Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रिस्कूल की मोन्टेसरी? ...

Hitguj » Views and Comments » General » प्रिस्कूल की मोन्टेसरी? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 19, 200620 05-19-06  5:23 pm
Archive through October 04, 200620 10-04-06  7:34 pm

Sashal
Wednesday, October 04, 2006 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगाही (वय २ वर्षं) preschool मध्ये जातो .. खरंतर daycare मध्ये .. मला वाटतं की तीन वर्षांपासून त्याला preschool/ montessori म्हणत असावेत .. कारण आत्ता या वयात कसल्याही अभ्यासाचं compulsion नसतं त्यांच्यावर, शिकले शिकले नाही तर नाही ..

मला कोणीतरी सांगितलं होतं की preschool आणि montessori मध्ये हा फ़रक असतो की preschool मध्ये वयाप्रमाणे वेगवेगळे वर्ग असतात तर montessori मध्ये सगळ्या वयाची मुलं एकाच वर्गात असतात .. मग मोठ्यांना बघून ही लहान मुलं पण पटकन आणि चांगल्या(?) पध्दतीने शिकतात ..

बाकी माझं असं मत आहे की ह्या वयात, म्हणजे २ ते ३ वर्षांच्या वयात, shapes, alphabets, colors, numbers, music etc. हा अभ्यासक्रमाचा भाग नसून मुलांसाठी नविन काहितरी माहित होणं एव्हढाच असतो .. ते आवडलं तर किंवा त्यात naturally गति असेल तर मुलं pick-up करतात, otherwwise वेळ लागतो .. पण हे त्यांना यायलाच हवं असं नाही .. अर्थात colors, shapes पटकन कळतात, numbers आणि alphabets च्या तूलनेत ..

बाकी अद्वैतही diapers न घालता जातो त्याच्या daycare मध्ये आणि हे तो फ़क्त तिकडेच करतोय कारण इतर मुलांना बघतो potty use करताना .. teachers पण मग encourage करतात .. बाकी दिवसाचे ९ तास तो तिकडे असतो म्हणजे time-table हवंच .. नाहितर teachers नी तरी कसं manage करायचा एव्हढा वेळ सगळ्या मुलांबरोबर .. मग या time-table मध्ये अभ्यास(?), music , इतर projects, outdoor play, nap time, lunch and snacks, TV बघणं हे included असतं आणि या सगळ्या activities मला योग्यच वाटतात ..


Seema_
Wednesday, October 04, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

potty trained जर मुल लवकर झाल असेल तर फ़ार problem होतो इथ day care मध्ये घालताना .
निदान आमच्या इथल्या तरी .
माझी मुलगी पण खुप लवकर trained झाली होती . आणि त्या teacher ला समजावुन सांगु पर्यंत नाकी नवु आले मला .
असो. आता झाल सगळ सुरळीत . पण बरेच दिवस आमची teacher मात्र माझ्याकडे मी "भयंकर आई" असल्या सारख बघत होती एवढ नक्की.


Bee
Thursday, October 05, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, तू म्हणते आहेस ते बरोबर आहे कारण मी कालच शुभेच्छांच्या बीबीवर अनुभव घेतला आहे. पण इथे किती कडक आया आहेत की मला टाळून सहज पुढे गेल्यात.. :-)

आमच्यावेळेला असे काही potty bitty training brining नव्हते म्हणून विचारले की हा प्रकार काय आहे नेमका.

गूगल जिंदाबाद!!!!!!


Storvi
Thursday, October 05, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>potty bitty training brining नव्हते >>अरे एवढा मोट्ठा झालास ना? :-O

Bee
Friday, October 06, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी मी एकदाची माहिती काढली. कुणाला जर नसेल माहिती तर इथे खाली लिंक देतो आहे...

http://en.wikipedia.org/wiki/Potty_training

लहान मुलांचे जेंव्हा पाळणाघरात बालसंगोपण होत असते त्यावेळी त्यांना शी सू कळायला लागणे आवश्यक आहे म्हणून potty training गरजेचे आहे.

Sahi
Friday, December 15, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणि marylandche आहे का ईथे...मी माज़्या पिल्लासाठी preschool का Montessori हा search करत आहे.

S1sd
Wednesday, March 07, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बडोद्या ला राहाते.
मला प्रेस्चूल मोन्तेस्सोरि ह्या
विशयि महीती हवी आहे.
आणि बदोद्यात प्रेस्चूल हया शाखा आहे का?
कोठे?
धन्यवाद.


Dipadeshpande
Friday, March 16, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा दोन वर्षाचा आहे. त्याला अडिच वर्षानन्तर प्ले स्कुल मध्ये घालणे गरजेचे आहे का? नाहितर तिन वर्षानन्तर नर्सरित घातले तर चालते का? मी भारतात राहते दिल्लिला.

Visoba_khechar
Saturday, March 17, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>लहान मुलांचे जेंव्हा पाळणाघरात बालसंगोपण होत असते त्यावेळी त्यांना शी सू कळायला लागणे आवश्यक आहे म्हणून potty training गरजेचे आहे.

पॊटी य़्रेनिंग?? हा हा हा! साला आमच्या लहानपणी संडासात आधीच जर कुणी गेलेला असेल तर आमच्या मातोश्री आम्हाला चक्क घराच्या गॆल्लरीमध्ये जुन्या वर्तमानपत्रावर बसवायच्या! शिवाय वर "मेल्या, दुसरं कुणी गेलं की तुला नेमकी कशी लागते रे?" हेही सुनवायच्या!! असो..;)

सत्तरीच्या घरातली आहे आता आमची म्हातारी. तिनं किती साधेपणानं वाढवलं आम्हाला हे आठवलं की आजही खूप समाधान वाटतं! काळ बदलला हेच खरं. आईने हाताला खेचत नेऊन, खसकन चड्डी गुडघ्यापर्यंत ओढून वर्तमानपत्रावर हागायला बसवणे याला "पॊटी ट्रेनिंग" म्हणतात हे आज समजलं! ;) म्हणजे आमचं पॊटी ट्रेनिंग वर्तमानपत्रावर झालं म्हणायचं तर!;)
"पॊटी" नांवाचं एक ट्रेनिंग असतं आणि ते आपल्या मुलाला द्यायचं असतं हेच बिचाऱ्या आमच्या माउलीला माहीती नव्हतं! असो!!

परवाच मायबोलीवरची कुणीतरी आई, 'माझा मुलगा फक्त त्याचं फेवरेट फूड खातो, मी काय करू?' या आशयाची तक्रार करत होती. ते वाचून सहजच आमच्या म्हातारीने आम्हाला लावलेल्या तूप-साखर-पोळीच्या गुंडाळीची गोडी आठवली! पोळी ताजी-गरम असेल तर लसणीची चेटणी, किंवा लोणच्याचा खार, किंवा तूपसाखर, किंवा तूपगूळ घालून पोळीची गुंडाळी करायची आणि खायची! शिळी पोळी असेल तर तूपगूळ किंवा तूपसाखर घालून तिचा कुस्करा करायचा आणि खायचा. किंवा मग फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात! साला खूप साधा जमाना होता. काही वेळेला आज्जी छानसे दूध-दही पोहे, कोळाचे पोहे, दडपेपोहे असं छानसं मधल्यावेळचं खायला करायची! उकड, थालीपीठ, या पदार्थांची पण चंगळ असे!

असो! आमच्या आईच्या काळात, 'माझं कारटं घरचं अन्न खात नाही हो, मी काय करू?' असं विचारायला इंटरनेटही नव्हतं आणि लेकुरवाळ्या लेकीसुनांच्या घरगुती तक्रारी मांडायला मायबोलीसारखी एखादी साईटही नव्हती हेच खरं! ;)

आपला,
(Outdated!) तात्या.

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=875925#POST875925

Sahi
Tuesday, June 10, 2008 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले वर्षभर माझी जिया (३ ची होईल जुलेमधे)एका प्रीस्कुलमधे जात आहे छान रहाते..घरी येताना आनंदी फ्रेश असते. थोडी शांत आहे सुरुवातिपसुनच पण आता तिच्याकदुन करुन घेतल्याजाणार्या अएक्टीविटीज मधे तोच तोच पणा येतोय असे मला वाटत आहे. आणि आजुबाअजुचि मुले मोन्टेसरीत (३ मुलि २ मोन्टेसरित हि प्रीस्कूल)आहेत तर बदलु का तिचि शाळा? तीच्या फ़्रेन्ड्सर्कल(?) च काय?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators