Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 19, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » दुःखद घटना » Archive through September 19, 2007 « Previous Next »

Robeenhood
Wednesday, February 21, 2007 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे वाईट झालं!
त्यांच्या नावाबद्दल लोकाना कुतुहल असे. कोल्हाटी समाजात बापाऐवजी आईचे नाव लावतात.आमच्या बरोबर रमेश विमल अंधारे नावाचा वर्गमित्र होता.
परवा पुणे विद्यापीठाचा परिक्षा फॉर्म भरीत असताना आईचे नावही लिहायला सांगितले होते. मार्कशीटमध्येही आईचे नाव येते हल्ली....


Kedarjoshi
Wednesday, February 21, 2007 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोल्हाट्याचे पोर एक जबरदस्त पुस्तक आहे.
रॉबीनहुड पण त्यांनी आईचे नाव वेगळ्या कारणासाठी लावले होते. त्याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे.


Upas
Wednesday, February 21, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे केदारचं.. मी डॉक्टर झालो मध्ये आणि कोल्ह्याट्याचं पोरं मध्ये त्यांनी ते स्पष्ट केलय.. त्यांची शिक्षणाची तळमळ आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची जिद्द पाहून थक्क व्हायला होतं.. खूप वाईट वाटलं हे ऐकून.. :-( जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हेच खरं.. त्यांच्या लिखाणाने आज पर्यंत कितीतरी जणांना शिकण्याची जिद्द आणि उभारी मिळाली असेल..

Limbutimbu
Wednesday, February 21, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाईट झाल!
अन वयही फार नव्हत त्यान्च


Dineshvs
Wednesday, February 21, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे, खरेच वाईट झाले.
अगदी प्रेरणादायी पुस्तके आहेत हि.



Mahaguru
Friday, March 23, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांचे निधन :-(

Runi
Friday, March 23, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच संवाद मध्ये भालेराव यांची मुलाखत वाचताना श्री. ना. पेंडसेंचे नाव वाचुन मी भुतकाळात गेले होते, शाळेत असताना तुंबाडचे खोत वाचलेले आठवले आणि नेमकी आज ही वाईट बातमी वाचण्यात आली.
रुनि


Mahaguru
Saturday, March 31, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेखिका मृणालिनी जोगळेकर यांचे नाशिकमधे निधन.
मृणालिनी जेगळेकर यांच्या मनवेला या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांचे शंध्याकाळचा चेहरा, रंग अमेरिकेचे अशी पुस्तके प्रसिध्द होती.
(ई-सकाळ मधील बातमी )

Mahaguru
Wednesday, May 30, 2007 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'श्यामची आई' वनमाला (सुशीला पवार) यांचे निधन.

Dineshvs
Wednesday, May 30, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कादंबरीतल्या आईचा चेहरा काळा आड गेला.
पायाला घाण लागु नये म्हणून जपतोस, तशीच मनालाही घाण लागु नये म्हणून जप हो श्याम.
अशी त्यांची वाक्ये अजुनही आठवताहेत.


Ajjuka
Thursday, May 31, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३ वर्षांपूर्वी त्यांना भेटायचा योग आला होता. या वयातही काय तेजस्वी दिसत होत्या. वाईट वाटले.

अजून काही दुःखद घटना...
ज्येष्ठ पत्रकार संजय संगवई गेले हृदयविकाराच्या झटक्याने. नर्मदा आंदोलनातले एक महत्वाचे नाव.

संगीतकार स्नेहल भाटकर गेले. परवा.

काल NCPA चे संस्थापक, 'पद्मभूषण' जे. जे. भाभा गेले.

किती वाईट बातम्या एक दोन दिवसात!!


Bee
Friday, June 01, 2007 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुशीला पवार गेल्याचे वाचून खूप दुःख झाले. पहिल्या वर्गात असताना शामची आई बघितला.. अजून तो चित्रपट लक्षात आहे. किती काळ गेला..

Svsameer
Monday, July 02, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताचे माजी कसोटीपटू व दमदार फलंदाज दिलीप सरदेसाई यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

Karadkar
Tuesday, July 03, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजदीप सरदेसाई यांचे ते वडील

Mahaguru
Friday, August 03, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक सरोजिनी शंकर वैद्य (वय ७४) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
:-(

Supriyaj
Friday, August 03, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही बातमी वाचून फारच वाईट वाटतयं.. त्या बहुतेक गेली काही वर्षं खूपच आजारी होत्या पण तरीदेखील त्या अजून नवीन पुस्तकांसाठी काम करत होत्या असं मधे एका लेखात वाचलं. त्यांचा 'संक्रमण ' हा वैचारीक लेखांचा संग्रह अप्रतिम, प्रत्येकाने वाचावा असा.


Supriyaj
Tuesday, August 21, 2007 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी सहित्यव्यवहारात 'मौजे'ची चिरंतन मुद्रा उमटवणारे ख्यातनाम प्रकाशक श्री.पु.भागवत यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले. गेल्याच महिन्यात BMM ला संजय भागवत भेटले होते, तेव्हा त्यांनी सध्या श्रीपु आणि मंगेश पाडगावकर बायबलच्या भाषांतरावर काम करत आहेत हे सांगितलं, ते ऐकून थक्कच झाले होते मी.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2298832

Saee
Wednesday, August 22, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीपुंना भावपूर्ण श्रध्दांजली. मोठ्या माणसांना घडवलेला मोठा माणूस गेला. आता जवळजवळ मागची पिढी संपलीच म्हणायची एका अर्थाने.

Aashu29
Wednesday, August 22, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रि. पुं ची बातमी आजच वाचली!! वाइट वाटले!!

Svsameer
Wednesday, September 19, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोर संगीतकार दत्ता डावजेकर यांचे बुधवारी रात्री आठ वाजता अंधेरीतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators