Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
प्रेम

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » ललित » प्रेम « Previous Next »

Mrudgandha6
Tuesday, September 12, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रेम

यमुनेच्या तीरावरील गर्द वनातून मुग्धपणे बरसणार्‍या सावळ्याच्या बासरीच्या सुरांमध्ये तन मन हरपणारी राधा जितकं उत्कट प्रेम त्या माधवावर करत असेल तितकंच उत्कट प्रेम युगांच्या अवधीनंतरसुद्धा करणारी मीरा मला एकदा स्पर्शली..तेव्हा..ती मला भावली..तितकंच तिच कृष्णप्रेमही माझ्या मनावर कोरलं गेलं..तिच्या माझ्या नात्याची वीण तिथंच गोवली गेली असावी..

मी तिच्या योग्यतेच्या तसूभरही जवळ पोहचू शकत नाही पण,आंम्हाला एक गोष्ट नेहमी सांधते ती म्हणजे सर्वस्व ओतून केलेलं प्रेम..युगे बदलली तरी ही एकच गोष्ट बदलत नाही..म्हणूनच गोकुळात राधेने कृष्णाच्या प्रेमात जे परमोच्च शिखर गाठले तेच मीरेनेही गाठले..

राधेच्या आठवणींत रंगुन गायी ऐवजी वृषभाची धार काढणारा शाम आणि त्याच्या एका दर्शनासाठी कासावीस होणारी राधा यांचे प्रेम जेव्हढे उत्कट श्रेष्ठ तेव्हढेच विषाचा प्याला अमृत समजून ओठाला लावणार्‍र्या मीरीचेही श्रेष्ठ..भौतिक जाणिवांच्या पलिकडले..

अक्रुराबरोबर कायमचा मथुरेला निघालेला मोहन अपल्याला सोडून जात आहे याची कल्पना कधी तरि त्या राधेने केली असेल का? तिचा आत्माच तिला सोडून जात असेलेला पहताना तिची होणारी तगमग आणि तरीही तिने अबोलपणे ते विषही पचवले... आधी कमालीची जवळीक आणि नंतर जीवघेणा विरह...
आणि मीरा..तिला तर कधीच माधवाचा प्रत्यक्ष संग मिळाला नव्हता तरीही इतके उत्कट प्रेम ज्यासाठी आयुष्यभर विरहाच्या विषाचे कडू घोट तिनेही पचवले..
कूठून आली ही ताकद ही निर्भयता दोघिंमध्ये.. प्रेमातून.. होय प्रेमातूनच..
माझ्या मते राधा आणि मीरा एकच आहेत.. राधेने प्रेम्-अद्वैतातून विरहरुपी द्वैत आणि पुन्हा मीरा बनून त्या माधवात सामावून अद्वैत अनुभवले.. आणि मग आधी,मध्य अन्त हे सगळेच फ़क्त प्रेमानंद बनून राहिले.. जे भौतिकतेच्या कोंदणात बसु शकत नाही.. भौतिक दुरत्व ज्यात आड येवू शकत नाही.. जे नेहमीच आत्म्याना एकरुप करते ते शाश्वत प्रेम.. आधी होते.. आता आहे आणि नंतरही रहाणार ते प्रेम.. हेच शाश्वत सत्य आहे.. आनी हेच सत्य आज सगळे विसरू पहात आहेत.. क्षणिक मोहापायी हा अक्षय आनंद आपण विसरुन गेलोय..
या जगाला मीरेची गरज पुन्ह पुन्हा भासत आहे.. प्रेम शिकवण्यासाठी..प्रेम करण्यासाठी..
मीरा माझ्या हृदयाच्या पायर्‍या उतरून माझ्या आत्म्याला स्पर्शतेय.. तेव्हापसून अंतरंगात एखादे कमळ उमलावे आनी त्याचा सुगंध इतरत्र पसरावा तसे माझ्या मनात प्रेम उमलतेय.. आत अन बाहेरही.. विश्व आनंदमयी बनवत..देहभान विसरुन आत्मभान जागृत करणारे प्रेम..ज्याला इतर कशाचा अधार लगत नाही ते प्रेम..जे स्वतः एक विश्वाचा आधार आहे ते प्रेम..

आज त्याचीच खरी गरज नाही काय???

म्हणुनच राधा पुन्हा अवतरायला हवी,माधव पुन्हा अवतरायला हवा,मीरा पुन्हा अवतरायला हवी.. इथे.. आपल्याच हृदयातील गाभार्‍यात..


Prashantnk
Tuesday, September 12, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा,
अगदीच हृदयस्पर्शी लिहल आहेस!तुझ्याच कवितेसारख!!


Mrudgandha6
Tuesday, September 12, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद प्रशान्तदादा.तुम्हाला आवडले हेच माझ्यासाठी जास्त मोलाचे आहे

Prashantnk
Tuesday, September 12, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा,
'दादा'पण म्हणतेस आणि 'तुम्हाला' असही म्हणतेस. हक्कान 'तू' म्हणत जा.
प्रेम,माया,ममता ह्या परमेश्वराच्या देणग्या आहेत.पण त्याचा गर्भित अर्थ फ़ारच कमीजणांना कळतो. आनंद ह्याचाच आहे की,तुला तो अर्थ 'कळला 'आहेच, पण त्याहुंनी महत्त्वाच, तो तुला 'वळलाही' आहे, मीरेसारखा!


Mrudgandha6
Wednesday, September 13, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दादा,जरुर,मलाही आवडेलच तुझ्यावर हक्क दखवायला..

Prashantnk
Wednesday, September 13, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा,
आज पोष्ट परत एकदा वाचावी वाटली.
ह्याच,गोकुळनंदना वरील आत्मनिर्भर प्रेमाने सगळे गोकुळवासी तरुन गेले.धन्य त्या प्रेमाची! मला खरच त्यांचा हेवा वाटतोय.


Smi_dod
Wednesday, September 13, 2006 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा... .... ... सुंदर लिहिलस,अगदी हृदयस्पर्शी!!!!

Proffspider
Thursday, September 14, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुदगन्धा अगदी छान लिहिला आहेस तु. खरच आजच्या जगात या क्षणीक सुखाच्या मागे धवणार्‍या या पिढीला खर्‍या आणि निर्मळ प्रेमाची ओळ्ख पटवायला पुन्हा एकदा राधा, मीरा, माधव अवतरायला हवी....इथेच आपल्या आजुबाजुला.. आपल्यामनाच्या गाभर्‍यात..... :-)

Shyamli
Thursday, September 14, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान........
खरच खुप छान..

यावर भरपुर आहे अजुन लिहीण्यासारख
जमल तर लीही अजुन


Rupali_rahul
Thursday, September 14, 2006 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा खुप छान लिहिल आहेस...

Mrudgandha6
Thursday, September 14, 2006 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद... ही माझ्या post ची ताकद नाही.. प्रेमाची आहे ज्यामुळे ही post सगळ्यांना आवडलीय.
खरेच अजूनही बरेच आहे लिहायचे..जरुर लिहिन..


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर... !!!!.. .. .... .. .. .. . .

I_maximus
Friday, September 22, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्दर अप्रतिम....... राधा आणि मीरा..... आणि तो शाम.... खरच... आज त्यान्चि ह्या जगाला गरज आहे

लिहिने चालु ठेव......

आभार





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators