Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
इंटर्नल एन्क्वायरी ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » इंटर्नल एन्क्वायरी « Previous Next »

Dineshvs
Friday, December 23, 2005 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑफ़िसमधे शिरायच्या आधी बागेत फ़ेरफ़टका मारायचा हा माझा नेहमीचा दिनक्रम. अपेक्षेप्रमाणे आज मोतिया गुलाबाची कळी ऊमलायला लागली होते. लॅबमधे डेव्हलप करत होते ते सोल्युशन आज स्प्रे करायला हवे होते. म्हणजे रंग खुलला असता आणि आकार वाढला असता. अशी अपेक्षा तरी होती माझी. तशीच लॅबमधे गेले. सॅंपल सोल्युशन घेऊन स्प्रे केले. झाडावरुन हात फ़िरवला. ” बेट्या यावेळी जरा यश दे रे ” म्हणुन विनंति केली.

ऑफ़िसमधे आल्या आल्या फणसेबाईना विचारले, काहि मेल वैगरे आहे का ? तर त्या नाहि म्हणाल्या. पुरंदर्‍याना काहि चेक सहिला आहेत का ते पण विचारायला सांगितले. ते जागेवर नव्हते. म्हणजे सध्या तरी ऑफ़िसमधे बसायचे काहि कारण नव्हते. कॉफ़ी घेऊन लॅबमधे जायचा विचार करत होते. कॉफ़ी मागितली.

हे ऑफ़िसचे काम माझ्या गळ्यातच पडले होते. ते कोटेशन्स बघणे, बिल्स अप्रुव्ह करणे, चेकवर सह्या करणे म्हणजे दडपणच वाटते मला. पुरंदर्‍यांवर विसंबुन सह्या करते खरं, पण हा माणुस कधी मोकळेपणी बोलतच नाही. विचारले प्रश्ण तर त्याची उत्तरं मिळणार. पण प्रश्णच काय विचारायचे ते नको का कळायला मला ?

त्यापेक्षा घरच्या बागेत प्रयोग करत होते ते काय वाईट होते. अगदी मनासारखा नदीकाठचा प्लॉट मिळाला होता. लेकीचे लग्न झाले आणि मला रिकामा वेळ खायला ऊठला. कधीकाळी अ स्टडी ऑफ़ ईफ़ेक्ट्स ऑफ़ सर्टन केमिकल्स ऑन द फ़्लॉवरिंग प्लॅंट्स, यावर मी थिसीस लिहिला होता, हे खरे तर विसरायलाच झाले होते. मनासारखी मोकळी जागा बघुन मला पुन्हा हुरुप आला. भरपुर झाडे लावली. केळी, पपया, अननस, सिताफ़ळं अशी बरेच. आणि गुलाब तर कुठुन कुठुन जमवले होते. सगळे प्रयोग परत करावेसे वाटत होते. पण त्यासाठी लॅब हवी होती. त्यावेळी हि रसिका फार्मास्युटिकल्स नुकतीच सुरु झाली होती. सहज लॅबची चौकशीला गेले तर तिथले एम. डी. क्षेमकल्याणी, सदाचे मित्रच निघाले. मग काय मला हवे तितके प्रयोग करता आले.

त्यांच्या कारभाराशी तसा माझा संबंध नव्हता. पण बराचवेळ तिथे बसत असल्याने लॅबमधल्या सगळ्यांशी मैत्री झाली. त्याना सल्ले देऊ लागले. पण ते तसे माझे फ़िल्डच नव्हते.

क्षेमकल्याणी साहेब, दोन तीन महिन्यानी येत असत, पण त्यानी स्वताहुन कधी माझ्या प्रयोगांची चौकशी केली नाही, पण मी सांगत असे ते मात्र मन लावुन ऐकत असत. आले कि चहाला आमच्याकडे जरुर येत, पण सदा घरी नसेल तर मात्र नम्र नकार देत असत. त्यांचा सज्जनपणा मला फ़ारच भावत असे.

एकदा मी घरच्या पपई केळ्यांसाठी काहि प्रयोग करत होते. क्षेमकल्याणी साहेब म्हणाले आधीच वाढलेल्या झाडांवर केलेले प्रयोग तितकेसे यशस्वी होणार नाहीत, टिश्यु कल्चर करुन रोपे करता आली तर हव्या त्या क्वालिटिज मिळतील. मी रिसर्च करत होते तेंव्हा हे तंत्र अगदी बाल्यावस्थेत होते, पण का कुणास ठाऊक, मी परत पुर्णपणे संशोधनात पडायचे ठरवले. पंचेचाळीशी नंतर ईतका हुरुप कुठुन आला कुणास ठाऊक. सदा पण आता त्याच्या संस्थेत बिझी झाला होता. खुपदा दौर्‍यावरच असे तो. घरात मी एकटी, रिकाम्या वेळाचे काय करायचे ते कळतच नव्हते.

मी नियमित लॅबमधे बसु लागल्यावर क्षेमकल्याणी साहेब म्हणाले आता स्टाफ़ म्हणुनच येत जा. खरे म्हणजे ईतके दिवस मला लॅब वापरु दिली त्याचे दडपण होतेच.

माझा नीटनेटकेपणा आणि पर्फ़ेक्ट डॉक्युमेंटेशन बघुन त्यानी हा निर्णय घेतला होता, बहुतेक. नियमित नोकरी अशी मी आयुष्यात कधी केली नव्हती. हौस म्हणुन काहि वर्षे लेक्चररशिप केली खरी, पण त्यालाहि आता बरिच वर्षे झाली. माझाच निर्णय होता तो.

मग सदाच कधी कधी माझा थिसीस काढुन बसायचा, म्हणायचा फ़ुकट जाऊ देऊ नकोस तुझे नॉलेज. मी म्हणायचे कुठे वाया घालवतेय रे. आठवड्यातुन दोन वेळा परसात पिकवलेली भाजी खातोय आपण.

पण आता मात्र पुर्ण वेळ ऑफ़िसला देत होते. आधी फ़क्त लॅबमधेच काम करत असे, मी डेवलप केलेल्या पपई आणि केळ्याचे रिझल्ट्स बघुन, क्षेमकल्याणी साहेब, फ़ार खुष झाले. ते म्हणाले वेगळे युनिट सुरु करु या, तुम्हाला सगळी जबाबदारी घ्यावी लागेल. पर्चेस पासुन मार्केटिंग पर्यंत. सगळी विश्वासु माणसे देतो. मी नाही म्हणायचा प्रश्णच नव्हता.

आज जवळ जवळ तीन वर्षे जबाबदारी पेलतेय हि, पण अजुनहि कागदावर सहि करायची म्हणजे बाचकायला होतं. प्रॉफ़िटबिलिटी वैगरे अजुनहि नीट कळत नाही. ते ईंटर्नल ऑडिट रिपोर्ट्स ऑफ़िस प्रोसिजर मॅन्युअल्स, काहि कळायचेच नाही मला. सगळे पुरंदर्‍यांकडे द्यायची मी.

आता तर ईतका व्याप वाढलाय कि लॅबमधे फ़ारच थोडा वेळ देता येतो. क्षेमकल्याणी साहेब पण वर्षातुन कधीतरी एकदाच येतात. आता तर लिमीटेड कंपनी झाली होती. मला आताश्या सगळे सोडुन द्यावेसे वाटत होते. पण साहेब म्हणायचे, आता तर कुठे सुरवात होतेय.

मॅडम, कॉफ़ी, फ़णसेबाईनी तंद्रीतुन जागे केले. कॉफ़ी तोंडाला लावतेय, तोच त्या म्हणाल्या, कि एक मेमो आहे म्हणुन.

कॉफ़ी पित पितच वाचला. क्षणभर मला अर्थच लागला नाही. नव्याने आलेल्या ईंटर्नल ऑडिटर कडुन आला होता तो. वाघेला नाव होते त्यांचे. जुजबी ओळख झाली होती. परत परत वाचला तेंव्हा कुठे अर्थ कळला.
डियर मॅडम, यु आर रेक्वेस्टेड टु अटेंड द ईंटर्नल एन्क्वायरी, ईन द मॅटर ऑफ़, अल्लेज्ड फ़्रॉड कमीटेड, ईन द ऑफ़िस.

सोबत पुरंदर्‍यांच्या नावे चार्जशीट होती. कुणा स्टार केमिकल्स ने पुरवलेली काहि केमिकल्स, बाजारभावापेक्षा जास्त किमतीला विकत घेण्यात आली होती. आणि त्या संबंधात एन्क्वायरी होती. त्या पर्चेस ऑर्डरवर तर माझ्याच सह्या दिसत होत्या. पण मला फ़ारसे काहि आठवत नव्हते. पुरंदरे असे कितीतरी कागद आणतात सहिसाठी.

मी त्याना बोलावले तर त्यांची एन्क्वायरी चालु असल्याचे कळले. फ़णसेबाईंकडे फ़ाईल्स मागितल्या तर त्या म्हणाल्या, सगळ्या फ़ाईल्स वाघेला साहेबांकडे आहेत. मला तर काहि सुचेनाच. सगळे जण माझ्याकडे संशयाने बघु लागलेत असे वाटायला लागले. मान वर सुद्धा करावीशी वाटत नव्हती. क्षेमकल्याणी साहेब पण जर्मनीला गेले होते.
खुप एकटेपणा जाणवला.

कसाबसा दिवस काढला, रात्री सदाच्या फ़ोनची खुप वाट बघितली. मी त्याला फ़ोन करायचा प्रश्णच नव्हता. त्याचे शिबीर कुठल्या खेडेगावात असेल, हे फ़क्त तोच जाणत असे.

लेकिला फ़ोन लावला, तर तिचे स्वताचेच रडगाणे. बाळ झोपत नाही. रात्रभर रडत राहतो, फ़ारच डिमांडिंग आहे आणि पारस डाराडुर झोपतो वैगरे वैगरे. तिला काहि सांगण्यात अर्थच नव्हता.

जेवायची ईच्छाच राहिली नव्हती. स्टार केमिकल्सचा विषय काहि डोक्यातुन जायला तयार नव्हता, नाव खुप ओळखीचे वाटत होते, आणि अचानक त्यांचा लोगो आणि तो लोगो असलेले मोहितचे कार्ड आठवले. आणि मोहितचा चेहरादेखील.

त्याची पहिली भेट अजुनहि आठवत होती. आधी रितसर अपॉईंटमेंट वैगरे घेऊन आला होता.

मे आय कमिन मॅम. अत्यंत आर्जवी सुरात त्याने विचारले होते. ओ येस, यु मे. मी वर न बघताच म्हणाले होते. आणि एक्दम एक मादक गंध दरवळला. फ़ुलांचे, केमिकल्सचे गंध माझ्या परिचयाचे होते. पण हा मात्र फ़ारच वेगळा होता. मान वर करुन बघितले आणि बघतच राहिले. भरपुर ऊंची, कमावलेले शरिर, गोरापान रंग, खट्याळ केस, मोरपिशी रंगाचा शर्ट आणि त्या शर्टांसारखे निळेशार डोळे. कदाचित मी जास्तच रोखुन बघितले असेन, निदान मला तरी वाटले तसे. पण त्याला अश्या नजरांची सवय असावी. मी एकदम भानावर आले. त्याला बसायला सांगुन मी कॉफ़ी मागवली.

तो स्टार केमिकल्सचा सेल्समन म्हणुन आला होता. प्रॉडक्ट ईन्फ़ो, कॅटलॉग्ज वैगरे दाखवत होता. मला फ़ारसे काहि कळत नव्हते, कारण मला त्याच्या चेहर्‍याची जणु मोहिनी पडली होती. आम्हा बायकाना सिक्स्थ सेन्स असतोच. त्यामुळे माझ्याकडे कुणी असे बघत बसले असते तर मला नक्कीच ऑकवर्ड वाटले असते. त्यालाहि ते कळत असावे. बट ईट सीम्ड दॅट हि वॉज एंजॉयिन्ग ईट.

मला त्याचा चेहरा खुप ओळखीचा वाटत होता. पण डोळे मात्र अनोळखी वाटत होते. मी त्याच विचारात होते, तेवढ्यात तो म्हणाला, सो, मॅम आर यु कन्फ़र्मिंग द ऑर्डर ? . मी एकदम भानावर आले. मी म्हणाले ते सगळे तुम्ही पुरंदर्‍यांशी बोला.

सगळे बोलणे झाले होते, तरीपण त्याने तिथुन जावे असे मला वाटत नव्हते. पंचेचाळीशीची मी आणि तो तिशीहि न गाठलेला तरुण. पण त्याच्याबद्दल असे काय आकर्षण मला वाटत होते, तेच मला नीट कळत नव्हते.
त्याने आणखी थोडा वेळ थांबावे म्हणुन मी फ़णसेबाईना परत कॉफ़ी मागवायला सांगितले. त्यांच्या चेहर्‍यावरची नाराजी मला सहज वाचता आली. मी म्हणाले, तेवढी कॉफ़ी सांगा आणि निघालात तरी चालेल. त्यानी केबिनचे दार जरा जोरातच ओढले असे मला वाटले. मोहितनेहि वळुन बघितले.

मग तोच म्हणाला, मॅडम तुम्ही जयहिंद कॉलेजमधे कधी केमिष्ट्री शिकवत होता का ? , मी होकार दिल्यावर तो म्हणाला, मी आठवतोय का तुम्हाला ? लॅबमधे दुसर्‍या टिमची फ़ाईंडिन्ग्ज कॉपी केली म्हणुन मला एकदा चांगलेच फ़ैलावर घेतले होते तुम्ही.

मी म्हणाले, हो रे, तरिच चेहरा ओळखीचा वाटतोय. पण नाव आठवत नाही. आणि डोळे पण आठवत नाहीत. फ़ार.
तो एकदम हसला, म्हणाला कसे आठवतील. तेंव्हा जाड चष्मा घालत होतो मी, आता लेन्स वापरतो. आणि काडि पेहलवान होतो तेंव्हा, आता रेग्युलर जिममधे जाऊन वर्क आऊट करतो.

ईथे कुठे ऊतरला आहेस, त्याने गावातल्या महागड्या हॉटेलचे नाव घेतले. माझी शंका ओळखुन तो म्हणाला, सेल करतोय तो कंपनीचा एवढा. मला हव्या त्याच हॉटेलवर राहतो मी नेहमी. काहिहि विकायला सांगा मला. जोगिणीला कॉंट्रासेप्टिव्ह्ज विकु शकतो मी. आणि विकलीत, सुद्धा. मला हसु आवरले नाही.

मी म्हणाले, तुमची पिढी स्वताचेच मार्केटिंग करु शकते. त्याला ते कितपत कळले कुणास ठाऊक.

मग एकदम म्हणाला मॅडम, आज माझ्याबरोबर डिनर घेणार का ? , मी म्हणाले आज नको. मिस्टर सदानंद, आज घरी नाहीत.

तर तो म्हणाला मॅडम आज तुम्ही एकट्या मीहि एकटा. एकमेकाना कंपनी देऊ. असं करा, आता सात वाजलेत, मी तुम्हाला बरोबर आठ वाजता न्यायला येतो.

का कुणास ठाऊक, मला नकार देणे फ़ार अवघड वाटले. तरी मी म्हणालेच, कश्याला ऊगीच त्रास घेतोस. खरे म्हणजे मीच तुला घरी बोलवायला हवेय. पण आज बाईंची रजा आहे. मी माझ्यापुरती खिचडी करुन जेवणार होते.

ओ मॅडम खरे सांगु तुम्ही त्याच असाव्यात कि नाही याची शंका होती मला. आज ईतक्या वर्षानंतरहि तुमच्यात काहिहि बदल झालेला नाही. त्यावेळी आम्ही सगळे तुमच्या प्रेमात पडलो होतो. त्यावेळी तुमच्याशी बोलायचे धाडस केले नसते, पण आज मात्र तुम्हाला यावेच लागेल.

टिकाय, आता एवढा आग्रहच करतो आहेस तर येते, पण तु न्यायला वैगरे नको येऊस. मी येते गाडी घेऊन. पण मला साडेनऊ दहाच्या आत घरी यायला हवेय रे.
मी म्हणाले.

सातच्या आत घरात असा नियम आहे कि काय ? त्याने चेष्टेच्या सुरात विचारले. मी म्हणाले जवळ जवळ तुझ्या वयाची लेक आहे मला, तिचा फ़ोन यायचा आहे साडेदहाला अमेरिकेहुन.

ठिकाय आपण पूलसाईड कॅफ़े मधे बसु. मी खालीच वाट बघीन, टेबल बुक करुन ठेवीन. तुम्ही नक्की या. त्याने हसुन निरोप घेतला.

घरी आल्यावर जवळ जवळ मी तरंगतच होते. सदाने मला कधीहि काहि कमी पडु दिले नव्हते, पण आज माझे मन माझ्या ताब्यात नव्हते. जरा लवकरच तयार झाले मी. अभिसारिकेसारखी. स्वताचेच हसु येत होते मला. एक मन बजावत होते, स्टुडंट आहे तो तुझा.

मी पोहोचले तर तिथल्या अटेन्डंटने मला अदबीने टेबल दाखवले. मीच आधी पोहोचले होते. अटेन्डंटने विचारले काहि ड्रिंक्स वैगरे घेणार का, मी म्हणाले माझा स्टुडंट येतोय.

स्विमिंग पुल जवळच होता. मंद निळ्या प्रकाशात काहि जण पोहत होते. वरच्या डाईव्हबोर्डवर एक कमनीय आकृति दिसत होती. ( मी मुद्दामच चष्मा लावला नव्हता. त्याच्याकडे लेन्सची चौकशी करायची होती ना. ) मी निरखुन बघत होते. आणि त्याने अगदी डौलदारपणे डाईव्ह मारली. तिथल्या एकदोन जणानी टाळ्या वाजवल्या. हळु हळु तो माझ्या दिशेने पोहत येऊ लागला. ओ तो मोहितच होता. अंग पुसुन तसाच स्विमिंग कॉश्च्युममधे तो माझ्या समोर येऊन बसला.

मी म्हणाले, छान डाईव्ह मारतोस रे. तो म्हणाला आधी घाबरायचो, मग जिद्दिने शिकलो. तुम्हाला शिकवु का ? मी म्हणाले हो, म्हातारपणी तेवढेच करायचे बाकि राहिलेय आता. तो म्हणला, तुम्हाला कोण म्हणेल म्हातारी. आज आजुबाजुच्या अनेक नजरा तुमच्यावर खिळलेल्या आहेत. या निळ्या सिल्कसाडीत तुम्ही आजुबाजुच्या पोरीना कॉम्लेक्स देताय.

मी म्हणाले हो ना, हा मदनाचा पुतळा या थेरडीवर कसा भाळला हा विचार करत असतील.
तुझे पोहुन झाले असेल तर ड्रेसप करुन ये जा. आणि कायरे लेन्स घालुन पोहता येते ? तो म्हणाला, लेन्स इन्प्लांट केलीत. कुणाला कळणार पण नाहीत, बघा तुम्हीच. त्याने झुकुन मला डोळे मोठे करुन दाखवले. मी पण नकळत त्याच्या गालावर हात ठेवुन बघुन घेतले.

तो पाच दहा मिनिटात कपडे करुन आला. केस तसेच ओले होते. मॅडम तुमचा ब्रॅंड कुठला ? मला काहि कळलेच नाही. माझ्या गोंधळलेल्या चेहर्‍याकडे बघुन तो म्हणाला, बीयर घेणार ना ? मी म्हणाले गप रे, मी घेत नाही हार्ड ड्रिंक्स, तर तो म्हणाला बियर म्हणजे बायकांचे पेय मानतात आजकाल. मी म्हणाले तुला हवी तर घे. मी आपले लिंबु सरबत घेईन.

तो बर्‍याच गमती जमती सांगत होता. केलेल्या डिल्स बद्दल, मैत्रिणींबद्दल स्वताच्या ईमिग्रेशनबद्दल मी पण खुप हसत होते. त्याचे बोलणे ऐकत रहावेसे वाटत होते. काय ऑर्डर केले आणि काय खाल्ले ते कळलेच नाही. घड्याळात बघितले तर साडेदहा वाजले होते. मी चटकन निघालेच.

घराचे दार ऊघडुन आत आले तर, फ़ोन वाजतच होता. लेकीचा असेल म्हणुन मी धावत जाऊन घेतला. सदाचा होता तो, कुठे होतीस तु ? किती वेळ ट्राय करतोय मी. गेले होते मित्राबरोबर डिनरला मी पटकन बोलुन गेले. त्याने तो दुखावल्याचे मला फ़ोनवरहि कळले. बिचार्‍याने केवळ काळजीपोटी विचारले होते. तोच सॉरी म्हणाला आणि मला रडुच फ़ूटले. काहि क्षण तसेच गेले, मग तो हळुच म्हणाला रागावलीस का ? मी म्हणाले नाही रे. आणि मोहित ऑफ़िसमधे आल्यापासुन डिनरपर्यंत सगळे सांगुन टाकले. खुप मोकळे वाटले मला. तो फ़क्त एवढेच म्हणाला, एकमेकांच्या मनातले कळायला, आपल्याला बोलुन दाखवायची गरज पडते का कधी ? लवकर परत ये रे एवढे बोलुन मी फ़ोन ठेवला होता.

आज हे सगळे आठवले, त्यानंतर मोहितची भेट झाली नव्हती. आज अचानक हा मेमो हातात येऊन पडला होता. सदा पण नेमका दुर होता. तळमळतच रात्र काढली.

सकाळी ऑफ़िसमधे जायचा धीरच होत नव्हता. आणि बोलावणे धाडल्यासारखा सदाचा फ़ोन आला. मी म्हणाले अरे नेहमीसारखा रात्री का नाहि केलास फ़ोन, खुप वाट बघितली. तो म्हणाला रात्री ज्या गावात होतो तिथे एस टी डी बुथच नव्हते. म्हणुन आत्ता केला. तु कशी आहेस, त्याने विचारले. मी मजेत, कधी येतो आहेस ? मी विचारले. काहि प्रॉबलेम आहे का ? माझ्या आवाजावरुन त्याने ओळखलेच. नाही रे नेहमीचच. मी सावरायचा प्रयत्न केलाय.
नाही, रात्रभर झोपलेली दिसत नाहीस तु. हवं तर आज रजा घे. मी येतोच परवा नाहितर तेरवा. त्याने सुचवुन बघितले.
आज जावेच लागणार रे, एक छोटा प्रॉबलेम आहे. एका सप्लायरचा काहितरी प्रॉबलेम आहे. मला नीटसे माहित नाही. काहितरी ईंटर्नल एन्क्वायरी व्हायची आहे. मला काहि समजत नाहिये. मे सांगायचा प्रयत्न केला.

तुला चार्जशीट दिलीय का ? त्याने विचारले. मी म्हणाले नाही, आमच्याकडे पुरंदरे म्हणुन आहेत, त्यांच्या नावे आहे. पण मला आज एन्क्वायरीला बोलावले आहे. मी सांगितले.

मग तु कश्याला घाबरते आहेस. जे विचारतील त्याना खरीखरी उत्तरे दे. अश्या गोष्टी रुटिन असतात. काहि विशेष नसते त्यात. त्याने आपल्यापरिने धीर दिला.

तु आत्ता नाहि का रे येऊ शकणार, मी विचारुन बघितले. तो म्हणाला शक्य असते तर नसतो का आलो. प्रवासालाच पंधरा सोळा तास लागतील. परवा येतोच. त्याने सांगितले.

नाहि म्हंटलं तरी थोडा धीर आला. आपले काहि चुकलेले नाही, मग कश्याला घाबरायचे असा विचार करुन मी, ऑफ़िसला गेले.

बागेत फ़ेरफ़टका मारावासा वाटतच नव्हता. तरिपण रोजच्या सवयीने गेलेच. मोतिया गुलाब चांगलाच तरारला होता. पिवळ्या गुलाबी रंगांची सरमिसळ आणि त्यावर थोडीशी निळसर छटा. स्प्रेने काम केले होते तर.

फ़ार वेळ ईथे घालवता येणार नव्हता. टेबलपाशी गेले. आज कागदपत्रच नव्हती बघायला. मग कॉन्फ़रन्स रुममधे गेले.

श्री. वाघेला, त्यांचा असिस्टंट. बसलेले होते. समोर डिक्टेशन पॅड घेऊन फ़णसेबाई बसल्या होत्या. अचानक माझ्या मनावर दडपण आले. नेमकी कोण चौकशी करतय ? कश्याची चौकशी करतय तेच कळत नव्हते ? उत्तरे तरी कोण देत होते कुणास ठाऊक.

मॅडम, आपल्याला चारजशीटची कॉपी मिळाली, असेलच. आमच्या चौकशीत श्री. पुरंदरे यांच्याविरुद्ध काहि पुरावे मिळाले आहेत. त्यांची चौकशी चालु आहेच. पण तुमच्याकडुनहि काहि माहिती मिळावी, या हेतुने आपल्याला बोलावण्यात आले आहे. आपण आपल्याला माहित असेल ती सर्व माहिती द्यावी, अशी अपेक्षा आहे. आपले कामकाज मराठी व ईंग्लीश मधुन चालेल. आपले म्हणणे नोंदवले जाईल. ते टाईप करुन त्यावर आपली सहि घेतली जाईल. त्यावेळी आपल्याला काहि चुक्क आढळल्यास त्या दुरुस्त करण्यात येतील. आपल्याला अर्थातच त्याची कॉपी देण्यात येईल. काहि शंका ?

नाही काहि नाही, मी सहकार्य करेनच.

” चौकशी तर मीहि करणार आहे तुझी. मलाहि खरी खरी उत्तरे द्यावी लागतील. अर्थात तुझी उत्तरे खरी का खोटी ते मला आपसुक कळणारच आहे. मग आहेस ना तयार ”

” आज अशी अंगावर का येतेस. तुला माहित आहे. माझे काहिच चुकले नाही. विचार कि काय विचारायचेय ते. ”

तर मॅडम. तुम्ही कधीपासुन ईथे काम करता आहात ? श्री पुरंदरे याना कधीपासुन ओळखता ?

मी साधारण पाच वर्षांपासुन येथेय ईथे. पण आधी ईथे काम करत नव्हते. फ़क्त माझ्या वैयक्तिक कामासाठी लॅब वापरत होते. क्षेमकल्याणी साहेबानी परवानगी दिली होती.

” म्हातारी झालीस गं. नीट तारिख वार आठवत नाही कि काय तुला ? नेमकी पाच वर्षे, दोन महिने आणि एकोणीस दिवस झालेत. काटेकोर फ़ाईंडिन्ग्ज नोंदवणारी ना तु. ”

पुढे मग माझे काम बघुन मला क्षेमकल्याणी साहेबानी हि पोस्ट ऑफ़र केली. मला तसा ऑफ़िसच्या कामाचा काहि अनुभव नव्हता. खरे म्ह्णजे मी तयारच नव्हते. मग साहेब म्हणाले. अनुभवी स्टाफ़ देतो. संभाळुन घेतील सगळे.

” हे का सांगत नाहीस कि तुझा अभिमान ऊफ़ाळुन आला होता. आपले नॉलेज वाया जातेय. काहितरी विधायक वैगरे. शिवाय पैसाहि हवाच होता ना तुला स्वताचा. हवा तसा खर्च करायला. ”

मॅडम पुरंदर्‍याना कधीपासुन ओळखता ?

मी तशी लॅबमधे असल्यापासुन जुजबी ओळखत होती. पण प्रत्यक्ष संबंध कधी आला नव्हता. पण मी ईथे जॉईन झाल्यापासुन त्यांच्याबरोबर काम करत होते.

” आता तुला आठवत नाहीय कि सांगायचे नाही ? तु ईथे कोणीहि नसताना, तुला काहि लॅब इन्स्ट्रुमेंट्स हवी होती. तु त्याना सांगितले होतेस. त्यानी ती ऑर्डर दिली नव्हती. मग तु क्षेमकल्याणी साहेबांकडे तक्रार केली होतीस. विसरलीस कि काय ”

” तक्रार कुठे, फ़क्त सांगितले होते त्याना. काय चुकले त्यात. ”

त्यांच्या वर्तणुकीबद्दल काय सांगता येईल तुम्हाला ?



नाहि तसे आमचे फ़रसे बोलणे नसायचे. काहि कागदपत्रांवर, चेकवर सहि घेण्यापुरते ते माझ्याकडे येत असत. मला काहि शंका आली तर मी त्याना विचारत अहे. त्याचे नेमके उत्तर ते देत असत.

” अगं पण तुझे त्यांच्या उत्तराने समाधान होत असे का ? , खरे सांग कितीवेळा ति तो कागद वाचुन बघितला होतास ? चटकन त्यांनी आणलेल्या कागदावर सह्या करुन तो मोकळी होत होतीस. नाहि का ?.”

” मला नाहि सहन व्हायचा तो माणुस. त्याचे ते चष्म्यावरुन रोखुन बघणे टोचायचे मला. आणि तो गुटख्याचा वास, नाहि सहन व्हायचा मला. ”

” ओ. म्हणजे ते तुझा दुस्वास करत होते तर. केवळ तु एक बाई आहेस म्हणुन तुला थेट हि पोझिशन मिळाली, असे ते म्हणतात. हे तुझ्या कानावर आले होते न ? “

आता सांगा कि सप्लायरकडुन येणारी कोटेशन्स, त्याना पाठवायच्या ऑर्डर्स, वैगरे कोण बघत असे ?

सगळे तेच बघत असत. सप्लायरांशी प्राथमिक बोलणी तेच करत असत. लॅबचे रिपोर्ट्स वैगरे असतील तर मी बगह्त असे.

पण या सगळ्यांवर तुम्ही सह्या तर करत होतात ना ?

हो सह्या माझ्या असायच्या, कारण क्षेमकल्याणीसाहेबाना ईथे यायला फ़ारसा वेळ मिळत नसे हल्ली. त्यांच्या सहिसाठी कुठले काम अडु नये, म्हणुन त्यानी मला सह्या करायच्या पॉवर्स दिल्या होत्या.

” तुला काय वाटतय. हा खुलासा पुरेसा आहे. तु म्हणजे काय रबरी शिक्का आहेस कि काय ? “

शिवाय ते तिथे आले कि मी त्याना प्रत्येक कागद डोळ्याखालुन घाला असे सांगते. एखादी सुचना केली तर जरुर लक्षात ठेवते मी.

एखादी ऑर्डर देताना, आपल्या ऑफ़िसची जी प्रोसिजर आहे, ती प्रत्येकवेळी ते फ़ॉलो करत असत का ?

हो म्हणजे, ते करत होतेच. प्रत्येकवेळी ते मला आलेली कोटेशन्स, त्यानी कोट केलेले रेट्स, असे टेबल दाखवत असत. मग जर एखाद्यावेळी सर्वात कमी कोटेशन दिलेल्या पार्टीला ऑर्डर द्यायची नसेल, तर त्याची करणे लिहुन ठेवत असत ते. ती मी नजरेखालुन घालत असे. त्यावरपण माझी सहि असायची. म्हणजे तो रिपोर्ट ते तयार करत असत. आधी त्यांची सहि असे, मग मी करत असे.

” म्हणजे रबरी शिक्कच ना. आहे ना त्याची सहि, मग झाका डोळे आणि करा सहि. वा छान. वाचत होतीस का प्रत्येकवेळी काय लिहिलय ते ? ”

” मला माझी लॅबची कामे होतीच कि. प्रत्येकवेळी कुठे सगळे चेक करणार होते मी ”?

मग, आता सांगा स्टार केमिकल्स ला दिलेली ऑर्डर, कशी देण्यात आली होती ?

कशी म्हणजे ?

म्हणजे सप्लायरशी प्राथमिक बोलणी कुणी केली होती ?

कुणी म्हणजे. पुरंदर्‍यानीच केली होती. फ़क्त त्यांचा सेल्समन माझ्या स्टुडंट असल्याने, तो मला भेटला होता ईतकेच. त्यावेळी त्यानी त्याच्या येण्याचे प्रयोजन सांगितले, मग मी त्याला पुरंदर्‍याना भेटायला सांगितले.

” तुला आधी माहित होते, तो तुझा स्टुडंट आहे ते ? का नंतर ओळख पटली ? तु ओळखलेच नव्हतेस त्याला. त्यानीच तुला विचारले होते ”

” पण तरिहि तो माझा स्टुडंट होता, हे सत्य तर बदलत नाही ना. ”

पुरंदर्‍यानी आमच्यासमोर असे सांगितले कि, तुम्ही त्या व्यक्तीला रात्री त्याच्या हॉटेलवर भेटायला गेला होतात. हे खरे आहे का ?

मी मगाशी सांगितलेच, कि तो माझा स्टुडंट होता म्हणुन. संध्याकाळ झालीच होती. मीच त्याला घरी जेवायला बोलावले होते. पण त्यानेच बाहेर जेऊ असे सुचवले, आणि आम्ही संध्याकाळी एकत्र भेटलो.

” स्टुडंट स्टुडंट म्हणुन काय घोष लावला आहेस ? भेटायला गेली होतीस तेंव्हा हा भाव होता का तुझ्या मनात ? सरळ सांगत का नाहीस, कि तुला त्याच्या सौंदर्याची भुरळ पडली म्हणुन. त्याने केलेल्या तुझ्या स्तुतिनी भारावुनच गेली होतीस तु. सदा बिचारा साधा भोळा, डिनरनंतर आणखी काहि ऑफ़र केली असती तर ”

” आणखी काय ? दहाच्या आत परत घरी आले होते मी. ”

” मग दहाच्या आत काहि करता येत नाहि का ? तो स्विमिंग कॉश्च्युममधे आणि तुझ्या हातात त्याचा चेहरा. डोळ्यात डोळे घालुन बघणे. काय अर्थ आहे या सगळ्यांचा. ”

” आता शर्ट पॅंट घालुन पोहतात का ? . आणि फ़क्त त्याचे इन्प्लांट केलेले लेन्स बघत होते मी. ती डोळ्यातच घालतात ना ? आणि मी चष्मा घालायला विसरले होते. ”

” विसरली होतीस ? एरवी कधी नाहीस विसरत ती. चष्मा तुझ्या पर्समधेच असतो. त्यादिवशीहि होता. फ़क्त आणखी तरुण दिसावे म्हणुन तु मुद्दाम घातला नव्हतास. त्या आधी स्वतः ड्राईव्ह करत गेली होतीस ना ? चष्मा न घालता गाडी चालवता येते तुला ?”

पण तुम्ही बराच वेळ एकत्र होता ना त्या हॉटेलमधे.

हे पुरंदर्‍यानी सांगितले का ? . हो आम्ही बराच वेळ बोलत होतो. पण त्यात ऑफ़िससंबंधी काहिच नव्हते. आमच्या अश्याच जनरल गप्पा चालल्या होत्या. आणि आम्ही पुलसाईड ओपन रेस्तॉरंटमधे अगदी मोकळ्यावर बसलो होतो. त्या आधी त्यानी पुरंदर्‍याबरोबर बियर घेतली होती. पुरंदर्‍यानीच मागितली होती. ऑफ़िसमधुन दोघे सोबतच गेले होते. त्यानेच सांगितले मला.

” जनरल गप्पा ! त्यात त्याने तसले जोक किती सांगितले तुला ? . एकदोनदा तर तुला आजुबाजुला बघुन, कोणी ऐकत तर नाहि ना, अशी खात्री करुन घ्यावी लागली होती. आणि तु एंजॉय करत होतीस सगळे. या वयात असे परपुरुषाबरोबर, रात्री हॉटेलमधे खिदळत बसणे, शोभले का तुला ? ”

” असे काय अशोभनीय वागले मी. आणि त्याचे व्यक्तिमत्वच तसे आर्जवी होते. नाही नकार देऊ शकले मी त्याला. शिवाय ओळखीचा होता तो. परका नव्हता. ”

तुमचे म्हणणे आम्ही नोन्दवुन घेतोय. बरं आता हे सांगा कि या स्टार केमिकल्स ला दिलेली ऑर्डर, त्याना दिलेला आॅडव्हान्स, हे सगळे तुमच्या सहिने झाले होते ना. या सप्लायरचे रेट्स हे बाजारभावापेक्षा जरा जास्त होते, हे तुम्ही का बघितले नाहीत ?

हे सगळे काम पुरंदरेच बघत असत. या केसमधेहि त्यानी हे सगळे केले होते, असे मला आठवतेय. मी क्षेमकल्याणीसाहेबाना नेहमी सांगत असे, कि हे सगळे पडताळुन बघणे मला जमत नाही. लॅबमधली वट्टेल ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. मी त्याना एक ईमेलहि पाठवली होती अशी.

याला त्यानी उत्तर दिले होते ?

हो नक्कीच दिले होते. पुरंदरे हे अत्यंत प्रामाणिक आहेत. आपल्या कंपनीत त्यानी अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विसंबुन, कुठलिहि ऑर्डर ओके करायला हरकत नाही. शिवाय मी तिथे आलो कि सगळ्या ऑर्डर्स बघत जाईनच. असे स्पष्ट लिहिले होते त्यानी. या ईमेलचा प्रिंटाऊट घेऊन ठेवला आहे मी.

त्याची कॉपी देऊ शकाल का ?

” परका नसला तरी पुरुष होता ना. आणि अशी कितीशी ओळखत होतीस त्याला तु ? त्याला नकार द्यायला तुला जमले नाही, तुच कबुल केलेस ना. ”

” ईनफ. कश्याला होकार दिला मी ? एका ओळखीच्या व्यकतीबरोबर काहि काळ बोलणे. एकत्र खाणेपिणे, याचा ईतका वाईट अर्थ निघतो ? केवळ तो तरुण पुरुष आणि मी विवाहित स्त्री आहे म्हणुन ?
आज मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, माझे काहि स्थान निर्माण करु पाहतेय, तर असे आरोप का केले जाताहेत माझ्यावर ?
सदाहि कधीकधी आदिवासी स्त्रियांच्या टंच सौंदर्याची वर्णने करतो माझ्याजवळ एकांतात. मी काहि असे आरोप करत नाही त्याच्यावर. त्याला हे स्वातंत्र्य आहे, मग मला का नाही ?

अपोझिट सेक्सचे आकर्षण वाटणे अगदी नैसर्गिक आहे. याला वयाचे काहिहि बंधन नाही.

येस मला वाटले त्याच्याबद्दल आकर्षण. त्याने माझ्या प्रेमात वैगरे पडल्याचा ऊल्लेख केला, तेंव्हा सुखावलेहि मी. याहि वयात आपण कुणाला आकर्षित करु शकतो, याचा आनंद झाला मला.
तो त्याच्या व्यावसायिक चातुर्याचा भाग असेलहि. नव्हे होताच. पण तरिही मी एक स्त्री आहे. मला पुरुषाच्या अनुनयाची भुल पडणारच.

त्याचे सुडौल शरिर बघुन, मी नकळत सदाच्या सुटलेल्या पोटाशी तुलनाहि केली. आज हे सगळे कबुल करायची हिम्मत आहे माझ्यात. अगदी सदालाहि सांगेन सगळे.

पण म्हणुन मी काहि गुन्हा केलाय, हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या वयाच्या स्त्रीया टिव्हीवर, सिनेमात देखणे पुरुष बघतात, तेंव्हा त्यांच्या मनात काय विचार येत असतील, याची मला पुर्ण कल्पना आहे. पुरुष चारचौघात कुठल्याहि स्त्रीच्या सौंदर्याची जाहिर चर्चा करु शकतात. तशी त्या ऊघडपणे नसतील करत, पण कुठेतरी, निदान मनातल्या मनात तरी अशी कबुली देत असतील.

शेवटी माझी बांधिलकि माझ्या मानाशी. संधी मिळत नाही तोपर्यंत सगळेच सभ्य. पण म्हणुन नुसत्या विचाराने कुणी भ्रष्ट होत नाही. जे सभ्यपणाचा आव आणतात ना, त्यांची किव करते मी, कारण मनातहि असले विचार न आणणे, कितीजणाना जमते याचीच मला शंका आहे.

माझ्या हातुन काहि व्यावसायिक चुक झालीच असेल तर, मी अवश्य त्याचे परिणाम भोगेन. पण एरवी माझे काहिहि चुकलेले नाही. ”

मॅडम, तुमच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पुरंदर्‍यानी तुमच्यावर काहि आरोप केले, त्याचे निराकरण करण्याची तुम्हालाहि संधी मिळावी म्हणुन आम्ही आपल्याला तसदी दिली. आमची फ़ाईंडिंग्ज आम्ही लवकरच कळवु.

समाप्त.



Moodi
Friday, December 23, 2005 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश नेहेमीप्रमाणेच अप्रतिम. माणसाचे अंतरग इतरांपासुन लपले तरी त्याला माहितच असते की. फारच छान उलगडवुन दाखवलेत.

थोडी सुन्न करणारी पण आहे ही कथा.

अंतरंगाशी संवाद साधला तर सर्व भावते अन कळते.


Champak
Friday, December 23, 2005 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवट अगदी सही सही हे!

:-)


Suniti_in
Friday, December 23, 2005 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश छानच आहे कथा. मनातले भाव छानच लेरेखाटले आहेत.

Suniti_in
Friday, December 23, 2005 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश छानच आहे कथा. मनातले भाव छानच रेखाटले आहेत.

Gs1
Monday, December 26, 2005 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

eka kqaot dÜna kqaa.. XaIYa-k tr sauroKca

Nirav
Monday, December 26, 2005 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

If you are CA (chartered accountant) and working for Big 4s, will name it as "External audit".

Prajaktad
Tuesday, December 27, 2005 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" मन! मनास उमगत नाही. "

Rachana_barve
Tuesday, December 27, 2005 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडली मला कल्पना. कथा सुरेख आहे.

Daizy
Saturday, December 31, 2005 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कथेमधील सगल्यात आवड्लेली बाजु म्हणजे त्या स्त्री च्या
नव-याची भुमीका त्याचा तीच्यावर असलेला विश्वास आणि ती
कोणाबरोबर गेल्यावर त्याला वाईट वाट्ते कारण तो तिच्यावर प्रेम
करतो असे मला तरी वाटते....
दुसरे म्हणजे.. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एखद्दा असा प्रसग येतो की आपल्याला कोणीतरी खुप आवडुण जाते. त्या वेलेस बरे
वाईट काही समजत नाही.... आणि नतर त्यात काही गेर होते किवा मज़ा मनात असे काहीच नव्हते अशी बोलावण आपण करत असतो... कधि कधी मनात तसे नसतेहि पण त्या व्यक्ति ची सोबत आवड्ते...

पण बर्याच वेल्ला आपण तोट्यात असतो...
हया कथेपासुन थोडे बाजुला जाउन तसेच थोडे काही......
तुम्ही " अस्तीत्व " हा सिनेमा बघीतला असेलच... त्यातील स्त्रीच्या हतुन एअका भावुक शणी तीचा तोल जातो आणि..........त्या नतर ती सवारते त्या शणी तिचे नव्-यावरील प्रेम कमी ज़ालेले नसते... पण ती ते काही शण ते विसरते हे खरे.

असो तो वादाचा विषय होईल...
बाकी कथा BEST...
पण तो मोहीत कुठे आहे सद्दा? ग़म्मत...... रे.............






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators