Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
डान्स बार वरील बन्दी चूक की बरोबर? ...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » डान्स बार वरील बन्दी चूक की बरोबर? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 16, 200624 04-16-06  8:53 am
Archive through April 18, 200620 04-18-06  11:22 pm

Dineshvs
Wednesday, April 19, 2006 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे मुळात डान्स बार्स हि समस्या नाहिये तर स्त्रीचे शोषण हि समस्या आहे.
यासाठी स्त्रीनेच स्वताला ईतके ऊंचावर नेले पाहिजे कि कुणाला तिच्याकडे वाकड्या नजरेने बघताहि येऊ नये.
आजहि स्त्रीया ईतक्या ऊंचीवर आहेतच, फक्त त्यांचे कर्तुत्व, लोकांसमोर आणले जात नाही.
अगदी मेधाचेच ऊदाहरण घ्या. तिची मते कदाचित पटणार नाहीत, पण तिचा प्रामाणिकपणा वादातीत आहे. तिने कधीच काहि लपवलेले नाही. मग सगळे ऊघडे टाकणार्‍या सिनेमानटीपेक्षा ती श्रेष्ठ आहे कि नाही ? मग तिचे कौतुक कोण करणार ?


Sanghamitra
Wednesday, April 19, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजची DNA मधली बातमी.
मुंबईत बारबंदीच्या वेळी ज्या ७५००० हजार बारबाला होत्या त्यातल्या ७५०० गल्फ मधे गेल्या. पण आता बंदी उठली की त्यांना परत यायचेय म्हाने.
बातमीची हेडलाईन Bargirls moved to gulf are feeling homesick about Mumbai अशी होती. म्हटलं काय ही देशभक्ती!
बातमीत लिहीलेय की तिथे त्यांना महिन्याला १८००० रुपये मिळतात. आणि मुंबईत कमीत कमी १२०० रुपये एका दिवसात मिळतात. आणि वीकेंड्स ना त्यापेक्षा जास्त. म्हणून आता त्यांना परतीचे वेध लागलेत.
खरंच खूपच शोषण होत होते त्यांचे बार्स बंद झाल्याने. चला आपली संस्कृती, नवी पिढी वगैरे राहू दे बाजूला. आपल्या परंपरागत सहिष्णु वृत्तीने त्यांचे स्वागत करू. :-(


Mekhla
Wednesday, April 19, 2006 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे वरती कुणीतरी 'अतिरेकी २ ४०० लोकांना मारतील, पण डान्सबार मुळे अख़्ख़ी पिढी बरबाद होईल' अश्या अर्थाचे काही लिहीले आहे.
मला त्यांची काहीच महिती नाही, पण माझ्यापुरते बोलायचे झाले तर माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करताना तो अतिरेकी हल्ल्याचा बळी ठरेल ह्यापेक्षा जास्ती भिती मला कशाचीच वाटत नाही. त्यापेक्षा मल तो डान्सबार मधे पडीक पण जिवंत राहिलेला परवडेल.
डान्सबार वाईट हे पटवून देताना अतिरेकी हल्ला बरा हे कुठल्याच मनसिकतेला पटू नये.

बाकी मी दिनेश आणि gs1 शी सहमत आहे.
एक म्हणजे मी (किंवा इतर कुणीही) कुठला व्यवसाय करावा हे सरकारने ठरवू नये. त्यावर किती कर आकारवा हे ठरवावे हवे तर, किंवा किती सुविधा द्याव्या अगर देऊ नये हे ही.

कुठलाही व्यवसाय बंद पाडायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे लोकांनी ती सेवा न वापरणे. तसे नसेल तर जोवर गिर्हाईक आहे तोवर तो येन केन प्रकारे चालूच रहाणार.



Aschig
Thursday, April 20, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sanghamitra, if those bargirls who want to come back are Indian by nationality, they have a right to come back. If they are not, and would just want to replace other Indian girls' right to earn a living, there should be enough stops to prevent them getting in.

lampan, this may be a change of topic, but I feel exactly like you feel when I see people being superstitous :-(

Sanghamitra
Thursday, April 20, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashish of course I know that as they are indian citizens, they have all rights to come back. The point is: It's a question of more money and not just earning a living.
And this shows that where other professions normally draw more money in gulf than India, bardancing is a sparkling exception in Mumbai.
I Should stop here as it may again get connected to the money matters discussed on other bb.

Deepanjali
Monday, April 24, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजहि स्त्रीया ईतक्या ऊंचीवर आहेतच, फक्त त्यांचे कर्तुत्व, लोकांसमोर आणले जात नाही.
अगदी मेधाचेच ऊदाहरण घ्या. तिची मते कदाचित पटणार नाहीत, पण तिचा प्रामाणिकपणा वादातीत आहे. तिने कधीच काहि लपवलेले नाही. मग सगळे ऊघडे टाकणार्‍या सिनेमानटीपेक्षा ती श्रेष्ठ आहे कि नाही ? मग तिचे कौतुक कोण करणार ?

<<< Comparing apples and oranges is useless, isn't it ?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators