own definition, Einstein was a deeply religious person (Pais 1982, p. 319).[39] He published a paper in Nature in 1940 entitled Science and Religion which gave his views on the subject.[40] In this he says that: "a person who is religiously enlightened appears to me to be one who has, to the best of his ability, liberated himself from the fetters of his selfish desires and is preoccupied with thoughts, feelings and aspirations to which he clings because of their super-personal value ... regardless of whether any attempt is made to unite this content with a Divine Being, for otherwise it would not be possible to count Buddha and Spinoza as religious personalities. Accordingly a religious person is devout in the sense that he has no doubt of the significance of those super-personal objects and goals which neither require nor are capable of rational foundation ... In this sense religion is the age-old endeavour of mankind to become clearly and completely conscious of these values and goals, and constantly to strengthen their effects." He argues that conflicts between science and religion "have all sprung from fatal errors." However "even though the realms of religion and science in themselves are clearly marked off from each other" there are "strong reciprocal relationships and dependencies" ... "science without religion is lame, religion without science is blind ... a legitimate conflict between science and religion cannot exist." However he makes it clear that he does not believe in a personal God, and suggests that "neither the rule of human nor Divine Will exists as an independent cause of natural events. To be sure, the doctrine of a personal God interfering with natural events could never be refuted ... by science, for [it] can always take refuge in those domains in which scientific knowledge has not yet been able to set foot." (Einstein 1940, pp. 605–607)

Einstein championed the work of psychologist Paul Diel,[41] which posited a biological and psychological, rather than theological or sociological, basis for morality.[42]

The most thorough exploration of Einstein's views on religion was made by his friend Max Jammer in the 1999 book Einstein and Religion (Jammer 1999).



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators