Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ग्रुप गेम्स

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » ग्रुप गेम्स « Previous Next »

Disha013
Thursday, November 30, 2006 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी असा बीबी असेल तर हा उडवावा.........




पार्ट्या,गेट टूगेदर,पाॅट लक वगैरेंमधे खेळता येतील असे ग्रुप गेम्स कुणी सुचवेल काय?













Chafa
Friday, December 01, 2006 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक अतिशय भन्नाट मजेदार गेम सांगतो. नाव आहे Psychiatrist . जितका मोठा ग्रूप असेल तितकी जास्त मजा येते. कमीत कमी ८ - १० जण असल्याशिवाय तर खेळूच नये.

तर, ग्रूप मधल्या कोणत्याही दोघांना psychiatrist म्हणून निवडायचं. त्यांना वेगळ्या खोलीत नेऊन नियम समजावायचे. ते असेः इथे बाहेरच्या खोलीत जमलेले सगळे जण एका मानसिक रोगाचे पेशंटस आहेत (म्हणजे वेडे :-O) सगळ्यांना एकच रोग आहे. तर तुम्ही psychiatrist म्हणून तुमच्याकडे ते रोगाचं exact निदान करुन घ्यायला आले आहेत. तुम्ही त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारुन त्यांचा exact रोग काय आहे ते ओळखायचं. तुम्ही त्यांना कुठलेही प्रश्न विचारु शकता पण ते स्वतःचे किंवा कोणाचेही specific identity details सांगू शकत नाहीत वेडे असल्यामुळे. :-O जसे नाव, पत्ता वगैरे. शिवाय एकाच पेशंटला प्रश्न विचारत बसलात तर ओळखणं अवघड होईल (because they all share same problem and behave in that similar pattern) .

त्यांना आत मधेच ठेवून बाहेरच्या ग्रूपला नियम समजवायचे, ते असेः
आधी सगळ्यांनी खुर्च्या एका वर्तुळात मांडून बसावे. २ सलग खुर्च्या psychiatrists साठी ठेवाव्या. आता जमलेल्या सगळ्या पेशंटसचा common रोग म्हणजे, everyone thinks that they are the person sitting on their right! . त्यामुळे psychiatrist नी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण उजव्या बाजूला बसलेला / बसलेली असेल तो / ती आहोत असे समजून उत्तर द्यायचे. खरे उत्तर माहीत नसेल तर अंदाजपंचे उत्तर द्यायचे. जर आपल्या डावीकडच्याने एकदम भलतेच चुकीचे उत्तर दिले, तर आपण जोरात psychiatrist ऽऽऽ असे ओरडायचे आणि असे ओरडल्यावर सगळ्या पेशंटसनी भराभर randomly seats exchange करायच्या. अशाने प्रत्येक वेळी वेगळी व्यक्ति उजवीकडे आल्यामुळे जाम मजा येते.

Job of psychiatrists is to find the mental problem by asking questions to everyone. The game becomes hilarious depending on the questions asked and the answers given! (how funny/naughty they are :-O ) The only drawback is, the game can be played only once in a group unless someone is good at coming up with equally funny and difficult behavior / mental patterns!


Lalu
Friday, December 01, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू तयार केलायस का हा गेम?

Disha013
Friday, December 01, 2006 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks ,पण माझ्या डोक्यावरून गेल्लाय...३,४ वेळा वाचला की समजेल अशी आशा करते :-)
अजुन सुचवा की.


Chafa
Saturday, December 02, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, मी नाही तयार केलेला, माझ्या मित्राच्या बायकोनी आम्हाला शिकवलेला. तर खेळता खेळता एक maarried मैत्रिण त्याच्या उजव्या बाजूला बसली होती. आणि याला प्रश्न विचारला की Who do you love most आणि त्याने उत्तर दिले My husband! आणि कहर म्हणजे त्यावर तिने psychiatrist ओरडून धमाल उडवली.

दिशा काही प्रश्न असतील तर विचार. अजून नवे गेम्स सुचवाच कोणाला माहीत असतील तर.


Vinaydesai
Tuesday, December 05, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेम हवा तर....

/hitguj/messages/58489/59097.html?1165334723#POST897168

Disha013
Tuesday, December 05, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय छान आहे अन्ताक्षरी.
चाफ़ा, परत वाचले सगळे निवांत. तर मेंटल problem आणि त्या अनुषंगाने प्रश्न सुचव्णार का? या वीकेन्डला गेट टुगेदर आहे,तेव्हा हा गेम आणि अंताक्षरी दोन्ही खेळता येतील एवढा वेळही आहे आणि मेंबर्स पण आहेत.


Vinaydesai
Tuesday, December 05, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक couples साठी.. प्रत्येकाला एक एक वर्तमान पत्रचा कागद द्यावा..

गाणं लावावं.. नाचता नाचता त्या कागडाची एक घडी घालायची( Size निम्मी होईल)...

गाणं थांबेल तेव्हा, दोघानीही त्या घडीवर उभ रहायचं आहे.. जे बाहेर जातील किंवा पडतील ते Out

सुरुवातीला सोपं आहे, पण घडी लहान होत आली, की नवर्‍याने बायकोला (अगर बायकोने नवर्‍याला) उचलणे, Balance करणे असे प्रयोग करावे लागतात...
शेवटी उरेल ते couple जिंकेल...


Vinaydesai
Tuesday, December 05, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक सगळ्यांसाठी..

हा खेळ लहान मुलांकडे असतो.. पण मोठे पण खेळू शकतात...

एका कागदावर एकाद्या प्रसिध्द व्यक्तीचं नांव लिहून तो एकाच्या (ज्याच्यावर राज्य आहे) पाठीवर चिकटवावा (त्याला अगर तिला नाही दाखवायचा.. फक्त प्रेक्षकाना दिसेल) जसं सानिया मिर्झा, JLO , Michel Jordan ...

मग त्याने प्रश्न विचारायचे...

मी बाई आहे का?
मी खेळाडू आहे का?
मी टेनिस खेळतो का?

प्रेक्षकांनी फक्त हो आणि नाही एवढं उत्तर द्यायचं... आणि त्याने अगर तिने ओळखायचं...

माझ्यावर राज्य आलं तेव्हा मला मायकेल जॅकसन आला.. मी 'बाई आहे का?' असं विचारलं तेव्हा लोकांनी 'माहीत नाही' असं उत्तर दिलं.. मग 'पुरुष आहे का?' असं विचारल्यावरही 'माहित नाही' असं उत्तर...

मग मला लगेच Clue लागला...


Sunidhee
Tuesday, December 05, 2006 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूगल वर couple games किंवा party games दिले कि खुप माहीती येते. दिशा पेशन्स असेल तर पहा :-)
विनय नी वर जो गेम सांगितला आहे त्याच्या उलट पण करुन खेळता येइल. म्हणजे असं कि समोरच्या व्यक्तिच्या पाठीवर जर 'शाहरुख खान' असे लिहिले असेल तर आपण त्या व्यक्तिशी तो 'शाहरुख'च आहे असे समजुन बोलायचे, प्रश्न विचारायचे. आणि त्या वरुन व्यक्ती ती तिच्या पाठीमागे काय लिहिले आहे ते ओळखेल. आणी ह्यात सर्वांचे सर्वांशी संभाषण व्हायला हवे (फक्त एकजण एकालाच प्रश्न विचारतोय असे नको), तर जास्ती मजा येते.
मला pictionary फ़ार आवडतो, कारण सर्वांची चित्रकला काही नीट नसते आणी त्या मुळे त्या चित्राला जि काही नावे ठेवली जातात त्याला तोड नाही :-)


Asami
Tuesday, December 05, 2006 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mafia किंवा werewolf असा search करून जो game येतो तो बघा , त्याच्यासारखा भन्नट party game नाहि राव.

Vinaydesai
Tuesday, December 05, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पार्टीत भाग घेणारे उत्साही असतील तर अजून दोन गेम

१. अर्ध्या लोकांना 'जर' अश्या चिठ्ठ्या द्यावात, आणि अर्ध्या लोकांना 'तर' अश्या... त्यावर त्यांनी आपल्याला सुचेल असं भन्नाट विधान लिहायचं आहे... मग एक जर आणि अक तर चिठ्ठी Random उचलून एकत्र वाचाव्यात.. मजा येते...

२. आधी ठरवून काही scene लिहून चिठ्ट्या तयार ठेवाव्यात... मग एक पुरुष आणि एक स्त्री यांना हा सीन जेवढं विनोदी बोलता येईल, तेवढा करायला सांगावा.. (नवरा बायकोचे संवाद नकोत..) पण उदा. म्हणून...
१. ब्राम्हण मासेविक्या आणि मासे घेणारी stylish बाई,

२. दुकानात एकादा कपडा परत करायला गेलेला / गेलेली आणि refuse करणारा विक्रेता / विक्रेती

३. रावण नको नको म्हणत असताना 'हरण' करा म्हणून मागे लागलेली सीता..

विषय असे ठेवावेत की, सीन करणार्‍याना विनोदी करयला Scope ठेवावा...

Whose Line is it Anyway मध्ये पण असे बरेच Game असतात...

मुलांना एकत्र करून... एक इंग्लिश अक्षर द्यायचं... आणि त्यांई पुढचं वाक्य, पुढच्या अक्षरावरून बोलायचं...


Start with D...

(D)Did you see that?
(E)Each of us, can see it
(F)For what?
(G)Good, I thought only I was seeing it..
(H)Hey Hey Hey, you are...
कुणी चुकलं की पुन्हा नवीन अक्षर..

Sunidhee
Thursday, December 07, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय मस्त खेळ माहीत आहेत कि तुम्हाला

Rora
Friday, December 22, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजुन एक मस्त गेम आहे ह्यात सग्ल्या बायकान्ना एका बाजुला उभ करायच मधे आनतरपाट धरल्या सारख कापड धरायच. मात्र चेहेरे पण दिसणार नाहीत अस धरायच. फ़क्त पावल दिसुद्यायची. नन्तर पुरुशान्नी पाय ओळखून आपापल्या बायको समोर जाऊन ऊभ रहायच. मग मधल कापड बाजुला करायच
खूप मज्जा येते कोणीही कोणाही समोर आसतात.


Chhatrapati
Tuesday, May 22, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे कांबळी ! छान गेम्स (खेळ) आहेत या. पण कमीत कमी १० लोक तरी जमले पाहिजेत. एक सांग, ६ लोकांसाठी उपयुक्त काही खेळ आहेत का ? बे एरिया मध्ये न राहणारे इतर विभागातले अल्पसंख्यांक मराठी लोक देखील खेळू शकतील असे काही ?? ... धन्यवाद.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators