Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
'अमर प्रेम' - STY ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००५ » 'अमर प्रेम' - STY « Previous Next »

मायबोलीवरचे एक लोकप्रिय लेखक, राहुल फाटक यानी यावेळच्या Spin the yarn अर्थात STY च्या कथेची सुरुवात लिहून ती कथा तुमच्या हाती सुपुर्द केली आहे. पुढचे भाग मायबोलीकरांनी लिहायचे आहेत. कृपया आपले लेखन एकाच पोस्ट मधे टाका. एखादा भाग सविस्तर लिहून झाल्यावर 'हे सगळे स्वप्न होते' असे लिहून रसभंग करु नये. एका पोस्ट मधे एकाच 'अवतारा' बद्दल लिहावे. (म्हणजे काय ते कथेचा पहिला भाग वचल्यावर कळेल) तर करा सुरुवात...

Sanyojak
Wednesday, September 07, 2005 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अमर प्रेम

तुमcअं डोकं आहे ना डोकं त्याला हात लावा.. अहो गुडघ्याकडे काय बघताय एव्हढे शिकले सवरलेले तुम्ही, शिवाय सुशिक्षीत हां तर लागलं का हाताला डोकं ? (बघा, कथा वाcअण्यापुर्वीc डोक्याला हात लावायcई पाळी !) हा, तर डोकं जराऽऽ उcअलून बाजूला ठेवा बघू

काय डिटॅcएबल नाही म्हणताय? बरं मग असं करा की तर्क, सामान्य ज्ञान, वैज्ञानिक सिद्धांत वगैरे जरा विसरून जा.. परिक्षेcए दिवस आठवा, म्हणजे आपोआप विसरायला मदत होईल

हां आत्ता कसं आता कथेcआ पहिला भाग वाcआयला तरी तुम्ही तयार झालात आता त्याcया पुढे जे काय होईल, म्हणजे लिहीलं जाईल त्याला आम्ही जबाबदार नाही हा ! (मागcया वर्षीcअं आठवतय ना.. त्या 'यार्न' cआ एकेक धागा कुठे कुठे गेला होता म्हणजे एकेका सुतावरुन कुणी स्वर्ग गाठला तर कुणी नागलोक, कुणी सप्तपाताळ, कुणी इन्द्रलोक वगैरे कुठेही जाउन वैश्विक गुंता करुन ठेवला होता! तर ह्या वेळी तरी संयोजकाना 'दोन उलटे दोन सुलटे' करत कथेला पुनर्जन्म द्यायला लावू नका.)

तर आपली ची कथा साधारण अशी आहे की...

अमर आत्ता त्याcया रुममधे एकटा बसून आपल्या हातातल्या त्या लाॅकेटकडे काहिश्या उदासपणे पहात होता

अमर कोण म्हणजे तुम्हाला अमर माहीत नाही म्हणजे अमर तुम्हाला माहीतc नाही ओह... माय मिस्टेक हं, तुम्हाला कसा माहीत असणार म्हणा.. तोc तर आपल्या नवीन कथेcआ हिरो आहे ना आणि कथा आत्ता कुठे सुरु होते आहे.

तर अमर म्हणजे आपला हिरो म्हणजे दिसायला वगैरे एकदम हिरो सारखा ! (आजकालcए हिंदी पिक्cअरcए काही हिरो त्यांcया हेअरस्टाईलमुळे जरा जास्तc आईवर गेल्यासारखे दिसतात तसा नाही हा !).. शिवाय अत्यंत हुशार, नम्र, सतत मदतीला तयार असणारा.. येह, आय गेस यु गाॅट द पाॅईंट म्हणजे सर्व गुण संपन्न फक्त एकc लोcआ होता, की अमर थोडा लाजरा होता म्ह्णजे मुलींशी बोलायcईही त्याला भिती वाटायcई तर डेटींग वगैरे लांबcअ राहू देत

तर आता जरा लाटा लाटा येउन स्क्रीन बदलू देत आणि आपण फ्लॅशबॅक बघूया ः

फ्लॅशबॅक ःमागcया आठवड्यात एक तळपती दुपार ः

त्या दिवशीc अमर पहिल्यांदा प्रेमात पडला झालं काय की अमर बाईकवर बसून सिग्नलला उभा होता!(वाक्यरcअनेत काहीतरी उकलय पण तुम्ही मुद्दा लक्षात घ्या!) ... तेव्हढ्यात बाजूला एक काळी मर्सिडीज येऊन थांबली पुढcयाc क्षणी त्या मर्सिडिजcई विंडो काही क्षणांपुरतीc खाली झाली आणि तेव्हाc त्या सुंदर तरुण मुलीcअं पहिलं दर्शन अमरला झालं

अमर त्या मुलीकडे पहातc राहीला.. त्याcया मनात 'उमंग जागे, तरंग उठ्ठे' असं काहितरी झालं ती गाडी काcअ वर होऊन निघून गेली तरी अमर वेड्यासारखा त्याc दिशेला पहात राहीला मागून वाजणारे हाॅर्न्स त्याला मंगल वाद्यांसारखे वाटू लागले अcआनक त्याला पवित्र उदात्त असं काहितरी वाटायला लागलं

एकटाc असता तर ही गोष्ट त्याने त्याcया स्वभावाला अनुसरून कुणाला कळूही दिली नसती पण बाईकवर त्याcया मागे त्याcआ रुममेट अंदू बसला होता.. त्याने अमरcई 'लव ऍट फर्स्ट साईट' अवस्था ओळखली कारण अमरसाठी हा अनुभव नवा असला तरी स्वत
cअंदूला अशा अवस्थेcआ दांडगा अनुभव होता

मग काय, दुसर्‍या दिवशी त्याc वेळी मर्सिडिजcआ पाठलाग करुन अंदूने नाना युक्त्या वापरुन तिcई माहिती काढली

मामला एकंदर बिकट होता कारण मर्सिडीजमधून जाणारी ती 'वो रहेनेवाली महेलोंकी' वगैरे असणार हे अंदूला माहीत होतं पण खरोखरc ती मर्सिडीज आत गेली ते राजवाड्यासारखं घर बघून अंदू आट पडला होता.. त्या कंपाउंडcया उंc दगडी भिंती,
आतलं हिरवगारं लाॅन, सुंदर फुलझाडांcया रांगा, मधे नाcअणारं कारंज आणि त्यासगळ्यापलिकडे ते भव्य महालासारखं घर त्या घराcया मालकांcअं आडनाव 'राजाध्यक्ष' आहे आणि त्यांcया एकुलत्या एक मुलीcअं नाव 'अप्सरा' आहे वगैरे गोष्टी अंदूने येनकेन प्रकरणे माहीत करुन घेतल्या.. ते लोकं म्हणे पूर्वी संस्थानिक आणि आजकाल मोठे उद्योगपती वगैरे होते

रुमवर येत येता अंदू विcआर करत होता ः 'आडनाव तर मराठी वाटतयं मग ते सगळं असं भव्य वगैरे असं कसं?' .. पण मग असा न्यूनगंड ठेवल्याबद्दल स्वतला दोष देऊन अंदू 'मराठी माणसा जागा हो' असे म्हणून त्याने गाढ झोपलेल्या अमरला
उठवलं व सगळी माहिती सांगितली

ते सगळं ऐकल्यावर अमरcआ गोरा एहरा इंतेने काळवंडला...

पुढcए सात दिवस अंदू अहोरात्र तिcई अजून अजून माहिती काढण्यात गुंतला होता... जसजशी माहिती मिळत होती तसतसा अंदूcआ मूळcआ जांभळा एहरा पांढराफटक पडत होता.

विcइत्रcअ फॅमिली होती. 'अप्सरेला' फक्त वडील होते.. आणि आर काका णि दोन विधवा आत्या होत्या सर्व त्या घरातc रहायcए. आणि एव्हढ्या क्लोज निट फॅमिलीमधे असतं ते लफडं इथेही होतं! ह्या सर्व काका आणि आत्यांना मुलगा पसंत पडल्याशिवाय अप्सरेcअं लग्न होणार नव्हतं

ह्या अडcअणी कमी म्हणून की काय अंदूला त्या मंडळींcया विcइत्र सवयींcई थोडी माहिती कळली

तिcए एक काका झोपेत आलत एकतर ते नाहीतर मग रात्री बेरात्री उठून पूर्वीcया सवयीने दरबार वगैरे भरवत नोकरcआकर मंडळी पुढे बसवून

तिcया दुसर्‍या काकाना 'शाॅर्ट टर्म मेमरी लाॅस' cआ प्राॅब्लेम होता.. बोलता बोलता विसरायcए समोर कोण आहे, आपण काय बोलत होतो ते! त्याना नाटकाcई आणि चित्रपटाची आवड होती आणि पूर्वी ओरुन काम करायcए नाटकात त्यामुळे मधूनc त्याना ते उतारे वगैरे म्हणायcई सवय होती.

तिcया मोठ्या आत्याला मधेc झटके येत आणि ती समोरcया अनोळखी माणसाला आपले दिवंगत पतिदेव समजत असे.

इतकी माहिती नोकर, पहारेकरी, खानसामा ह्यांcयाकडून काढता काढता अंदूcई पाॅकेटमनी संपली त्यामुळे उरलेल्या दोन काका व राहिलेल्या आत्याcई माहिती तो काढू शकला नाही. पण सगळेc विcइत्र असल्याने सगळे नोकर कंटाळले होते अगदी शिवाय ह्या सगळ्यांcया अजून आवडी निवडी काय होत्या कुणास ठावूक..

अशा खतरनाक लोकांcया मुलीcया प्रेमात पडल्याबद्दल अंदूने अमरला शिव्या घातल्या... पण अमरने 'अब यही अcछा लगता है अंदू, के कुछ अcछा न लगे' असा निर्वाणीcआ डायलाॅग टाकला आणि अंदूcए मन मित्रप्रेमाने पुन्हा भरुन आले मनावर दगड ठेउन 'मी दोन दिवसात परत येतोc आहे तोपर्यंत विcआर करुन ठेव' असं अमरला सांगून अंदू घरी जाउन येण्यासाठी बॅग वगैरे घेऊन बाहेर पडला आणि अमरला त्या हाॅस्टेल रुममधे अजूनc एकटं वाटू लागलं

आता पुन्हा स्क्रीनवर लाटा लाटा येउ देत.. कारण फ्लॅशबॅक संपलेला आहे.

कट टू प्रेसेन्ट ः

cअंदू गेल्यावर काही वेळाने अमरला अcआनक आठवण झाली ती आजीने दिलेल्या लाॅकेटcई त्याcए आईवडील तो लहान असताना गेले असल्यामुळे त्याcया आजीनेc त्याला वाढवले होते आणि तिcया शेवटcया आजारात ते अद्भुत लाॅकेट त्याcयाकडे दिले होते

त्याने घाईघाईने जुन्या बॅगेcया तळातून ते लाॅकेट शोधून काढलं .. 'अगदी जीवनमरणाcई वेळ येईल तेव्हाc ह्याcआ वापर कर!' असं आजीनं बजावल होतं.. त्यावेळी त्या लाॅकेटcए अद्भुत गुण ऐकून अमरcआ अर्थातc विश्वास बसला नव्हता.. पण आता ह्या 'आर या पार' अशा ह्या प्रसंगी ते लाॅकेट वापरुन बघायला त्याcआ आतला आवाज सारखा सांगत होता

असं काय होतं त्या लाॅकेटमधे विशेष

अमरcया आजीcया म्हणण्यानुसार ते लाॅकेट उजव्या हातात धरून डोळे बंद करून ज्या व्यक्तीcअं स्मरण करू ती व्यक्ती लाॅकेट घालणार्‍याcया अंगात संcआरत असे

फक्त एकcअ होतंः ती व्यक्ती जिवंत नसायला हवी म्हणजे भूतकाळातली इतिहासातली अगदी पुराणकाळातलीही कुठलिही मृत व्यक्ती अंगात येऊ शके

अर्थतc जी व्यक्ती निवडू, त्याप्रमाणे त्या व्यक्तीcए विशेष गुण, कला किंवा जे अंगामधे शिरत ते एकदम दहा बारा तास अर्थात त्याअधी पुन्हा लाॅकेट हातात धरुन डोळे मिटले तर पुन्हा माणूस नाॅर्मल होवू शकत असे

अपरिहार्यपणे, अंगात येणार्‍या व्यक्तीcई भाषा, देहबोली ह्याcआ मूळ माणसावर थोडा फार परिणाम अधून मधून दिसून येई नाहीतर माणूस बराcअसा नेहमीसारखाc दिसे, पण कधी कधी बाह्य रुप पण थोडे बदलायचे म्हणे

आता हे सगळं असं अद्भुत अलौकीक काहीतरी लाॅकेटबद्दल सांगीतलं गेल्यामुळे अमर बिcआर्‍या आजीcया डोक्यावर आजारामुळे परिणाम झाला असेल असेc इतके दिवस समजत होता

आत्तही तो खोल विcआरात बुडला होता...

आता आपण तिcई भेट घेणार कशी, तिला आपण आवडू का ? (आता, काही अतिश्रीमंत मुली एखाद्याcआ टेबल टेनिसमधे बॅकहॅंड आंगला आहे म्हणुन त्याcया प्रेमात पडल्याcई प्रगल्भ उदाहरणे त्याने पाहिली होती पण...) आणि समजा अगदी ती आपल्या प्रेमात पडली तरी तिcया विcइत्र काका आत्यांना आपण कसे इंप्रेस करणार हं.... एकंदर लाॅकेट वापरुन बघण्याशिवाय काही पर्याय नाही तर

'अप्सरे'cया महालासारख्या घरात गेल्याशिवाय तिcई भेट होणार कशी.. आत्ता रात्रीcए आठ वाजले आहेत... तिcया घराcया प्रcअंड भिंती कुणाcया नकळत ओलांडायला अंऽऽ कुणाcए नाव मनात धरावे बरं

अमर असे विcआर करत होता पण त्याला लाॅकेटसंबधी दोन गोष्टी अजून माहीत नव्हत्या. त्यातली एक तुम्हाला माहित आहे हो आणि ती म्हणजे ते लाॅकेट खरोखरc अद्भुत होते... (त्याशिवाय गोष्ट पुढे कशी जाणार ?)

पण दुसरी गोष्ट म्हणजे, का कोण जाणे काही काही वेळेला त्या लाॅकेटcआ अद्भुत इफेक्ट एक्दम थोड्या वेळासाठी गायब व्हायcआ आता आपण आशा करुयात की ऐनवेळी ते लाॅकेट अमरला दगा देणार नाही

त्याcए प्रेम सफल होऊ देत (दहाव्या दिवशी) अशी आपण प्रार्थना करुयात

शेवटी अमरcआ विcआर ठरला.. ती उंcअ भिंत ओलांडायcई तर एकc व्यक्ती योग्य आहे.. अर्थात लाॅकेट काम करत असेल तर पुढcअं पुढे बघू त्याने लाॅकेट हातात धरलं आणि डोळे मिटून मनात एका व्यक्तीcअं नाव आणल ः तानाजी मालुसरे





Maitreyee
Wednesday, September 07, 2005 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तानाजीचं नाव घेऊन झलं पण मिनिटभर त्याला काहीच फ़रक जाणवेना...! अचानक त्याला हवेत थंडी वाढलीय असं वाटलं, आणि हलू हळू त्याच्या भोवती धुकं दाटून आल्याचाही भास झाला.. हे काय असावं असं म्हणेपर्यन्त अचानक त्याच्या डोळ्यासमोर अन्धारी आली..
जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा वेगळंच वाटत होतं त्याला. एक वेगळाच आत्मविश्वास आला होता.. त्याने समोर भिन्तीकडे पाहिले इतका वेळ उन्च आणि गुळगुळीत वाटलेल्या भिन्तीत आता त्याला खाचा, कपारी दिसायला लागल्या! त्यात हात पाय रोवत तो बघता बघता भिन्तीवर चढला देखिल!
कुणी नाही असं पाहून त्याने खाली उडी मारली, पण कसं कुणास ठाऊक, त्या जोअरदार उडी नन्तर झटक्यात परत त्याचा 'अमर' झाला होता!
मग काय! आता आत जायचा धीर होत नव्हता.. मग तो बागेत एका झुडुपा आड लपून परिसराचं निरीक्षण करू लागला..

थोड्याच वेळात त्याला बोलण्याचे आवाज ऐकू आले. दोघी मुली बोलत येत होत्या.. त्याने हळूच पाहिले, आणि समोरून 'तिला' येताना पहाताच त्याच्या अन्गावर पार रोमान्च वगैरे उभे राहिले! पण तेवढ्यात च मऊ हिरवळीत चालताना मधेच ठेच लागावी तसे झाले त्याचे! तिच्याबरोबरच्या दुसर्‍या मुलीला पाहून! 'माझ्या पौर्णिमे बरोबर ही कोण आवस?' ती बया म्हणजे साक्षात शूर्पणखा, पूतना ची बहीण शोभावी अशी 'सीतेवर पहारा करणार्‍या' कॅटेगरीतली वाटली त्याला!
ही कोण आफ़त आता! असे म्हणतोय तोवर आतून हाक आली ' अप्सराताई आणि श्यामल, तुम्हाल बोलावताय्त साहेब'
आणि त्या दोघी आत नोघून गेल्या
'हं s या शामल ला कटवून अप्सरेशी कधी बरं बोलता येईल मला' अमर मनात म्हणाला काहीतरी तसाच खतरनाक प्लॅन बनवाय्ला हवा, एवढे अडथळे पार करून अप्सरेपर्यन्त पोहोचायचं तर!
'अप्सरा ss .. अप्सरा मै आ रहा हूं'!!
एक मिनिट काही चुकत तर नाही ना?
एक भयंकर शन्का त्याच्या मनात आली.. आणि त्याला कापरंच भरलं!
'आपन पाहिली ती सुन्दरी तीच अप्सरा राजाध्यक्ष कशावरून? या २ पैकी कोणती अप्सरा आणि कोणती श्यामल???'

अर्र्र्र्र




Deepanjali
Thursday, September 08, 2005 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे ... !
काही भलता गोंधळ होण्या आधी 'ती' कोण पहायला हवे,नाही तर 'अंदाज अपना अपना' मधल्या अमिर खान सारखा गोंधळ होयचा
पण अता मुली पर्यंत पोचायचे आणि हव्या त्या पोरीवर impression मारायचे तर 'तानाजी' काय कामाचा
तानाजी अंगात संचारून 'आधी लगीन कोंढाण्याचे' होण्या आधी अमर ने डोळे मिटून स्वत : ला अवतारमुक्त केले.
अता कोण बरं lady killer अंगत आणायचा, तो ही मेलेला, अमर ला आठवला एकदम show man 'राज कपूर'!
'रंगेल' आणि ज्याच्याकडे मुली attract होतो असा..
डोळे मिटून 'राज कपूर' असे म्हंटले, तसा खूप बदल काही त्याला जाणवेना, म्हणजे locket ने गडबड नाही ना केली?
पण त्याचे धाडस अचानक वाढले आणि झुडपा मागचा अमर चक्क main entrance पाशी गेला.
त्याने door bell वाजवली तसे अचानक 'बादल' गरजले, पावसाची चिन्हं दिसू लागली, सगळे कसे क्षणात, पाउस पडू लागला आणि अमर एकदम थोडा थोडा 'राज कपूर' सारखा दिसू लागला, म्हणजे चेहेरा तसाच पण डोळे निळे, केसांची style राज कपूर सारखी, मिशी पण चार्ली चॅप्लीन, ... आपलं 'राज कपूर style ची!
आणि .............
त्याच क्षणी अप्सरेची माथेफ़िरु अत्या Victoria's secret च्या 'Pink collection' चा off shoulder night gaun घालून दार उघडायला बाहेर आली
देखण्या 'राज कपूर सारख्या' अमर ला पाहून तिच्याही अंगात आलं आणि ती बाहेर येऊन गाऊ लागली,
'ताक धिना धिन
बरसात मे हमसे मिले तुम सजन तुमसे मिले हम बरसात मे
ताक धिना धिन'

त्या golden oldie ला पाहून अमर ची ही शुध्द हारपली!
त्यानेही पावसात भिजणार्‍या अत्त्या सोबत एकदम 'राज' style चा romance सुरु केला, तिच्या off shoulder gaun चा फ़ायदा घेत त्याने तिच्या खांद्या वरून हात फ़िरवले आणि तिच्या shoulders ला एकदम 'राज' style मधे kiss केलं, मग एकदम अत्याला कंबरेत वाकवून ती 'RK banner 'ची बरसात ची pose घेतली
अत्या एकदम घायळ झाली तिने नवे गाणे सुरु केले,
'मोरे अंग लग जा बालमा'

अमर अत्याला चांगलाच चिकटला,अत्त्याने थोडा शिंक आल्या सारखा चेहेरा केला, तो अमर ला फ़ारच 'मादक' वाटला,
त्यानेही मग गणे सुरु केले,

प्यार हुआ
इकरार हुआ है
प्यारसे फ़िर क्यूं
डरता है दिल'


अत्या लाजली, बाकीचा romance आत जाऊन करावा म्हणून तिने त्याला घरात बोलावले आणि नवे गाणे सुरु केले,

'घर आया मेरा परदेसी प्यास बुझी मेरे आखियन की'
अत्याने भिजलेल्या अमर ला ब्रॅंडी प्यायला दिली!
अमर ने तो 'एकच प्याला' प्यायला आणि 'राज कपूर' ची graceful roamantic style अचानक जंगली झाली!
त्याने अता भलतेच गाणे सुरु केले

मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या through
कधी शंभर एक शंभर टू
त्या दिवशी झाला fever सुरु
कधी शंभर एक कधी शंभर टू
अत्याही म्हणाली.. ..
U know my age is 40 + 9
अमर लगेच म्हणाला,
Oh that means you are old wine
कोई जाने ना जाने ये जाने है क्या
कुछ और नही ये है प्यार का बुखार
धक धक
My heart is beating

असे म्हणत अमर झोकांड्या घेऊ लागला!
पुढे, 'भीगे होठ तेरे, प्यसा दिल मेरा' सुरु होणार इतक्यात अमर चा तोल अजुन गेला.
पिउन out झालेया अमरला क्षण भर काही समजेना अपण कोणा बरोबर romance करतोय, आणि त्या अप्सरा, शामल गेल्या कुठे ............. !



Prasad_shir
Friday, September 09, 2005 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(दीपांजलीच्या रोमॅंटिक सिक्सर नंतर कोणी लिहायला धजावलेलं दिसत नाहिये!...)

अमरच्या अंगात राजकपूर शिरलेला... त्यात रंपा चा डोस जास्त झालेला आणि तेंव्हाच आत्यालाही सॉलिड रंग चढलेला.... दोघांचंही स्थळ काळ वेळ यांचं भान सुटलेलं असतानाच तिथे झोपेत आलणार्‍या काकांनी प्रवेश केला... काका जरी झोपेत होते तरी त्यांचे डोळे टक्क उघडे होते. आणि काकांच्या मागे दोन तीन नोकर होते. काका बहुदा दरबार भरवण्याच्या मूड मधे असावेत. खोलीत शिरताच महाराजांनी (आपलं काकांनी). दरबार भरवायला सुरुवात केली. एक नोकर मोठ्या आवाजत म्हणाला... बा आदब बा मुलाहिजा होशियार... इ इ. काका स्थानापन्न झाले. अजूनही त्यांचं लक्ष कोपर्‍यात झोकांड्या खात उभ्या असलेल्या अमर आणि आत्या कडे गेलं नव्हतं.

इतक्यात एक दुसरीच गंमत झाली, आत्याचा रोमान्सचा झटका अचानक नाहिसा झाला! अमर अद्यापही झिंगलेल्या राजकपूरच्या रूपातच उभा होता... तशा अवस्थेतल्या अनोळखी इसमाला (अमरला) समोर पाहून आत्यानं मोठ्यानं किंकाळी फोडली....


Lalu
Saturday, September 10, 2005 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती किंकाळी ऐकून अमरची दारू खाडकन् उतरली. अमरच्या अन्गातला भेदरलेला राजकपूर झटकन त्या खोलीतून बाहेर पडला आणि समोर दिसलेल्या एका दरवाजातून आत शिरला. तिथे पूर्ण काळोख होता. बाहेर पाऊस पडतच होता आणि अधूनमधून विजांचा कडकडाट... पुढे काय होणार या काळजीनं त्यच्या छातीत धडधडू लागले, नकळत त्याने डोळे मिटले आणि आपल्या छातीवर हात ठेवून एक दीर्घ श्वास घेतला.. आणि त्याक्षणी अन्गातला राजकपूरही निघून गेला...

भानावर आलेल्य अमरने पुन्हा घडलेल्या सगळ्या घटनांची मनातल्या मनात उजळणी सुरु केली. आत्याबाईंबरोबर झालेल्या प्रकारची त्याला अत्यंत शरम वाटू लागली. झालेला प्रकार 'पडलेले स्वप्न' म्हणून सोडून देता आला असता तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं. पण त शक्य नव्हतं. यापुढं त्या लॉकेटचा वापर विचारपूर्वक करायचा असं त्यानं ठरवलं. उगाच 'धरलं लॉकेट आणि केलं स्मरण' असं नको.

तेवढ्यात त्याला पुन्हा एक किंकाळी ऐकू आली. पाठोपाठ एक प्रकाश चमकला आणि वीज कडाडली. अमरला आता पळवाट शोधण्याशिवाय उपाय नाही हे लक्षात आलं. अनेक दरवाज्याच्या भुलभुलैयतून शेवटी तो कसाबसा एकदा त्या महालासारख्या घरातून बाहेर पडला तो थेट हॉस्टेलमधे रूमवर येऊन आडवा झाला. पुढच्या चालीचा विचार करता करता त्याला झोप कधी लागली ते कळलंच नाही.

दुसर्‍या दिवशी नेहमी प्रमाणं ऊठून समोरच्या टपरीवर चहा प्यायला निघाला. एका कडक चहाची ऑर्डर देऊन तो तिथे लावलेल्या वर्तमानपत्राचे मथळे चाळू लागला. एका बातमीकडं त्याचं लक्ष वेधलं गेलं. सुरवातीच्या २, ४ ओळी वाचत असतानाच आपले हातपाय गळून जात आहेत अस त्याला वाटलं. पेपर झटकन हातात घेऊन चहासाठी आणलेली चिल्लर तिथे टाकून तो चहा न पिताच धावत रुम वर आला आणि रुमचा दरवाजा लावून थरथरत्या हाताने तो पेपर उघडला. आणि त्या मथळ्याखालची बातमी तो वाचू लागला.. तो मथळा होता..

राजाध्यक्ष बंगल्यात काल रात्री दोन खून!

रात्री उशिरा हाती आलेली बातमी असल्यामुळं फारसे डिटेल्स नव्हते. .. एक मध्यमवयीन स्त्री आणि एक पुरुष बातमी वाचून पूर्ण होते न होते तोच दरवज्यावर टकटक झाली. त्या आवजानं अमर प्रचंड दचकला.

" अरे दरवाजा उघड, झोपलायस का अजून... "

चन्दूचा आवज ऐकून त्याच्या जीवात जीव आला. त्याने धावतच जाऊन दरवाजा उघडला, चन्दू आत येताच पुन्हा लाऊन घेतला

" चन्द्या... तू २ दिवस येणार नव्हतास ना, आत्ताच कसा आलास..?? म्हणजे आलस ते बरंच झालं..

" अरे असा भेदरलायस का, काय झालं? "

अमरने काही न सांगता फक्त ती बातमी चन्दूच्या समोर धरली. चन्दूनं ती बातमी नीट वाचली आणि तो अमरची समजूत घालू लागला,
" काळजी वाटण्यासारखी गोष्ट आहे रे... पण 'ती' सुखरुप आहे, म्हणजे बातमी वरुन गेलेले लोक... "

रात्रीचा घडलेला प्रकार माहित नसल्यामुळं अमरची खरी काळजी त्याला कळणार नव्हती. अमर त्याला खरी गोष्ट सांगायला धजावला नाही. बोलता बोलता चन्दू तिथे पडलेल्या लॉकेटशी चाळा करु लागला. अमरचं त्या लॉकेटकडे लक्ष जातात अमर कमालीचा अस्वस्थ झाला. ते वरदान न ठरता एक शापच ठरायला लागलंय असं त्याला वाटू लागलं.. आता कडक चहा प्याल्याशिवाय बरं वाटणार नाही म्हणून तो पुन्हा जायला निघाला, चन्दूला काही थातुरमातुर कारण सान्गून तो बाहेर पडला, खरं म्हणजे त्याला TV वर त्या बातमी बद्दल काही नवीन माहिती मिळते का हे ही पहायचं होतं..

अमर जाताच चन्दू विचारमग्न झाला, आत्तापर्यन्त दडवलेली काळजी त्याच्याही चेहर्‍यावर दिसू लागली. त्या मुलीची माहिती काढता काढता तिच्या बरोबर राहणारी ती दुसरी मुलगी त्याला आवडू लागली होती. अर्थात तीही सुखरुपच असणार याबद्दल त्याला खात्री होती पण... एक क्षणभर डोळे मिटून त्यानं विचार केला.. 'आज मी त्याच्यासारखा असतो तर.. ' चन्दूच्या समोर त्याचा आदर्श, त्याचा हिरो उभा राहिला....

चन्दूला त्याच्या हिरोची आठवण होत असतानाच अमरच्या आजीने अमरला दिलेले ते अदभुत लॉकेट त्याच्या उजव्या हातात होते....


Shraddhak
Saturday, September 10, 2005 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" तू गेलास कशाला तिथे तरफ़डायला? " अमरने वैतागून चंदूला विचारले. चंदूने लॉकेट हातात घेतले असताना त्याच्या आवडत्या हिरोचे नाव त्याcया मनात आले होते तरी त्याच्यावर लॉकेटचा काहीही परिणाम झाला नाही. कारण ते लॉकेट त्याच्या आजीचे नव्हते. बहुधा ते लॉकेट फ़क्त नातेवाईकांवरच प्रभाव दाखवेल असा clause असावा. पण आजारपणाच्या गडबडीत आजी अमरला ते सांगू शकली नाही. :-P बराच वेळ ते लॉकेट हातात घेऊन तो बसून राहिला आणि तिथे निरर्थक बसून राहण्याचा कंटाळा आल्याने खुनाबद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी राजाध्यक्षांच्या बंगल्याकडे गेला. अमर चंदूवर वैतागला होता तरी त्याने आणलेली माहिती कमी महत्वाची नव्हती.
" काही खून बीन झाले नाहीयेत. काल अप्सरेची ती माथेफ़िरू आत्या अतिशय revealing कपडे घालून कुणा माणसाबरोबर रोमान्स करताना तिच्या काकांना दिसली. तेव्हा ते स्वत : ला कुठलातरी सम्राट समजत होते म्हणे! असलं काही कृत्य करणार्‍या ह्या बाईला ताबडतोब मृत्युदंड द्या; असा त्यांनी हुकूम सोडला. त्यांचे नोकर ती कारवाई करायला धजेनात म्हणून त्यांनी स्वत : चं पिस्तूल काढलं. तेव्हाच आत्याला पण झटका आला आणि तिने त्यांना आपले पतिदेव समजून ' आ गये? तुमसे बदला लेने के लिये ही मै आज तक जिंदा हूं! ' त्यांच्यावर तिचं पिस्तूल झाडलं. वयोमानाप्रमाणे दोघांचेही हात कापतात. गोळ्यांनी जखमी झालेत पण मेले बिले नाहीयेत. पेपरवाल्यांना काय, राईचा पर्वत करण्यात हातखंडा... "

ही कहाणी ऐकून अमरला हुश्श झाले. परंतु आत्याबरोबरचा तो माणूस आपणच होतो हे त्याने चंदूला सांगितले नाही. मात्र यापुढे लॉकेट जपूनच वापरायचे हे त्याने ठरवून टाकले.
... तरी व्हायचा तो घोटाळा झालाच. अमर दुसर्‍या दिवशी सोफ़्यावर लोळून रंगीत मुगले आझम बघत होता आणि एकीकडे उजव्या हातात लॉकेट घेऊन त्याच्याशी खेळत होता. समोरच्या स्क्रीनवरच्या देखण्या मधुबालाकडे बघताना एकदम न राहवून त्याने " आह मधुबाला! " असं म्हणून डोळे मिटले आणि लॉकेटका जादू चल गया!

.... थोड्या वेळाने अमर चेहर्‍यावर बुरखा ओढून राजाध्यक्षांच्या बंगल्याकडे निघाला.
फ़ाटकापाशीच अप्सरेचे दुसरे काका गस्त घालत उभे होते. बुरखाधारी अमरला पाहून ते गरजले...
" अनारकली! " ' च्या मारी, ह्याने देखील मुगले आझम बघितला की काय? केबलवाला एकच दिसतोय. ' अमर मनाशी म्हटला.
" तुम जैसी कनीज को इस वक्त हमारे महल मे आने की इजाजत नही है. बताओ क्यों आई हो? " ते पुन्हा अमरच्या अंगावर ओरडले.
" म. म.. मुझे अप्सराने बुलाया है. "
" कनीज को तमीज नही है! " काका गरजले. एरवीचा प्रसंग असता तर अमरने ' काय भिकार वाक्य आहे! ' म्हणून म्हातार्‍याची चेष्टा केली असती. पण आता....
' वक्त पडे बाका
तो गधे को कहे काका| ' ही म्हण त्याला आत्ता कुठे नीट कळली.
" जाओ, शहजादी अप्सरा अपने कमरे मे है. " काका म्हणाले तशी अमरने चटकन बंगल्यात अप्सरेच्या खोलीच्या दिशेने धूम ठोकली. चंदूने अप्सरेची खोली नक्की कुठे आहे ही बहुमोल माहिती अमरला दिलीच होती.
.. अप्सरा तिच्या पलंगावर उदास बसली होती. अमरची चाहूल लागताच तिने वर पाहिले.
" श्यामल काय गं हे? तू दिसायला सुंदर नाहीस असं आज पुन्हा तुझा latest crush म्हणाला वाटतं? लगेच बुरखा वगैरे? "
उत्तरादाखल अमरने हं एवढेच म्हटले.
" तुझं बरं आहे. असले विचित्र नातेवाईक नाहीत तुला... कुणावरही प्रेम करून लग्न करू शकतेस तू! नाहीतर मी... त्या दिवशी सिग्नलला दिसलेला तो मुलगा... त्याची ती बाईक.. त्याची ती personality ! काळ्या काचेआडून किती तरी वेळ मी त्याच्याकडे बघत होते. आणि त्याने बघावं म्हणून काचही खाली केली. पुन्हा काही दिसला नाही गं तो. "

.... हे ऐकून अमरच्या अंगावर रोमांच उभे राहिले. चला म्हणजे त्याचे प्रयत्न योग्य दिशेने चालले होते तर... फ़क्त आता ' काका आत्याको निपटाना बाकी रह गया था! '
त्याने हर्षभरित होऊन बुरखा दूर केला आणि ' अय्या तू? ' असं किंचाळत अप्सरेने त्याला मिठी मारली.
नेमकी तेव्हाच काकांनी ठरवल्यासारखी रुममध्ये entry घेतली.
... आता काय होणार? म्हणून अप्सरा आणि अमर भयचकित नजरेने पाहत असतानाच काकांच्या उग्र चेहर्‍यावर चक्क कौतुक उमटले.
" कित्येक वर्षं झाली. एवढं परफ़ेक्ट वेषांतर बघितलं नव्हतं मी... तुझ्या ' अभिनयावर ' मी जाम खूश आहे.......... "
.... या काकांशी बराच वेळ बोलून निघताना अमरने शाहरुख खान स्टाईल...
' मै अमर.. नाम तो याद रहेगा ना? ' असं म्हटलं खरं... पण त्याचा कितपत उपयोग होईल अशी शंका मनात घेऊनच तो तिथून निघाला.
... पण आजच्या दिवसाच्या प्रसंगाने अमरला बरेच मानसिक बळ मिळाले होते.



Paragkan
Monday, September 12, 2005 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय हे कुणीc लिहीत नाहिये? मति कुंठित झाली का आधीचे भाग वाचून? :-O
कथा रुळावर आणण्याcआ हा माझा प्रयत्न
------------------------

इतर कुणाcया लक्षात येणार नाही याची काळजी घेत तो त्या महागुहेतून आपलं महालातून बाहेर पडला. त्याने त्या काकाबरोबर झालेल्या बोलण्याcई मनातल्या मनात उजळणी केली.
हा अप्सरेचा काका क्रमांक २ होता. जुन्या संगीत नाटकात स्त्रीपार्टी भूमिका करत असे, अगदी आवदीने. 'नशीब' अमर स्वतःशीच हसून म्हणाला. काकानी दोघांcया या 'अस्फुट' प्रेमाला आपला हस्त (वरदहस्त देण्याची क्षमता नसल्यामुळे) दिला होता. 'cअला एक काका (की काकू?) तर खिशात पडला' असं म्हणत अमरने सुस्कारा सोडला. त्याने मनोमन 'मधुबालाcए' आभारही मानले.

घरी आला तर अंदूशेठcई स्वारी कसल्याश्या तंद्रीत बसण्या आणि लवंडण्याच्या मधल्या कुठल्याशा अवस्थेत होती. नजर 'पार' लागली होती. अशा अवस्थेतून त्याला जागं करू नये हे अमर पूर्वानुभवावरुन शिकला होता. मग त्याने खोलीचा दुसरा कोपरा काबीज केला आणि स्वतःची तंद्री लावली.
हातातलं लॉकेट बघत बघत त्याने आता मनोमन पद्धतशीर प्लॅन आखायला सुरुवात केली. त्याने ठरवलं की आता एका वेळी एका काका किंवा आत्याला गटवायcअं. तो स्वतःवरc जाम खूष झाला. त्याला बसल्या बसल्या स्वप्नं पडू लागली अप्सरेची तिcयाशी प्रेमालाप वगैरे वगैरे वगैरे
पण मध्येच अप्सरेcई ती आत्या नं. १ कडमडली आणि त्याला स्वप्नातून पळता भुई थोडी झाली.

आता त्याला आपलं दुसरं सावज ठरवायcअं होतं. काम तितकसं सोपं नव्हतं. काका नं. १ आणि आत्या नं १ आ त्याने आधीच धसका घेतला होता. तेव्हा आता त्याने 'आत्या नं. २' कडे मोर्cआ वलवायcअं ठरवलं. पण तिcयाबद्दल काहीच माहिती नव्हती फक्त एकc समजलं होतं की या 'आत्तोबा' कुस्ती शौकीन आहेत.


Deepstambh
Tuesday, September 13, 2005 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कुस्ती म्हटल्यावर सातार्‍यातील मल्लांचा हात कोणी धरु शकणार नाही (फक्त त्या मल्लाची बायको सोडुन) याची अमरला पुरेपूर खात्री होती. राजघराण्यातले राज्याध्यक्ष म्हटल्यावर त्यांचा शाहू महाराजांच्या सातारा संस्थानाशी नक्कीच काहितरी संबंध असणार, हे ही त्याने ताडले. पण WWF मधली कुस्तीची नाटकं सोडून अमरला कुस्तीची काहीच कल्पना नव्हती.

त्याने रिमोट हाती धरला आणि केबलवर TenSports धुंडाळायला सुरुवात केली. पण केबलवाल्याने पैसे थकवाल्याने Star-ESPN, TenSports या वाहिन्या लागत नाहित अशी मौलीक माहिती चंदूने अमरला दिली.

शेवटी त्याने मायबोलीची मदत घ्यायचा विचार केला. त्याचा अमर _ प्रेम _ १९८४ असा एक मायबोली ID होता, पण त्या नावाने प्रश्न विचारणे त्याला योग्य वाटले नाही. कारण हितगूजकर आपल्याला फाडून खातील याची त्याला खात्री होती. एव्हढेच नाही तर हितगूजवरही बरीच prospective मंडळी असल्याने (एक तर चक्क 'राजकुमार' च आहे.. म्हणजे बोंबलले) अप्सरा आपल्या हातची जाईल, याचीही त्याला भिती वाटली..

म्हणून त्याने 'बुरखा' नावाचा एक नविन ID तयार केला आणि हा फेक ID नसुन केवळ काही अपरिहार्य कारणासाठी आपण तो घेतला आहे याची 'मनोमन' खात्री पटवली. आधी तो 'Looking for' / 'एक खरी व्यथा' या बीबींवर जाणार होता, पण तिथे माहिती विचारल्यावर जरा जास्तच माहिती मिळते याचा त्याला अनुभव होता. म्हणून तो जाऊन थडकला थेट सातारा बीबीवर..

सातारा बीबीवर अशाप्रकारे संवाद घडला.. (कंसातील वाक्ये लेखकाचे स्वगत आहे)

Burakhaa: Hi guys!! wassup?? aahe kaa koni? (आपण नविन आहोत हे भासवण्यासाठी मिंग्लीश लिहिलेच पाहिजे)
Aj_onweb: तुला नक्की कोण हवंय?
Goodhi: मै हू ना!:-)
Maaru_Agg_Kaanaakhaali: अगं गूढी, काल पाडव्यानिमित्त म्युनिकला एक मराठी जोडपे येणार होते.. मला त्यांना जोड्याने मारायचे होते, पण उगाच 'इतरांच्या गॉगलमधुन आपण' (इ. गॉ. आ.) सारखे व्हायला नको म्हणुन मी त्यांच्यासाठी शेव बनवायला गेली.. पण शेव राहिली बाजुला आणि चुकुन पडल्या गाठी..
Bha: बरखा सुस्वागतम!! हा घे पुष्पगुच्छ:-) -- (नंबर लावला आहे)
Lambuchambu: साला हा केतकर जन्माला का आला रे भो??
Burakhaa: Bha bhaau (पत्ता कट).. mi barakhaa naahi kaahi.. burakhaa aahe. malaa smiley kase dyaayache te saangtaa kaa?? aani devanagri pan shikavaa.. (सांगेलच कोणीतरी.. तसेही इथे सर्व रि.टे.)
Aj_onweb: बुरखाताई.. a href="
/cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi" target="_blank" इथे जा /a :-)
Burakhaa: (हा आपला साधा सरळ दिसतोय, कधी कोणाशी तंटा नाही.. कधी कसल्या वादात नाही, यालाच पकडूया) अजय दादा, सातार्‍याचा प्रसिद्ध मेलेला मल्ल कोण रे???:-) -- (लगेच देवनागरी?? प्रगती छान आहे)
Khadkhadi: इथे जिवंत माणसाची किंमत नाही, मेलेल्यांना विचारताहेत.:-(
Dilip_Buddhaa: सातारा बीबीचा पास घेतला का?? -- (झाली रॅगींग सुरु)
Vivek_Oberoi: यांना ऍडमिनच्या शब्दांची किंमत नाही.. मनाची नाहितर जनाची तरी.. रोज ढोसायच्या गोष्टी आणि जाऊन पडायचे कुठल्यातरी खड्ड्यात.. आता तर पुण्यात खड्डेपण भरपूर आहेत.. म्हणजे पुण्याचे आयुक्त करीरपण यांना सामील असणार.. मलातर पाकिस्तान आणि भूतानचापण यात हात दिसतोय.. जा^ऊंदे.. आपण का वाईट व्हायचें..
Andhar: आपल्याला काही प्रॉब्लेम???
तोडून टाका, फोडून टाका
जाळ काढुन पोळून टाका
ग्लासात ही अडकली मदिरा
घशात या ढोसून टाका
Sonaapati: कोण तो?
ज्याने मला ठार केले??
शत्रू होता?
की मित्रानेच वार केले?
Lambuchambu: विवेकभो.. तुप्ले 'जनाची नाहितर मनाची तरी' असं बोलायचे होते का रे भो?? च्यायला हा केतकर ~!@#$%&*^#@ ..
कोण समजतो हा स्वताला??
Sampataa_Jhoke: आम्ही कोण म्हणोनी काय पुसता???
आम्ही असू तोकडे..
अरे शेंबड्या पोरांनोऽऽऽऽ..
आधी आपले नाक पूसा..
...आम्ही कोण म्हणोनी काय पुसता???
Aj_onweb: आपले a href="http://satara.nic.in/htmldocs/prominet_personalities2.htm" target="_blank" खाशबा जाधव /a आहेत की.. a href="http://sify.com/sports/olympics/fullstory.php?id=13538760" target="_blank" ऑलिंपीक मेडल विनर /a

यानंतर Burakhaa नावाची व्यक्ती कधीच मायबोलीवर दिसली नाही आणि अनेकजण तडफडत बसले. असो.. त्यांची प्रेमकहाणी हा आपल्या कथेचा विषय नाही..

मायबोली बंद करुन अमरने लगेच लॉकेट हातात धरले आणि खाशबा जाधावांचे नामस्मरण केले..


Punyanagarikar
Tuesday, September 13, 2005 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पराग, बरं हे घे.. एका दगडात दोन आत्या.. :-)


अमर आता खाशबा जाधवांच्या अवतारात राजाध्यक्षांच्या बंगल्यावर पोहोचला. त्याने कुस्ती प्रेमी अत्यांना impress करायचा पूर्णं प्लन आखला होता. पण तिथे पोचतो तर त्याला वेगळच काही तरी दिसलं..

एक बारिक टकला माणूस, दोन्ही अत्यांना कसलेसे फ़ोटो दाखवत होता. कुस्ती प्रेमी अत्या त्या माणसाला बेदम हाणायच्या मोहाला टाळत असल्या सारख्या दिसल्या, तर romance करणार्‍या आत्या रडत होत्या.
अमर पोचताच तो माणुस उठला. फ़ोटो खिशात टाकत म्हणाला,
" मग पैसे कधी पोचवताय "
त्याच्या बोलण्यावरुन अमर ला 'दाल मे कुछ काला है' अस जाणवलं.
त्याने एकदम " हा माणुस तुम्हाला त्रास देतो आहे का? " अशिच सुरुवात केली.
तश्या कुस्ती प्रेमी आत्या जरा चपापल्या. एकदम अनोळखी माणसाला अशी गोष्ट कशी सांगायची पण romantic आत्या बिथरल्या. त्या म्हणे,
" अहो, हा माणुस आहे न, ह्याच्या कडे माझे काही compromising फ़ोटो आहेत. काल पर्वा जो पाऊस झाला न, त्यात म्हणे मी कोणा मुला बरोबर romance करत असल्याचे ह्यांच्या कडे फ़ोटो आहेत. ते त्यांनी आम्हाला दाखवले. आता त्याला त्याला... पैसे हवेऽऽत... " अस म्हणुन ह्या आत्या पुन्हा रडायला मोकळ्या..

इथे अमरच्या डोक्यातली चक्र जोरदार फ़िरायला लागली. त्याने त्या बारिक टकल्या मनुष्याला कुस्ती च्या एका जबरदस्तं पकडित धरलं. तो माणुस WWF बघत नसल्या मुळे काहिच करू शकला नाही. मग अमर त्याला म्हणाला,
" बर्‍या बोलानं ते फ़ोटो आणि नेगेटिव्ह इथे दे, नाही तर तुझी खैर नाही "
तसं त्या माणसानी जिवाची गया वाया करुन अमर ला फ़ोटो आणि नेगेटिव्ह्स दिल्या. त्या अमर ने लगेच कुस्ती प्रेमी आत्यांना दिल्या, आणि बरोबर असल्याची खात्री करुन घ्यायला सांगितली. इथे कुस्ती प्रेमी आत्या एकदम impress झालेल्या. आश्चर्याने घातलेलं तोंडातलं बोट काढुन (ते पुसुन) त्यांनी फ़ोटो आणि नेगेटिव्ह्स तपासल्या. बरोबर असल्याची खात्री पटली तशी अमर ने त्या माणसाला सोडल. वर धमकावलं,
" पुन्हा हे असले धंदे केलेस, तर तंगडं मोडुन ठेविन.. चल पळ इकडनं "
आता त्याला एकच काळजी होती, ती म्हणजे त्या फ़ोटोतला तरूण तो स्वतः होता आणि हे त्या दोन्ही आत्यांना कळता कामा नव्हतं.
म्हणुन त्याने romantic आत्यांना सांगितल,
" तुम्ही हे फ़ोटो आणि नेगेटिव्ह्स जाळुन टाका पाहू. आहा, बघू पण नका त्यांच्या कडे... "
अस म्हणुन त्या romantic आत्यांना त्याने ते फ़ोटो जाळायला लावले, आणि मग सुटकेचा निश्वास टाकला.
दोन्ही आत्यांच्या आता grateful नजरा त्याच्या कडे अहेत अस पाहुन, त्याने मग आपन तिथे का आलो ह्याचं खरं कारण सांगितलं. दोन्ही आत्यांना इतकं impress केल्यावर आणि एव्हढा नाजुक problem इतक्या सफ़ाईनी सोडवल्यावर त्यांच्या विरोधाचा काही प्रश्णच नव्हता. पण दोन्ही आत्यांनी त्याला आपुलकीने सावध केल...
" आमचा होकार आहेच रे तुझ्या आणि अप्सरेच्या जोडीला.. पण आमच्या होकाराने काय होतय तिच्या मोठ्या काकांना पटवलस तर खरी बात आहे. तसे तिचे मोठे काका थोडे विचित्रच आहेत............ त्यांना माणसां पेक्षा प्राणी जास्ती आवडतात. त्यामुळे ते शिकार वगरे करणार्‍यांचा तिरस्कार करतात.. घारात तीन चार कुत्रे मांजरी ठेवल्या आहेत. एवढच नव्हे, कधी कधी स्वतःच्या अंगात एखादा जंगली प्राणी संचारल्या सारख वागतात.. "



Rachana_barve
Wednesday, September 14, 2005 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमरचा चेहरा रडवेला झाला. त्याच्या त्या brad pitt सारख्या डोळ्यात अश्रू आलेले मोठ्या आत्याला अज्जीबात आवडले नाही. " अमर तू आमच्या कडे उद्या रात्री जेवायला ये. आणि तू नक्की सगळ्यांवर छाप पाडशील " आत्या संतोषाने मान डोलावत म्हणाली.
अमरचा चेहरा नुकत्याच खुडलेल्या गुलाबासारखा खुलला. " आणि हो येताना शॅंपेन आणायला विसरू नकोस. " अमर मान डोलावत घरी पोहोचला. उद्या इतक्या सगळ्या लोकांसमोरे परिक्षा द्यायची ह्या भितीने त्याला निटसे जेवणदेखिल गेले नाही. अगदी त्याची आवडती बिर्याणी देखिल तो २ बशा खाऊन नको म्हंटल्यावर चंदुला फ़िट यायची बाकी होती.
" आयला अमर प्रेमात इतका बुडलास? जेव की " चंदु तोबरा भरत म्हणाला
" अरे काय सांगू उद्या मला अप्सरा कडे जेवायला जायचे आहे. " आणि अमरने पडलेल्या आवाजात कहाणी सांगीतली.
" हात्तीच्या मग जा की बिनधास्त. फ़ाड फ़ाड इंग्रजी बोलून गार करून टाक सगळ्यांना. अरे लडकी तो हा बोलीच है. मेन तर बाजी तु मारलीस आता हे छोटे मोठे बुरुज सर करायला काय घाबरतोस. " चंदूने चाटून पुसून बशी साफ़ केली. अमर हेव्याने त्याच्याकडे बघत राहिला. तितक्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली " तू येतोस का? तू चल माझ्याबरोबर " चंदूने बोकाणा भरायला केलेला आ तसाच राहिला. " काय? तिच्या विचित्र फ़ॅमीलीला भेटायला? मी नाही "
इथे बराच वेळ चंदू नाही नाही म्हणत गयावया करतोय आणी अमर त्याला मस्का मारतोय हे द्रुष्य. शेवटी श्यामल पण तिथे येणार आहे हे ऐकल्यावर चंदु तयार झाला.
दुसर्‍या दिवशी कसून तयार होऊन शॅंपेनची महागातली महाग बोॅटल घेऊन चंदु आणि अमरने त्या अवढव्या राजवाड्याव्याची बेल वाजवली.
" या " म्हणत रामूने स्वागत केले.
चंदू प्रथमच आत आल्याने त्याचे डोळे दिपले होते.
जिन्यावरून अप्सरा आणि शामल हातात हात घालून खाली आल्या..
अप्सराने आपल्या नाजूक आवाजात अमरला हाय केल्यावर तो बेशुद्ध होण्याच्या मार्गावर होता. तोपर्यंत चंदू श्यामलशी ओळख काढून घेऊन तिच्या हातात हात घालून बागेत देखिल निघाला होता. अमरने अवंढा गिळुन खिशातले ते लोॅकेट चाचपले. आणि तो अप्सरा कडे बघून कसाबसा हसला. आपण इतके हजरजवाबी असायला हवे की ही सगळी लोकं अगदी खूष झाली पाहिजेत करत त्याने एक नाव डोळ्यांसमोर आणले. प्र के अत्रे आणि त्याने लोॅकेट हातात धरून डोळे घट्ट मिटले


Deepanjali
Saturday, September 17, 2005 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

‘ श्रोता दशसहस्त्रेषु ’ म्हणणारे अत्रे अमरसारख्या कुठल्याही ‘ य ’ श्रोत्या मधे संचारु लागले तर ते अत्रे कसले!
त्यामुळे या वेळी ही locket ने धोका दिला!
अमर ने वैतागून या ऐन वेळी धोका देणार्‍या’ locket बद्दल अजुन काही धागेदोरे’ मिळतात का ते शोधायचे ठरवले आणि त्याने सरळ गाठली आज्जीची संदूक!
खूप शोधल्यावर त्याला एक अजीर्ण झालेली पिवळट कागदाची एक खिळखिळी वही मिळाली, त्यातही काही locket विषयी माहिती दिसेना म्हणून अमर ने ती रागाने फ़ेकली, इतक्यात ………………. ,
एक चिठ्ठी उडून पडली.
अमर ने तो अजीर्ण कागद उलगडला आणि त्याच्या नावाचे पत्र पाहून तो अतिशय आश्चर्यचकीत झाला
ते पत्रं अस होत,


|| श्री ||


चि . अमर,
अनेक उत्तम आशीर्वाद!
मला खात्री आहे ही चिठ्ठी जेंव्हा तुला मिळेल तेंव्हा तू मोठा झाला असशील आणि कदाचित प्रेमातही पडला असशील, हो ना?
लाजलास का, पण ऐक, आज मी तुला आज एक गोष्ट सांगणार आहे, या गोष्टीत मी म्हणजेच सुमी’ आहे, अनेक क्रांतिकरी आहेत आणि आहे जाॅन’!
का रे, जाॅन चे नाव ऐकून गोंधळलास
तर ऐक, आज तुझ्या या आजीची प्रेम कहाणी, मला खात्री आहे तुझ्या प्रेम कहाणीलाही ही कहाणी एक वेगळीच दिशा देइल.
तर ते दिवस होते ब्रिटीशांच्या राजवटीचे
सारा देश पेटला होता क्रांतीच्या जोशाने, आणि बर का अमर तुझी आजीही यात मागे नव्हती!
ज्या वयात इतर मुली साज शृंगार करतात, स्वत : ला तासन तास आरशात बघत परीकथेतील राजकुमाराची स्वप्नं पहातात, त्या वयात बर का अमर, आम्हा सर्व स्वप्नाळु मैत्रीणींचे डोळे एकच सप्न पहात होते, ‘स्वतंत्र्’ भारताचे!
आम्ही गांधीजींच्या स्वदेशीचा पुरस्कार केला असला तरी अहिंसा चळवळ आम्हाला मान्य नव्हती, आम्हा पोरींची तुकडी भगतसिंग, टिळक, सावरकर यांच्या बंडखोर धडाडी वृत्तीची पूजा करायची!
कामा मधे कुठला खतरा’ नसेल तर त्यात आम्हाला काही आव्हान च वाटायचे नाही, अगदी अवघड कामे करायची आम्हा मुलींची तयारी असायची!
कधी कधी भूमिगत होउन गुप्तपणे काम करायचं, तर कधी ब्रिटिशांच्या नजरबंदेतील स्वातंत्र्य सैनिकांना सोडवणे कधी कधी चक्क जाळपोळ सुध्दा करण्यात कमी नवह्ती हो तुझी आजी!
त्या दिवशी असच वातावरण तापलं होतं, आम्ही नुकतीच तोडफ़ोड, जाळपोळ करून तुरुंगात शिक्षा भोगणार्‍या आम्च्या काही सथीदारांना सोडवलं होतं.
आणि अता आम्हाला पोलिस शोधत होते.
थोडक्यात काय तर पुन्ह एकदा भूमिगत होयची वेळ अली होते!
रात्रीच्या जेवणच्या भाकरी मधून कुठे लपायचे तो संदेश आला,
अगदी आड बाजुच्या कोकणतल्या एका खेड्यात छोट्यशा घरात जायचे होते.
ठरल्या प्रमाणे मी तिथे गेले तर घरावर नाव होते
’जाॅन लुइस’.
ते नव पाहून मी गोंधळले इतक्यात एका पंचवीशीतल्या गोर्‍या, उमद्या समुद्र सारख्या निळ्या डोळ्यंच्या ब्रिटीश्’ तरुणाने मला हताला ओढून आत नेले.
’C’mon hurry up, get inside before any officer arrives !’, असे म्हणत मला तो आत घेउन गेला.
आधी मला त्याच्यावर विष्वास ठेवु नये असे वाटले,
पण आम्चा secret code त्याने सांगितला, ’Deep blue sea’ आणि माझी खात्री झाली.
नंतर कळलं की जाॅन एक ब्रिटीश असून आमचाच साथीदार होता!
ब्रीटीशा मधे राहून आम्हाला त्यांची माहिती पुरवणार तो आमचा अतिशय उपयुक्त खबरी’ होता.
जाॅन च्या व्यक्तीमत्त्वाने नकळत प्रभावित झालेले माझे मन नकळत त्याच्या मधे परीकथेतला राजकुमार्’ शोधु लागले, पण दुसर्‍याच क्षणी मला देशभक्तीच्या ध्येयची आठवण झाली, आणि मी धाडस करून जाॅन शी बोलले.
तर बर का अमर, जाॅन होता एका ब्रिटीश आधिकार्‍याचा मुलगा पण मनाने अगदी मृदू, एक कलाकार!
भारतात तो आला होता रम्य निसर्ग पहायला, चित्रं काढणे, कविता करणे हे त्याचे आवडते छंद!
पण भारतात त्या वेळी चाललेली चळवळ पाहून त्याचे मन नकळत भारतीय क्रांतिकारां सारखे खंबीर कसे बनले त्याचे त्यालाच कळले नाही!
त्या रात्री वेळ कसा घालवायचा समजत नव्ह्तं, इतक्यात जाॅन माझ्या साठी एक cup कडक coffee घेउन आला आणि चक्क माझ्याशी तोडक्या मोडक्या मराठी मधे बोलु लागला.
बराच वेळ आमच्या गप्पा झाल्या, वर वर इतक्या शांत दिसणार्‍या जाॅन ने आमच्या लढ्यात इतकी साहसं केली होती हे ऐकुन आश्चर्य वाटले!
जाॅन अगदी भुरळ पाडणारा होता, अवघ्या दोनच तासात काही साहसी कथा, काही इंग्रजी कविता त्याने ऐकवल्या, त्याने काढलेली सुंदर चित्रं दाखवली, काही खळखळून ह्सवणारे jokes पण सांगितले.
अमर, कित्येक वर्षांनी तुझ्या आजीला असा निवांत वेळ मिळाला आणि इतकं हसायला मिळालं
मला हसताना पाहून जाॅन एक्दम उद्गारला,
‘ Beautiful !…. Perfect Indian beauty!....… glowing dusky complexion, mysterious deep black eyes, rosy lips and stunning smile, Sumi can I sketch your portrait?'
मी लाजून मानेनेच होकार दिला, आणि बघता बघता त्याने असे काही चित्रं काढले की मला जाणवलं, ‘अरे आपण सुंदर आहोत’!
पुढे त्याने मला त्याने स्वत : रचलेली कविता ऐकवली,

Every night in my dreams
I see you. I feel you.
That is how I know you go on.
Far across the distance
And spaces between us
You have come to show you go on.
Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
And you're here in my heart
And my heart will go on and on


माझे मनही त्याच्या कवितेने काव्य्मय झाले आणि मी त्याची ती अधुरी कविता माझ्या परीने पूर्ण करायचा प्रयत्न केला.

Love can touch us one time
And last for a lifetime
And never let go till we're gone
Love was when I loved you
One true time I hold to
In my life we'll always go on
Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
And you're here in my heart
And my heart will go on and on ....



अमर, आम्हा दोघांना त्या क्षणी एका मेकांच्या प्रेमाची जाणीव झाली, नकळत आम्ही एका मेकांचे हात ह्तात घेतले आणि एक मेकांच्या डोळ्यात पहात राहिलो, जाॅन च्या त्या deep blue डोळ्यांनी क्षण भर मोहिनी टाकली.
इतक्यात दार वाजलं, खबरी ने एक संदेश आणला होता, ताबडतोप हे ठिकाण सोडायची वेळ आली होती, ब्रिटीशांना जाॅन ची गद्दारी समजली होती आणि माझा ठाव ठिकाणही
खबरी ने आम्हाला दिलेला संदेश होता समुद्र पार करून दुसर्‍या गावात लपण्याचा!
बाहेर तर समुद्रं खाळला होता तरी जाॅन नी मला घेउन नाव वल्हवायला सुरु केली, खूप झपाझप वल्हे मारत आम्ही समुद्राच्या मध्यभागी आलो, आणि समुद्र शांत झाला, इतक्यात जाॅन नी मला एक locket दिले.
‘हे तुझ्या साठी, माझ्या grand father नी मला दिलेलं, सुमी, ‘संकटकाळी प्रेयसीची रक्षा करायला हे कामी येतं असा आजोबांचा विष्वास आहे, अत्ता मी डोळे बन्द करून त्यांच्या नावाचे स्मरण करणार आहे, आजोबांचा आत्मा मग इथे येउन काही चमत्कार करेल असा माझाही विशास आहे मला वाटतं आज ते locket आजमावून पहायची वेळ आली आहे, असे म्हणत जाॅन नी डोळे मिटले आणि त्याच्यात एक divine power आली!
मग ते locket त्याने माझ्या गळ्यात घातले!
समुद्र जसा अचानक शांत झाला तसा जाॅन क्षण भर खूप शांत झाला, म्हणाला सुमी, काय माहित ही वादळा पूर्वीही शांतता असेल, वादळात वहात गेलो तर पुन्हा भेटू, न भेटू!
मरण्य पूर्वी मला एक हिंदी कविता ऐकव ना please !
त्याचे ते पाणी दार डोळे पाणवले अणि माझ्या तोंडी नकळत एक हिंदी कविता आली,

‘हो चांदनी जब तक रात
देता हर कोई साथ
तुम मगर अंधेरोमे
ना छोडना मेरा हाथ
जब कोई बात बिगड जाए
जब कोई मुष्कील पड जाए
तुम देना साथ मेरा
ओ हमनवाज
न कोई है न कोई था
जिन्दगी मे तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा
ओ हमनवाज
..............


इतक्यात वादळ आलं आणि अमर आमची नाव उलटली, मी आणि जाॅन नी हात पाय मारून पोहत एका झाडाच्या फ़ांदीचा आधार घेतला, किती तरी वेळ त्या फ़ांदी बरोबर वहात गेलो, कधी बेशुध्द झालो ते मात्रं कळलच नाही!
जाग आली तेंव्हा आम्ही किनार्‍याला लागलो होतो, फ़ांदी तशीच हतात होती, आधी मी जाॅन ला उठवलं, खूप वेळानी जाॅन नी डोळे उघडले,

‘सुमी, locket नी magic दाखवली, तू वाचलीस, मी खूप आनंदी आहे आज, पण unfortunately जिंदगी भर क साथ्’ आपल्या नशीबात नाही, तुझे आयुष्य मोलाचे आहे, अनेक भारतीयांना स्वातंत्र्याचा सूर्य दाखवण्यात तुला यश मिळो!
कदाचित तुला या किनार्‍यावर पोचवण्या साठीच Jesus नी मला बनवलं असेल, सुमी, तुमची क्रांती यशसी होईल, भारत स्वतंत्र होईल, तुझ्या देशभक्तीला अणि या उगवत्या सूर्याला माझा सलाम’!

असे म्हणून जाॅन नी कायमचे डोळे मिटले!

जाॅन गेला पण माझा विश्वास आहे पुढल्या जन्मी नक्कीच जाॅन माझा होईल त्याची आठवण या heart shape locket च्या रुपाने माझ्या मनात कायम राहील कारण,

There is some love that will not
go away
You're here, there's nothing I fear,
And I know that my heart will go on
We'll stay forever this way
You are safe in my heart
And my heart will go on and on


अमर, हे locket अता तुझे आहे!
'जाॅन'सारख्या एखाद्या 'अमर' आत्म्याचे स्मरण करून ते वापर आणि तुझे प्रेम यशस्वी होईल पण मजा म्हणून वापरु नकोस, तेंव्हाच वापर जेंव्हा तू आणि तुझी प्रेयसी संकटात असाल, मजा म्हणून वापरशील तर ते कदाचित काम करेलही पण नेमके संकटात जादू दाखवणर नाही!
लक्षात ठेव, 'जाॅन सारखे खरे 'अमर प्रेम करशील तरच तरशील!
तुझीच,
सुमा आज्जी
...........................................








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators