Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पगार किती म्हन्ता...? ...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » पगार किती म्हन्ता...? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 13, 200620 04-13-06  6:39 am
Archive through April 14, 200620 04-14-06  10:16 am

Aschig
Friday, April 14, 2006 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maanus, I think bhangi was a random example taken to indicate that ALL jobs are important, not to be taken in particular. Nevertheless, if you take the changing global needs into consideration, especially in the villages which make up our majority population, we neither need concrete and metal WCs (which are accompanied by Honeysuckers here) nor bhangi's but bio-friendly units which return the biostuff back to the biosphere for recycling.

occupations are often invented to serve a niche. Many times they outgrow their utility and those in that occupation continue to sway the public through false propoganda. If we could get rid of them, the national per capita income will be better (with those people doing real jobs too).

incidently, during the industrial revolution, easy methods of mass use of iron was what was invented.


Ekanath
Friday, April 14, 2006 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरजच काय आहे माणसाने आपले आयुष्य अश्या कामामधे वाया घालवण्याचे.

अहो, आयुष्य वाया जात नाही हो त्यांचे सत्कारणी लागते. किमान "हे" तरी काम त्यांना मिळते, नाहीतर उपासमारच व्हायची!

अर्थात आशीश यांनी म्हटल्याप्रमाणे भंगी हे एक उदाहरण झाले. रस्ता साफ करणाराही घ्या. तिथे तर सगळे automatic नसते ना? किमान भारतात तरी मनुष्य लागतोच रस्ते झाडायला.

असो, पोलिस यांनी मांडलेला मुख्य विषय आर्थिक विषमतेचा आहे.


Zakki
Friday, April 14, 2006 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरी पगाराची तफ़ावत इथेही आहेच.
storvi, तुमचा मुद्दा योग्य. पण मला असेहि म्हणायचे होते, जे मी म्हंटले नाही, की, मुळात निदान मूलभूत गरजा भागतील एव्हढे पैसे मिळवण्याला इथे अनेक मार्ग आहेत, अगदी निव्वळ चैनीसाठी सुद्धा लागणारे पैसे मिळवण्याची सोय आहे. त्यात इतर, विशेषत: यूरोप (इंग्लंड) इथल्या सारखा Class consciousness , नि त्यातून उद्भवणारा काम करण्यातील कमीपणा कमी प्रमाणात आहे. अर्थातच उगीचच कुणि कमी पगाराची, 'हलक्या दर्जाची' नोकरी करणार नाही, जास्तीत जास्त सोयिची, जास्त पगाराची नोकरी मिळवण्याची धडपड करतातहि, नि ती धडपड पण चांगलीच यशस्वी होते. (म्हणजे दहा वर्षे अत्यंत आरामात, केवळ थोडा वेळ काम करून, मी पण बक्कळ पैसा मिळविला, (नि घालविला))

तर अशी परिस्थिती जेंव्हा भारतात येईल, तेंव्हा तिथे पण भंगीकाम करायला 'भारतातील' एक अख्खा माणूस खर्च करावा लागणार नाही. मग भारताला पण श्रीमंत, पुढारलेल्या अमेरिके सारखे दुसरेच प्रश्न उद्भवतील! illegal immigration, इतर धर्मीयांचे आक्रमण इ. फक्त hopefully , चक्रनेमिक्रमेण परत मुसलमान किंवा कुणितरी इतर येऊन भारतावर राज्य करू शकणार नाहीत, जर आपण इतिहासापासून काही शिकलो तर!!!


Sanghamitra
Saturday, April 15, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण सगळे लोक जे ही साईट access करतोय ते किमान internet surfing करू शकतो. पण कित्येक लोकांचा IQ हा आपल्या या internet surfing community पेक्षा कमी असतो. त्यांना डोके लावून करायची कामं जमतच नाहीत. मग शारिरिक कष्ट हाच पर्याय अहे. भंगी, रस्ते झाडणारे हे काम करणार्‍या लोकांना तुम्ही कारकुनी किंवा डोक्याची कामं दिलीत तरी ती त्यातल्या बहुतेकांना जमतील असं वाटत नाही.
माणूस कुठलंही काम करतो तो त्याच्या कुवतीप्रमाणेच करतो.
मधे कोलकात्याच्या सायकल रिक्षा बंद करा असं मानवी हक्क वाल्यांचं म्हणणं होतं. ते सायकल रिक्षावाल्यांनीच हाणून पाडलं.
एक गोष्ट कितीही कटू असली तरी सत्य आहे. तुमच्या कुवतीप्रमाणेच तुम्हाला काम आणि पैसा मिळणार.
कुणी काही समाजसेवा म्हणून कुठलं काम करत नाही. पैसा आणि स्वानंद (job satisfaction) या दोन गोष्टीच प्रत्येक जण बघतो. मग उगीच रडण्यात काय अर्थ आहे?
हां इतरांनीच म्हटलं पाहिजे की माझ्या मुलाला चांगले शिक्षक मिळावेत म्हणून मी जास्त पैसा द्यायला तयार आहे. तुम्ही शिक्षकांचे पगार वाढवा पण चांगले शिक्षक नेमा. प्रायव्हेट क्लास वाले खोर्‍यानं पैसा ओढतातच.
आणि resident doctors चं तरी काय?
त्यंच्या क्षेत्रात हल्ली super specialization केल्याशिवाय काही होतच नाही. आणि हे सगळं ते करत असतात ते शेवटी स्वतःचं hospital or clinic काढायचं आणि बक्कळ पैसा कमवायचा या उदात्त भावनेनेच ना.
शिवाय खेड्यात तर नुसत्या MBBS झालेल्या डॉक्टरांना सुद्धा दोन वर्षात बंगला गाडी घेता येईल इतका पैसा मिळतो. पण खेड्यात जाणार कोण? खेड्यातली internship सुद्धा नको असते त्यांना.
IT, management या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा, असुरक्षितता आणि एकूणच भविष्याच्या तरतुदीचा अभाव या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला सतत updated रहावं लागतं, सतत अभ्यास लागतो. अनियमित वेळी आणि बहुतेकदा आठपेक्षा कितीतरी जास्त तास काम करावं लागतं. on call असाल तर डॉक्टरपेक्षा जास्त वेळा झोपमोड होण्याची शक्यता असते.
तुम्ही ज्याला तुमची सेवा देता त्या client base ला तुमची सेवा किती गरजेची वाटते आणि तुमच्याकडूनच ते करून घेण्यासाठी ते जस्तीत जास्त किती पैसा खर्च करू शकतात त्यावर तुमचं मूल्य अवलंबून आहे. After all it all depends on how you sell yourself!
तुम्हाला जास्त पैसाच हवा असेल तर आम्हाला आम्ही काम करतोय त्या क्षेत्रात द्या म्हणण्यापेक्षा तुम्हीच पैसा असलेल्या क्षेत्रात उतरून दाखवा.


Arch
Saturday, April 15, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भंगी, रस्ते झाडणारे हे काम करणार्‍या लोकांना तुम्ही कारकुनी किंवा डोक्याची कामं दिलीत तरी ती त्यातल्या बहुतेकांना जमतील असं वाटत नाही. >>
संघमित्रा, हे पटत नाही. पुष्कळदा परिस्थिती, आजूबाजूच वातावरण कारण असत.
त्यंच्या क्षेत्रात हल्ली super specialization केल्याशिवाय काही होतच नाही. आणि हे सगळं ते करत असतात ते शेवटी स्वतःचं hospital or clinic काढायचं आणि बक्कळ पैसा कमवायचा या उदात्त भावनेनेच ना. >>
हेही पटल नाही. सरकारी hospitals मधले Doctors केवढ्या कमी पगारावर काम करतात आणि तिथूनच retire होतात. मानवसेवा हा त्यांचा धर्म असतो. स्वानुभवावरून सांगते आहे.

आता इथेच थांबते. मी IT मध्ये आहे. outsourcing मुळे IT त पैसा आहे. त्या क्षेत्रात इतरांच्यपेक्षा फ़ार काही मर्दुमकी गाजवत आहात म्हणून नाही. नाहितर IIT चा mechanical engineer हा B.Com. करून computers चे courses घेतलेल्या programmer पेक्षा कमी कमावतो तेंव्हा त्याच्या बुध्दीमत्तेला किंवा शिक्षणाला अनुसरून त्याला पैसा मिळत नाही ही त्याची तक्रार अगदी रास्त आहे.


Mrinmayee
Saturday, April 15, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, तुझं (तीन्ही मुद्द्यांबद्दलचं) म्हणणं १००% पटलं. माझा नवरा IIT graduate, IISc post-graduate असतानादेखिल, त्यानं public sector company तली नोकरी सोडली. तुटपुंजा पगार आणि वरिश्ठांची त्याच्यासारख्या सगळ्यांच्या ढोरमेहेनतीबाबत अनास्था!

Yog
Saturday, April 15, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्घमित्रा,
मुद्दे फ़ार एकान्गी वाटतात शिवाय डोक्याची काम जमत नाहीत म्हणून भन्गी काम करतात हे विधान खटकत.

मला वाटत याच so called मानसिकता व दृष्टिकोनावर पोलिसाला आक्शेप असावा. कुठल्याही व्यवसायाकडे निकृष्ट वा कमी प्रतीचा म्हणून जेव्हा समाज बघतो तिथूनच विषमता सुरू होते. खर तर जी अन्गीभूत अन पारम्पारीक गुणवैशीष्ट्ये असतात त्यात मनुष्य जास्ती यशस्वी होतो. सोनार काम, लोहार काम, बागकाम, शेती, बान्धकाम, इत्यादी काय कमी बुद्धी वाल्यान्ची कामे आहेत का..? अजीबात नाही. किम्बहुना या व अशा बर्‍याचश्या व्यवसायात उत्पादन, गुन्तवणुक, खरेदी, विक्री, बाजारपेठ याही बाबीन्च भान ठेवाव लागत. so saying that IT/IM reflects "highly talented" and everything else is "for the lower class" just doesn't stand on any merrit. सामजिक अन राजकीय दोन्ही पातळीवर जोपर्यन्त सर्व व्यवसायात "proprtionate" गुन्तवणुक होत नाही तोवर ही पगारातील विषमता ही कायमच असणार आहे अस मला वाटत. right now IT/IM all seem to be "offshoring balloon" phenomenon.. तोही फ़ुटेलच तेव्हा सर्व परत एकदा येरे माझ्या मागल्या आहेच. economy cycle पाहिली तर लक्षात येईल की पाच वर्ष प्रगती अन पाच वर्ष मन्दी असा आजकाल जगात trend दिसतो.. पण ज्या मुलभूत सेवा अन सुविधा देणार्‍या नोकर्‍या असतात त्या मात्र अजूनही बहुतांशी खितपत पडलेल्या दिसून येतात. कदाचीत पोलिसाला याच विषमतेबद्दल बोलायचे असेल. पगार किती हे फ़क्त त्या विषमतेच सान्ख्यिक निदर्शक आहे!


Zakki
Sunday, April 16, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा एक गमतीशीर गोष्ट संगून वादाचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. पटल्यास बघा, नाहीतर सोडून द्या. पण विचार केला तर काही शिकण्यासारखे आहे.

एकदा एक IIM चा पदवीधर नि एक Harvard चा पदवीधर, दोघेहि महाराष्ट्रीय, यांनी ठरविले की आपण आता business बद्दल एव्हढे शिकलो आहोत, तर आपण दाखवून देऊ की महाराष्ट्रीय पण धंद्यात मागे नाहीत. त्यांनी पाहिले एक अशिक्षित वाणि त्यांच्या भागात किराणामालाचे दुकान चालवून अतिशय गब्बर झाला आहे. त्यांनी ठरविले, की त्याला शह द्यायचा, नि त्याचा काही धंदा आपल्याकडे वळवायाचा. तर त्यांनी पुन: एकदा त्यांची पुस्तके वाचून, business planning, strategy, tactics इ. चा अभ्यास करून ठरविले की आपण सुरुवातीला फक्त गोडे तेल विकायचा धंदा करून, त्यातला नफा वापरून मग धंदा वाढवू. त्याप्रमाणे त्यांनी गोड्या तेलाचा धंदा काढला. वाण्याकडे तेल ५० रु. किलो, तर यांनी ४५ रु. किलो लावले. लगेच वाण्याने ४० रु. किलो केले, यांनी ३५. असे करता करता हळू हळु वाण्याकडून गिर्‍हाइके यांच्या दुकानात येऊ लागली. शेवटी वाण्याने २० रु. किलो भाव लावला. यांनी ठरविले की आपण आता हार मानायची नाही. आपण १५ रु. किलो भाव लाऊ. त्यांच्या बायका, मोठी माणसे म्हणाली अरे, काय वेडे का खुळे तुम्ही? जेव्हढ्याला तुम्ही तेल आणता त्याच्यापेक्षा कमी भावात विकाल तर दिवाळे निघेल. पण यांनी ऐकले नाही. इकडे वाण्याने पण भाव १० रु. किलो केला. बघता बघता एका दिवसात त्यांच्या दुकानातून बर्‍याच गिर्‍हाईकांनी येऊन सगळे तेल घेतले. यांचा एव्हढा तोटा झाला की पुन: आणखी तेल आणायला पण पैसा उरला नाही. शेवटी हाताला रुमाल बांधून ते वाण्याकडे गेले नि म्हणाले, आम्ही हरलो, पण तुला तरी एव्हढे कमी भाव कसे परवडत होते?

वाणी शांतपणे उद्गारला. अहो, मी नुसताच बोर्ड लावत होतो, भावाचा. गिर्‍हाईके आली की त्यांना सांगत होतो, तेल संपले, मग ते आपसूकच तुमच्या दुकानातून तेल घेत होते!


Moodi
Sunday, April 16, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की....

हा लोकसत्तामधील एक लेख.

http://www.loksatta.com/daily/20060416/lr03.htm .

Moodi
Sunday, April 16, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक बाई आपल्या उच्च विद्याभुषीत सुनेला घेऊन बाजारात गेली. तिथे नेहेमीच्या भाजीवालीला तिने कौतुकाने सांगीतले ही बघ माझी सुन, भरपूर शिकलेली, दणदणीत पगाराची नोकरी आहे हिला.
भाजीवाली सगळे निरखुन बघत होती, भाज्यांचे वजन करीत होती. अन सुन त्या भाज्या पिशवीत भरत होती. भाजी वाली म्हणाली खरय बाई तुमचे, ती खुप शिकलेली आहे हे मला आधीच कळले.

कसे ग? जेव्हा तुमच्या सुनेने टॉमेटो पिशवीच्या तळाला अन कांदे बटाटे वरती भरले तेव्हाच तिचे व्यवहार ज्ञान कळले. भाजीवाली शांतपणे म्हणाली.

सातवी आठवी शिकलेले धिरुभाई अंबानी कितीतरी हजार कोटींचा रीलायन्स उद्योग उभा करतात ते मेहेनत अन कष्ट करण्याची वृत्ती अन कुवत होती म्हणुनच.

तळातुन वर कसे यायचे ते व्यक्त्तीने ठरवायचे.


Zakki
Sunday, April 16, 2006 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिक्षकांचे नि पोलिसांचे पगार कमी असतात, म्हणून त्यांनी तक्रार करणे मला तरी योग्य वाटते. पण कधी कधी कुठले लोक पगाराबद्दल तक्रार करतात? U.S. News & World Report या मासिकातील च्या १७ एप्रिलच्या अंकातून (पान १८) घेतलेली काही वाक्ये:

"Making between $149,132 and $208,100 (On par with the vice president and House speaker) does not cut it anymore. Listen to Supreme Court Justice Anthony Kennedy. 'We are patronized when we meet judges from England, the European Union, or Malaysia, whose salaries double that of ours,' he tells a House subcommittee. 'They say, "We are sorry about you salaries." You should not put us in that position.
His dramatic complaints reveal that judicial pay has gone from a whine to a serious issue that Chief justice John Roberts plans to raise it in the Congress.'The failure of the Congress to address the problem of judicial salary is assuming the proportion of a historic wrong.' The higher workload even has older judges off the links and in court full time. 'They don't have to that,' they don't have to work at all.' says kennedy."

लिन्क्स, म्हणजे गोल्फ खेळायची जागा. आणि हे पगार वर्षाचे. आता ही म्हणजे तहाहयात नोकरी, अतिशय उदार benefits आणि बहुमान मिळणारी अमेरिकेतील फक्त नऊ माणसे! मग दोन दोन नोकर्‍या करणार्‍यांनी काय म्हणावे?
तुमच्या पैकी ज्यांना त्यांच्याहून कमी पगार मिळत असेल, त्या सर्वांनी तक्रार करायला काहीच हरकत नाही!



Maitreyee
Sunday, April 16, 2006 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या २ दिवस इथे फ़िरकले नाही तर अर्काईव्ह भरून चाललेत!
(पेडगावचे?) पोलिस, एकनाथ,आणि जे कोणी मी अज्ञानी आहे किन्वा मी खोटे बोलतेय असे समजत आहेत त्यांच्यासाठी : :-)
मी सरकारी ' माहितीचा अधिकार ' वापरला तेव्हा Department of education च्या website वर काही interesting माहिती मिळाली ही पहा
Monthly Emoluments (NAME, DESIGNATION, SALARY IN RS :-)
182 JAGDISH PRASAD SR PEON 8379
183 RAMAKANT YADAV SR PEON 7262
184 BUDH RAM PEON 7761
185 MAMAN SINGH PEON 8070 :-)
आणि कोणत्या शिक्षकांना ' एवढा पगार ' आहे विचारलेल्यांकरता मी नेट वर शोधले. College teachers(professors) salaries बद्दल इथे
UGC website वर सर्व माहिती आहे. शाळा शिक्षकांबद्दल अजून Direct info chi link नाही मिळाली तरी इथे पहा अझिम प्रेमजी फ़ाउंडेशन चा एक सर्वे
'Motivation of Teachers' बद्दल, त्यात त्यांच्या (सरकारी शाळेतले शिक्षक)पगाराबद्दलही डीटेल्स आहेत
इथे पहा
त्यातले काही डीटेल इथे कॉपी पेस्ट करत आहे
Basic Pay-scales of School teachers, (in Rs.)

Entry grade 6500-10,500, per year increment of 200 increment

10 years later:
7500-12,000, per year increment of 250

20 years later: No automatic increase 7500-12,000,

Source: Education Department Notifications, Government of Rajasthan (compiled in 2004)

***The gross pay includes basic pay plus dearness allowance announced from time to time based on cost of living index
plus house rent allowance + city compensatory allowances for urban teachers..........

सांगायचा मुद्दा एवढाच की मी ते १२, २१ हजार वगैरे आकडे लिहिले ते खोटे, २२व्या शतकातले वगैरे नव्हते:-)
आता खाजगी शाळांत वगैरे कमी पगार असणे(जो लहान कंपन्यात इंजिनियर असो की आणखी कुणी त्यांनाही कमीच असतो), किन्वा सही १० वर घेऊन ४ च देणे हा विषय च वेगळा आहे.
आणखी वेळ झाला की लिहीन, बाकी चर्चा चालू द्या :-)



Zakki
Sunday, April 16, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या २ दिवस इथे फ़िरकले नाही तर अर्काईव्ह भरून चाललेत!
माफ करा मैत्रेयी, इथे कुणिच नव्हते, नि मलाही काही उद्योग नव्हता, म्हणून खरडले काहीतरी. Admin ना सांगून उडवून दिलेत तरी काऽहि फरक पडणार नाही. म्हणजे उगीच Archive होत रहाणार नाही, नि विषयाला धरून जे आहे, तेच राहील


Maitreyee
Sunday, April 16, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की
तुमच्या पोस्ट्स बद्दल नव्हे, माझ्या त्या पोस्ट नन्तर इथे केवढी पोस्ट येऊन पडली अशा अर्थाचे general statement होते ते
:-)

Moodi
Sunday, April 16, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलीस तुम्ही मागे वर्षापूर्वी लोकसत्तात आलेला आपले निवृत कमिशनर श्री अरविंद इनामदार यांचा लेख वाचला होता का? त्यात त्यांनी पोलीसांच्या मागण्या कशा रास्त अन योग्य आहेत याविषयी फार सुरेख लिहीले होते. दुर्दैवाने मला ती लिंक शोधुनही सापडली नाही. सब इन्स्पेक्टरला सुद्धा अगदी झोपडपट्टीत रहायची वेळ आलीय हे त्यावेळी वाचुन खरच वाईट वाटले.

Sanghamitra
Monday, April 17, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


योग मला कुठल्याच कामाला कमी लेखायचं नाहीये.
भंगी किंवा सफाई कामगार हे एक उदाहरण झाले. ते कमी महत्वाचं नाहीयेच.
आणि IT, IIM यांच्या नोकर्‍या फक्त मेरिटवरच असतात आणि त्यात अजून सरकारी नोकर्‍यांसारखी reservations आलेली नाहीयेत. वशिलेबाजी सुद्धा अजिबातच होत नाही. निदान नोकरी मिळवताना.
मला म्हणायचं होतं एखाद्या industry चा पगार ठरण्यासाठी काही calculations असतात त्याप्रमाणेच तो ठरतो. आणि बहुतांश लोक (यात सगळे मायबोलीकर बसतील असं मला म्हणायचं नाही. त्यातले बरेचसे नक्किच social work करण्यासाठीच जगत असणार. मग ते IT मधे असले तरी) हे नेहमी पैसा, प्रतिष्ठा आणि आपली कुवत या गोष्टी पाहूनच आपले करीयर निवडतात. स्वछंदी आणि कलाकार लोक मात्र आपल्या मनाचा कौल घेऊन हे ठरवतात.
आणि शेती, सराफी, लोहारकाम हे सगळे business आहेत. त्याची तुलना नोकर्‍यांशी कशाला? त्याला नक्कीच पाट्याटाकू नोकर्‍र्यांपेक्षा जास्त डोके लागते. आणि डोके असलेला आणि कष्टाळू माणूसच त्यात पैसे कमावतो हेच तर म्हणायचे होते मला.
शिक्षकांना पगार कमी मिळतो हे मी माझ्या आधीच्या पोस्टमधे म्हटलेच आहे.
पण एखाद्या वर्गाला जास्त पगार मिळतो तो आपोआप दुसर्‍या service industry कडे जातोच की.
इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि लोकशाही असलेल्या देशात प्रत्येक industry ला सारखा पगार देणं शक्य नाही. खूप तफावत असणं नक्कीच चूकच आहे.
मूडी अंबानी कुणाकडे मला पगार वाढवून हवाय म्हणायला गेले होते हे नव्हतं बाई मला माहिती. मला आपलं वाटत होतं की आपल्या अक्कलहुषारीनेच त्यांनी स्वतःचं business empire उभं केलं
आता सगळ्यांसाठी एक general दिवा



Moodi
Monday, April 17, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा अशा शब्दात लिहायची काहीच जरुरी नव्हती, अन तू अशा शब्दात लिहीशील हे ही मला वाटल नव्हत बाई, अन तुझा दिवा तुलाच लखलाभ.
ते उदाहरण मी अशासाठी दिले की बरेच जण व्यवसाय करतात पण वाईट अनुभवांमुळे हताश पण होवुन अर्ध्यावर सोडतात, पण काही लोक व्यवसाय असो वा नोकरी खचुन न जाता आपला लढा जिद्दिने चालु ठेवुन एक होवुन मागण्या सुद्धा मान्य करुन घेतात.पोलीस, शिक्षक असो वा डॉक्टर जे अहोरात्र सतत सेवा देत आहेत त्यांना त्यांचे अधिकार मिळायला हवेच.



Sanghamitra
Monday, April 17, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिक्षक आणि डॉक्टरच का प्रत्येकालाच त्यांचे हक्क मिळायला हवेत.
पण पोलिसाची आणि इतरही लोकांची IT, IIM च्या पगारांशी केलेली तुलना पटत नाही. इथं बीबी त्याच गोष्टींनी सुरू झालेला दिसतोय.
उगीच एखाद्या शेजारच्या सुंदर मुलीला श्रीमंत नवरा मिळाला म्हणून प्रत्येकीलाच हवा म्हटलं तर होईल का तसं?
प्रत्येकानं आपल्या अपेक्षा ठरवाव्या आणि त्या पटतील अशा पद्धतीनं मांडाव्या.
आणि नोकर्‍यांची तुलना बिझनेसशी करणे पण बरोबर नाही. तो वेगळाच विषय आहे.
या देशात कामवाल्या बाईने ५० रुपये वाढवून मागितले तर ५०००० रुपये कमावणार्‍या बायका तिला कामावरून काढून टाकतात.
आणि याच देशात असहाय लोकांना पैसे भरले नाहीत तर operation होणार नाही आणि जीव वाचणार नाही असे डॉक्टर्स सांगतात आणि वर अभिमानाने ते जाहीर पण करतात.
इथंच रात्रभर सोसायटीतल्या शंभर घरांनी निवांत झोपावे म्हणून जागणार्‍या वॉचमनला २००० रुपयात स्वतःचे भागवून त्यातलेच पैसे गावाकडेही पाठवावे लागतात.
समान हक्कांसाठी बाहेर भाषणं ठोकणारे लोक आपल्यासाठी राबणार्‍या लोकांना कसे वागवतात ते पाहिलंय मी.
फक्त विदारक गोष्टीच लिहायच्या तर मीही लिहू शकते.
मी या विषम परिस्थितीच्या कारणांबद्दल लिहीत होते. त्यांची चर्चा पूर्वग्रह बाजूला ठेवूनच व्हायला हवी. त्यातूनच काहीतरी logical निष्कर्ष आणि plan निघू शकतो.
नुसते कुणाला किती कमी पगार आहेत याचीच सुरस आणि चमत्कारिक चर्चा होणार असेल तर I am out of the game.


Arch
Monday, April 17, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि IT, IIM यांच्या नोकर्‍या फक्त मेरिटवरच असतात आणि त्यात अजून सरकारी नोकर्‍यांसारखी reservations आलेली नाहीयेत. वशिलेबाजी सुद्धा अजिबातच होत नाही. निदान नोकरी मिळवताना. >>
खरच की काय? मी तर IT contractors नी पाठवलेले incompetent employees पाहिले आहेत ज्यांना clients नी परत मायदेशी पाठवलेल आहे. हे जर merit वर select झाले होते तर कसल merit पाहिल गेल माहित नाही.

उगीच एखाद्या शेजारच्या सुंदर मुलीला श्रीमंत नवरा मिळाला म्हणून प्रत्येकीलाच हवा म्हटलं तर होईल का तसं?

Is this apples to apples comparison? दिसण कुठे आणि कर्तृत्व कुठे? काहीच्या काहीच

Ekanath
Tuesday, April 18, 2006 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी ताई,
राजस्थानाचे सरकार फारच दयाळू असेल. ते असो.
मी "अज्ञानमूलक" हा शब्द वापरला तो तुम्हाला "अज्ञानी" म्हणण्यासाठी नव्हे.
मला माहितीजालबद्दल काही माहिती नाही, त्यामुळे मी त्याबद्दल काही लिहिले तर ते "अज्ञानमूलक"च असणार. नाही का? म्हणजे मी जर विचारले की माहितीजालावर मिळणार्‍या माहितीची विश्वासार्हता किती? तर माझा प्रश्न "अज्ञानमूलक"च म्हणावा लागेल ना?
त्या अर्थानेच मी तो शब्द वापरला होता. असो.
चांगले पगार असतील तर चांगलेच आहे. तेच तर आमचे म्हणणे आहे. फक्त राजस्थानात जे पगार मिळतात तेच महाराष्ट्रातही मिळाले तर उत्तमच!

CBSE बोर्ड सोडल्यास बाकी सर्व सरकारी शाळांचे व्यवस्थापन "राज्य सरकर" मार्फत होते. सरकारी शाळांमधे (यात जिल्हा परिषदेच्या शाळाही मोडतत.) कित्येक वेळा नियमित पगाराची बोंब असते. पगारवाढ, भत्ते मिळत नाहीत. खाजगी शाळांची तर वेगळीच कहाणी आहे.

विषय वाढवायचा नाहीये. पण पु ल देशपांडे यांच्या "उरलंसुरलं" या पुस्तकातल्या शिक्षकांच्या मोर्च्याचा उल्लेख मी मुद्दम केला होता. ( तो लेख काल्पनिक होता का?)

असो, या विषयावर "मी" अधिक काही लिहिणे हे औचित्याला सोडून होईल.


Savani
Tuesday, April 18, 2006 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकनाथ, मी तुमच्याशी सहमत आहे. मैत्रेयी, माझी एक नातेवाईक पुण्याच्या अत्यंत नामांकित अनुदानीत शाळेत, म्हन्जे मराठी शाळांमध्ये अगदी अग्रगण्य शाळेत आहे. ती १ वर्षापूर्वी लागली आहे. तिला शिक्षण सेवक ह्या पदावर घेतले आहे. हा शिक्षकांसाठी नवीन शब्द आहे सध्या. आणि तिचे वेतन दरमहा ३५०० आहे.
अर्थात इथे हे विषयांतर आहे. पण आपण जे १० १२ हजार वेतन म्हणता ते पुर्वी लागलेल्या शिक्षकाना नक्कीच आहे. माझ्या आईच्या २५ वर्षाच्या नोकरीनंतर आता तिला ५ आकडी पगार आहे.


Ninavi
Tuesday, April 18, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा लेख वाचला का तुम्ही?

Ekanath
Wednesday, April 19, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राथमिक नाही, पण उच्च शिक्षणाची महाराष्ट्रातील अवस्था... बाकीच्यांची अवस्थाही फारशी वेगळी नाही.

http://loksatta.com/daily/20060419/mp05.htm

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators