Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Eksashti Sohala

Hitguj » Looking for » Religion » Eksashti Sohala « Previous Next »

Rupantar
Thursday, February 01, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namaskar,
mala Eksashti ( 61 st birthday) puja ani sohlyachi mahiti hawi aahe. tasech mulgi ani vadil ya natyabaddal kahi vishesh literature kuni refer karel ka please?



Rmjadhav75
Thursday, February 01, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय! रुपाली,

मायबोली वर आपले स्वागत.

एकसष्ठी बद्दल कसली माहीती (पूजा वगैरे) हवी आहे?

वडील व मुलगी यांच्या नात्याबद्दल चे साहीत्य कुठल्या भाषेत हवे व कुठल्या प्रकारचे हवे?

राजेश.


Zakki
Thursday, February 01, 2007 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे म्हणतात की एकसष्ठी ही वाढदिवस उलटल्यावर एक दोन महिन्यानी करावी. हे ज्या व्यक्तिने मला सांगीतले, त्यांना तशी आपल्या धर्माची चालीरितींची नुसतीच चांगलि माहिती नाही तर त्या पूजा सांगतात, लग्न लावतात, गृहशांति करतात. आणि त्यांच्या बद्दल इथल्या इतरहि अनेक बर्‍याच 'झटपट भट' लोकांना आदर आहे.

मी कारण विचारल्यावर त्या म्हणाल्या, असे पहा पूर्वी लोक जास्त वर्षे जगत नसत, म्हणून मुळात एकसष्ठी ला महत्व होते. पण एकसष्ठी नंतर म्हातारा लवकरच मेला तर एव्हढा सगळा सोहळा नि खर्च वाया जायचा. म्हणून जरा एक दोन महिने वाट बघावी, म्हतार्‍याची तब्येत बघावी नि मगच एकसष्टी करावी. माझ्या दोन्ही मोठ्या भावांची, माझी नि माझ्या धाकट्या भावाची एकसष्ठी आम्ही अशीच उशीरा साजरी केली होती.



पूर्वी जेंव्हा मी मायबोलीवर पुणेकरांची टिंगल करत असे, तेंव्हा मी लिहीले होते की ही उशीरा सोहळा करायची पद्धत बहुधा पुण्यात सुरू झाली. पण बरेच पुणेकर रडू लागले की सारखे सारखे आम्हालाच का हो नावे ठेवता? म्हणून आता पुन: तसे लिहीत नाही!


Rupantar
Monday, February 05, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala pratisad dilayabaddal tumha sarvanche abhar.
Mal 2/3 diwsat mazhya babancha eksashti programme sathi mumbai la jayche aahe. I have never attended such a ceremony before. kuni unique idea suchwel ka kinwa experience share karel ka? besides I want to write few lines for my father and cant manage to have a good start . khup suchatay pan lihayla jamat nahiye.... kahi madat milel ka please

Limbutimbu
Tuesday, February 06, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकसष्ठी साजरी करण्यामागे केवळ सोहळा किन्वा काहीतरी "विधी" किन्वा जास्त जगला अशी कारणे नसुन, हिन्दू ज्योतिष शास्त्राप्रमाणे, माणसाचे आयुर्मान एकशेवीस वर्षान्चे कल्पून, आकाशातील जन्मवेळची ग्रहस्थिती साठाव्या वर्षी पुन्हा येत असल्याने जवळपास "जननशान्ती" प्रमाणेच या कार्यक्रमाचे प्रयोजन असते!

लिहिण्या सन्दर्भात काय सान्गावे???
सर्वप्रथम शि. सा. न. वि. वि. करुन, आपल्याला जे जसे वाढवले त्याबद्दल त्यान्चे आभार मानावेत, त्यान्नी ऐन उमेदीच्या काळात उपसलेल्या कष्टान्ची जाण दाखवावी, व उत्तम आयुरारोग्य लाभावे म्हणुन अभिष्टचिन्तन करावे! जोडीस एखादी सुन्दर उपयोगी भेटवस्तू द्यावी....... आम्ही तुम्हाला विसरलेलो नाहीत, व केवळ अपेक्षान्चे ओझे तुमच्यावर लादु इच्छीत नाही, उलट आपण प्रेमादरास पात्र असुन आता आमच्याकडुन तुमच्या काय अपेक्षा हेत ते विचारावे.....!
एक पथ्य, कोणत्याही परिस्थितीत, त्यान्च्या वाढत्या वयाचा उल्लेख करू नये! उलटपक्षी, आजही तुम्ही आमच्या तेवढेच "उपयोगी" आहात, तुमचे तुमच्या अनुभवान्च्या शिदोरीसहीत असणे आम्हा साठी अजुनही "आधार" आहे असे "जाणवुन" द्यावे!


Rupantar
Thursday, February 08, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

abhar tumha sarwanche. chan kalpana suchavlyat. khup hurup alay.....aata barech kahi lihu shaken ase watatay....

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators