Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Music Classes

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Music Classes « Previous Next »

Sojo
Tuesday, September 26, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमसकार मंडळी,
मला कोणि डेक्कन-भाडारकर रोड जवळ चंगल्या गाण्याच्या क्लासची माहिती(फोन पत्ता) देऊ शकेल का?

Thanks in advance

Raina
Wednesday, September 27, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घोले रोडवर सौ धनश्री घाटेंचा क्लास असायचा. त्या जयपूर घराण्याची गायकी शिकवायच्या. लहान मुलांना पण शिकवायच्या.
फोन नं नाही- पण तुम्हाला directory त गौतम घाटें चा नंबर मिळू शकेल.


Sojo
Thursday, September 28, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks a lot Raina. I would look in the directory for number.
मला माझ्या ४.५ वर्श्याच्या मुलाला गाणे शिकण्यासाठी क्लासला घालायचे, देक्कन भाडारकर रोड येथे असल्यास उत्तम.
आजून कोणिच नाहि का माहिती देऊ शकणार?


Raina
Thursday, September 28, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली- पुण्यात गाण्याच्या क्लासेसची काय कमी.. मात्र जरा चौकशी करुनच पाठवावे लागेल त्याला.
सिन्थेसाईझर शिकायचा असेल तर मोडेल काॅलनीतले सुहासचंद्र कुलकर्णी.
किंवा शनिवार पेठेतल्या गांधर्व महाविद्यालयात चौकशी केली तर काही माहिती मिळू शकेल.गांधर्व महाविद्यालयात ४-८ वर्षांच्या मुलांसाठी बालगीत क्लास असतो.

एक सुचवू का? ४.५ वर्ष म्हणजे लहान आहे तो.. जरा अजून २-३ वर्षांनी सुरवात केली तर त्याचे चित्त लागेल. आणि मुलग्यांना नेहमी आवाज फुटला नंतर की गायनाच्या शिक्षणात खंड पडतोच.

सुरांशीच ओळख करुन द्यायची असेल तर पेटी व्हायोलिनसतार ह्यातले काहीतरी शिकता येईल.


Sojo
Thursday, September 28, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm.. good suggestion..Thanks Raina.
मी स्वत्: गाणे शिकले आहे आणि मी हे पाहिले की माझा मुलगाहि गाणि छान ग्रास्प करतो. हल्लिच तो सा रे ग म म्हण्याचा प्रयत्न करतो आहे. माझि इछा होति कि जर व्यवस्तित छान स्वर ऐकायला मिळाले आणि गाणे नुसते बसून ऐकले जर त्याने तरि त्याला त्यात गोडी निर्माण होइल.
तो ह्या वयात कोणते वाद्य शिकू शकेल असे तुम्हाला वाटते.


Raina
Friday, September 29, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली-
अगं ईथे काही छोट्या मुलांना गाणं शिकवण्याचे अनुभव ऐकून आणि निरीक्षणाअंती सांगते.. काय होतं न शास्त्रीय संगीताचे सरगम, पलटे आणि मग राग भूप लक्षणगीत आलाप ताना असली सुरवात केली की एव्हढी लहान मुलं कंटाळतात- आणि त्यांना क्लास पूर्ण करण्यासाठी प्रलोभनंच फार दाखवावी लागतात. एक तर अजून एका जागी तासभर बसायची त्यांची तयारी नसते. मग कंटाळा करतात.
क्लास मध्ये तेच तेच शिकवतात म्हणून जायच टाळतात- आणि आया ही वैतागतात. कधी कधी त्यांना मुळीच आवड नसते आणि आया फार दामटतात.
त्यावरुन असं वाटत की त्यापेक्षा- त्यांच्याच समवयस्क मुलांचा नुसत्या बालगीतांचा क्लास असेल तर चांगले. तसा गांधर्व महाविद्यालयात असतो असे ऐकले आहे.
किंवा तुला स्वत्:ला स्वरओळख आहेच..तर तूही बसू शकतेस त्याला घेउन १०-१५ मिनीट- नुसते गुणगुणणे किंवा हसत खेळत सरगम वगैरे. आणि सर्वात उत्तम म्हणजे घरी चांगले संगीत लावून ठेवणे.. सतत ऐकत राहणे- कधी त्यांच्या अंगात सूर भिनत जातील कळणार नाही. आम्च्या स्नेहींची ५ आणि ३ वर्षांची २ मुलं चक्क गुलाम अलींच्या गझला गुणगुणतात- जन्माआधी आणि जन्मापासून सतत ऐकलेलं आपसूक त्या गझला पेटीवर वाजवायचा प्रयत्न करतात.
मुलांमधली उत्सूकता अफाट असते- आईवडिल पेटी वाजवताहेत म्हणून आपण मध्ये मध्ये करुन वाजवून पहाणे.. .. त्यांच्या सोबत गुणगुणणे..वगैरे..
माझ्या मैत्रिणिचा ४-५ वर्षांचा मुलगा- आम्ही तिच्या घरी रियाज करायचो म्हणुन मध्ये मध्ये करत पुरिया वगैरे राग ओळखायला लागला होता..

sorry हे पोस्ट थोडं लांबलं


Sojo
Friday, September 29, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तुमचे म्हणणे पटले आहे..
Many Thanks for the advice.

Paragb
Wednesday, April 02, 2008 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thane yethe lahan mulansathi kunla shikavni/classes chi mahiti aslyas pl sanga.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators