Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
इतिहास

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » इतिहास « Previous Next »

Sakhi_d
Thursday, July 19, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"वेडात मराठे वीर दौडले सात" ह्या गाण्यात / कवितेत ज्या सात वीरांचा उल्लेख केलाय त्यांची नावे कुणाला माहिती आहेत का? तसेच त्या घटनेचे संर्दभ माहित आहे का?

Kedarjoshi
Thursday, July 19, 2007 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यात खरे नाव एकच. प्रतापराव गुजर. बाकीच्यांची नावे कोणालाही माहीती नाहीत. बहुतेक ते शिलेदार असावेत.

कडतोजी (प्रतापराव ही पदवी आहे) गुजर हे राजांचे सेनापती. त्यांनी बहलोलखानाला एकदा पराभुत केले. बहलोलखानाने माफी मागुन अभय मागीतले वर परत स्वराज्यावर आक्रमन करनार नाही असा करार केला. कडतोजींनी तो करार महाराजांकडे पाठवुन दिला. महाराज रागावले व म्हणाले की गनिमास काय म्हनुन सुला केला, सुला करनारे तुम्ही कोण? उद्या जर परत गनिम चालुन आला तर काय करनार. बहलोलखानास गर्दीस मिळविल्याशिवाय आम्हास तुमचे तोंड दाखवु नका.
हे पत्र प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांनी आधी सांगीतल्याप्रमाने बहलोलखान परत १ लाख सैन्य घेऊन काही महीन्यांनी चालुन आला. प्रतापरावास आश्चर्य वाटले. त्यांचा तळापासुन (तळ म्हणजे खरा सैन्याचा तळ नसावा तर ते मुशाफीरी ला गेले असावेत त्यामुळे त्यांचाकडे कमी सैन्य वा मोजकेच शिलेदार असावेत असा कयास) जवळच बहलोलखानाचे सैन्य होते.

प्रतापराव आपल्या शिलेदारांसोबत त्या १ लाख सैन्यावर चालुन गेले व धारातिर्थी पडले. त्यावर हे गाणे.


Jtudct
Tuesday, September 25, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i need Uktya or ovi , fort che photo khali lihayache ahet.......anyone pl.help me tell link .......thnkx in advance

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators