Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Pune » वर्षा विहार २००७ » Archive through June 12, 2007 « Previous Next »

Limbutimbu
Friday, June 08, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> लिम्ब्या,लिम्बीला तू म्हैस म्हणाला असा अर्थ ध्वनित होतोय..
>>>>> हा अर्थ झकासामार्फत व्हाया त्याचं खटलं तुझ्या खटल्याकडे पोचवलं तुझं काही खरं नाय बुवा!
डोम्बल तुझ! काही होत नाही मला!
माझी आये मला म्हसोब्या म्हणायची!
लिम्बीला कळ्ळ तर (येड्या च्या ऐवजी)रेड्या म्हणेल! बास्स येवढच हुइल!
बायदीवे, तुझ्या कपाळावर ते टेन्गुळ कसल आल हे??? DDD

अवो ववि_सन्योजक, म्या दर बारीला एक सुचना करत अस्तो अन तुमी ती नजरेआड करता! नाव नोन्दणी सुरू झाली ना? मग कोण कोण नाव नोन्दली त्यान्ची यादी टाकत जावा की रोजच्या रोज!
म्हन्जे बीबी हलता रहातो अन करावयाच्या घोषणेची घोषणा करावी लागत नाही! कस?????
:-)DDD

Nalini
Friday, June 08, 2007 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हशीवर बसण्याचा सराव कसा करावा,
ईथे प्रत्यक्ष लालू प्रसाद यांच्या तोंडुन.

Zakasrao
Friday, June 08, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अर्थ झकासामार्फत व्हाया त्याचं खटलं तुझ्या खटल्याकडे पोचवलं तुझं काही खरं नाय बुवा>>
गिरी सहि आयडिया रे. आजच मी त्याच्या घराजवळुन जाणार आहे. जरा वाट सोडुन त्याच्या घरात जावुन येवु काय? मग उद्या लिम्बु कामाला आला नाहि कि ओळखायच कि........

Limbutimbu
Friday, June 08, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए नलिनी, ते खुप मोठ्ठ हे, लोड व्हायला वेळ घेतय! मला नाही बघता आल! :-(

पण एक उपाय हे सरावाचा!
घरातील लाकडी स्टुल घ्यायच, त्यावर एक तकीया (लोड) आदवा ठेवायचा
हां हांऽऽ गडबड करु नका लगेच बसायची
आता त्यावर दुसरा लोड तसाच आडवा ठेवायचा
हां, आता व्हा स्वार त्या वरच्या लोडावर! खालच्या लोडाला किन्वा स्टुलाला पाय न लावता पाय हवेत ताठ अधान्तरी धरुन बॅलन्स करणे म्हण्जे म्हशीवर बसणे होय! जरुर प्रयोग करुन पहा!
हव तर ते स्टुल फोमच्या गादीवर ठेवल तर अधिक हलता झुलता परिणाम मिळेल!

झकोबा, तू आज येतोहेस का??? ये, माझ्या भिन्तीच काम अपुर हे त्याला तुझी मदत होईल......!



Nalini
Friday, June 08, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू, तुला दिसेल तेव्हा ते नक्की बघ. लालूने अगदी action करून दाखवलेय, की म्हशीवर कसे बसायचे ते. विशेष म्हणजे ह्यात लालूला सहकुटूंब पहायला मिळेल.

Lalu
Friday, June 08, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आँ? ओह... ते होय . हे नलिनीचं पोस्ट वाचून घाबरलेच मी...:-)
टी शर्ट आहेत का... वा! वा!


Asami
Friday, June 08, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

. हे नलिनीचं पोस्ट वाचून घाबरलेच मी...>> श्या मी पण म्हैशीवर बसलेली लालू बघायला गेलो होतो उत्सुकतेने

Lalu
Friday, June 08, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>म्हैशीवर बसलेली लालू बघायला गेलो
धन्यवाद हो! :-) 'दोन म्हशी' न म्हटल्याबद्दल!

Vavi_sanyojak
Monday, June 11, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या उत्साही प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. ज्यांनी नावनोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर करावी!

Athak
Monday, June 11, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि २००७ ला खुप खुप शुभेच्छा , छान एंजॉय करा , म्हशी धुवा :-) पाण्यात शिरा पोहा डुंबा :-) , बखर लिहा . एखाद्या फांदीवर बसुन आम्ही मनाने तिकडेच असु :-)

Viveki
Monday, June 11, 2007 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वर्षाविहाराबद्दल विधायक सूचना.

गेली काही वर्षे माय्बोलीच्या या उपक्रमाने चाम्गलेच बाळसे धरले आहे. ते अधिकाधिक छान व्हावे म्हणुन काही सूचना. त्यातल्या पहिल्या काही सूचना कदाचित यावर्षी अमलात आणता येणार नाहीत पण पुढच्या वर्षी विचार व्हावा.

(१)गणेशोत्सव व दिवाळी अंकाप्रमाणे हाही उपक्रम मायबोलीचा अधिकृत उपक्रम म्हणून आयोजित करण्यात यावा.

(२)त्यासाठी संयोजनात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी आपली नावे admin किंवा moderators कडे द्यावी व त्यातून संयोजन मंडळ स्थापन व्हावे.

(३)यामुळे सर्व सभसदांना सहभागाची संधी मिळेल, व एकाच गटाचे लोक कंपूबाजी करत आहेत असे चित्र दिसणार नाही. तसेच तारखा, ठिकाण याबाबतही फक्त 'आपल्याच' लोकांची सोय बघण्याचे प्रकार होणार नाहीत. तसेच ठिकाण सगळ्यांना परवडेल असे वाजवी खर्चाचे, ट्रेन वा बसने यता येईल असे असल्यास छानच. मायबोली आणि कुटूंबीय यांना यायचे असल्याने सहज जाता येईल असे असावे, फार चालणे वगैरे नसावे, भिजायचे नसल्यास निवार्‍याची सोय असावी.

(४) वविला कोणाला प्रवेश असेल याचे निकष जाहीर करावेत, आणि ते प्रामाणिकपणे सर्वांसाठी समान पाळले जावेत, एखाद्या संयोजिकेशी 'वाकडे' आहे म्हणून कोणाला तरी प्रवेश बंद असे प्रकार होउ नयेत.

(५) पैसे भरण्याचे निकषही समान असावेत, म्हणजे कोणाला अगदी कडक डेडलाईन तर आपल्या गटातल्या लोकांना सवलती असे होउ नये. तसेच कोणी यायचे रद्द केल्यास पैसे परत मिळण्याचे नियमही स्पष्ट व सर्वांना समान असावेत.

(६)पारदर्शकता असावी, येणार्‍यांची यादी केवळ संयोजक व त्यांच्या गटापुरती असू नये ती इथे द्यावी, म्हणजे येऊ इच्छिणार्‍यांनाही कोण कोण भेटणार आहे ते कळेल.

(७) तपशीलवार जमाखर्च लगेच प्रसिद्ध केला जावा आणि काही रक्कम शिल्लक उरली असल्यास ती admin यांच्या सल्ल्याने ताबडतोब चाम्गल्या संस्थेस दिली जावी. त्यासाठी अनेक reminders व बरेच महिने लागू नयेत.

(८) वर्षविहाराच्या बीबीवर किंवा इतरत्र कोणी काय लिहावे, काय लिहू नये हे योग्यायोग्य ठरवण्याची जबाबदारी ववि संयोजक नव्हे तर moderator ची आहे हे लक्षात घेतले जावे, आणि उगाच एखाद्याला तू का इथे लिहितोस म्हणून दाटू नये.

(९) ववी संयोजनाच्या मिटींग, प्रत्यक्ष ववि आणी नंतरचे किमान संयोजकांकडुन लिहिले जाणारे वृत्तांत यात वविला अनुपस्थित मायबोलिकरांची नालस्ती अथवा टोमणे असे प्रकार नसावेत.

विध्यायक सूचना करायाच्या असल्याने हे सर्व कोणी कोणी कधी कधी केले या वादात अजिबात जायचे नाही तर हे सर्व होणार नाही हे पाहिले जावे अशी अपेक्षा आहे.

क्र. १ आणि २ या सूचना अमलात आणल्यास पुढचे सर्व प्रकार बर्‍याच प्रमाणात आटोक्यात आणता येतील असे वाटते.






Mrinmayee
Monday, June 11, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा गटबाजीस अजीबात विरोध नाही! जो गट माझ्या ओरलँडो ते मुंबई प्रवासाच्या तिकिटाचे पैसे उभे करु शकेल मी त्या गटाची पुरस्कर्ती! :-)
तिकिट न मिळाल्यामुळे जर मी उपस्थीत राहु शकले नाही तर माझ्या गैरहजेरीत माझ्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यास माझी पूर्ण परवानगी आहे. लोकांचा टाईपपास केल्याचं पुण्य पदरी पडेल!:-)


Balgya
Monday, June 11, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विवेकराव, फारच विनोदी लिहिता राव तुम्ही. actually तुम्ही कुठचे हो? अरबस्तानात असता का? तुमच्या profile मध्ये more about me या भागात बदलुन 'उंटावरुन शेळ्या हाकणे' असे का लिहित नाही तुम्ही?

तुमच्या पोस्टकडे बघुन असे वाटते कि तुम्ही गटबाजी विरिधात काही करत नसुन तीला खतपाणी घालायचेच काम करत आहात.

तुमच्याच ८ नंबरच्या मुद्याचा आधार घेउन ही पोस्ट टाकतो आहे.


Zakki
Monday, June 11, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व. वि. ला आल्यावर काय बोलावे, काय बोलू नये, कुणि कुणाशी केंव्हा बोलावे ते आधीच ठरवण्यात यावे. कार्यक्रम आखला असेल त्याप्रमाणेच करावे. जर खेळ खेळायचा कार्यक्रम असेल तर सर्वांनी खेळ खेळलाच पाहिजे. आराम करायच्या वेळा असतील तेंव्हाच आराम करावा. सर्वांनी डोळे मिटून आराम केलाच पाहिजे. आरामाच्या वेळी हालचाल करण्यास अथवा बोलण्यास बंदी आहे.

खायला काय पदार्थ आणायचे नि काय नाहीत हे आधीच ठरवले पाहिजे.

संयोजक होण्यासाठी उमेदवारी जाहीर करण्याच्या आधी डिपॉझिट भरले पाहिजे. कमी मते मिळाल्यास डिपॉझिट जप्त होईल.

ठरल्याप्रमाणे जे वागणार नाहीत त्यांना दंड करण्यात येईल, नि त्यांचे मायबोलीवर येणे बंद करण्यात येईल. ठरल्या वेळेपेक्षा उशीरा येणार्‍यांना अथवा ठरल्या वेळेच्या आधी किंवा नंतर जाण्यार्‍यांना पण हीच शिक्षा आहे.

ही नियमांची यादी अजून संपलेली नाही, यात केंव्हाहि बदल करायचे अधिकार संयोजकाच्या हातात.


Admin
Tuesday, June 12, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विवेकी,
तुमच्या सुचनांबद्दल धन्यवाद. त्यामागे तुमचा हेतु चांगला आहे, मायबोलीच्या नावाचा उपयोग करून काही व्यक्तिनी फायदा करून घेऊ नये असा असावा, असे वाटते आहे. त्यासाठी सुचवलेले उपाय मात्र प्रत्यक्ष व्यवहारात आणणे सोपे नाही. परंतु ते अंमलात आणले नाही तरी त्यातून चांगले ते साध्य होते आहे हे नक्की.

गेले काही वर्षे, वर्षाविहार यशस्वी होतो आहे कारण त्या त्या वर्षी संयोजकानी घेतलेले त्यामागचे कष्ट. कुठल्याही प्रकारे हा अधिकृत ववि आहे किंवा नाही याची घोषणा न करताही हे छान चालू आहे. दरवर्षी वेगळे संयोजक असुनही मायबोलीकर पुन्हा पुन्हा येतात.
कुठल्याही कार्यक्रमाचे संयोजन करताना संयोजकाना कुठे, कधी, केंव्हा, कसे याबाबत काही ठाम भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे प्रत्येकालाच जमेल तेंव्हा, तसे, तिथे, तितक्यात कार्यक्रम ठेवता येत नाही. त्या कार्यक्रमाला जायचे का नाही याचे स्वातंत्र्य प्रत्येक मायबोलीकराला आहे. संयोजक मनमानी करतील तर मायबोलीकर जाणे बंद करतील. फक्त अधिकृत कार्यक्रम आहे म्हणून वाटेल ते सहन करतील असे मुळीच नाही. याउलट कार्यक्रम चांगला झाला तर पुन्हा जातील. आणि गेले काही वर्षे तो यशस्वी होतो आहे यातच सगळे आले नाही का? इतकी चांगली परंपरा टिकवून ठेवण्याची जबाबदारी संयोजकांवर आहे आणि एखाद्या वर्षी जरी त्यांचे वागणे योग्य नसले तरी ही परंपरा बंद पडेल याची जाणीव त्यांना नक्कीच आहे.
संयोजन समिती उभी करणे आणि कार्यक्रम यशस्वी करणे हे कठीण काम आहे. त्यामुळे संयोजकानी कामात हातभार उचलणार्‍या लोकांना नेमले तर त्यात चुकले कुठे. त्यानी नुसत्या बघ्यांना घेतले आणि कार्यक्रम बंद पडला असे तर झाले नाही ना? उलट दरवर्षी आपण अजून चांगला ववी करायचा याचे वेध संयोजकाना लागतात आणि मायबोलीकराना आनंद मिळवून देतात यातच सगळे आले असे मला वाटते

Shyamli
Tuesday, June 12, 2007 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकिट न मिळाल्यामुळे जर मी उपस्थीत राहु शकले नाही तर माझ्या गैरहजेरीत माझ्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यास माझी पूर्ण परवानगी आहे. लोकांचा टाईपपास केल्याचं पुण्य पदरी पडेल!:-) >>>अनुमोदन ग मृ :-)

लगे रहो लोक्स हे नाहि करायच तर मग काय कारायच? कैच्या कैच...........!त्या शिवाय करणार काय मग?????????

jokes apart,
यातल काहीही होत नाही, अतीशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम असतो,सगळ्या सोयी व्यवस्थीत असतात,मुलही कंटाळत नाहीत.

गेल्यावर्शी मीही ववीला पहिल्यांदाच गेले, या सगळ्या मंड्ळींना पहिल्यांदाच भेटले,कंपुशाही वगैरे अजिबात जाणवली नाही . ववी तर अगदी छान झाला होता, आणि हाही होईल
तेंव्हा यंदा कोणी पहिल्यांदाच जाणार असलात तर अगदी बिनधास्त जा मी एकटा/टी आहे कसा जाउ वगैरे विचार मनात न आणता.आणि कुठलीही मैत्री टिकवण्यासाठी काय कराव लागतं हो? चार शब्द गोड बोललात तर कुणिही जवळ करेल कि तुम्हालाही . उगाच कंपुशाही कंपुशाही म्हणून भुई धोपटण्यात काहीही अर्थ नाहीये.



संयोजकांना शुभेच्छा :-)

असो, यंदा मी येउ शकणार नाहीये पण मनानी तीथेच असेन:-)
वविला मनापासून भरपुर शुभेच्छा :-)


Jayavi
Tuesday, June 12, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली.....क्या बात है!! एकदम पटॆश :-)
संयोजकांना माझ्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा :-)

Milya
Tuesday, June 12, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांस्कृतिक समितीला एक नम्र सुचना

ह्यावेळी म्हणींचे dumb charades असणार आहे का?

असतील तर खालील म्हणी / वाक्प्रचार नक्की ठेवा

१. लोका सांगे ब्रम्हज्ञान ....
२. अती शहाणा त्याचा ...
३. उंटावरुन शेळ्या हाकणे
४. विवेकानेच बुद्धीचा वापर
५. सोनारानेच कान टोचले ...


मनानी तीथेच असेन >>> श्यामले म्हणजे तुझाही व्रूतांत वाचायला मिळणार तर

Kandapohe
Tuesday, June 12, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझाही व्रूतांत वाचायला मिळणार >>>
मिल्या वृत्तांत vRuttAMta असे लिही.

Limbutimbu
Wednesday, June 13, 2007 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आधीच्या काही वर्षाविहार आणि जीटीजीचे वृत्तान्त वाचुन काढले! :-)
बरेचसे वृत्तान्त तुटक तुटक भासतात! (मॉड्स नी साफसफाई केलेली दिसते)
तसेच गेल्या दोन वर्षान्च्या वृत्तान्तात, सान्स्कृतिक कार्यक्रमातुन प्रत्यक्ष "वर्षाविहारास" किती वेळ मिळाला याचा उलगडा होत नाही!
कोणी त्या त्या दिवसान्चे वेळापत्रक सान्गु शकेल का???
:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators