Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Kanyadaan Koni karave??

Hitguj » Views and Comments » General » Kanyadaan Koni karave?? « Previous Next »

Jadoo
Thursday, September 21, 2006 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala tumha saglyaana wicharavese watate..ki lagnaat muliche kanyadaan koni karave? I mean jer single parent astil ter.Fakta aai asel or fakta wadil astil ter ektyaane kanyaadaan karave ka or karata yete ka?

Konanala yaacha anubhav aahe ka?


Arch
Thursday, September 21, 2006 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, तुझा प्रश्ण कन्यादान करावे की नाही असा नसल्यामुळे त्यावर माझ मत देत नाही.

Anyway आईवडिलांनी कन्यादान कराव. जिथे आई किंवा वडिल नसतील तेथे फ़क्त वडिल किंवा फ़क्त आईने कन्यादान कराव. उगाचच तेंव्हा काका काकी किंवा इतर नातेवाईकांना कन्यादान करायला सांगू नये. जेथे दोन्ही नसतील तेथे त्या मुलिला जे कोण आईवडिलांच्या स्थानी असतील त्यांनी तो विधी करावा. रुढिंनुसार काही भटजी ह्याला संमती देत नाहीत पण हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नसून मुलीला असावा. हे झाल माझ मत.


Jadoo
Thursday, September 21, 2006 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks a lot for Reply Arch
How about Widow..Widow kanyadaan karu shakate ka?

Arch
Thursday, September 21, 2006 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भटजी मानतील किंवा नाही. पण माझ्यामते आईनेच कराव. माझ्यामते ते ठरवायचा हक्क किन्वा अधिकार दुसर्‍या कोणालाही नाही.

Abhishruti
Friday, September 22, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्चच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. मला somehow 'कन्यादान' हा शब्दच आवडत नाही. आणि आरच म्हणते त्याप्रमाणे ज्या आईने मुलीला वाढविले आहे, तिच्यासाठी कष्ट घेतले आहेत तिलाच कन्यादान करायचा हक्क आहे it should not matter whether she is widow or divorcee or whatever ... ! भटजी कोण लागुन गेलाय सांगणारा. मी तसा हट्ट केला होता आणि माझ्या मैत्रिणीनेही तसेच केले. भटजीला आणि आईला तुम्ही कसं convince करता याच्यावर सर्व अवलंबून आहे. माझी आई, नातेवाईक कोणीच तयार नव्हते सुरुवातीला, सुशिक्षित असुनही! पण मी हट्टालाच पेटले , नाहीतर मी लग्नच करणार नाही असा पवित्रा घेतला.

Priyab
Friday, September 22, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कन्यादान' हा शब्द तर मलाहि ख़रेतर अजीबात आवडत नाही,पण मी अजुन एक हि लग्न या प्रथेशिवाय पाहिलेले नाही
पण मी सुद्धा वरिल २ पोस्ट शी सहमत आहे हे सम्पुर्णपणे मुलीवर अवलम्बुन आहे कि हे कोणि पार पाडावे..
आई अथवा वडिल..एकटे असले तरिहि त्यानिच ते करावे असे मला वाटते..


Sai
Friday, September 22, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कन्यादान हा विधी खरे म्हणजे मला पटत नाही आणि त्यामुळेच आमच्या लग्नात मी हा विधी होउ दिला नव्हता.. पण जर कुणाला करायचाच असेल तर ज्याने कुणी त्या मुलीला लहानाचे मोठे केले त्याच व्यक्तीला हा अधिकार असायला हवा... मग ती व्यक्ती म्हणजे आई-वडील अथव इतर कोणि असो!! अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले!!!!!

Storvi
Friday, September 22, 2006 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>अजुन एक हि लग्न या प्रथेशिवाय पाहिलेले नाही
>>मी दोन तीन लग्न पाहिलेली आहेत ह्या विधी शिवाय झालेली. आणि आम्हाला लग्नाच्यावेळी जरा अक्कल असती तर आम्हीदेखिल तेच केले असते :-O

Akashvede
Wednesday, September 27, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरिल सर्व मते वाचता, कन्यादान शब्द पसन्त नसावा असे वाट्ते, पण माता- पिता कन्यादान करतात, कारण मुलिच्या स्त्रित्वावर त्यान्ना अधिकार नसतो. ते फ़क्त त्याचे दान करतात. मुलीचा त्या घरावरिल अधिकार कायम असतो. वेद्काळपासुन ही प्रथा आहे.

दान घेणार्याला, ते दात्याला परत करता येत नाहि. ते सम्भळ्ने हे कर्तव्य असते, अणि एतर कोणला पुन्हा दान करत येत नाहि(सन्मान, सम्पत्ति, ई. हे सर्व प्रकार परत करत येतात्/ दान केले जातात.).म्हन्णुन कन्यादान हा शब्द अहे.

सक्रुत दाह ददानीति. सक्रुत कन्या प्रदीयते! '

कन्या दानाचा अधिकार, माता व पिता यान्ना सारखे च आहेत.


Abcd
Wednesday, September 27, 2006 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My family does not believe in "Kannyadan" concept.
Mazya babanni donhi bahininchya lagnat kanyadan kela nahi. For that matter mazya bhavachya lagnat tyanna pan karu dila nahi.
Dan karayala mazi mulagi vastu nahi va mazya malkichihi nahi. She is my daughter and always will be.In my wedding my dad told this to my husband. For u r marriage I give my full support and blessing to love her as I do or even more….:-)))
I am very proud of my parents

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators