Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 29, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » गणेशोत्सव » Archive through August 29, 2006 « Previous Next »

Deepstambh
Monday, August 28, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमीन.. सर्व बीबींवर उजव्या बाजुला गणेशोत्सव बीबीची लिंक देता येईल का??

Krishnag
Monday, August 28, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती बाप्पा मोरया||
मंगलमुर्ती मोरया||


Manishalimaye
Monday, August 28, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे देवाधिदेवा गजानना सगळ्यांना सुबुध्दी द्या.
सगळ्यांना सुखी ठेवा!
गणपती बाप्पा मोरया


Deemdu
Monday, August 28, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोदकवाल्या बप्पा तुझी किती किती नावे
तुझ्या बारा नावांचे स्त्रोत्र रोज गावे
पहिले नाव वक्रतुंड दुसरे एकदंत
कृष्णपिंगाक्ष तिसरे चौथे गजवक्र
लंबोदर पाचवे हे सहावे विकट
विघ्नराजेंद्र सातवे आठवे धुम्रवर्ण
नववे नाव भालचंद्र दहावे विनायक
गणपती अकरावे बारावे गजानन
अश्या नावांनी रे तुला नित्य आठवावे
तुझ्या बारा नावांचे स्त्रोत्र रोज गावे


Upas
Monday, August 28, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती बाप्पा मोरया!!
आज ऋषींची भाजी.. ऋषी पंचमी.. :-)


Asami
Monday, August 28, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमूर्ती मोरया ||


Dineshvs
Monday, August 28, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, ई भोजनाला येणार का ?
ऋषीपंचमीची भाजी, दशमी, दही आणि दाण्याची चटणी, असा बेत आहे.


rp

Savani
Monday, August 28, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, लालू, तुमच्याकडच्या गणपतींचे दर्शन घेतले बरं का! आणि हो, मोदक अप्रतीम झाले आहेत.

Savani
Monday, August 28, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! दिनेशदा, आलेच बघा मी. ती सीताफ़ळं मात्र मी घेणार हं.

Megha16
Monday, August 28, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च लालु
दोघीचे गणपती छान आहेत.
प्रसाद पन.
दिनेशदा अरे वा बाकी काही नाही मिळाल तरी चालेल, पण एक सिताफळ मला.
सावनी तुला एक मला एक चालेल ना.
बंगलोर ला असताना रोज सिताफळ खात होते इतकी की खाऊन कंटाळा आला होता. आणी आता २ वर्षानी सिताफळ पाहीले.


Seema_
Monday, August 28, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नटनाट्य कलाकुसरी| नाना छंद नृत्य करी|
टाळ मृदांग सरोवरी|उपांग हुंकारे||
स्थिरता नाही एक क्षण | चपळविशई अग्रगण |
साजीरी मुर्ती सुलक्षण | लावण्येखाणी||
रुणझुणा वाजती नुपुरे | वाकी भोभाटती गजरे|
घागरियासहित मनोहरे|पाऊले दोनी||
ईश्वरसभेस आली शोभा|
दिव्यावरांची फ़ाकली प्रभा|साहित्यविशई | अष्टनायका होती||
ऐसा सर्वांगे सुंदरु|
सकळ विद्यांचा आगरु|
त्यासी माझा नमस्कारु|साष्टांग भावे||
s

Deepanjali
Monday, August 28, 2006 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या तर्फ़े ebmm च्या गणेश पूजे साठी केलेला जेवणाचा प्रसाद


Manuswini
Tuesday, August 29, 2006 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली

एक curious प्रश्ण
तुम्ही ते चपाती वगैरे नैवेद्यात दाखवता का ग?

मी इथे लालुच्या नैवेद्यात पण बघितली म्हणुन विचारते.


आम्ही फक्त वरण,भात,एखादी उपवासाची भाजी, मोदक, शीरा,दही, भातावर एक धार शुद्ध तूप, तुळशीचे पान मुदेवर बस. कांदा,लसुण तर अजीबत नाही.


Deepanjali
Tuesday, August 29, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु ,
कान्दा लसूण नसतोच .
बाकी आमच्या घरी सर्व जेवण जे घरी करतो त्याचा नैवेद्य दाखवतात .
चटणी कोशिंबिर , पोळी किंवा पुरी , दोन भाज्या , साधं वरण भात तूप आणि पाच गोड पदार्थ .
यात तळलेला मोदक आणि करंजी must.


Lalu
Tuesday, August 29, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, मेघा धन्यवाद.
मनःस्विनी, आम्ही पण सगळ्या जेवणाचा नैवेद्य दाखवतो. स्वयंपाकात कान्दा लसूण नसतो. नैवेद्याच्या ताटात वेगळे मीठ वाढत नाहीत.

मोरया!! उद्या कोण आणणार आहे प्रसाद?


Kmayuresh2002
Tuesday, August 29, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय
श्री वरदमूर्तये नमो नमः


Asami
Tuesday, August 29, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया ||


Arch
Tuesday, August 29, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा, कोणी मोरयाचा अर्थ सांगणार का? इतर कुठे असेल तर तिथे पाहीन आणि ही post उडवून टाकेन.

Dineshvs
Tuesday, August 29, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नैवैद्यात मीठ का वाढत नाहीत, याचे मी वाचलेले कारण असे. विष्णुने वृंदाला म्हणजेच तुळशीला प्रत्येक जन्मात लग्न करायचे वचन दिले. त्यावेळी तिने विचारले, तुझ्या आयुष्यात माझे स्थान काय, तर तु माझ्या आयुष्यात मीठासारखी आहेस, असे सांगितले CBDG नैवैद्यात तुळशीचे पान असतेच, म्हणुन मीठ वेगळे वाढत नाहीत.
तुलसीविवाह नावाचा एक पौराणिक सिनेमा आला होता. त्यात जयश्री गडकर, रंधवा, अभि भट्टाचार्य वैगरे होते.


Manuswini
Tuesday, August 29, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर म्हणुनच आई मीठ वाढत नाही ताटात.
पण न चुकता तुळशीचे पान असते मुदेवर





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators