Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Aajcha TaruN

Hitguj » Looking for » Religion » Aajcha TaruN « Previous Next »

Mith_ko
Monday, January 30, 2006 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरुण म्हणजे हिमालयचे चूर्ण आणि आकाशाला गवसणी घालण्या एवढी दुर्दम्य शक्ति बाळगणारा. त्याचा अर्थ वयामध्ये मर्यादित नसून, तो वय वाचक ही नाही.
तर असा हा आजचा तरुण जास्त करुन भरकटलेला दिसतो की, आपल्या ध्येया प्रती जागरुक आणि त्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. या साठी हे मंच.
ह्या किवा भारतीय संस्क्रुती विषयी जास्त माहीती किवा काही प्रश्न असल्यास विचारु शकतात, मी तुम्हाला लॉजिकली सान्गण्याचा प्रयत्न करीन.

धन्यवाद


Moodi
Monday, January 30, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकारण सोडुन कशावरही उत्तर दे म्हणजे झाल. नाहीतर धर्माच्या बीबीचा पण V&C व्हायचा.

Mith_ko
Monday, January 30, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी जेव्हा आश्रम पद्धतीत शिक्षण होत असे तेव्हा गुरुनी आज्ञा दिल्यावर आई-वडिलान्ना आज्ञा घेऊन तरुण ग्रहाश्रमात प्रवेश करायचा, आणि आश्रमातला तरुणाची अशी प्रतिभा असायची की, रस्त्यावरुन जाताना वाटेत जर राजा सेन्या बरोबर जात असेल तर, राजा त्याच्या चेहर्‍यावरील प्रतिभा व त्याचे व्यक्तिमत्व बघुनच समजून जायचे की हा कोणत्या तरी आश्रमातील गुरुचा शिष्य आहे, आणि त्यास अगोदर जाऊ देत असत.
पण आजच्या तरुणाला लग्नासाठी आई-वडिलान्ना सुद्धा विचारण्याची आवश्यकता वाटत नाही.
आणि आज तरुण आपली तेजस्वीता व व्यक्तिमत्व विसरुन बसला आहे.


Mith_ko
Monday, January 30, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही संकल्पना व ह्या विषयाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तुमच्या प्रतिक्रियाची वाट पाहत आहे.


Amitpen
Tuesday, January 31, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिथुन या लॉजिकने तर आजचे गुरु, आजचे राजे(लोकप्रतिनिधी) देखिल आपली तेजस्वीता आणी व्यक्तिमत्व गमावून बसले आहेत...
आपल्या देशातले तरूण मला ध्येयासाठी जास्त जागरुक वाटतात...त्यांची स्वप्ने जास्त मोठी असतात...

काहीच न करता
frustrate होणे आणी प्रयत्न करुन अपयश आल्यावर निराश होणे यात फरक आहे...

हा बीबी संस्कृतीबद्दल आहे का भरकटलेल्या तरुणाई बद्दल?


Mith_ko
Tuesday, January 31, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे आमित तुझे. आजचे जवळ्-जवळ सर्वच गुरु, लोकप्रतिनिधि हे आपले तेजस्विता तर गमावूनच बसले आहेतच. या व्यतिरीक्त या गुरु महाराज, ट्रस्ट, संस्थानी आपला बाजार मान्डून ठेवला आहे. कारण जेव्हा डोक्यात स्वार्थ येतो तेव्हा तेजस्विता निघून जाते.
आपल्या देशातील तरुण ध्येयासाठी जागरुक वाटतात ते ही बरोबर आहे, पण फारच कमी आहेत.
कारण आजच्या बहुतेक तरुणाना आपले ध्येय काय आहे, काय असावे हेच अगोदर माहीत नसतं.
मला या सदरातुन एवढेच साध्य करायचा छोटासा प्रयत्न करीत आहे की, तरुणाने आपली शक्ति वायफळ घालवू नये. तरुणानी ठरवले तर काय शक्य नाही त्याच्यासाठी.
डायरेक्टली तरुणावर तर इनडायरेक्टली आहे. कारण त्याचा परीणाम वरच होणार.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators