Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 07, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through July 07, 2007 « Previous Next »

Chinya1985
Friday, July 06, 2007 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव नाही असे म्हणनार्‍या लोकांच्या पोस्ट्स वाचुन असे आढळते की देव धर्म या गोष्टींबाबत त्यांना पुरेसी माहिति नाही. आणि या अज्ञानातुन त्यांनी काही समजुती करुन घेतल्या आहेत ज्या चुकिच्या आहेत. असो तुम्ही दुखावले गेले असल्यास क्षमा करा.

ओम्निपोटेन्स आणि ओम्निसीएंट वरिल मुद्देही चुकिचे आहेत. can God limit himself permanently???answer is both yen n no. how? he may limit himself permanently at a perticular place. n he may not limit himself permanently at other places. so he becomes omnipotent. what is this semi omnipotent????
god can manifest himself anywhere anytime.

कोणितरी लिहिलय की देव म्हणजे सर्वशक्तिमान. अगदी बरोबर आहे. God is full of 6 qualities-beauty,power,wealth,renunciation etc.
ह्या गोश्टी असतिल तरच तो देव बनतो. हेच सर्व धर्म सांगतात. अल्ला शब्दाचा एक अर्थ आहे की तो जो सर्वात मोठा आहे. भगवान शब्दाचा एक अर्थ होतो की तो जो सर्वात मोठा आहे आणि लहानही आहे. तुम्ही ज्या काही गोश्टी बघता त्यात सर्वात पुढे देव आहे he is supreme in every respect मुळात या जगातिल सर्व गोष्टी देवाकडुनच येतात. देवात नाही अशी एकही गोश्ट इथे नाही. फ़क्त देव चांगले वाइट या विषेशणांना transcendental आहे. म्हणजे त्याने केलेली गोष्ट चांगलिच असते(मुळात चांगली हा शब्द वापरायला नको). त्यामुळे काही भक्ती संप्रदाय देव सोडुन इतर सर्व गोष्टींना वाइटच मानतात. मग ते काम material डोळ्यांनी चांगलेही का असु नये. पण ते काम देवाशीसंबंधीत नसल्याने that thing is conditioned . या दुख्:लयातुन स्वत्:ला सुखालयात म्हनजे देवाकडे नेणे हाच या मानवी जन्माचा उद्देश आहे. ह्यात राधाच्या प्रश्नाचे उत्तर येते. बरोबर आहे की माणुस काय काय करणार?हीच तर देवाकदे जाण्याची पहिलि पायरी आहे. देव तु लिहिलेल्या एकाही गोश्टीसाठी नकोय. तो हवा आहे की नाही हा प्रश्नच चुकिचा आहे. देव हे सत्य आहे बाकी सर्व माया आहे. देवाला कालबाह्य करायला निघालेले तुम्ही कोण?
वेद म्हणतात की देवाच्या परवानगीशिवाय गवतसुध्दा वार्‍यावर हलु शकत नाही. गीतेत भगवान कृष्ण सांगतात की ते सर्वांमधे आहेत आणि सर्वांच्या गोश्टी as a witness बघत आहेत आणि आपल्या मनोकामना पुर्ण करत आहेत. म्हणजे जेंव्हा या जगातिल मायामोहात रहायच अस आपल्याला sincerely वाटत तेंव्हा ते आपल्याला सर्व opportunities देतात मायामोहात रहायला. आणि जेंव्हा आपण त्यांच्या जवळ जाण्याचा sincerely प्रयत्न करतो तेंव्हा ते आपल्याला सर्व opportunities देतात त्यांच्यापर्यंत जायला. यामधे कर्माचे laws पण येतात. धर्मामुळे वाइट गोश्टी झाल्या तर ती लोकांची लिमिटेशन्स आहेत.

राहिलि गोश्ट तन्याची. त्याचा मुद्दाच चुकिचा आहे. तुला वाटत की देव या संकल्पनेची गरजच नाही. अरे पण तुझ्या वाटण्या न वाटण्यानी काहिच फ़रक पडत नाही. आपल्या दररोजच्या जिवनात देवाचा काय उपयोग? अरे पण आपले दररोजचे जिवन आपण ज्या मार्गाने जगतो हे बरोबरच आहे हे कोणी सांगितले???मुळात आपण temporary जगात राहत आहोत. जिथे काहिच permanent (शाश्वत?)नाही. हे जग म्हणजे दु:खालय आहे. इथला आनंदही क्षणभंगुर आहे. कुठली गोश्ट आहे जी permanent आहे???ती गोष्ट आहे देव. देव म्हणजे सच्चिदानंद. सत म्हनजे eternal चित म्हनजे ज्ञान आणि आनंद म्हणजे आनंद. आपल्याला जर शाश्वत ज्ञान आणि आनंद हवा असेल तर आपल्याला देवाकडेच जायला हवे. आपल्याला जर क्षणभंगुर आनंद हवा असेल तर देवाकडे दुर्लक्ष करा आणि दुख्:त जगत रहा जन्मोजन्म. देव तुम्हाला जे पाहिजे ते देइन.

मी लिहिलेली पोस्ट्स न समजल्यास प्रश्न विचारा. बर्याच गोश्टी थोड्या थोद्या लिहिलेल्या आहेत त्यामुळे समजण्यास बहुतेक कठिण जातिल.



Chinya1985
Friday, July 06, 2007 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्देनना मी रामसेतुच्या चर्चेच्या वेळीही हे म्हटल होत की तुम्ही चुकिच्या समजुती करुन घेउ नका धर्माबद्दल. त्यांच्या पोस्ट्समधे परत देव या गोश्टीबाबत त्यांच्या चुकिच्या समजुती दिसुन येतात. बकरी वगैरे कापल्याने देव खुश होतो ही समजुत चुकिची हे बरोबर पण म्हणुन देवच चुकिचा हे चुकिचे. परत अंधश्रध्दा म्हणजेच धर्म अशी शेन्डेननी करुन घेतलेली चुकिची समजुत दिसुन येते.
गायिसारख्या निर्बुध्द प्राण्याला देव मानणे चुकिचे हेही तसेच. गाय आपल्याला दुध देते म्हणजेच आपला आइप्रमाणे सांभाळ करते हिच आई जेन्व्हा म्हातारी होते तेंव्हा तिलाच मारुन खाणे ही कृतघ्नता नाही का?? what kind of civilisation is this ? तुमची आई हुशार नसेल तर तुम्ही वाटेल तसा तिचा अपमान कराल का?आणि केल्यास ते चुकिचे नाही का??सुर्यामुळे आपले जीवन चालते, त्याला त्याबद्दल पुजल्यास काय चुकले??


Shendenaxatra
Friday, July 06, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी वरती देव कालबाह्य कसा झाला आहे ह्याची काही उदाहरणे दिली. ह्यातली कुठलीही उदाहरणे कपोलकल्पित नव्हती.
देवाला कोंबडे, बकरे, नारळ बळी देणे आजही चालू असते.
संकट आले की नवस बोलणे आजही असते.
गायीसारख्या निर्बुद्ध पशुस देव मानणे आजही आहे.
तेव्हा येथील सदस्य असा देव मानत नसतील कदाचित पण जगात लाखो लोक असा कालबाह्य झालेला देव आजही मानतात, पूजतात.
ह्या प्रकारचा देव म्हणजे लाचखोर सरकारी अधिकारी वा उन्मत्त, डोकेफिरू हुकुमशहा वा राजा असावा असे वाटते. कायम त्याला भिऊन असा, वरचेवर चांगल्या चुंगल्या गोष्टी नजराणे म्हणून द्या. अत्यंत विनम्रपणे वागा. जर चुकून कुचराई झाली शिरच्छेद! वा रे देव!

म्हैस गायीप्रमाणे दूध वगैरे देते पण तिला देव मानत नाहीत. म्हैस भाकड झाली की कित्येक लोक खाटकाकडे पाठवतात. भाकड जनावर पोसणे स्वस्त असते का? पण गायीला मात्र स्पेशल स्टेटस.
आणि हो, कुणाला देव मानू नका म्हणजे त्या प्राण्याला मारुन खा, त्या प्राण्याचे हाल करा असे नाही. त्या पशुला पशुसारखे वागवा. तुमच्या गोठ्यात असेल तर चांगली काळजी घ्या.
कुत्र्या वा मांजराला आपण देव मानत नाही. त्यांचेही उपयोग आहेतच. पण त्यांना मारुन खातही नाही. तसे गायीबाबत शक्य आहे की.


Shendenaxatra
Friday, July 06, 2007 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूर्यामुळे जीवन चालते मग त्याची पूजा का करु नये?
एकाच शहरात रहाणार्‍या एकाने सूर्याची पूजा केली, दुसर्‍याने साफ दुर्लक्ष केले, तिसर्‍याने रोज तिन्हीत्रिकाळ सूर्याला शिव्या घातल्या तर काय तिघांना वेगळे ऊन मिळणार आहे का? मग कशाला पूजा करा? सूर्यनमस्कार घालत असाल तर निदान व्यायाम तरी होतो. पण रोज सूर्याची षोडशोपचारे पूजा करून वेळ, सामग्री आणि कष्टाचा अपव्यय होणार. त्यापेक्षा सूर्याच्या ऊर्जेचा जास्त उपयोग करता येईल यावर रोज तितका वेळ विचार आणि आचार केला तर कदाचित जास्त फायदा होईल (हे माझे मत).



Kedarjoshi
Friday, July 06, 2007 - 10:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाला कोंबडे, बकरे, नारळ बळी देणे आजही चालू असते.
संकट आले की नवस बोलणे आजही असते. >>>>>


हा त्या मानवांचा दोष आहे त्यात देव कुठे येतो? देवाने त्यांना येऊन सांगीतले का की मला बोकड कापा म्हणुन? चिन्या ने लिहीले आहे की अंधश्रध्देला तुम्ही धर्म मानता आहात. काहीशा फरकाने मलाही हेच म्हणावे लागेल.

भाकड गायी ला मारन्यात काहीही हरकत नसावी. (निदान माझी तरी नाही. मी मॉंस भक्षन करत नाही पण भाकड पशु तो भाकड पशु).


एकाच शहरात रहाणार्‍या एकाने सूर्याची पूजा केली, दुसर्‍याने साफ दुर्लक्ष केले, तिसर्‍याने रोज तिन्हीत्रिकाळ सूर्याला शिव्या घातल्या तर काय तिघांना वेगळे ऊन मिळणार आहे का?>>>>

सवाल मिळनार्या उनाचा नाही तर सुर्य ते देतो म्हणुन त्याचा प्रति कृतज्ञ राहान्याचा आहे. जे पुजा करतात त्यांची कदाचित कृतज्ञतेची भावना असेल. मग अशी भावना असन्यास गैर काय?

आशिष, तुझ्या बीबी वरील मी विचारलेला प्रश्नचे उत्तर असे अपेक्षित न्हवते it was just a loud thinking अन त्यामुळेच तो प्रश्न आजही आहे. but I liked your answer .
गोतम बुध्दा ना ज्ञान प्राप्त झाले, विवेकानंदाना झाले, येशु ला झाले तर ते काय होते? त्यांना देव दिसला का? असेल तर कसा? विवेकानंद चे नाव याच्या साठी कारण त्यांनी तो प्रश्न बोलुन दाखविला. जसे शेंडे ने दाखविला वा मला पडला.
मला तो अजुनही आहे याचे कारण कदाचित ' मी ' आहे. देव नाही. कारण ते ज्ञान असेलच तर मी तिथपर्यंत पोचु शकत नाही यामुळे माझा ना देव असन्यावर विश्वास आहे ना देव नसन्यावर. कारण ते सिध्द करता येत नाही. असेलच तर अनुभवावे लागेल.

अन जर देव नसेलच तर how one can limit it वर काही जन देव लिमीटेड वैगरे आहे असे लिहीत आहेत मग देवाला मानत आहेत का?


Vijaykulkarni
Friday, July 06, 2007 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेद म्हणतात की देवाच्या परवानगीशिवाय गवतसुध्दा वार्‍यावर हलु शकत नाही.

हे केवळ वेद म्हणतात म्हनून खरे मानायचे?

मग आणखी एखाद्या धर्मग्रन्थात वेगळे कही लिहिले असेल.

य दोहोन्मध्ये खरे काय


Shendenaxatra
Friday, July 06, 2007 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

***हा त्या मानवांचा दोष आहे त्यात देव कुठे येतो? देवाने त्यांना येऊन सांगीतले का की मला बोकड कापा म्हणुन? चिन्या ने लिहीले आहे की अंधश्रध्देला तुम्ही धर्म मानता आहात. काहीशा फरकाने मलाही हेच म्हणावे लागेल.
***
देव ह्या संकल्पनेचा हा एक अत्यंत कच्चा दुवा आहे तो म्हणजे देव हा मानवनिर्मित आहे. कितीही कंठशोष करून सांगितले की देवाने अमक्याला हे सांगितले, त्याने ते लिहिले आणि तो आमचा धर्मग्रंथ बनला तरी हे अटळ सत्य आहे की देव हा मानवनिर्मित आहे. त्यामुळे आपण असे हात झटकू शकत नाही.

आता कुठल्या मानवाने, कुठल्या काळात, कुठल्या परिस्थितीत देवाची कल्पना केली त्यावर देव कसा आहे ते ठरते. कुणाच्या देवाला डुक्कर अपवित्र असतो तर कुणाच्या देवाला गाय अपवित्र.
पुन्हा एकदा सांगतो की देव ही मानवाने बनवलेली कल्पना आहे.

सूर्याविषयी कृतज्ञता: सूर्यासारख्या अस्मानी गोलाबद्दल कृतज्ञता बाळगण्याचा काय उपयोग आहे? सूर्याला बरे वाटते का? ह्या एकतर्फी भावनेचा नक्की काय फायदा बरे?


Ksha
Saturday, July 07, 2007 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शें. न.

चला बरं, परत एकदा वाचूया हं आपण,
देवाविषयीच्या या "कल्पना" मानवनिर्मित आहेत. या "कल्पनांना" तुम्ही देव मानत असाल तर यांत तुमची चूक आहे.

गायीचा देव वगैरे भानगड उगाच यांत घुसवणं मुळांत चूक आहे. देव हा जितका गायींत आहे तितकांच तो उंदीर झुरळांत, आणि गटारींत जगणार्‍या डुकरांत देखील आहे. आता गायीची पूजा करणे या संस्कृतीजन्य उपचारांत आणि देवाच्या मूळ संकल्पनेमध्ये गफलत नाही ना होत?
एकदा नाहीतर दुसर्‍यांदा वाचा सगळं. :-)

असो. हे सगळं देवाने लिहावं अशी का तुमची अपेक्षा. आपण कोण असे मोठे लागून गेला की देव आपलं अस्तित्व सिद्ध करायला तुमच्यापुढे येईल? त्याचे अस्तित्व कळायला देखील पात्रता लागते. आणि त्यामुळेच गौतमबुद्ध, येशू, विवेकानंदांना जे ज्ञान झाले ते फक्त काहींनाच होते. अशा काही गोष्टी आपल्याला जे जाणते आहेत त्यांच्या अनुभवांवरून शिकाव्या लागतात. आपल्याला "मानवनिर्मित" जन्मदाखला आणि आईच्या सांगण्यावरूनच वडीलांचे नाव कळते ना? का "कशावरून" हा प्रश्न विचारावा लागतो तिथेही? तुम्ही अशा कुठल्याही वैज्ञानिक सिद्धांताला देखील "कशावरून" हा प्रश्न लावून त्याचं च्युईंगगम करू शकता.
पण आधी सांगितल्याप्रमाणे, मी आहे म्हणून आणि तुम्ही नाही म्हणून देवाच्या अस्तित्वावर त्याचा काही परिणाम होणार नाही.
गेली अनेक वर्षे तुमच्यासारखे चार्वाक निर्माण झाले. तुम्हीं अजून एक. तुम्हाला अमान्य आहेत ना त्याचे अस्तित्व? मग अमान्य तर.
जेव्हां तुम्हांला त्याचा साक्षात्कार होईल तेव्हांच ते समजू शकते.

आणि काय माहिती, असाल सुद्धा तुम्ही इतपत पात्रतेचे की देव तुम्हांला साक्षात्कार देईल, मी काही तुम्हांला बघितलेले नाही, किंवा भेटलेलो नाही.
( मग खरंतर तुम्ही अस्तित्वात आहात याला पुरावा काय? हे प्रश्न एक थोडासा ऍडव्हान्स्ड् कंप्युटर प्रोग्रम टाकत आहे असेही म्हणता येईल... :-) )


Aktta
Saturday, July 07, 2007 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सब माया है.....
एकटा...


Shendenaxatra
Saturday, July 07, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव ही निव्वळ कल्पना आहे. त्यामुळे ह्या कल्पनांनाच देव मानणे
काही चूक नाही.

गायीची भानगड कशी उद्भवली?
कुणीतरी विचारले की देव कालबाह्य कसा तर ते स्पष्ट करायला मी "गायीची भानगड" आणली. आपण तो विषय काढला नसल्यास आपण त्यात भाग घेऊ नये. नंतर कुणीतरी गायीला देव मानणे
चूक कसे असे विचारल्यामुळे मला माझी भूमिका स्पष्ट करणे
क्रमप्राप्त होते. आपल्याला त्यात स्वारस्य नसल्यास नसो.
गाय हा देव आहे असे वाक्य जुन्या पुराणात अनेकदा आले आहे.
गायीच्या नाकात अमका देव, कानात तमका, शेपटीत तमका अशी साग्रसंगीत वर्णनेही आहेत.

** हे सगळे देवाने लिहावे अशी अपेक्षा आहे का?
देव हा अस्तित्त्वात नाही. मानवाने सोयीसाठी तो बनवला
तेव्हा तो काही लिहील असे वाटत नाही. जर येशू, विवेकानंद, तुकाराम आणि बुद्ध ह्यांना एकाच देवाने काय ते सांगितले असते तर शिकवणीत इतका फरक का? इतक्या विसंगती का?
एकजण मूर्तीपूजा करणार्‍यांची निंदा करतो (बायबल साम १०६:३६)
तर दुसरा मूर्तीत सर्वस्व पाहतो. तीच गोष्ट इस्लामची.
एक देव सांगतो आपले एक पंचमांश उत्पन्न समाजाला द्या असे सांगतो तर बाकी देव त्याविषयी चकार शब्द काढत नाहीत. अल्ला म्हणतो रमझानमधे उपास करा हिंदू वा ख्रिस्तांचा देव त्याविषयी गप्प. तात्पर्य इतक्या विसंगत शिकवणी सर्वशक्तीमान देव नाही तर मानवच देऊ शकतो.

आणि आपण वडिलांच्या ओळखीची भानगड आपण का घुसवलीत्त? तरी दोष पत्करून सांगतो. डी एन ए वापरून अमक्याचा बाप अमकाच आहे हे सिद्ध करता येते.

*मी अस्तित्वात आहे ह्याला पुरावा काय?
मला वाटते देवाचे अस्तित्त्व आहे असे गृहित धरल्यामुळे मानवजातीचे जितके नुकसान झाले आहे तितके माझ्या अस्तित्वावरून होणार नाही त्यामुळे तो प्रश्न विसरुया. तसाही तो विषयाला धरून नाही. त्याविषयी नंतर कधीतरी.

** देवाचे अस्तित्त्व कळायला पात्रता लागते.
टीकाकारांचे तोंड बंद करायला वापरली जाणारी एक लोणकढी थाप. का लागते हो पात्रता? आणि मग एखादा मला देवाने अमके सांगितले असे म्हणतो ते तपासायचे कसे? भोंदू आणि सच्चे ह्यातील फरक कसा कळणार?
मुस्लिमांचा देव म्हणतो महंमद हा शेवटचा प्रेषित. हिंदूंचे ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद असे कित्येक देवाशी "संवाद" साधणारे महात्मे झाले. तेही प्रेषितच. मग खरे कुठले नि खोटे कुठले?

खरोखरच जर कुणी सर्वशक्तीमान, सर्वज्ञानी, सर्वव्यापी इत्यादी इत्यादी असता तर त्याने इतका घोळ घातला असता का? आपणच विचार करा बरे.


Ksha
Saturday, July 07, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडे, शेंडे तुम्ही परत काही गोष्टी अध्यारूत धरताय. फारच गंमतीशीर आहात तुम्ही. एकदा का तुम्ही तुमच्या कल्पनासाम्राज्यातून बाहेर पडला की मग पुढे धर्माबद्दल बोलू.

आणि इथे विषय चर्चा करण्यासाठीच काढतात ना? गायीबद्दलची ती अतिशय प्रायव्हेट चर्चा असेल तर सांगा, आपण नेमस्तकांना सांगून एखादा खाजगी बीबी मिळतो का ते बघू. ठीक?

आणि परत तेच. धर्म! आता दोनदा मोठ्याने म्हणा बघू

धर्म म्हणजे देव नाही
धर्म म्हणजे देव नाही

पुराण तर तुम्हीच मानत नव्हता ना? मला तर असेच दिसले होते. एकदम असा तुमचा पुराणांमध्ये एव्हढा विश्वास कसा बसला? चमत्कारच म्हणायचा! ( बहुतेक लिंबूनेच काहीतरी केले असावे :-) )
धर्म ही देवाचे रूप समजावून घेण्यासाठी बनवलेली एक वाट आहे. आणि तुम्ही म्हणताय देवाच्या रुपात विसंगती आहे. कुठेय हो? सर्वांनीच सांगितले आहे की देव निराकार, निर्गुण आहे. मूर्ती ही त्या निराकारावर एकाग्रता मिळवण्यासाठी असलेले एक माध्यम आहे. असो, तो विषय तुम्हांआम्हांसाठी जरा फारच वरचा आहे.
बाकी एक वाक्य मात्र तुम्ही बरोब्बर बोललात अगदी. विसंगत शिकवणी देणारी माणसं, देव नव्हे! धर्माचा विचित्र अर्थ काढणारी तुम्हांआम्हांसारखी माणसेच..
इतकी पुराणे वाचता ना? मग जरा थोडी गीता पण वाचा, त्यांत भोंदू कुठले आणि सच्चे कुठले यांचे रीतसर वर्णन आहे. आणि घोळ देव घालत नाहीये हो... घोळ आपण घालतोय :-)

बाकी डी. एन् ए. ही चाचणी पण "मानवनिर्मित"च ना हो? त्यांवर कसा विश्वास ठेवता आपण? :-)


Phdixit
Saturday, July 07, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>सूर्यामुळे जीवन चालते मग त्याची पूजा का करु नये?
>>>>>>>मग कशाला पूजा करा? त्यापेक्षा सूर्याच्या ऊर्जेचा जास्त उपयोग करता येईल >>>>>>>> कदाचित जास्त फायदा होईल (हे माझे मत).



शेंडे मास्त्र मला तुमच्या पोस्ट वाचुन तुमची देव आणी त्याची केली जाणारी पुजा ह्या बद्दलची असलेली खरी Exact संकल्पना जाणुन घ्यायची इच्छा आहे. वर कुठे तुम्ही लिहिलि असेल तर त्यची लिंक दिली तरी चालेल.

Shrini
Saturday, July 07, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> he may limit himself permanently at a perticular place

what is this 'may' ? you can't prove that you can do something unless you do it. So if we apply the same rule to God, He will have to limit himself permanently at a particular place to prove that He can do it. Once He does that, His ability at that place is limited forever, hence He is no longer omnipotent...

I see no paradox in this question... it only goes to show that omnipotence is illogical.

Chyayla
Saturday, July 07, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष, मनस्मी, केदार व चिन्या खरच तुमच्या अप्रतिम पोस्ट वाचायल्या मिळाल्यात. शेन्डेन तुमचा धर्म आणी देव याचा घोळ जरा बाजुला ठेवला तर शुद्ध चर्चा करता येइल बरेच जणानी सांगुनही तुम्ही तेच पालुपद लावता आहात त्यामुळे अगदी नाईलाजाने बोलावे लागतेय.

बाकी श्रीनी त्या Paradox मधुन बाहेर पडायचा मन्:स्थितित दीसत नाहीत. तेंव्हा चालु द्या.. मला तर त्या सगळ्या पोस्ट बाउंसर जात आहेत थोड मराठीत लिहिले तर हवा तरी लागेल. अहो श्रीनी जरा मराठीतही लिवा की.



Ksha
Saturday, July 07, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाईलाजाने नाही "च्यायला" ( मी येथे शिवी देत नाहीये हे नेमस्तक व इतर विचारी मंडळी सवयीप्रमाणे "अध्यारूत" धरतीलच :-) )
धर्म आणि देव यांच्यातला हा घोळ कित्येक जण करतात. तेव्हां शेंडे बोलतायत ते चांगलच आहे. त्या निमित्ताने चर्चा तरी होतेय. आपणही शिकू काहीतरी चांगले. बाकी श्रिनीचे ते omnipotent-omniscient जरा मला पण समजावून घ्यायचे आहे. येईलच ते पुढे.


Shrini
Saturday, July 07, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think the chief characteristic that separates God from man is His omnipotence... otherwise God would basically be a super-man... not fundamentally different from man.

That's why it's so important to discuss omnipotence... and if that concept does not really make sense, then on what other characteristics would we separate God from man ?

Omniscience is another misleading concept. How do you even decide how much knowledge exists in Universe ? and if even that can't be decided, then how can we even prove omniscience ?

Chyayla
Saturday, July 07, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतीम सत्याला पोहोचणे किंवा मिळवणे हे एकच ऑब्जेक्टिव्ह असावे का? किंवा अंतीम सत्य आहे हे निश्चित का? मला जगात एकच सत्य जाणवते ते म्हणजे माझा एक्झीस्टन्स..

मला नाही ही भूक.. सत्य शोधण्याची भूक म्हणजे काय? आणि ती प्रत्येक माणसाला असावी म्हणजे काय? का असावी?

मी बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार करतो कारण तो मला रोजच्या आयुष्यात पुरेसा आहे.. रोजचे आयुष्य हा शब्दप्रयोग महत्वाचा कारण माझा रेफरन्स हा माझा एक्झीस्टन्स आहे.

तान्या तुमची पोस्ट वाचली व स्पष्ट विचारही वाचलेत. मी तुम्हाला किन्वा कोणालाही देव मानाच असे म्हणणार नाही. पण मला या मुद्यान्वर अधीक बोलायचे आहे.

१) तुम्ही म्हणालात की मी बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार करतो कारण रोजच्या जीवनात तो पुरेसा आहे अगदी कबुल.. पण मला एक सांगा त्यासाठी मनुष्यच असण्याची काय गरज आहे एखादा पशुही असेच म्हणु शकतो त्याला काय "रोजच्या आयुश्यात" अन्न, मैथुन ईतपत मीळवण्याची बुद्धी असतेच तेवढ तो मिळवतोच त्याला बाकीचा विचार करण्याची गरजच नाही अन्न मिळवण्यासाठी शेती करायची त्यासाठी शोध लावायचे त्यात नव नवीन संशोधन करत रहाणे ह्या भानगडीत तो कधीच पडत नाही काय कारण? स्वता:चे Existence पाहीले झाल सम्पल... तर असा हा बुद्धीप्रामाण्यवाद.

२) पशु आणी मनुश्य यामधे मग खरच काय फ़रक राहीला? तुम्ही जो बुद्धी प्रामाण्यवाद म्हणता आहात तो मानवाचा मुळीच नाही कारण मानवाकडे यापेक्षा विषेश काही तरी आहे ते म्हणजे "जिज्ञासा" . मला नाही भुक सत्य शोधण्याची असे तुम्ही म्हणालात मग मानव का म्हणुन वैज्ञानिक प्रयोग करतो का नवे शोध लावतो त्याला काय गरज आहे अवकाशातुन प्रत्येक विज्ञान शाखेतुन माहिती मिळ्वण्याची धडपड का करतो? कारण पोटापुरता अन्न तर तो जेन्व्हा आदीम स्वरुपात होता तेन्व्हाही मीळतच होते मग हे सगळे शोध कशासाठी?

३)बरे काही शोध लावुन तो थाम्बला का नाही त्याच रोज नवेनवे संशोधन चालुच आहे रोजच्या कामापुरत तर त्याने केन्व्हाच मिळवले होते तरी तो सतत काय शोधत असतो? मग ही भुक कशाची?

४)तुमच्या बुद्धीप्रामाण्यवादाचा दुसरा पैलु मला कुपमन्डुक वृत्तीचा वाटतो. फ़क्त भौतिकतेपुरताच तुम्हीच म्हणालात की देव आहे की नाही कसा आहे मला नाही ठाउक आणी मला ते जाणण्याची गरजच नाही. ठीक आहे असतात काहीन्च्या मर्यादा, समजुती, अन्धश्रद्धा. एक उदाहरण मध्यप्रदेशात एक आदीम जमात होती एका प्रचन्ड मोठ्या आणी खोल दरीत ते शतकानु शतके रहात होते त्यानी ठाम समजुत करुन घेतली की बस दरीपलीकडे जगच नाही अर्थातच त्यामुळे त्यान्च काहीच अडले नव्हते. त्याना काही गरजही नव्हती. पण असाच काहीसा हा विचार आहे असे मला वाटते. (तुमच्या विचारान्चा मान राखुन)

५) काही असतात जे साहस करुन या भौतिकतेच्या पलिकडेही जे आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणी मनुश्य म्हणुन जिज्ञासेद्वारे शोध घेणे हे मानवासाठी नैसर्गिक आहे त्यामुळे तुमचा अंतिम सत्य शोधायलाच पाहिजे का? हा तुमचा प्रश्न अगदी नैसर्गिकपणे व आपोआप निकालात निघतो. तरी ज्ञानाने प्रगत व परीपक्व मानव ज्याला अंतिम सत्य शोधण्याची जिज्ञासा व साहस आहे अध्यात्माकडे नाही झुकला तरच नवल मी तर म्हणेल की अध्यात्म म्हणजे अतिआधुनिक भौतिकतेच्याही पलिकडे सत्य शोधुन काढण्यासाठी एक उत्क्रुष्ट साधन आहे, शास्त्र आहे. अर्थात हे काही एर्या गबाळ्याच काम नोहे.

६) भारतात हा अगदी प्राचीन काळापासुन ह्यावर ऋशी मुनीन्च्या काळापासुन संशोधन सुरु आहे व त्याना काही सत्ये गवसली, ज्ञान, अनुभुती मिळवली व परमोच्च सुख मिळवले अक्षय आनन्द मिळवला व हा आनन्द सामान्य जनतेलाही मिळावा म्हणुन त्यान्ची धडपड चालु आहे अर्थात हे सगळ रोजचे जीवन साम्भाळुनच मानवाला सुखी करण्यासाठीच.

७)एक गोष्ट निश्चित की मानवाने कितीही भौतिक प्रगती केली तरी भौतिकतेपासुन त्याला पुर्ण सुख कधीच मिळणार नाही आज हे नाही तर उद्या ते नाही. विषयोपोभोग तात्पुरता आनन्द देतात पण दु:ख मात्र जास्त देतात. ज्या वस्तुपासुन सुख मिळते तीच वस्तु दुख्:ही देते. त्यामुळे ह्या भौतिकतेत पुर्ण आनन्द नाही. भौतिकतेच्या नादी लागुन माणसानी नैसर्गिक झोप सुद्धा गमावली आहे, संहारक शस्त्रे, दहशतवाद, जीवघेणे प्रदुषण. तुम्ही आता सधन देशात आहात तुम्हाला काही कमी नाही पण सोबत दुसरेही जग आहे त्यात दोन वेळ जेवण्याची भ्रान्त लोक उपाशी मरतात, हिन्सेमुळे कित्येक निरपराध मृत्युमुखी पडतात. कुठे मानव सुखात लोळतोय तर कुठे दुखाच्या खाईत. कितीही प्रगती झाली तरी ही दरी काही भरुन निघत नाहीये.

८) भ्रामक समजुत करुन घेउन देव रीटायर्ड करणारे मग ह्या भौतिक प्रगतीमुळे होणारे नुकसान तर जास्त आहे सगळी मानव जात नष्ट होण्याचा धोका आहे मग त्यालापण रीटायर्ड करण्याचे का नाही बोलत? सोबत काही Religion असे आहेत की त्यान्च्या प्रेशिताला ज्या मार्गाने सत्य कळाले तोच मार्ग योग्य आणी ईतरानीही ते मानायलाच पाहिजे. त्यासाठी क्रुसेड व जिहाद करुन हिन्साच केल्या जाते हे आपण पहातोच. मला भारतिय संस्कृतीचा याचसाठी अभिमान आहे की ती प्रत्येकाला स्वातन्त्र्य देते व एखाद्या प्रेशिताच्या, भोन्दुबाबाच्या माध्यमापेक्षा स्वानुभुती घेउन स्वता:च्या बुद्धीला, तर्काला पटेल तरच सरळ परमेश्ववाशी सन्धान साधण्यावर भर देते.

९) तरी समाजरीती, धर्म आणी परमेश्वर (देव)ह्यातला फ़रक न ओळखुन ईथे ह्या BB वर गोंधळ घालणे सुरुच आहे. अरे कोणी गायीला पुजेल सुर्याला पुजेल याचा तुम्हाला काय त्रास व्हावा आणी अन्गाचा तीळपापड व्हावा, तुम्हाला नाही पटत नका करु पण दुसर्यावर जबरदस्ती का? तो तर तुम्हाला जबरदस्ती करत नाहीये की सुर्याची पुजा कर नाही तर हो मरायला तयार? किन्वा त्यासाठी धर्मयुद्ध तर नाही पुकारले ना? जर एवढीच काळजी असेल तर त्यापेक्षा प्रदुषण, भेसळ, भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे सगळ भौतिक सुख मिळवण्यासाठीची धडपड ह्या मुळे मानवाचे तर किती नुकसान होते त्याबद्दल काही करावे.

१०) भौतिकतेमुळे मानवाने खुप प्रगती केली तर काय होइल त्याला हातपाय हलवायची गरज नाही सगळ काम कस मनात आल्याबरोबर बटन दाबल की समोर हजर अगदी मुलायम गाद्यान्मधे लोळत बसला तरी त्याला सुख मिळेल का? अजुन रोग निर्माण व्हायचे मग आहेच सगळे दवाखाने दीमतीला. नैसर्गिक निर्भेळ जीवनाचा आनन्द मात्र केन्व्हाच गमावलेला असेल.

११) आता या सगळ्यात देव कुठे आला? असा प्रश्न पडला असेल ना? आधी ह्यावर विचार करा नन्तरच रहस्य आपोआप उलगडत जाईल.


Vijaykulkarni
Saturday, July 07, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिळवण्यासाठी शेती करायची त्यासाठी शोध लावायचे त्यात नव नवीन संशोधन करत रहाणे ह्या भानगडीत तो कधीच पडत नाही काय कारण? स्वता:चे ऍक्षिस्तेन्cए

बुद्धीप्रामाण्यवाद म्हणजे काय यावर तुमचाच गोन्धळ झालेला दिसतो.


Chinya1985
Saturday, July 07, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला तुमच्या शेवटच्या पोस्ट ला पुर्ण अनुमोदन. मीपण आज तोच प्राण्यांचा मुद्दा मांडणार होतो.

शेन्डेन, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगावी वाटते की धर्मातिल काही गोष्टी सिंबॉलिक असतात. हे मंडुक उपनिषदावरिल प्रश्नाच्या वेळीही सांगायचे होते. त्यामुळे कर्मकांड वगैरेतच सर्व धर्म येतो हेही चुकिचे. देवाला भिउन वावरा ही गोष्ट हिंदु धर्म सांगत नाही. भक्ती संप्रदायात ३ गोष्टी सांगितल्या जातात्-१)देवाकडुन काहिही material मागु नका.२)त्याला घाबरु नका.३)फ़क्त त्याच्यावरच अवलंबुन रहा (म्हणजे कधी गणपतिला म्हटल मी तुझाच भक्त, कधी कृष्णाला म्हटल अस करु नका). God fearing ही संकल्पना ख्रिश्चन धर्मात आहे आणि इस्लाम मधे आहे. ही गोष्ट सुरुवातिला ठिक आहे पण higher spiritual understanding च्या वेळी ती सोडावी लागते. राहिली गोष्ट वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या गोष्टी का सांगतात. कारण की बर्‍याच गोष्टी सिंबॉलिक असतात. आणि दुसरे म्हणजे वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात तत्कालिन गरजांप्रमाणे देवाने निर्माण केले. बाह्य गोश्टी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व धर्मांचा गाभा एकच आहे. देवाला बघायला पात्रता लागते जी सर्व जण मिळवु शकतात. एकदा एका संतांना एका माणसाने विचारले की तुम्ही मला देव दाखवु शकता का.संत म्हणाले हो दाखवु शकतो पण त्यासाठी तुला spiritual डोळे लागतील ते तुझ्याकडे कुठे आहेत??ज्याप्रमाणे मायक्रोब्स बघायला मायक्रोस्कोपचे डोळे लागतात त्याप्रमाणे देव बघायला spiritual डोळे लागतात,या tiny, little eyes नी तु काय बघु शकशील??

विजयराव वेद म्हणतात त्याप्रमाणे दुसरे धर्म म्हणत नाहित पण तसे नसेल असेही म्हणत नाहित. राजयोग म्हणुन एक धर्मपध्दती आहे ज्यात तुम्हाला वेद अथवा इतर धर्मग्रंथांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही फ़क्त तुम्हाला येणार्‍या अनुभवांवर विश्वास ठेवा असे म्हटले आहे.

क्ष लिहिलेल्या गोश्टी बरोबर आहेत पण निर्गुण, निराकार हेच अंतिम रुप असेही नाही. द्वैताद्वैतवाद म्हणतो की सगुण साकार ह्या रुपाभोवती निर्गुण निराकार ब्रह्म आहे.

shrinii ,u r playin with words. this is not logic exam. still ,how do u know that God has not limited himself at a perticular place permanently??u'll come 2 know that only when u'll meet God.i wrote may because i don't know if he has done that or not. what i know is he can do anythin so he can do that thing 2. abt. omniscient-we don't know how much knowledge there is but it doesn't prove somebody else doesn't know it. as if we will know how much knowledge there is, we will become omniscient. now u have started logic thing then i'll give u an example-there is life in this world.life comes 4m life.animals give rise 2 other animals so do plants. now how logical is it when u say that there is no one 4m whome the life here started??logic is simple-life here came 4m somebody n we say that somebody is God. science has not proved that life came 4m non livin things. so according 2 ur logic there is no life on this earth. cause we can not say something is there if we don't know where it came 4m. so do u say there is no life??


Chinya1985
Saturday, July 07, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजयराव पण बुध्दीप्रामाण्यवाद असलाच पाहिजे हा नियम का??त्याची गरजच काय??जर तुम्ही म्हणता देवाची गरज नाही तर आम्ही म्हणतो मग बुध्दीप्रामाण्यवादाचीपण काहिच गरज नाहि. दैनंदिन जिवनच सर्वस्व आहे तर माग कुत्र्या मांजरांसारखे जगणे काय चुकिचे??

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators