Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 24, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 24, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Saturday, July 22, 2006 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी ....
सुंदर रे ...

मीनू ... खरंच मस्त आहेत गं ह्या कविता ... विशेषत: शेवट कसा अचानक समोर आल्यासारखा वाटतो ...


Pkarandikar50
Saturday, July 22, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोष्ट अध्यात्माची

"भौतिक आणि अध्यात्मिक,
मानवी आणि ईश्वरीय,
यांच्यातल्या सीमारेषा तशा पुसटच.
एकाचा शेवट कुठे होतो,
दुसर्‍याची कुठे होते सुरुवात?
कसे एकमेकात घट्ट गुंतलेले वाटतात.
काही सांगता येइल का हो, महाराज?"
धाडस करून मी विचारलेच बुवांना.

एका छद्मी कटाक्षानेच, बुवांनी
माझ्या प्रश्नाची वासलात लावली.
"अजून बरेच टप्पे करायचे आहेत पार"
म्हणाले, "एव्हढ्यात कसं समजणार?"

माझं मनच उडालं प्रवचनातून.
मधूनच उठलो, चालायला लागलो.
अचानक रिकामा निघालेला वेळ
कुठे घालवावा, विचारात पडलो.
वाटेत एका डॉक्टर मित्राचा दवाखाना लागला.
शिरलो झालं, आत.
"काय? आज इकडे कुठे चुकली वाट?"
मित्राचा खंवचटपणा.
"गेलो होतो अमुक-तमुक बुवांच्या प्रवचनाला,
मधेच कंटाळलो, सोडून निघालो.
वाटेत तुझा दवाखाना दिसला, डोकवावं म्हटलं.
कामात व्यत्यय तर नाही ना,
आणला, तुझ्या?" मी उत्तरलो.

"छे छे.बरं केलंस.
अरे, कसला बोगस तुझा तो बुवा?
परवाच व्हिजिटला जाऊन आलो ना मठात."
तो ठासून म्हणाला.
"बुवांना काय झाले बुवा अचानकपणे?
प्रवचनाला तरी नव्हता खाडा, सप्ताहात?"
माझा अचंबा.
"त्या बुवाला काय भरलीय धाड?
सेवेकरी शिष्येला दिलान महाप्रसाद,
तीचे पोट पाडायचे किती घ्याल,
विचारत होता तुझा पारमार्थिक बुवा."
मित्राने स्वच्छच सांगून टाकले.

दवाखान्यातूनहि उठलो, तिरीमिरीत,
चालायला लागलो, समजावत स्वत:लाच.
"काय विपरीत घडलं होतं असं,
की मी वैतागावं?
जगरहाटीत घडतातच ना असले प्रकार?
भौतिकाचे आणि अध्यात्माचे
असेच पडतात ना विळखे एकमेकांना?"

-बापू.






Pkarandikar50
Saturday, July 22, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशासकीय नोकरीत उभी हयात घालवली. त्या शासनाचे, म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय- दोन्ही, जवळून दर्शन झाले. मला जे दिसले, ते असे आहे:-

डोळस

एक डोळा,रिकाम्या खांचेंतला,
होता कसा, आठवत नाही.
सुटला बिचारा, केंव्हाच फुटला.

दुसरा डोळा, सावध मुरलेला.
तुम्ही सांगाल, तेव्हढेच पहातो.
नको म्हणता? प्रश्नच मिटला.

तिसरा डोळा, शेपूट घातलेला.
तेल संपलेय, पीळ फुलवातीचा.
भावली डुचकी, खुशाल बोंबला.

-बापू.




Pkarandikar50
Saturday, July 22, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशासकीय नोकरीत उभी हयात घालवली. त्या शासनाचे, म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय- दोन्ही, जवळून दर्शन झाले. मला जे दिसले, ते असे आहे:-

डोळस

एक डोळा,रिकाम्या खांचेंतला,
होता कसा, आठवत नाही.
सुटला बिचारा, केंव्हाच फुटला.

दुसरा डोळा, सावध मुरलेला.
तुम्ही सांगाल, तेव्हढेच पहातो.
नको म्हणता? प्रश्नच मिटला.

तिसरा डोळा, शेपूट घातलेला.
तेल संपलेय, पीळ फुलवातीचा.
भावली डुचकी, खुशाल बोंबला.

-बापू.




Mrudgandha6
Sunday, July 23, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापु, "डोळ्यामागचा" भावर्थ व्यवस्थित चितारला अहात..विशेषत दुसरे कडवे.. या जगात बरेच जन डोळे असुन आंधळे कान असून बहिरे आणि वाचा असुन मुके आहेत...कारण सगळ्यांना स्वतअचे आयुष्य मजेत जगायचे आहे..दुसर्‍यावर अन्याय होतोय ना आपले काय जातेय? बरे काही करु नका परन्तु,निदान संवेदना तरि थेवा.पण तेही नाही.खरेच हेच चाललेय नाहि? ..पण असेच कुठवर चालायचे? सगळे जन भगतसिन्ग़्ह दुसर्‍याच्या घरिच जन्मावा असे म्हनतात. आणि एखदा भगतसिन्ग़्ह पुढे आलाच तर त्याला साथ देणे दुरच उलटपक्शी पळुन जातात. इथे प्रामणिक माणसाला पुरव्या अभावी गप्प बसावे लागते.कुनी बन्ड केलेच तर त्यालाच बन्ड्खोर समजुन सुळावर लटकवले जाते. जाते. एक शेर इथे आठ्वतो..
माना के उन के नेज़ों पे अब सर नहीं कोई
क्या उन के आस्तीन में भी ख़न्जर नहीं कोई

हेच घडतय.आणि कुणि काही बोलु शकत नाही करण प्रामाणिक माणसाकडे तसा पुरावा कुठे असतो??


Pkarandikar50
Sunday, July 23, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrudgandha
आपण डोळस (किंवा पारदर्शक)प्रशासनाच्या गप्पा नेहमी ऐकतो पण वस्तुस्थिती फार वेगळीच असते, हेच मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे (स्वानुभवावरून).खलप्रवृत्तीन्चे निर्दालन करण्यासाठी शासनाकडे 'तृतिय नेत्र' असणे आवश्यक असते पण आपल्याकडच्या लोकशाहीत खल प्रवृत्तींचेच राज्य सुरू आहे. त्यामूळे तीसर्‍या डोळ्याने शेपूट घातले आहे.
-बापू.



Mi_vikas
Sunday, July 23, 2006 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



उतरते रात्र श्वासात
हा चंद्र रन्ध्ररन्ध्रात
का गालांवरति
रंग उषेचे चढले रे

माझी न मी उरले
माझी न मी उरले

का फ़ुलांफ़ुलांतून आज
प्राजक्त जागविसी रात
चांदने नभीचे
कुशीत माज्या शिरले रे

माझी न मी उरले
माझी न मी उरले


Vaibhav_joshi
Sunday, July 23, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू ... दोन्ही कविता सुंदर ... दुसरी तर फारच चपखल आहे .... इतकं संवेदनशील असूनही तुम्ही कसं काय प्रशासन आणि कवी मन सांभाळता हा मला पहिल्यापासून पडलेला प्रश्न आहे ... म्हणजे इतकं सहजी switch on आणि switch off होणं जमणं खरच कठीण आहे ... अर्थात हे बोलूच भेट घडेल तेव्हा ...

Ninavi
Sunday, July 23, 2006 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नांतला राजकुमार

स्वप्नांतला राजकुमार
स्वप्नांत पाहिलेलाच बरा..
स्वप्नांत राहिलेलाच बरा..
दिवसाच्या उजेडात आलाच कधी
तर लक्षात येतं,
घोडं कागदी आहे..
मुकुट बेगडी..
आणि ते जे काही बलदंड वगैरे वाटलं होतं
तो चिलखताचा आकार आहे..

आत ' माणूस' नाहीच आहे..


Ameyadeshpande
Sunday, July 23, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तोच तो... बहुदा "माणूस"

मी तर विसरुन गेलो आहे त्या माणसालाच...
कधी ओळखत होतो बहुदा...

अनोळखी असा हात मायेनी फ़िरायचा
जखमेवर फ़ुंकर घालायचा
"माणुसकी" की काय त्याची आठवण करून द्यायचा......

अलिकडे पहातोय नुसत्या वाहत राहणार्‍या जखमा...
आणि त्याबरोबर डोळे ही...
ओळखीचे वाटतात ते... खूपच...
हो हो तीच ही... मी पाहिलेली...... "माणुसकी"

तेव्हापासुन एकच करतो आहे...
जिवाच्या आकांतानी फ़ुंकर घालत हिंडतो आहे...
कमीत कमी स्वत:ची ओळख विसरून नाही जाणार ह्याचा प्रयत्न करतो आहे....


Meenu
Monday, July 24, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापु दोन्ही कविता सुंदरच .. डुचकी या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो ..?

Prasad_shir
Monday, July 24, 2006 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्स आणि आपण...

पाच वर्षांचा प्रिन्स
साठ फुटी खड्ड्यात
पन्नास तास अडकला...
तर
म्याडमपासून, मनमोहनांपर्यंत
लष्करापासून, मंत्र्या संत्र्यांपर्यंत
सगळ्या सगळ्यांनी पळापळ केली...
नाही,
वाहिन्यांनी त्यांना करायला लावली...
पण
कोट्यावधींचा देश
खोल खोल खड्ड्यात
साठवर्ष अडकून आहे
यावर कुठे किरकोळ चर्चाही नाही...
कारण
प्रिन्सला लाभलेलं TRP चं वरदान
तुमच्या आमच्या खड्ड्यांना नाही...
म्हणून
TRP चा विजय असो...
आणि वाहिनीशाहीचाही विजय असो...


Mrudgandha6
Monday, July 24, 2006 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय,
खुपच छान मांडला आहेस तुझ्या जिवाचा आकान्त.माझाही तोच प्रयत्न सुरु आहे. निदान स्वतः माणुस म्हणुन जगण्याचा. all d best

प्रसाद,
काय बोलु? अतिशय खरे आहे तुझे.

.मी वरती दिलेल्या बापुंच्या कवितेच्या प्रतिक्रियेचे मर्म आणि तुमच्या कविता जनू एकच प्रश्न करत आहेत.पुन्हा पुन्हा..


Pkarandikar50
Monday, July 24, 2006 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Meenu
भावली आणि डुचकी हे दोन्ही शब्द माझ्यावरच्या ग्रामीण संस्कारांमुळे आले असावेत.
भावली: बाहुली (डोळ्याची किंवा खेळण्यातली)
डुचकी: तिरळी किंवा चकणी (काही वेळा डोळ्यात फूल पडल्यावर झालेल्या स्थितीलासुद्धा हा शब्द वापरलेला मी ऐकला आहे)
-बापू


Pkarandikar50
Monday, July 24, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav,

कविमन म्हणजे काही वेगळे असते का? कवि सामान्य माणसाचे जीवनहि जगत असतोच की! कोणी शेतकरी असेल, कोणी व्यापारी किंवा कारकून. मी स्वत:ला कवि मुळीच समजत नाही. कविता करणे हा माझा एक छंद आहे, फवल्या वेळचा उद्योग आहे, जसं की मी ब्रिज खेळतो किंवा सन्गीत ऐकतो. त्यामुळे switch-on किंवा switch-off करण्यासाठी काही वेगळा प्रयत्न वगैरे करावा लागल्याचे मला तरी आठवत नाही.

-बापू.


Gharuanna
Monday, July 24, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद सुन्दर इतका छान सन्दर्भ

Pkarandikar50
Monday, July 24, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद,

तुझ्या कवितेत प्रकट झालेल्या मतांशी आणि विचारांशी सहमत असूनही मला थोडा वेगळा मुद्दा मांडायचा आहे.

आज-काल टि आर पी आणि सेन्सेक्स ह्यांना सर्वोच्च महत्व प्राप्त झालंय. त्यांच्या चढ-उतारावर सरकार आणि समाज हेलकावत आहेत, ह्याबद्दल कितीहि हळहळ वाटली, कितीहि संताप आला तरी ती वस्तुस्थिती सहजासहजी बदलणार नाहिये. मूठभर बुद्धिजीवी आणि सद्विवेकी मंडळी ती वस्तुस्थिती बदलू शकत नाहीत. मुळात ह्या दोन्ही ब्रम्हराक्षसांना जन्म देणारे आणि त्यांचं संगोपन करणारे बुद्धिजीवीच होते आणि आहेत.

माझ्या आईने मला सांगीतलेली एक पुराणातली गोष्ट मला अलीकडे नेहमी वरचेवर आठवते आणि अधिकाधिक पटत चललीय.

कलीयुगाची सुरुवात होताना, ब्रम्हदेवाने कलीमहाराजांना भूतलावर जाण्याची आज्ञा दिली, तेंव्हा कलीने विचारले, देवाधिराज, आपल्या आज्ञेनुसार मी पृथ्वीवर जातो पण तेथे पोचल्यावर मी वास्तव्य कुठे करायचे? ब्रम्हदेवांनी कलीला फर्मावले की, तू मानवाच्या मेंदूत जाऊन रहा, जेणेकरून मानवाला सर्व काही विपरीत दिसू लागेल. त्याची प्रत्येक कृतीहि त्यामुळे विपरीत होइल. त्याच्या सद्सदविवेक बुद्धीला भ्रम होतील. त्यावर कलीने विचारले, ठीक आहे.जशी आपली आज्ञा. पण प्रत्येक मानवाची प्रत्येक कृती जर विपरीत हो ऊ लागली तर फार थोड्या अवधीत संपूर्ण मानवजात नष्ट होईल. भूतलाचे रुपांतर एका विशाल स्मशानभूमीत होण्यास वेळ लागणार नाही. आपल्याला हेच व्हायला हवे आहे काय? तर मग त्यासाठी एका संपूर्ण युगाची काय आवश्यकता? महादेवांनी आपल्या तृतीय नेत्राने एक दृष्टिक्षेप केला तर क्षणार्धांत सारी मानवजात जळून भस्मसात हो ऊ शकते. ब्रम्हदेवांनी त्याला समजावले की, मानवाने आपल्या कृतीने, आपल्या हाताने आपला सर्वनाश ओढवून घ्यावा, हेच उत्तम. शिवाय, काही मानव असे निघतीलच की जे तुझ्या प्रभावाखाली सापडून विपरीत वागण्यापासून स्वत:ला रोखतील.इतरांनाहि समजावण्याचा प्रयत्न करतील. अशा विचारी मानवांना आपण थोडी संधी द्यायला हवी. जे तुझ्या प्रभावाखाली येतील ते नरकात जातील. जे तुला प्राणपणाने प्रतिकार करतील त्यांना मोक्ष आणि स्वर्गप्राप्ती होईल.

तेंव्हापासून मानवाच्या मेंदूत शिरून बसलेला कली आणि विवेकबुद्धी यांच्यात एक स्पर्धा, एक लढाई सुरू आहे. कधी कलीचे पारडे जड होते तर कधी विवेकाचे. ह्या लढाईत प्रत्येकाला भाग घ्यावाच लागतो, कोणतातरी एक पक्ष स्वीकारावाच लागतो. कोणता मार्ग पत्करायचा याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. विवेकाचा पक्ष घेणारे एकाकी पडू शकतात. त्यांनी समविचारी माणसांची फळी उभारायला हवी तरच त्यांचा निभाव लागेल.

तात्पर्य, प्राप्त वस्तुस्थितीचा हतबल हो ऊन स्वीकार करण्याने कुणाचेच हित साधणार नाही.

प्रसादच्या (आणि काही अन्शाने माझ्याहि) कवितेत वस्तुस्थितीचे यथार्थ आणि ह्रूदयद्रावक वर्णन आहे. त्यापुढे जाऊन काय करायचे ते प्रत्येकाने ठरवायचे आहे.

-बापू.



Kandapohe
Monday, July 24, 2006 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, खरच अप्रतीम सादरीकरण रे!

बापू, सुंदर निरुपण. तुम्ही पुण्यात असता का? एकदा भेटूया!


Pkarandikar50
Monday, July 24, 2006 - 10:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prasad,

फॅशन शो मधे मॉडेलची घसरलेली चोळी किंवा राखी सावंतचे चुम्बन यावर वाहिन्यांनी केवळ टी अर पी साठी हैदोस घातला हे तर खरेच. त्यापेक्षा प्रिन्सवर टी अर पी मिळवणे जास्त चान्गले,नाही का? वाहिन्यांनी त्यातल्यात्यात सकारात्मक भूमिका घ्यावी याकरता आपण "मौनी बहुमत" वाल्यांनी काहीतरी करावे, हेच जास्त बरे, असे नाही का तुला वाटत?

Kaandapohe,

होय. मी सध्यातरी पुण्यातच रहतो. आपण जरूर भेटू या. बाकी काही नाही तरी तुम्हाला तुमचे आवडते कान्दा-पोहे नक्कीच खाऊ घालीन!

-बापू


Saconchat
Monday, July 24, 2006 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगल्याच कविता उच्य आहेत. येथे TRP चा अर्थ काय आहे?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators