Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Jaage vhaa

Hitguj » Views and Comments » General » Jaage vhaa « Previous Next »

Phatrya
Saturday, December 02, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसे आहात आपण सर्वजण? मजेतचं असणार? हो ना!
अहो किती मौजमजा करता? आता तरी जागे व्हा.

माझा भगवा, माझा निळा, माझा हिरवा
असं म्हणता-म्हणता सारा हिन्दुस्तान जळत आहे.
राजकारण्यांनी लावलेली आग
दिवसें-दिवस उग्र रुप धरत आहे.


कळलं का काही? अहो तुम्ही जागे व्हा आणि लोकांना पण जागे करा.


Chyayla
Saturday, December 02, 2006 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ाटर्या... तु असा आयडी का घेतलास?

अरे ही जी परिस्थिती आहे ना ती थोड्याफ़ार फ़रकाने सगळ्याच जगात आहे. एखाद्या परिवारातसुद्धा जरी ते रक्ताचे नातेवाईक असले तरी वाद होतातच आणी हे जग तर किती विचारान्नी, लोकान्नी, त्यान्च्यातल्या प्रत्येकाच्या मतभेदान्नी भरलेले आहे एका गोष्टीसाठी सुद्धा मतैक्य नसत "मुन्डे मुन्डे मतिर्भिन्ना" असा प्रकार आहे. मग तिथे हे होणारच. घरातल्या भान्ड्याला भान्ड लागणारच आणी आवाज पण होणारच.

गरज आहे वैश्विक कुटुम्बाच्या सन्कल्पनेची, सर्वेपी सुखिना: सन्तु असा विचार करुन कार्य करणार्यान्ची. ह्या गोष्टीना केवळ अध्यात्मिक पातळीवरच समजुन घेता येत.

भगवा, निळा, हिरवा याच्यातला प्रत्येकजणच म्हणतो की जागे व्हा, तु पण तेच म्हणतो मग यात काय फ़रक आहे. कदाचित याला पण एक वेगळा रन्ग मिळायचा, त्यान्च्या त्यान्च्या समजुतीने ते म्हणतात जागे व्हा. तुला कश्या प्रकारची जाग्रुती हवी आहे? हे सगळ राजकारणी लोक करतात असे तुझे म्हणने आहे मग काय राजकारणापासुन अलिप्त रहायचे म्हणतोस काय त्याच्याविरुद्ध जाग्रुती म्हणतोय काय?




Mahaguru
Sunday, December 03, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ाटर्या नाही ते, 'फत्र्या' असे असावे

Robeenhood
Sunday, December 03, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मुन्डे मुन्डे मतिर्भिन्ना">>>>>>
यात काहीतरी चूक आहे...
ते पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना
कुण्डे कुण्डे नव: तोय:..

असे आहे असे वाटते...


Harshu007
Sunday, December 03, 2006 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज्या मते या सर्व बाबिनवर योग्य ति चच्रा व्हायला हवि या घडलेल्या गोष्टिवर प्रतेक मायबोलि करानि मत नोंदवावि

Phatrya
Monday, December 04, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसादजी तुम्ही बरोबर लिहलं आहे. ते नाव फत्र्या आहे.
समीरजी ही परिस्थिती सर्व जगात असली तरी तिथल्या लोकांची आणि आपल्या लोकांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आपल्या कडचे लोकं (प्रत्येक माणूस नव्हे) स्वत्: विचार करत नाहीत, जरी केला तरी ते ऐकतात मात्र दुसर्‍यांचच. आणि त्यातल्यात्यात राजकारण्यांच. काय चांगलं आणि काय वाईट यातला फरकच समजत नाही.
आणि हो मला राजकारणापासून अलिप्त राहायचं नाही. पण आपण सर्वजण एकत्र आलो तर खूप काही करु शकू. गरज आहे ती फक्त जन्-जागरूकतेची. मी कवीतेच्या माध्यमातून हे कार्य करू ईच्छितो ऐवढचं.
तुम्ही तुमचे मत नोंदविल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद!!!


Yuvrajshekhar
Monday, January 22, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फत्र्या आधी तुझी एखादी या विषयावरची कविता इथे पोस्ट कर म्हणजे आम्हाला पण कळेल तू नक्की कशाप्रकारे हे करू इच्छितोस.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators