Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Maajhee Aajjee

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » ललित » Maajhee Aajjee « Previous Next »

Rupali_county
Thursday, September 14, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु तुझ्या लेखावरुन मला हे लिहावस वाटत आहे

माझी आजी

माझी आजी एक हिरा होता आमच्या घरातला. खूप कडक सुद्धा होति पण खूप प्रेमळ, त्रास सहन करून तिच्या ५ मूलाना वाढवल आणि मोठ केल. आपण जो त्रास काढला तो त्यानी काढू नये म्हनून ति खूप झटत असे.

सुरवातिला माझ्या काका च आणि पप्पा च मूळीच पटायच नाही आणि ति मरे पर्यन्त कधीच पटल नाही.
शेवटच्या श्वासा पर्यन्त मोठ्या मूलाला कधी भेटेल अस तिला झाल होत पण तो योग काही आला नाही.

शपथ दिलि होती तिन, "मेल्या वर मला अग्नि देउ नका म्हनून, माति द्या, आपल्या मातीत मला माझ मरण द्या, मला त्या मातित मिसळून धरणी च्या कूशित राहू द्या, वाड वडिला कडून चालत आलेल्या जमिनित मला विलिन होउ द्या"

दर वर्षी आम्ही मे महिन्याचि सूटी कधी लागते हे च मोजत असू आणि आजी सूद्धा. तिचा वय झाल होत म्हनून आम्ही तिला माझ्या आत्या कडे ठेवल होत, गावातून रानात राहणार्या आत्या कडे जाण्या साठी आम्ही बैल गाडी तून जात असू, तेव्हा माझी आजी वाटेवर बसून आमची वाट बघत बसयची, ऊन तर हे तळपत असे पण त्याची तिला फ़िकिर नाही, कूनी विचारल तर म्हनायची "माझी पोर आत्ता येत्यात बघ" अणि त्या तळपत्या ऊनात डोई वर सहा वारि साडी चा पदर सावरत आणि एका हातात पाण्याचा ताम्ब्या आनि पेला घेउन आमची वाट बघत असे. आम्ची बैल गाडी तिला दूरवरून दिसत असे. तिचि नजर भारी तिक्ष्ण होति...विचारल तर म्हणायची "कूरडू चि भाजी खावुन दिस काढल्यात"

अशी ही मायेची आजी मला परत दूरवरून आमच्या गाडीला डोईवर हाथ ठेवुन बघताना आता दिसत नाही. दूर वर गेली ति आम्हा सर्वाना सोडून...


Mrudgandha6
Friday, September 15, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझ्या आजी आजोबांची,पन्जीची आठवण झाली..
अग ती वरुन पहात असेल पण तुझ्याकडे so dont worry





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators