Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
स्वरचित आरत्या ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » स्वरचित आरत्या « Previous Next »

Prasad_shir
Monday, August 28, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे गजवदना

हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना

तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना

मूर्तरूप तू चैतन्याचे
धाम अकल्पित कैवल्याचे
श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि
होत रहावी तुझी प्रार्थना

आनंदाचे गांव सदोदित
तुझ्या कृपेने हृदयी निर्मित
आनंदाच्या गावकर्‍यांची
श्री गणराया तुला वंदना

- प्रसाद


Kshipra
Sunday, August 27, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिध्दी वल्लभा
सिध्दी वल्लभा
प्रारंभी नमितो देवा
आशिर्वच मजला द्यावा

अणुगर्भी करिसी वास
तृणदर्भी तुझी रेघ
दीनांचा तुचि नाथ

ठायी ठायी भगवंत
दिसे तोचि भाग्यवंत
तोचि खरा बुध्दीवंत

कर्माचा स्वामी मीच
स्थिर बुध्दी देई हीच
वळो माझी दृष्टी आत

माझे ठायी तुझा अंश
मोहमाया करिती दंश
तया वारी एकदंत

- क्षिप्रा



Peshawa
Monday, August 28, 2006 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


गंपा आल्ये गंपा आल्ये
आल्ये ले आल्ये गंपा आल्ये

उंदिल पायशी
तुंदिल पोत
मोदक सोंदेत
कानचे सुप
बघा बघा साले
दुलत आल्ये!

आल्ये ले आल्ये गंप्पत्ती आल्ये!

गेउन हातात माझी ही झांज!
गुलालात लंगून नाचनाल मी आज
दिच्यांग तिच्यांग गंप्पत्ती आल्ये!

आल्ये ले आल्ये गंप्पत्ती आल्ये!



Jayavi
Tuesday, August 29, 2006 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री गणेश वंदना

गजानना तुज वंदन करीतो
भरुनी अंजली सुमनांची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची

लडिवाळ हे रुप गोजिरे
प्रसन्न भासे सदा साजिरे
माता अंबा दृष्ट काढिते
सदैव अपुल्या पुत्राची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची

अपार लीला तुझ्या गणेशा
सवे रंगसी रिद्धि सिद्धिच्या
नाथ गणांचा तूच शोभतो
चिंता वाही जगताची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची

वरदविनायक, करुणागारा
सारी विघ्ने नेसी विलया
सिंदूरवदना, मयूरेश्वरा
करीसी दैना दु:खाची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची

पार्वतीनंदन, हे जगवंदन
तिन्ही लोकीचा त्राता भगवन
भवसागर हा तरण्या देवा
नाव हाक तू भक्तांची
आशिर्वच दे अम्हा मोरया
चरणी पार्थना ही अमुची

जयश्री



Rupali_county
Friday, September 01, 2006 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय गणराया श्री गणराया
मन्गल मूर्ति मोरया

अश्टविनायक मन्गलदायक
तु विघ्नहर्ता तु सुखकर्ता
मन्गल मूर्ति मोरया


Rupali_county
Friday, September 01, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेशा गणेशा गणेशा गणेशा
जय जय श्री गणेशा
जय जय श्री गणेशा

वक्रतुण्ड एकदन्त
कपिल गजकर्णक, गजकर्णक, गजकर्णक

गणेशा गणेशा गणेशा गणेशा
जय जय श्री गणेशा

लम्बोदर विकट
विघ्ननाशा धूम्रवर्णा, धूम्रवर्णा, धूम्रवर्णा

गणेशा गणेशा गणेशा गणेशा
जय जय श्री गणेशा

भालचन्द्रा विनायका
गजानना गणाधीप, गणाधीप, गणाधीप

गणेशा गणेशा गणेशा गणेशा
जय जय श्री गणेशा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators