Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
NCAA--March Madness

Hitguj » Views and Comments » General » NCAA--March Madness « Previous Next »

Moderator_5
Wednesday, March 14, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द यांच्या विनंतीवरून हा BB उघडण्यात आला आहे.

Mukund
Wednesday, March 14, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक.. खुप आभारी आहे...

या विषयाला कितपत प्रतिसाद मिळेल हे माहीत नाही. मायबोलिवरचे बरेच सभासद अमेरिकेत काही काळ वास्तव्य करुन आहेत. त्यात काही जण माझ्या सारखे इथे शिक्षणा साठी आले असतीलच. त्यापैकी काहींना जर आपापल्या कॉलेजच्या बास्केटबॉल टीम बद्दल बोलायचे असेल...खास करुन
March Madnessचालु असताना..तर त्यासाठी हा बीबी मी उघडण्यास विनंती केली.

आज जर रार इथे अजुन येत असली असती तर तिने नक्कीच इथे लिहीले असते. झालच तर आदित्य बेडेकर...तुझ्याकडुन प्रतिक्रिया अभिप्रेत आहेत इथे...:-). आदित्य तुझ्या इ मेल ला उत्तर पाठवले आहे.. मिळाले का?

या महिन्यात अमेरिकेत बहुतेक प्रत्येक ऑफ़ीसमधे
NCAA Basketball Tournamentच्या ६४ टिम्स चे Bracket बेट लावण्यासाठी मजा म्हणुन वाटलेले असते. या वर्षीची सिंड्रेला टीम कोण, पहिल्या राउंड मधे कुठले अपसेट्स पासुन फ़ायनल ४ मधे कोण जातील व Championshipकोण जिंकेल या वर सर्वत्र चर्चा असते.

मी स्वतः
University of Kansas(KU..Kansas Jayhawks) चा असल्यामुळे मला यात विशेष interest आहे. कारण traditionally KU has one of the best college basketball programs in the country. KU,University of North Carolina(Tar Heels) and University of Kentucky(Wildcats) are 3 of the winningest college basketball programs in the country. Along with UCLA and Duke, these 5 universities have dominated the college basketball for years. या वर्षी North Carolina is a first seed in East Regional where as Kansas is a first seed in West. Kentucky,Duke and UCLA are also in West Regional making West one of the toughest region out of 4, although one must admit that Kentucky and Duke had an ordinary year this year compared to their storied past.....

तर या वर्षीचे Bracket पाहुन कोणाचे काय मत आहे? मला असे वाटते की Florida,North Carolina,Memphis and UCLA( Although I want Kansas to make it to final 4 ... I think they will loose to UCLA in west regional finals..) या ४ टिम्स फ़ायनल ४ ला जातील.फ़्लोरिडा गेल्या वर्षीचे Champions आहेत व त्यांचे सगळे खेळाडु या वर्षी परत आले आहेत त्यामुळे ते परत स्पर्धा जिंकण्याची दाट शक्यता आहे...

संपुर्ण ब्रॅकेट इथे पाहायला मिळेल


http://cbs.sportsline.com/collegebasketball/mayhem/brackets/viewable_men

Mukund
Monday, March 17, 2008 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या वर्षीचा मार्च मॅडनेस सुरु झाला तरी या बीबीवर माझे गेल्या वर्षीच्या मार्च मॅडनेसचे एकमेव पोस्ट तसेच पडुन आहे.... या वर्षी कोणाला अमेरिकन कॉलेज बास्केटबॉलमधे इंटरेस्ट निर्माण झाला असेल तर त्यांच्यासाठी या वर्षीचे हे ब्रॅकेट.....

http://sports.yahoo.com/ncaab/bracket?rid=2

माझे गेल्या वर्षीचे भाकीत खरे ठरले होते.... युनिव्हरसीटी ऑफ़ फ़्लोरिडाने नॅशनल चॅंपिअनशिप मिळवली होती आणी मी सांगीतल्याप्रमाणे आमची कॅन्सस युनिव्हर्सिटीची टिम गेल्या वर्षी UCLAकडुन रिजनल सेमीफ़ायनलला हरली होती. या वर्षीची गंमत म्हणजे गेल्या वर्षी ज्या दोन टिम्स फ़ायनलला होत्या.. फ़्लोरिडा व ओहायो स्टेट..... त्या दोनीही टिम्सना या वर्षी ६४ मधे सुद्धा निवडले नाही....

माझ्या कॅन्सास युनिव्हरसीटीला.....
(KU Jayhawks) या वर्षीसुद्धा गेल्या वर्षीप्रमाणे पहिले सीडींग मिळाले आहे.. मिडवेस्ट डिव्हीजन मधे... पण या वेळेला रिजनल फ़ायनलमधे जॉर्जटाउन युनिव्हर्सीटीला हरवुन आम्ही फ़ायनल फ़ोर ला जाउ असे मला वाटते... पण फ़ायनल फ़ोरमधे आम्ही या वर्षी NORTH CAROLINA कडुन हरु असे मला वाटते... नॉर्थ कॅरोलायना टार हील्सकडे टायलर हान्सबोरो सारखा खेळाडु आहे..... जो त्यांना सहज या वर्षीचे अजिंक्यपद मिळवुन देउ शकतो....

पण या स्पर्धेला अमेरिकेत मार्च मॅडनेस म्हणत असल्यामुळे मी माझ्या भाकीतात सपशेल तोंडघशी पडु शकतो:-)

तळटीप.... आर्च... तुमची टेनेसी व्हॉलंटीअर्सची टिम या वर्षी खरच चांगली आहे... पण त्यांनी जर
NORTH CAROLINAला हरवुन फ़ायनल फ़ोर गाठलेच.... तर..... तुमची गाठ आमच्याशी आहे...आणी आमच्या KU Jayhawksविरुद्ध तुम्हाला बिलकुल आशा नाही...:-)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators