Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 18, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Pune » वर्षा विहार २००७ » Archive through July 18, 2007 « Previous Next »

Nandini2911
Tuesday, July 17, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कापो, मला बॉसने विचारलं म्हशीवर एखादं आर्टिकल लिही.. तुम्ही आधीच लिहिलेलं असल्याचं मी त्याच्या निदर्शनास आणुन दिलं आणि इतकी माझी लेखन भरारी नसल्याचं ही स्पष्ट केलं.

कुणाकडे माझे म्हशीवर बसलेले फोटो आहेत का? माझ्या घरातल्याचा विश्वास बसत नाहीये की मि म्हशीवर बसले.


Neel_ved
Tuesday, July 17, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदु, आहे माझ्याकडे उद्या मेलतो गं.....

Shivam
Tuesday, July 17, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व.वि.ला येता आलं नाही, याचं दु:ख होतय. :-( पण तुम्हा सर्वांच्या वृत्तांतामधील प्रत्येक शब्दागणीक उपस्थित राहण्याचा अनुभव मिळतोय.

वाकड्या, कृष्णा, नंदिनी, रीना तुम्हा सर्वांचेच वर्त्तांत छान.

का.पो. कशी काय ही किमया केलीत बुवा? तुम्हाला भेटायलाच हवं. आता "पुन्हा एक पसायदान" लिहायला घ्याच. :-)


Kmayuresh2002
Tuesday, July 17, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरातल्याचा विश्वास बसत नाहीये की मि म्हशीवर बसले...त्या म्हशीचा पण बसला नव्हता त्या दिवशी

Limbutimbu
Tuesday, July 17, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवो सन्योजक, या कोणाच्याच वृत्तान्तात "म्हशीवर यशस्वी आकर्षक पणे राईड" करणार्‍यान्च्यात पहिला नम्बर काढुन त्यान्चा सत्कार केल्याचा उल्लेख नाही, करायला हवा होता ना?????? सत्कार??????

Reena
Tuesday, July 17, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थ्री चिअर्स टु ऑल मुलुंडकर्स
सारी, अरे मायबोली कर्स लिहायचे होते..समजुन घ्या..


Himscool
Tuesday, July 17, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या घरातल्याचा विश्वास बसत नाहीये की मि म्हशीवर बसले.>>>
काल कोणत्याही म्हशी संदर्भात माहिती आली नाही पेपरमध्ये म्हणुन विचारताहेत का असे...

Bhramar_vihar
Tuesday, July 17, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि ला आलेल्या मंडळींसाठी yahoo group वर हिशेब टाकला आहे. काही शंका असल्यास ववि संयोजकाच्या आयडीवर मेल करु शकता!

Limbutimbu
Tuesday, July 17, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> yahoo group वर हिशेब टाकला आहे
अरेच्च्या??? कोण?? कोण ते??? आयडी तरी कळुद्यात???? कोण विचारला होता??
आलेल्यान्पैकी विचारला होता का कुणी पन्चवीस रुपयान्चा हिशेब???? DDD

पण असुद्यात, मन्डळान नेहेमी तयारीतच असाव! :-)

बायदीवे, इथे हिशेब नकोच्चे (डबल च बरका ), पण एकुण किती जण जमले होते तो आकडा सन्योजकान्नी अधिकृत वविचा अधिकृत रिपोर्ट (वृत्तान्त) म्हणुन हिथ "फोडायला" हरकत नसावी, नाही का???
म्हन्जे त्यायोगे, वविबाबत "सन्योजकान्च्या" स्वतन्त्र कॉमेण्ट्स सगळ्यान्नाच वाचायला मिळतील
एक फॉर्मॅट बनवुन देवु का? :-)


Ruma
Tuesday, July 17, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववी वाचून मी छन enjoy केला.. पण सगळी मजा मी मिसलेच..

Atlya
Tuesday, July 17, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, रीना मस्तच लिहलाय वृतांत....

Yashwardhan
Tuesday, July 17, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यंदाच्या वर्षा-विहाराचा सविस्तर वृतांत
ठिकाण:- सगुणा बाग, नेरळ
दिनांक:- १५ जुलै २००७

२ जुलै रोजी वविची घोषणा झाल्यापासुन मी ववि ला जायचे ठरवले होते. नुक्ताच मी नविन सभासद झाल्यामुळे हे नक्कि काय असते ते बघायची उत्सुकता होती. आधीच्या वविचे वृत्तांत वाचुन थोडी फार कल्पना आली होती.

आता यंदाच्या वर्षाविहारचा वृत्तांत

दिनांक १५ जुलै
सकाळी ६.०० वाजता सावरकर भवन

ठरल्याप्रमाणे सकाळी ६.०० वाजता सावरकर भवन येथे पोहचलो. माझा मायबोलीवरील पहिलच वर्षाविहार असल्यामुळे लवकरच गेलो. पाठोपठ राजेश जाधव (राजा) याचे आगमन झाले. ऒळखत नसल्याने तो न थांबता निघुन गेला.(नंतर कळाले की तो चहा घेण्यासाठी गेला होता).दहा मिनिटांनी मयुरेश व राकु यांचे आगमन झाले. थोड्यावेळाने राजा सुध्धा परत आला. ६.१५ वाजता संकल्पचे(फ) दुचकी घेउन आगमन झाले. बालगंधर्वच्या आवारात दुचाकीला स्थानपन्न करुन तो आमच्यात सामिल झाला. भ्रमणध्वनीवरुन वाहनाची चौकशी करण्यात आली. वाहन वेळेवर न आल्याने सर्व काळजीत होते. नक्की तीच गाडी (क्रीम कलर) येईल ना ही चिंता होती. ठीक ६.३० वाजता सांगितलेल्या वाहनाचे आगमन झाले. वाहन दिसल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला व गाडीमधुन किमया उपहारगृह,कोथरुड या स्थळी इतर सभसदांना घेण्यास रवाना झालो.

सकाळी ७.०० वाजता किमया उपहारगृह

किमया उपहरगृहापाशी गेल्यावर आम्ही सर्वजण बाकी सभासदांची वाट बघत होतो. तेवढ्यात राम आलेले दिसले. पाठोपाठ केपी, मिलिंद, पुनम(सोबत नचिकेत), श्रद्धा, अरुण, मीनु यांचेही आगमन झाले. पण कृष्णाजी, हिमांशु व दिमडु यांचे आगमन बाकी होते. थोड्यावेळाने सर्वांचेच आगमन झाले. हिमांशु मायबोलीचे टी-शर्ट घेउन आला होता. वाहनामध्ये स्थानापन्न झाल्यावर संयोजकांनी (मयुरेश) सर्वांची शिरगणती घेतली व कोणी बाकी नाही याची खात्री करुन घेतली व वाहनाने इप्सितस्थळी जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

सकाळी ७.३० वाजता (गाडीमध्ये)

वाहन इप्सितस्थळी रवाना झाल्यावर श्रद्धाने सांस्कृतीक समिती सभासद म्हणुन सर्वांचे स्वागत हवाईसुंदरीप्रमाणे केले. त्यात बाकी सभसदांनी प्रश्न विचरुन तिची त्रेधा उडवुन दिली. स्वागत समारोह संपल्यावर वाहनामध्ये दोन गट करुन अंताक्षरीला सुरवात करण्यात आली. या अंताक्षरीचे पंच म्हणुन केपी यांन मान्यता देण्यात आली.वाहनाने वेग घेतल्यावर अंताक्षरीलाही जोर चढला. आवडतीच्या गाण्याला सर्वजण मनापासुन दाद देत होते. मंगेश त्याचा कॅमेरा घेऊन वाहनचालकाशेजारी जाउन बसला. मयुरेशने पण अंताक्षरी व वाहनातील सर्व सभासदांचे चलतचित्रण करण्यास व जमल्यास अंताक्षरीमध्ये भाग घेण्यास सुरवात केली.

सकाळी ८.३० वाजता

अंताक्षरीमध्ये जोरात गाणी म्हणल्यामुळे सर्वांना क्षुधाशांतीची गरज होती. त्यामुळे सर्वनुमते क्षुधाशांतीसाठी थांबण्याचे ठरले. वाहनचालकानेही गरज ओळखुन एका उपहारगृहासमोर वाहन थांबवण्याचे ठरविले. थांबताक्षणीच सगळे उपहारगृहत गेले. त्यात संयोजकांनी ही क्षुधशांती स्वखर्चाने करण्याचे फर्मान सोडले होते. उपहारगृहात सर्वानी चहा, बिस्कीटे आणि वेफर्स यांचा आस्वाद घेतला. तेवढ्यात राम यांना एक वर्तमानपत्र सापडले व त्यांनी ते वाचण्यासाठी मीनू कडे दिले. वर्तमानपत्र कुठल्यातरी दक्षिण भारतीय भाषेतील असल्याचे लक्षत आले. तरीपण मीनुने दिलेली जबाबदारी पुर्ण करण्यासाठी त्या वर्तमानपत्रात जॅकीचा फोटो असल्याचे जाहीर केले. सर्वांची क्षुधाशांती झाल्यावर सर्वजण क्षुधाशांतीचा खर्च देण्यासाठी स्वतःच्या पाकिटात हात घातला. पण संयोजकांनी ही क्षुधाशांती समितीकडुन असल्याचे जाहिर केले. ह्यातुन संयोजकांची मुस्सदेगिरी दिसुन आली. क्षुधाशांतीसाठी थांबलेले असतना मुंबईच्या सभासदांची भ्रमणध्वनीवरुन संयोजकांनी माहिती करुन घेतली व ते अर्ध्या वाटेत असल्याचे जाहीर केले.

*********क्रमशः *********

Kmayuresh2002
Tuesday, July 17, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यश्या,लेका निबंध चांगला लिहितोयस रे..:-) शाळेत मार खाल्ला होतास वाट्टं बाईंच्या हातचा निबंधावरून.. लब्बाड..
आणि हो मुस्सद्देगिरी नव्हे रे मुत्सद्देगिरी.. लिही पाहु शंभर वेळा:-)


सारी, अरे मायबोली कर्स लिहायचे होते..समजुन घ्या.. जल्ला कित्ती कित्ती म्हणुन समजुन घ्यायचे गो तुला.. नाही नाही.. अगदी हिरमोड केलास बघ आमचा

Upas
Tuesday, July 17, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>ववि वाचून मी छान enjoy केला..
रुमा, लोकं ववि miss करून विव्हळताहेत आणि तू enjoy? :-O ~D
जनता.. मस्त एकदम.. सही मजा केलीत एकंदर..

Pendhya
Wednesday, July 18, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी रिना, छान वृत्तांत आहेत.


Yogi050181
Wednesday, July 18, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जल्ला वृत्तांत सगळ्यांनि जबरी लिहिलेत.. मी थोडा वायट लिवतो..
आगाउ सुचना वृत्तांत सत्य घटनेवर आधारित आहे.. नि सगळी पात्रे खर्रिच आहेत.. यात क्रमश्: प्रकार नसल्याने कोणाला वाचताना डुलकी लागल्यास मी जबाबदार नाही..
:-)

शेवटी तो दिवस आला ज्यासाठी सगळे मुंबईकर सकाळचे ५.३० चे रिमांडर देत होते.. रविवार नि पहाटेला बस गाठायची म्हणजे मोठे आव्हानच.. काय करणार घड्याळात ४.३० दाखवणारे काटे कधीच बघितले नव्हते.. :-)
लाडकीने तर ५ वाजता फोनुन मी जागा आहे की नाही याची खातरजमा केली.. एशने सुक्ष्माला घेउन येत असल्याचे कळवले.. तोवर विरारहुन ट्रेनमधुन येणारा बाबल्या बोरिवली स्टे. ला पोचत होता.. ठरल्या वेळेप्रमाणे सगळे आले नि मी शेवटीच पोचलो नि ६ वाजता सुक्श्मा अम्हा चौकटीला घेउन चालु पडली.. पुढे विहारासाथी आतुरतेने वाट पहात असलेल्या भ्रमला सुक्श्माने pick up केले...

बस्स.. मग सुक्श्मा सुसाट पळाली.. काय करणार तिला पण प्राजक्ता ला भेटायचे होते..
:-)

जल्ला पेट रिकामे अस्ल्याने कुथे दुकान आहे का हे बघता बघता एरोळी कधी आले ते कललाच नाही.. . गाडीतुन उतरताच ला.बुन योगायोग येताना दिसला...मागोमाग गिरीविहार, स्वा, नील, आनंदमैत्री(फ्रेंच दाढिवाला आनंद) यांचे आगमन झाले.. निलने तात्काळ मायबोलीचा पोस्टर गाडिवर चिपकवला.. नि मी त्याने आणलेले भकरवडीचे पाकिट घेउन खाण्यास आरंभ केला.. काही वेळातच आनंदराव हलतडुलत ( widout sat nite effect !!!) येताना दिसला.. सोबतिला नाना चेंगट होता.. पण तब्येत बिघडल्याने तो जसा आला तसा गेला. बस्स.. आता एकच उरले घारुअण्णा.. फोनवरुन १० मिन्टातात येतो असे सांगत ते जास्ती नाही फक्त अर्धा पाउण तासात सहकुटुंब हार नारळ घेउन अवतरले.. अम्हाला वाटले नारळासाठी झाडावर तर नाही ना चढले... :-)

तिकडुन पुढे निघालो नि काही क्षणात चेतना नि थोड्या अंतराने रीना यांना पिक अप केले गेले.. त्याचवेळी सुक्श्माला हार चढवुन पुढ्यात नारळ फोडला गेला.. एशने पेढावाटप केले.. नि पुढील प्रवास चालु झाला.. पुढे वाट बघुन बघुन वैतागलेली कथा फेम नन्दिनी बेलापुरला जोईन्ड झाली.. नि भ्रमाने आप्ल्या लिस्टवर सम्पुर्णम म्हणुन काट मारली.. :-)नंदुने देखील लाडु(शादीका ??) वाटुन तोंड गोड केले..
मग as usual आमचे प्रामुख्याने आनंदचे गितपुराण चालु झाले.. सोबतीला घरुअण्णा वाजवायला बॉंगो घेउन आले होते.. त्यामुळे रंगतच वाढली.. पुढे चायपानासाठी एका टपरीवर सुक्श्मा थांबली.. नि घारुअण्णांचा चेहरा खुलला.. नंदुने आणलेल्या पराठासंगे सर्वांचे चहाप्राशन झाले.. नि परत प्रवास चालु झाला.. त्याचबरोबर आमचे पुन्हा विविध भरती प्रसारण चालु झाले.. आनंदने म्हटलेले हांजी” रॅप सॉंग तर लाजवाबच.. या उत्साहात घारुअण्णांची छोटीही मागे नव्हती.. तिनेही अगदी मनमोकळेपणाने हसत कविता म्हटल्या.. यात फक्त लाडकी नि स्वातीचा आवाज नव्हता.. लाडकीचा आवाज म्हणजी झुळुकच नि स्वातीला बागेत होणार्‍या कार्यक्रमात बहुढा गायचे असेल.. आयोजकांना ही बातमी कळली असावि नि म्हणुनच काय गायनाचा भाग बारगळा असावा.. हुश्श, जल्ला किती बरे झाले नाय..

अधुन मधुन आनंद नि नील प्रवासात येणार्‍या काही नको त्या ठिकाणांची माहिती देत होते.. उदा. वस्तीगृह (की वसंतीगृह..)
गाण्यांचे सर्व प्रकार झाले.. फक्त एकच राहिले होते ते म्हणजे कोळीगीत.. नि रीनाला फक्त तेच हवे होते.. शेवटी ति इच्छा मी पुर्ण केली.. spiderman spiderman म्हणुन दाखवले...
सर्वात शेवटी महिलामंडळापैकी रीनानेच पुढाकार घेउन तिचे fav. गाणे होटोंसे छु लु तो..” चालु केले.. नि सगळे सैरावैरा पळु पाहु लागले.. नशिबाने सुक्श्मा तोवर बागेत पोहोचली होती.. सुटलो बुवा.. पण टाळ्या वाजवुन तिला दाद दिली मात्र.. तरीही.. रिनाने indi idol साठी जरुर प्रयत्न करावा.. तुला वोट आऊट करण्यासाठी आमचे समस नक्किच असतिल..
बागेत शिरताच पहिले मोहक दृश्या सामोरे आले ते म्हणजे चहुबाजुंनी पने वेढलेले छोटुसे घर.. फारच उठुन दिसत होते..
शेवटी एकदाची सुक्स्मा पुण्याहुन आलेल्या प्राजक्ताला भेटली नि खर्‍या अर्थाने मोठा gtg सोहळा चालु झाला.. नाश्ता चालु असताना तेथिल एका बावडीने(विहिर) लक्ष वेधुन घेतले.. जल्ला काय खोल होती.. मी नि योग जाउन पाहतो तर काय.. चक्क १ फुट खोल नि पाण्याचा प्त्ताच नव्हता मगोमाग केपि देखील उत्सुकतेने आला.. नि तो पण दचकला..
:-) शेवटी त्याच विहीरीमुळे आम्ही चेतना व रीना यांना चांगलेच बनवले (हे तर सोप्प्यात सोप्पे.. ).. नि नंतर रिनाने नंदुला बकरी बनवले..
पुढे पेटपुजा झाली नी ओळखपरेडचा अनोखा खेळ सादर झाला.. पडदा है पडदा.. कार्यक्रामच्या सुत्रधरांचे या खेळाबद्दल अभिनंदन.. हा खेळ आटोपता आटोपता ओळखी झाल्या.. नि पुढे फिशिंग स्पॉटवर नेण्यात आले.. सुंदर तालावातील सुंदर मासे बघण्यात आले.. हातळण्यात आले.. पण मी, भ्रमा, आनंदमैत्री हेच मासे "पोटाळण्यात" उत्सुक होते तो भाग वेगळाच..
:-)

केपीने तर एक भला मोठा मासा कुशीत घेतला होता.. त्यावेळी तो डिसकव्हरी वाहिनीचे प्रतिनिधीत्व करतोय असे भासले…
पुढे म्हशींची सैर करणार्यांसाथी म्हैस वाट बघतच होती.. हिम्सकुल, पार्थ, आनंदमैत्री, राज्या, नंदु, रीना यांई म्हशी रायडींगचा आस्वाद लुटला.. नंदु, रीनाने केलेली सैर cowboy buffallogirl थाटातलीच होती.. खुप एन्जॉय केले त्यांनी.. बाकी आम्हा बैलांना त्या म्हशीने काहि इंप्रेस केले नाही.. ना त्या केपीला.. बिचार्‍या त्या म्हशीला केपीने चांगलेच निराश केले आता उचलुन घेईल, आता कुशीत घेईल म्हणुन वाट बघत होती..
:-)
पुढचे ठिकाण म्हण्जी १दम बेस्टच.. धबधबा… १५-२० मिनिटांच्या अंतरावर असलेला नि डोंगराळ प्रदेशात विसावलेआ धबधबा छानच.. त्या थिकाणापर्यंत जाइस्तोवर करावी लागलेली पायपीट, हिम्स्कुलला झालेला किरकोळ बांबु अपघात आणि वाटेत लागणारे दगड्स नि सरबत पार्‍टी करणारे काही ग्रुप्स ह्या गोष्टींना मागे सारुन फेसाळणार्या पाण्याचा एक स्पॉट शोधला.. नि सर्व मायबोलिकर पाण्यात न्हाउन निघाले.. यात छोटा शुरवीर पार्थ आघाडिवर होता.. त्या पाण्याचा वेग नि थंडावा यातुन बाहेर पडण्याची इच्छाच होत नव्हती.. पण बिजी शेडुलमुळे नाइलाज होता नि आम्ही परत फिरलो.. बागेत परत जाइस्तोवर जेवणाची उत्तम सोय झाली होती. जेवण आटपेपर्यंत तिकडच्याच काही मुलान्नी जोषपुर्ण पारंपारिक नृत्य सादर केले.. एव्हाना मायबोली टीशर्‍ट वाटप पुर्ण झाले होते.. मग मायबोलीकर पुन्हा एकत्रित जमले नि शब्द खेळ सुरु झाला.. यात आनंद,रीना, स्वाती या ग्रुपने बाजी मारली.. बक्षिस वाटप पेशव्यांकडुन (फ) केले जात होते.. यामागोमाग मायबोली क्विज़ स्पर्धा झाली.. त्यात Psg , भ्रमा यांनी बाजी मारली.. भ्रमाला तर बापुंची तोलामोलाची साथ लाभली.. :-)
पुढे आकर्शक वेषभुषेची स्पर्धा झाल्ली.. ज्यात पार्थ सर्वांमध्ये सरस ठरला.. नंतर द्रमशरॅदचा खेळ सुरु झाला.. त्यात घारुअण्णा, सौ. घरुअण्णा नि राम या ग्रुपने विजय मिळवला.. घारुअण्णांनी केलेला मुकाभिनय लक्षवेधीच.. यामध्ये राकु, राफा, मयुरेश ग्रुपनेही धमाल उडवुन दिली.. तशी ओळखण्यासाठी दिलेली गाणी फारच सोप्पी होती.. नि सर्वात छोटी स्पर्धक धनश्रीने केलेला मुकाभिनय मस्तच होता... या धमाल गोंधळात सांजवेळ झाली ते कळलेच नाही.. नि चायभजीच्या साक्शीने कार्यक्रमाची सांगता झाली नि सगळे गाठोडे बांधायला सुरवात...

याचवेळी योगायोग नि मी who dares to win चा भाग समजुन तिथे सैनिकी प्रशिक्षणासाथी ठेवलेल्या नेटवर चढाई सुरु केली.. प्रहार सिनेमाची आठवण झाली त्यावेळी.. पाठिंबा द्याय्ला निल होताच.. यात चपळ योगाची सरशी झाली.. पण सॉलिड अनुभव होता.. नंतर जोडीला मैत्री देखील आला..वरती अडकल्यावर त्याची तर चांगलीच तार.बळ उडाली... नंतर जाता जाता तलावाकाठी ग्रुपफोटो सेशन पार पडले.. नि सुक्श्मा प्राजक्ता परत आपुल्या गावी जाण्यास तयार झाल्या.. पुणेकरांना निरोप देउन आम्ही परतीच्या प्रवासावला निघालो.. सोबतिला कुरवाळतो भाउराया” होते..
पुन्हा मग मंगलदंगल गाणी सादर झाली.. त्याच जल्लोषात जल्ला म्या एक ड्यान्स पण केला.. “ढगाला लागली कळ्” या गान्यावर.. त्यात आनंद, योगायोगची साथ होतीच..
पुढे मग एका धाब्यावर चहासाठी सुक्श्माला थांबवले.. तेव्हा बॅगेत उरलेली, चुकुन राहिलेली बिस्कुटांची पाकिटे आणण्यात आली.. झेब्रीने (भ्रमाने रीनाचे केलेले नामकरण) तर नुसती नानकट म्हणुन कटकट लावली होती..
मग शेवटच्या टप्प्यातिल प्रवास चालु झाला.. गाडितले दिवे गुल झाले मात्र गाणी, बडबड, टोमणे चालुच होते.. मैत्रीने सादर केलेली चढता सुरज कवाली, योगाने म्हटलेले सलामे इश्क, नीलने गायलेले राधा बावरी ही गाणी मस्तच झाली.. उखाणे सोहळाही पार पडला.. यांत गोंधळात बाबल्या, राकुंनी मध्येच उतरुन लौकर निरोप घेतला.. मग नंदीने निरोप गेतला.. जाता म्हशीवर कथ्हा लिवण्याचा सल्ला तिला देण्य्यत आला. तरीही पिकनिक कल्लोळ चालुच होता.. यात पुढच्या gtg , गटारी नि बुधकरांचे बुधवार इती संकल्प केले गेले... नंतर रीनाचे खेडेगाव समिप आले तसे तीने घरी जेवणाचे आवतण दिले… स्पे. मे. कांद्यावरचे अंडे.. येवढ्यात स्वाती देखील पेंगायला लागली होती.. फर्नांडीजच्या स्वप्नात व्हती वाट्ट..
पुढे चेतनाने सर्वांना टाटा केले.. नि मग ऐरोळीला बरीच बस खाली झाली..तेव्हाच आनंदचे पाकिट या मस्तिमध्ये गहाळ झाल्याचे लक्षात आले.. नि जल्ला हिरमोड झाला.. मग गाडीत बरीच जागा नि शांतता अस्ल्याचे पाहुन भ्रमा, लाडकी नि मी डुलकी काढण्यात मग्न झालो. ऍश मात्र द्रायवरला बिलगुनच बसला होता.. काय करणार सुक्श्मा शेवटी त्याच्या घरापर्यंत जाणार होती ना.. :-)
घरी पोहोचताच थकवा नि hangaover जबरी असणार याची कल्पना आली.. :-)
पुढचा व वि यापेक्षा रंगतदार असेल.. नि उपस्थितांचा आकडा वाढलेला असेल अशी आशा करायला काहिच हरकत नाही..
मायबोलिकर्स रॉकर्स..










Kmayuresh2002
Wednesday, July 18, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्या,जल्ला काय वृत्तांत लिवलायस रे... खल्लास:-)

Krishnag
Wednesday, July 18, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...धबधब्याच्या दिशेने गाडी त्या छोट्याश्या रस्त्याने धावत होती १५ मिनिटांचे अन्तर संगितले होते तरी बराच वेळ
त्या अरुंद रस्त्यावरून गेलो तरी धबधब्याचा मागमूस दिसत नव्हता. एका गावात गाडी शिरली तेंव्हा तिथल्या रहिवाश्याने (बहुदा गावचा नेता असावा) हटकले आणि "डोंगर दर्‍यात फिरायला येता तर एवढ्या मोठ्या गाड्या घेऊन कुठे फिरता जरा पायी फिरा"
असा अनाहूत सल्ला ऐकवत थोडावेळ अडकवून धरले तरी संयोजक मयुरेश, मार्गदर्शक व गाडीचा सारथी ह्यांनी त्या नेत्याच्या सल्ल्याला
न जुमानता गाडी पुढे नेण्याचे ठरविले. थोडे पुढे गेल्यावर आता इथेच गाडी थांबवा आणि इथून पायीच चला असे मार्गदर्शकाने
सांगितल्यावर सारे उतरले. दुतर्फा हिरवळीच्या रस्त्यावरून मग पदभ्रमण करीत सारे धबधब्याच्या दिशेने प्रयाण करिते झाले.
धबधबा दृष्टीपथात आला पण तिकडे जावे वाटेना बरीच गर्दी त्या वहाणार्‍या ओढ्यात डुंबत बसली होती. त्यातील बरेच गट हे
अपेयपानाचा मोह अनावर झाल्याने धुंद झाले होते तेंव्हा बागेचे यजमान मोहात अडकाल असे काही मायबोलीकरांना का म्हणाले हे कळले!
राम आणि आमचे मार्गदर्शक ह्यांनी थोडे पुढे जाऊन धबधब्या कडील परिस्थिचा अंदाज घेतला आणि ह्या पुढील धबधब्याकडील प्रवासाचा मोह टाळून इथेच ओढ्यात जलक्रिडेचा आनंद लुटवा असे त्याने संगितले!

शेवटी त्या ओढ्यातच सर्वांनी बैठक मारली काहीजण घोट्याइतके, काही गुढघ्या इतके, काही नखशिखान्त तर काही केवळ बुटाइतके पाण्यात उतरले. काहींना इच्छा होउनही नाही उतरले तर काहे इच्छा नसुनही उतरले! चिल्ल्या पिल्ल्यांनी मात्र पाण्यात डुंबण्याचा मनमुराद
आनंद लुटला. धबब्याच्या आसपासचे वातावरण मोहात पाडण्या पेक्षा दूर करणारे जास्त झाले होते त्यामुळे मायबोलीकरांनी तिथे जास्त वेळ व्यतित न करता पुन्हा माघारी जाणे इष्ट समजून जलक्रिडेचा थोडासा अनुभव घेऊन माघारी परतते झाले!
धबधबा परिसरातील एकंदरीत वातावरणा मुळे यजमानांनी वर्णन केल्या प्रमाणे अपेक्षित मजा काही आली नाही
पुन्हा माघारी फिरुन सांस्कृतिक समितीने ठरविलेल्या कार्यक्रमांचा देखील आनंद लुटायचा होता त्यामुळे वेळीच पोहोचावे असे ठरवून परत फिरलो...


क्रमश:


Bhramar_vihar
Wednesday, July 18, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्या, जल्ला येवडा लिहायला कुठं शिकलास?? वाचता येत नाय पन जल्ला लिवतो जबरी!

Himscool
Wednesday, July 18, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जल्ला, लय भारी लिवलायस की योग्या.. पन तो म्हैशीवर बसणार मी नवतो काय तो राज्या होता...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators