Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 10, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बायोडिझेल क्रांतीची कामधेनू » Archive through August 10, 2006 « Previous Next »

Gs1
Tuesday, August 08, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सेवा क्षेत्रात मोठी आघाडी घेत भारताने विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली असली, तरी त्यात सर्वात मोठा अडथळा आणि धोका आहे तो उर्जेबाबातच्या परावलंबित्वाचा.

भारताची सध्याची खनिज तेलाची आयात १० कोटी टन एवढी आहे आणि त्यापोटी २ लाख कोटी रुपये आपण खर्च करतो. सध्याचे geopolitics तेलाभोवती एवढे केंद्रित होत चालले आहे की या आर्थिक किमतीव्यतिरिक्तही बरीच मोठी किंमत भारताला मोजावी लागू शकते. मुस्लिम देशांचा भारताच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणावरचा वाढता प्रभाव हा या परावलंबित्वाचा सगळ्यात मोठा धोका समोर दिसतो आहे. आणीबाणीच्या प्रसंगी संरक्षणासाठी पुरेस एवढेही साठे आपल्याकडे नाहीत. यावर उपाय म्हणून अरब देशांवरचे अवलंबन कमी करणे, रशिया वा व्हेनेझुएलासारखे पर्याय विकसित करणे असे काही उपाय सुरू केले असले तरी त्याची व्याप्ती मर्यादित आहेच, आणि त्यातही परावलंबित्व आणि प्रचंड प्रमाणात परकीय चलन बाहेर जाणे हे दुष्परीणाम तसेच आहेत.

विकासासाठी इंधनाची गरज तर वाढतच जाणार, आंतरराष्ट्रीय दरही भरमसाठ वाढत आहेत, वाढणार आहेत अशा पुढे भयावह होउ शकेल अशा परिस्थितीत बायो डिझेल च्या रुपाने एक कामधेनू आपल्याकडे चालून आली आहे. आता ही क्रांती देशभर कशी पसरते यावर आपण उर्जास्वातंत्र्याची लढाई जिंकू शकू का हे ठरणार आहे.

बायो डिझेल म्हणजे काय ? कुठल्याही वनस्पती तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रीयेद्वारे मोनो अल्कील्समध्ये केलेले रुपांतर म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन म्हणून वापरायच्या दृष्टीने सर्व गुणधर्म हे पेट्रोलियम डिझेलसारखेच असतात, शिवाय सल्फर नसल्याने प्रदुषण पातळी डिझेलच्या तुलनेत नगण्य असते. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य असल्याने हा पूर्णत: रेन्युवेबल असा उर्जास्त्रोत म्हणता येईल.

अमेरिकेत सोयाबीनचे तेल यासाठी वाप्रले जाते, तर पाम तेलाच वापर युरोप, मलेशियामध्ये करतात. भारतात मात्र खाद्य तेलाचीच टंचाई असल्याने ते बायो डिझेलसाठी वापरणे शक्य नाही.

जत्रोपा ह्या अखाद्य तेलबियांच्या झाडांची लागवड करून अनेक जण ते वापरत आहेत. पण अगदी देशी व कुठल्याही काळजीशिवाय पडीक जमीनीतही सर्वत्र वाढणारे करंजाचे झाड आता अक्षरश : कल्पवृक्षासारखे समोर आले आहे. आणि योग्य व जलद पावले उचलली तर एकाच दगडात उर्जा स्वातंत्र्य आणि गरिबी निर्मूलन या दोन्ही गोष्टी आश्चर्यकारक रित्या शक्य होणार आहेत.

मोठे चित्र
(१) भारतातल्या १ / ३ पडीक उजाड जमिनीचा वापर.
(२) तेवढ्या भागावर पूर्ण ग्रीन कव्हर आणि त्याचे कारबन क्रेडिटद्वारे अजून उत्पन्न.
(३) पाच कोटी कुटुंबांना आता मिळतो त्याच्या तिप्पट रोजगार (वार्षिक २४००० रुपये), तो सुद्धा एरवी रिकामे असतात त्या उन्हाळ्याच्या दोन महिन्यात काम करूनच. म्हणजे एकून २० कोटी माणसे दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याची क्षमता.
(४) पाच कोटी टन डिझेल.
(५) १५००० MW वीज़.
(६) पंधरा कोटी टन सेंद्रिय खत.

छोटे चित्र : योजना

अर्थात छोट्या छोट्या गावांना फायदा होण्यासाठी हे सर्व विकेंद्रित पद्धतीने करणे हे अत्यावश्यक आहे ते असे.

(१) दहा पंधरा गावात मिळून पाच हजार एकर पडीक जमिनीवर करंजाची झाडे लावली जातील.
(२) ही जमीन खाजगी असू शकते, वा वनखात्याची जमीन वनवासींना, एका कुटूंबाला एक एकर याप्रमाणे वापरायला दिली जाऊ शकते.
(३) पाचव्या वर्षापासून करंजाला बिया येऊ लागतात.
(४) मार्च एप्रिलमध्ये त्या गोळा करण्याचे काम चालेल.
(५) प्रत्येक एकरामागे चार टन बिया मिळतात. त्याला ६ रुपये प्रती किलो किमान भाव दिला जाईल. अशाप्रकारे थेट २४००० रुपयाचे उत्पन्न मिळेल. (सध्या ८००० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न आहे)
(६) या गावांचा मिळून एक बायो डिझेल प्लांट असेल, तिथे या बियांचे तेल, मग त्यापासून ५० लाख लिटर दिझेल आणि १.५ मेगावॉट वीज निर्माण केली जाईल जी या सर्व परिसराला पुरेल. हा कारखाना खाजगी मालकीचा, स्वयंसेवी संस्थेने चालवलेला वा सहकारी तत्वावरचा असू शकतो.

असे संपूर्ण भारतात दहाहजार प्रकल्प राबवल्यास वर दिलेले मोठे चित्र प्रत्यक्षात येउ शकते. त्या दिशेने काही कामाला सुरूवातही झाली आहे.

आपण काय करू शकतो ?

(१)तुमची स्वत : ची मोठ्या प्रमाणात पडीक जमीन असल्यास तुम्ही स्वत : हा उत्तम नफाही देणारा उपक्रम हातात घेऊ शकता, आपल्या गावाला तसे करण्यास प्रोत्साहित करू शकता.

(२)एकुणच प्रकल्प मोठा आहे आणि लागवड व सुरूवातीची पाच वर्षे झाडांची जी काही किमान निगा राखावी लागेल त्यासाठी साधारण वीस हजार रुपये एकराला असा खर्च येत आहे, ज्याची नंतरच्या उत्पन्नातून वनवासी फेड करू शकतील. एका प्रकल्पासाठी हा खर्च दहा कोटी रुपये एवढा आहे. वेळेचे महत्व लक्षात घेता असे अधिकाधिक प्रकल्प लगेच सुरू करणे हा कळीचा मुद्दा आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर आठ वर्षांसाठी सॉफ्ट लोन देणार्‍या संस्थांची गरज आहे. अशा कुठल्या संस्थेशी आपले संबंध असल्यास जरूर कळवा.

काही धोके

(१)सरकारने याचे महत्व ओळखून जत्रोपाच्या लागवडीसाठी काही अनुदान जाहीर केले आहे. पण लागवड न करता ते लाटले जाण्यासाठी रातोरात अनेक उद्योग, संस्था जन्माला आल्या आहेत. यामुळे असे सर्व सरकारी प्रयत्न पूर्ण फसण्याची शक्यता आहे.

(२)मोठ्या उत्पन्नाचे आमिष दाखवून सुपीक जमीनीवर जत्रोपाची लागवड करण्यास शेतकर्‍यांना भरीला घातले गेले आहे, यातूनही पुन्हा मोठा भ्रमनिरास होणार आहे.

(३)काही ठिकाणी सरकारने वन जमीनी या लागवडीसाठी खाजगी उद्योगांना देऊ केल्या आहेत. त्याचा फायदा घेउन भारत मुठ्ठीमे करू इच्छिणारे उद्योगसमूह जंगलेच्या जंगले ताब्यात घेउ पहात आहेत. बायो डिझेल उद्योग वाढला तर तिथेही मोनोपॉली असावी असा प्रयत्न आहे.

(४) ऑईल इंपोर्ट लॉबी सक्रीय झाली आहे आणि किमान सरकारी योजना कशा अयशस्वी होतील यासाठी हालचाली चालू आहेत.


हे सर्व लक्षात घेउन तेल आयातीचा प्रचंड पैसा गरिबांकडे वळवण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात पुढे जावा म्हणून आपल्या पातळीवर काही करता येणार असेल तर जरूर करावे असे मल वाटते.



Maitreyee
Tuesday, August 08, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1,खूप छान. नेमकी आणि उपयुक्त माहिती!

Moodi
Tuesday, August 08, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस अचूक अन सुरेख माहिती. पण अजुन एक धोका. जत्रोपा अतीशय काळजीपूर्वक हाताळावी लागते कारण ती किंवा तिच्या बीया खूप विषारी असल्याचे वाचले आहे. अन ही अशीच माहिती युवा सकाळ मध्ये किंवा सकाळच्याच दिशा या पुरवणीत वाचली होती.

पण तज्ञ लोकांच्या हाताखाली राहुन बरेच काही साधता येईल, उपाय एकच की स्वार्थी अन संधीसाधुना यापासुन लांब ठेऊन शेतकर्‍यांनी आपला विकास घडवुन आणावा.


Bee
Tuesday, August 08, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी करंजाच्या झाडांची लागवड बद्दल वर्तमानपत्रात अगदी ओझरतं वाचलं होतं त्याच कारण हे पोष्ट्स वाचून कळल. माहितीवर्धक लेख लिहिलास गोविंदा..

Limbutimbu
Tuesday, August 08, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> (५) प्रत्येक एकरामागे चार टन बिया मिळतात.
>>>> (६) या गावांचा मिळून एक बायो डिझेल प्लांट असेल, तिथे या बियांचे तेल, मग त्यापासून ५० लाख लिटर दिझेल आणि १.५ मेगावॉट वीज निर्माण केली जाईल
एक शन्का हे!
चार टन बिया म्हणजे चार हजार किलो, तर त्यापासुन पन्नास लाख लिटर डिझेल करायला कितीक टन बिया हव्यात? किती एकर जमिन लागवडीखाली हवी? अन्य काय पदार्थ वापरायला लागतील? पन्नास लाख लिटर या व्होल्युम सन्दर्भात हा प्रश्ण विचारतो हे आणि सिरीयसली विचारतो हे! :-)
आधी माझा प्रश्ण चुकला होता, तो सुधारुन लिहिला हे! :-)
मला चार टनात किती लिटर डिझेल असही माहीत होण अपेक्षित हे!


Gs1
Tuesday, August 08, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मूडी जत्रोपाला प्रोत्साहन ही अगदी चुकीची व हानीकारक गोष्ट आहे. पण तो एका वेगळ्या लेखाचा विषय होईल.

लिंबू
४ टन गुणिले ५००० एकर म्हणजे वीस हजार टन ( दोन कोटी किलो)
त्यातून २५% डिझेल मिळते म्हणून ५० लाख लिटर.
उरलेल्या ७५% टक्के, म्हणजे दीड कोटी किलो चोथ्यातून ७५ लाख मीटर क्यूब एवढा गॅस तयार होतो ज्यावर १.५ मेगावॉटचा पॉवर प्लंट चालवता येतो.
यातून पुन्हा उरलेली दीड कोटी किलो स्लरी हे उत्तम सेंद्रिय खत आहे ज्याला आता ४ रुपये किलो भाव मिळू शकतो.




Limbutimbu
Tuesday, August 08, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीएस, त्वरीत उत्तराबद्दल तुला थॅन्क्यू! :-) मला तेवढी माहीती पुरेशी हे! :-)
प्रोसेस बद्दल कुठ काय लिन्क असेल तर दे किन्वा इथे लिही! :-)
माझ्या डोक्यात पाच दहा एकर जागेवरचा इन्डिव्हिजुअल प्लान्टचा किडा वळवळतोहे, शक्या शक्यता आजमावायचा हेत! :-)
मी आता कलटी


Laalbhai
Tuesday, August 08, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगला विषय आणि चांगली माहिती.

उद्योगसमूह जंगलेच्या जंगले ताब्यात घेउ पहात आहेत.

कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच्या एका भागात बिर्लांच्या कागद बनवणार्‍या कारखान्याने निलगीरीची जंगले ताब्यात घेऊन अशीच जंगलांची आणि गावांची वाट लवली होती. विषयाशी संबंधित नाही, पण हे वाक्य वाचून आठवले ते लिहावेसे वाटले.(गावाचे नाव आता विसरलो.)




Zakki
Tuesday, August 08, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबर गॅस, बायो डिझेल हे धंदे विकेंद्रित स्वरूपात खेडो पाडी उभारावेत. शक्यतो सरकारला या सगळ्यापासून दूऽर ठेवावे. Microcredit कल्पनेचा उपयोग करून छोटे उद्योगधंदे काढावे. त्यामुळे उठसूठ शहरांकडे धावणे थांबेल. अश्या अनेक कल्पना वेळोवेळी मांडण्यात आलेल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले कुणास ठाउक?

Chandya
Tuesday, August 08, 2006 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS, nice info.

I think, use of karanja oil as biofuel was first discovered by dr. U. Shrinivasa from IISc.

Upas
Tuesday, August 08, 2006 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1, अगदी छान माहिती..


Itsme
Wednesday, August 09, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS, सुस्पष्ट आणि नेमकी माहिती ... जर हा प्रयोग कोणाला करायचा असेल तर तुमच्या plant वरचे कोणी तज्ञ मदत / मार्गदर्शन करतील का ?

(आमच्या) नगर सारख्या दुष्काळी जिल्ह्यांमधे शेतकर्‍यांना असा कहीतरी मार्ग मिळणे खुपच जरुरी आहे.


Samuvai
Wednesday, August 09, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम लेख माला गोविंद!

Gs1
Wednesday, August 09, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चंद्या, discover असे नाही म्हणता येणार कारण
(१) आपल्याकडे करंजाचा ईंधन म्हणून उपयोग प्राचीन काळापासून चालत आला आहे.
(२) बायो डिझेल निर्मितीची प्रक्रीया ही कुठल्याही ट्री बेस्ड ओईलला उपयुक्त अशी साधारण सामायिक प्रक्रिया आहे.

कर्नाटकमध्ये करंजाचा उपयोग हा बर्‍याच संघटितपणे चालत होता, त्याचा तुम्ही उल्लेख केलेल्या IISc च्या सूत्रा या गटाने अभ्यास केला आणि त्यांना पुढे मदत केली. त्यांचे काम खूप चांगले आहे आणि आम्हालाही त्यांची खूप मदत झाली आहे.


झक्की -'अश्या अनेक कल्पना वेळोवेळी मांडण्यात आलेल्या आहेत. त्याचे पुढे काय झाले कुणास ठाउक?'

झक्की,
आम्ही महाराष्ट्रात एक खाजगी मालकीचा आणि एक मेळघाटातल्या वनवासींसाठी असे दोन प्रकल्प उभारणीच्या कामाला लागलो आहोत. त्याची पुर्वतयारी म्हणून १५० टन क्षमतेचा एक चाचणी प्रकल्प गेले वर्षभर चालवत आहोत, त्यातले डिझेल हे ASTM युरोपमधून automotive grade म्हणुन प्रमाणित करून आणले आहे आणि त्यावर आम्ही स्वत्: जनसेट्स, बसेसपासून ते अगदी एक स्कोडाही चालवत आहोतच, शिवाय नियमित विक्रीही करत आहोत.

मोठ्या प्रमाणावर करायचे काम असल्याने सरकारच्या मदतीने वेगात होउ शकते. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, झारखंद आणि मध्य प्रदेशच्या सरकारांशी त्याबाबत काही चर्चाही चालू आहे, आणि काही सकारात्मक पावले उचलली जातील असे दिसत आहे.

थोडक्यात काय तर ही केवळ एक कल्पना नाही. पण आम्ही काय करतोय हा त्या लेखाचा विषय नसल्याने आणि इथे सार्वजनिक व्यासपीठावर स्वत्:बद्दल किती वैयक्तिक माहिती उघड करायची याला मर्यादा असल्याने वर त्याबद्दल सविस्तर लिहिले नव्हते एवढेच.

आरती,

असे खूप प्रकल्प उभे रहाणे हे आवश्यक आहे, कोणाला रस असेल तर शक्य ती सर्व मदत करूच. पण मी म्हटले तसे हे सर्व पडीक जमीनिवर करायचे, जिथे इतर पीक घेता येते अशा सिंचनाचा लाभ घेणार्‍या जमीनींवर नाही.

धन्यवाद सर्वांना.



Limbutimbu
Wednesday, August 09, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीयस, बरोबर हे, करन्जी पुर्वीपासुन वापरात हे! :-)
मध्यन्तरी मी लिम्बीला विचारल की जेव्हा पलित्यान्साठी रॉकेल बिकेल नसायचे तर तुम्ही कसले तेल वापरायचा? काडेपेट्या नसल्याने घरटी देवघरात निरान्जन तरी पेटवुन ठेवायला कसल तेल वापरायचा? खाद्य तेल तर परवडणे तेव्हाही शक्य नव्हते! तिने सान्गितले की कडु तेल म्हन्जे करन्जीचे तेल वापरायचो! :-) ते आठवले!
योग्य वेळेस तुझ्या कडुन जरुर माहिती घेइन! :-)
सद्ध्या मी पडीक जमिनीच्या शोधात हे! झाली सोय तर पाच धा एकराची होउ शकेल पण पुढच पुढ!
या बीबी बद्दल तुला थॅन्क्यू!


Laalbhai
Wednesday, August 09, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1:
काल सविस्तर लिहिता आले नाही.

यापूर्वी मी आधीच ऐकले होते. पण "पाण्यापासून पेट्रोल" चे प्रकरण आठवले म्हणून सोडून दिले आणि विसरून गेलो.

काल तुम्ही लिहिलेला हा लेख वाचला, आवडला आणि उत्सुकता अजुन चाळवली.

तुमची योजना चांगलीच आहे. पण मुळात बायोडिझेल आणि पारंपारिक इंधने यांची तुलना काय म्हणते यात तुम्ही सविस्तर लिहिलेले नाहीत, असे लक्षात आले. म्हणून internet वर शोधले तर खजिनाच हाती लागला!

मी चाळले त्यावरून biodiesel चे खालील फायदे लक्षात आले.

1. Negligible pollution
2. More lubricant
3. More Engine life
4. Less frequent breakdowns
5. Better milage
6. Smooth driving experience
7. The biggest advantage is that, it can be used in existing vehicals. No need for ANY modification absolutely.

शिवाय जनित्रामधे वापरायलाही हे डिझेल उत्तम आहे, असे दिसते.

ही माहिती share केल्याबद्दल धन्यवाद. बायोडिझेलबद्दल असलेला माझ्या गैरसमज तर दूर झालाच पण ही फारच उपयुक्त साधन आहे, हेही कळले. तुमच्या project ला शुभेच्छा.


अधिक माहितीसाठी लोकांनी खालच्या लिंक्स जरूर पहाव्यात.

http://www.biodiesel.org/pdf_files/fuelfactsheets/Myths_Facts.pdf
http://www.biodiesel.org/pdf_files/fuelfactsheets/emissions.pdf
http://www.biodiesel.org/pdf_files/fuelfactsheets/CommonlyAsked.PDF
http://www.biodiesel.org/


Biodiesel in India.

http://www.svlele.com/biodiesel_in_india.htm


वरील सर्व लिंक्स अमेरिकेच्या आहेत. तिथे जत्रोपा वापरत नाहीत. सोयाबीन वगैरे वापरतात. पण GS1 यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या दोन्हींच्या biodiesel मधे फारसा फरक नसतो, असे दिसते आहे.

GS1 एक साधी शंका... या दोन्ही biodiesel ची (सोयाबीन आणि जत्रोपा) तुलना करून त्याचे documented proofs आहेत का?

Laalbhai
Wednesday, August 09, 2006 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा.. हे तर बेष्टच..

A number of studies have found that biodiesel biodegrades much more rapidly than conventional diesel. Users in environmentally sensitive areas such as wetlands, marine environments, and national parks have taken advantage of this property.

Raina
Thursday, August 10, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wow GS1 !आपला लेख वाचून ज्ञानात मोलाची भर पडली आहे. Thanks a lot.

Dineshvs
Thursday, August 10, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज ना ऊद्या आपल्याला पर्यायी ईंधनाकडे वळावे लागणारच आहे.

करंजा चे झाड तसे सगळीकडे दिसते. मुंबईत पण भरपुर झाडे आहेत याची. तुकतुकीत चमकदार त्रिदलीय पाने असतात. साधारण बेलासारखी. मार्च महिन्यात मोहोर येतो. पांढरट गुलाबी रंगाची फुले असतात. झाडाखाली सडा पडतो. कुरमुरे पडलेत कि काय असा भास होतो.
याच्या शेंगा जवळपास करंजीच्या आकाराच्याच असतात. दोन ईंच लांब व एक ईंच रुंद असतात. शेंगात एकच चौकोनी बी असते.
याच्या तेलाला जरा घाण वास येतो. पण वंगण, आणि दिव्यात हे तेल वापरतात. माझ्या आजोळी डास, चिलटे ढेकुण वैगरे चावु नयेत म्हणुन हे तेल अंगाला लावत असत.


Arch
Thursday, August 10, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 फ़ारच चांगली माहिती दिली आहेत. आणि ह्या पर्यायी इंधनाकडे आपण वळू अशी अपेक्षा करते.

काही वर्षांपूर्वी माझ्या नवर्‍याने आपल्या कडच्या पाणी टंचाईबद्दल काही projects, university मधल्या Prof ना suggest केले होते with economical help पण त्याकडे इथे काही होणार नाही आपल्याकडे सगळीकडे अंदाधूंद आहे अस सांगून त्याला नाउमेद करून टाकल. आपल्याकडे shallow आणि random tapping, water resource साठी वापरल जात आणि त्याऐवजी काय केल पाहिजे ह्याच्या त्याच्या studied and tested कल्पना होत्या. पण i guess he did not find right channel to funnel his ideas. विषय वेगळा वळला गेला आहे. त्यामुळे हे post उडवल तरी चालेल.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators