Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 28, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » कथा कादंबरी » चन्द्रवाटा » Archive through June 28, 2006 « Previous Next »

Hems
Tuesday, June 06, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, वा ! नेहेमीप्रमाणे छान लिहितोयस.
लवकर सवड काढ पुढे लिहायला !


Prajaktad
Monday, June 12, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग!चन्द्रवाटा कुठे हरवल्या ? लिही पुढचा भाग

Moodi
Monday, June 12, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग खरच फार वाट पहातोय आम्ही. आता लंपनला खरच राग येऊन त्याने इथे कथेचा पुढचा भाग टाकला तर तुझ्या कथेची STY होईल. लंपन रागवु नकोस, गंमत केली तू तसे लिहीलेस म्हणुन.

Yog
Monday, June 12, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

3. कुम्पण

हळु हळु थन्डीचे दिवस सरत होते तशी मनातील बोच जरा कमी होत होती नाहितर त्या उदास, वैराण अन बर्फ़ातील स्तब्ध निसर्गाकडे पाहून खर तर शलाकाचा जीव अजूनच कोरडा होत असे अन मग घरातील चार भिन्तीत तेच तेच विचार अन त्याच सलणार्‍या आठवणी. त्या दिवशी अभीकडे मन जरा हलक केल्यापासून तिला थोड मोकळ वाटू लागल. अभिषेक च्या स्वभावातील मार्दव अन आपुलकीची तिला हळु हळु सवय झाली होती, जणू वणव्यातून जळून निघाल्यावर कुणी हळुवार फ़ुन्कर घालावी तसे त्याच्या सहवासात तिच्या जखमा निवत होत्या. शलाका अन रजत च अस का झाल?, काय व्हायला हव होत?, कुणी कस वागल? कुठे काय चुकल? अशा कुठल्याच प्रश्णान्चा त्याने कधिच उल्लेखही केला नाही बहुदा त्यामुळेच की काय, तिच जळणार मन कुठेतरी शान्त होत होत.

इकडे अभीला मात्र शलाकाशी वागताना मुद्दामून अधिक काळजी अन सय्यम ठेवावा लागे. आपल्या सहानुभूतीचं तिच्यावर दडपण येता कामा नये, किम्बहुना तिला त्याची जाणिवही होता कामा नये, कुठल्याही प्रसन्गात आपण भावनिक स्तरावर तिच्या किती जवळ जावू शकतो, तिला कितपत बोलत करायच, या सर्वावर त्याने थोड्या मर्यादा आखून घेतल्या होत्या. इतरान्पेक्षा तिच्या बाबतीत अधिक sensitive रहाव लागत असे अन हे सर्व करताना पहिल्याच प्रेमातून हाय खल्लेली शलाका कधि आपल्या बरोबर एकत्र चार पावले चालू शकेल का याची खात्री नव्हती. तशी अपेक्षा केली तरी ते पहिले पाऊल कुणि आणि कधी टाकावे याचे उत्तर नव्हते. त्याच्या मनात एक विचीत्र सम्भ्रम असे, कधी त्याच्या बरोबर मुक्तपणे जीवनातील सर्व बारीक सारीक गोष्टीन्चा आनन्द घेणारी तर कधी एकटीच आपल्याच जगात हरवलेली शलाका, नक्की कुणाशी जवळीक साधावी हेच कळत नव्हत.

"Yes I like him very much.. he is the one who kissed me on my forehead this morning..." , खर तर रिमी च्या त्या शब्दाने अभिषेक पुरता हबकला. सर्वान्च्यात अस उघडपणे जाहीर करताना एरवी बिन्धास्त असणारी रिमी चक्क लाजली. एरवी गप्पा गोष्टीत अभिची फ़िरकी घेण्याची खर तर रिमीला सवय होती. त्यातच मादक सौन्दर्य अन पन्जाबी arrogance ची देणगी लाभली असल्याने बेधडकपणे कुठलिही गोष्ट ती करू शकते हे सर्वानाच माहित होत. पण त्या दिवशी पार्टी मधे Truth n Dare game मधल तीच ते उत्तर किती गम्भीरपणे घ्याव हेच अभीला कळेना. खर तर दोघान्ची खूप आधीपासूनची ओळख. रिमी परदेशात त्याच्या college मधे आल्यापासून अभीची तिला खूपच मदत झाली होती. गेले वर्षभर मित्र मैत्रीणीन्मधे त्यान्ची जोडी तशी फ़ेमसच. अर्थात रिमीची बेफ़िकीर वृत्ती, स्वच्छन्दीपणा, अन प्रचन्ड उत्साह याचा अभिला नेहेमी हेवा वाटायचा. कदाचित सधन अन उच्चब्रू कुटुम्बातील असल्याने तीच्या वागण्यातील ती तडफ़ त्याला नेहेमीच जाणवली होती. इतर अनेक मुले तीच्या अवती भोवती घुटमळत असली तरी अभिला कधी फ़रक पडला नाही किम्बहुना त्याच्या तशा अलुफ़पणाचा अन आत्मविश्वासाचा बहुदा रिमीला हेवा वाटत असावा. खर तर ते दोघही अतीशय जवळचे मित्र, इतके की बर्‍याच गोष्टी एकमेकाबद्दल गृहीत धरल्या जात, अन त्यातून उदभवणारे राग, रुसवे, फ़ुगवे, गैरसमज तर प्रसन्गी दोघान्ची होणारी करमणूक यातून दोघान्च्यात एक सहज मोकळ नातं निर्माण झाल होत. त्या दिवशी रिमीच्या वाढदिवसाची surprise party अभीने आयोजीत केली अन नेहेमीप्रमाणेच तिच्या आवडीचे गुलाब देताना तिच्या मस्तकाच चुम्बन घेतल.

रिमीच्या मगाच्या शब्दान्वर खर तर हसाव का गम्भीर व्हाव हे कळत नव्हत. may be it was not that big thing for her... पण अभीच्या मनात प्रश्णान्च काहुर उठल. रिमी चे ते शब्द ऐकून त्या पार्टीत असलेल्या शलाकाचा उतरलेला चेहेरा अन त्यानन्तर तिच्या सम्भाषणातून जाणवणारा एक अडीचा, तक्रारीचा सूर त्याला जास्ती बेचैन करून गेला. खर तर सर्वान्च्या नजरेत रिमी अन अभी were such perfect pair! किम्बहुना रिमी ने उघडपणे बोलून दाखवल नसत तरी चालल असत. पण अभीच्या मनाच काय? अस काय होत शलाकात..?

...

शलाका, काय करू कळत नाहीये, काल सर्व जण पार्टी सम्पून घरी गेलात, अन रीमी ने नन्तर मला रीतसर प्रपोज देखिल केल. तिच्या तोन्डावर नाही म्हणू शकलो नाही. तीला मि दुखावू शकत नाही पण कितीही चान्गली मैत्रीण असली तरी मि असा पुढचा विचारही केला नाही, in fact I know she is gem of a person but I know that she is not the one.... काय करू..?

अभीच्या प्रश्णावर शलाका बराच वेळ शान्त बसून होती. खर तर दोघही शान्तपणे बसून राहिले. अभीला त्या प्रश्णाच उत्तर आपण का देवू शकत नाही या विचाराने ती अधिक अस्वस्थ झाली.

कदाचीत त्यान्च्यातील त्या निशब्द क्षणान्मधे अनेक प्रश्णान्ची उत्तरे दडली असावीत. ते क्षण अन त्या संवेदना फ़क्त अनुभवता येत होत्या. शब्दात पकडण अवघड होत. कदाचित तो अबोलाच त्यान्ना एकत्र धरून ठेवत होता का..?


त्या दिवशी रिमी ला अभीने दिलेले गुलाब खर तर शलाकाला टोचले होते अन आज आश्रमातील त्या कुम्पणापलिकडील गुलाबान्चे ताटवे पाहताना पुन्हा एकदा ती बोच नव्याने अनुभवली तीने. गुलाबाभोवतीच कुम्पण अधिक बोचू लागल. आयुष्य अस गुलाबा सारखच असत का..? खूप आकर्षक, मोहक, भरपूर काही देवू पाहणार, स्वच्छन्दीपणे डुलणार, अन तरिही कुठल्याश्या कुम्पणाच्या मर्यादेत बान्धलेल, थाम्बलेल? शलाकाचा संसार आजही गोन्डस होता, इतराना हेवा वाटेल असाच होता पण तरिही त्या गुलाबाभोवतीच कुम्पण कधी कुणाला जाणवल असेल का..? काय विचीत्र विरोधाभास आहे, माळी मन लावून रोप लावतो, त्याला जीवापरीस सम्भाळतो, रुजवतो, वाढवतो अन मग तो टपोरा सुन्दर गुलाब ऐन तारूण्यात आल्यावर त्याच्या रक्षणासाठी(?) स्वतःच त्याभोवती कुम्पणही घालतो. जे बीज एक निखळ आनन्द देण्यास तो लावतो, त्याच्या स्वातन्त्र्यावर असे बन्धन?

अभी च्या त्या दिवशीच्या प्रश्णावर शलाका चा अबोला अन आज कुम्पणापलिकडील त्या गुलाबान्कडे पाहिल्यावरही फ़क्त अबोलाच!

या मर्यादेतच आपल्याला आयुष्य हसत जगायच आहे, वाढवायच आहे, बहरायच आहे, शलाकाने पुन्हा निर्धार केला अन ज्या कामासाठी आलो आहोत ते पुरं करून जाण्याच नविन बळ पुन्हा आल्यागत वाटल. स्वताशीच ती हसली. तिचं मन आजही तोच पूर्वीचा लपन्डाव खेळत होत... अन समोर दिसत होते ते असेच अनेक वर्षापूर्वी एका विचीत्र कुम्पणात बन्दिस्त झालेले अभी, शलाका अन रिमी.


Yog
Monday, June 12, 2006 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

4. ध्यास

गेली सहा वर्ष दादान्जवळ वाढलेली श्रीया आता एक दोन दिवसाचीच पाहुणी होती. तिला कुणीतरी दत्तक घेवून जाणर कुटुम्ब सापडल होत याचा आनन्द तर इतर मुलीन्पेक्षा वेगळी स्वताच्या मुलीगत वाढवलेल्या श्रीयाला स्वताच्या हाताने कुणाच्या परक्याच्या स्वाधीन करायच अन तेही कायमच, या कलपेनेन्च गेले काहि दिवस दादा बेचैन झाले होते.
तस पाहिल तर श्रीया अन त्यान्च रक्ताच नात तरी कुठे होत? असेच कुणीतरी अवेळीच त्या दोन महिन्याच्या मुलीला आश्रमात आणून सोडले अन त्या दिवसापासून तो आश्रम हे तिच घर, तेथील लोक हेच तिच कुटुम्ब झाल होत. जगाच्या दृष्टीने आश्रमाचे चालक, वाहक असणारे दादा तीचे मात्र वडीलच होते. कोवळ्या वयातील त्यान्च्या मन्डीवर घेतलेली झोप, कुशीत घेतलेले हुन्कार, त्यान्च्या हातावर बान्धलेले झोपाळे, उड्या, तीला आठवत नसत्लही पण दादान्चा तो मायेचा स्पर्श, ओलावा तिला कायमचा स्मरणात होता. अन आता इतक्यातच दादाना सोडून इतक लाम्ब जावा लागणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. फ़क्त गेले काही दिवस दादान्च्या स्वभावातील अन वागण्यातील बदल तिला जाणवत होता. आठ वर्षाची पोर त्यान्च्या वागण्या बोलण्यावरून असा कुठवर विचार करणार होती? पण काहितरी बदललय एव्ह्ड तिला निश्चीत जाणवत होत.

तस तर दादान्ची दिनचर्या ठरलेली असे. पहाटेच उठून योगाभ्यास, मग नदीवर स्नान करून यायचे. सकाळचा थोडा नाश्ता आटोपून सुर्योदयाच्या वेळी नाटमन्डपात जायचे. सुर्योदय अन सूर्यास्ताला आश्रमात दोन वेळच्या प्रार्थना असत. सर्व मुली, सेवक वर्ग, अन उपस्थित लोक एकत्र येवून दादानी स्वतः रचलेली प्रार्थना म्हणत. या मुलीना स्वताबद्दल कुठलाही न्यूनगन्ड येवू नये, त्यान्च्यावर दैवाने कुठलाही अन्याय केला आहे अशी चीड त्याना वाटू नये, मनात कुणाबद्दलही कुठलिही कटूता राहू नये, अन त्याच बरोबर आयुष्य जगण्याची अन घडवण्याची सन्धी आपल्याला ईश्वराने दिली याची जाणीव रहावी ही भावना जागवीणारी अशी दयाघनाची प्रार्थना अन सायमवन्दना दादानी मुद्दामून रचली होती. प्रार्थनेच्या वेळी दूरवरून श्वेतवस्त्रात दादा येताना पाहिले की सर्व मुली शान्त होत. एव्हड्या मोठ्या आश्रमाच्या परिसरात त्यावेळी एक रम्य शान्तता पसरे फ़क्त पक्षान्चा मधुर किलबिलाट, अजून उगवत्या सूर्याची आश्रमाच्या भिन्तीवर पडलेली कोवळी किरणे, नाटमन्डपासमोरील बहरलेल्या फ़ुलान्चे वेलीन्चे मन्द सुवास, अन आज दादा काय नविन शिकवणार किव्वा कोण नविन मैत्रीण येणार या कुतुहलात मन्डपात शिस्तीने उभ्या राहिलेल्या मुली. मग सकाळी प्रार्थनेपासून सुरुवात झाली की काही वेद, उपनीषदे इत्यान्दीन्मधील एखाद दुसरे श्लोक, मग त्यानन्तर दोन मुली एखाद्या विषयावर त्याना जमेल अन उमजेल तसे बोलून दाखवत, त्यातून एक प्रकारचा संवाद अन चर्चा घडत असे. दादान्च्या मार्गदर्शनाखाली प्रत्त्येक गोष्ट गोडीने पण शिस्तीने होत असे. मग ध्यानधारणा, योगाभ्यास, इतर अभ्यासक्रम करता करता दोन तास सहज निघून जात. पुन्हा मग सर्व मुली आपापल्या ठरवून दिलेल्या कामी लागत. दुपारी सर्वान्चे एकत्र भोजन,त्यातही स्वयम्पाकात मदत करायला मुलीन्चे दिवस ठरेलेले असत. सन्ध्याकाळी पुन्हा सायम्प्रार्थनेनन्तर काही खेळ, इतर कामे, असे करत करत प्रत्त्येक दिवस जात असे. या सर्वातही कुणाला काही अडचण, शन्का आली तर त्यासाठी दादा स्वताहून लक्ष घालत.
आश्रमात कुणासाठी ते वडिल होते, कुणासाठी भाऊ, कुणासाठी मामा, कुणासाठी शिक्षक, सन्चालक तर कुणासाठी आणखीन काही. प्रत्त्येकीच्या मनात त्यान्च्यासाठी एक वेगळ आदराच स्थान होत.
श्रीया मात्र सर्वाहून वेगळी, दादान्ची खास लाडकी.

कुतुहलापोटी तर कधी गरजेपोटी आश्रमाला भेट देणारे लोक त्या आश्रमाच्या कामकाज अन इतर पसार्‍यापेक्षा दादान्च्या व्यक्तीमत्वाकडे पाहून आश्चर्यचकीत होत. वयाने अजून तरूण दिसणारे, कुठल्याही प्रकारची विरक्ती वा सन्यस्त अभिव्यक्ती न भासवणारे अन प्रत्त्येक मुलीबद्दल त्यान्च्या मनातील कळकळ अन काळजी पाहून लोक थक्क होत. दादान्च्या एकन्दर चालण्या बोलण्यात कसलिशी वेगळीच आपुलकी पण धडाडी होती. कर्तव्यकठोर तर तितकेच प्रेमळ सन्चालक. जितके गरजेचे आहे तितकेच पण अचूक बोलणारे दादा खर तर त्या छोट्याश्या गावत प्रसिध्ध जास्त होते ते अशा कमी वयात स्वताला अशा सुन्दर समाजसेवेत वाहून घेतल्याबद्दल.

श्रीया साठी मात्र दादा प्रसिध्ध होते ते इतरानी न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या त्यान्च्यातील एका वेगळ्याच कलाकाराबद्दल. सहज एकदा त्यान्च्या खोलीत खेळता खेळता त्यान्ची डायरी तिच्या हाती लागली होती. त्यातील काही पानान्वरील कविता पहिल्यान्दा वाचताना तिला विश्वास बसला नव्हता. तीच्या परीने त्या कवितेतील शब्दान्चा अर्थ अन सन्दर्भ उमगला नसला तरी देखील दयाघनाची आर्त प्रार्थना लिहीणारे दादा अशा इतर कविताही लिहू शकतात किव्वा लिहीतात याचच तिला अधिक कुतुहल वाटल होत. मग एकदा दादाना तीने मोठी हिम्मत करून विचारल..
" दादा तुमच्या कविता का नाही आम्हाला शिकवीत " ?
श्रीयाचा खोडसरपणा दादाना नविन नव्हता. त्यान्च्या कविता चोरून वाचल्या किव्वा तिने डायरीत पाहिल्या हे कबूल करण्यावेजी तिला असा उलट प्रश्ण करताना पाहून खर तर त्याना तिच जास्तीच कौतुक वाटल. त्या लहान पोरीवर काय रागवायच? अन त्यातून ती त्यान्ची लाडकी श्रीया होती.
" अग वेडे, या कविता काही शिकवायला नाहीत, त्या फ़क्ता वाचायला आहेत.. तू थोडी अजून मोठी झालीस की वाच, तुला आवडतील. "
आठ वर्षाच्या श्रीयाच त्या उत्तराने मात्र समाधान झाल नव्हत. इतर मुलीन्पेक्षा श्रीयातील ते वेगळे गूण दादाना कधी कधी चुट्पुट लावत. ज्या वयात इतर मुली खेळ, गाणी, रहाणे सहाणे, कपडे, शाळा या विषयात रमत त्याच वयात श्रीया मात्र तीच्या अवती भोवतीच्या व्यक्ती, निसर्ग त्यान्चे विविध गुण, वैशिष्ट्ये जाणून घेण्यात उत्सुक होती. त्या कोवळ्या वयातही दादान्च्या कवितेचा अर्थ लावण्याचे वेड तिला अधिक होते.

" दादा पण ही कविता अजून पुरी झाली नाही का... " ? श्रीयाने तरिही पुन्हा विचारलच होत..

तीच्या प्रश्णावर फ़क्त स्मित हास्य करत दादानी पुन्हा एकदा ती कविता स्वताःशीच वाचली..

" काळ्या टपूर शाईत ओघळली
त्यान्च्या काळीजाची नक्षी,
अखेरच्या भेटीत उडाले
शब्दान्चे गलबल पक्षी.

वेचून त्यान्ची नभांगणे
दिशान्चे गळले हात,
सन्दर्भांचे धृव विरघळले
शिल्लक उत्तर रात.

वचनांची भावपालखी
पेलतात अजून हे शहारे,
अनोळखी रेषात वसले
मेन्दीचे नवे निवारे.

सरणावर उद्या पेटतील
अनेक त्यान्चे जिव्हाळे,
ध्यास निजले राखेत जरी
मनात शिल्लक उन्हाळे.

ते येतील परतूनी पुन्हा
उजळतील चन्द्रवाटा...
...... "

श्रीया बेटी, ही कविता पुरी झाली की तुला नक्की सान्गेन. मलाही ध्यास आहे ती पुरी लिहायचा...

दादान्च्या डोळ्यात श्रीयाने त्या दिवशी प्रथमच एक हळवा ध्यास ओघळताना पाहिला होता.

(क्रमशः)


Lopamudraa
Tuesday, June 13, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त कविता.. तर खुप आवडली... (गलबल पक्षी...!!!)

Rupali_rahul
Tuesday, June 13, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कविता..... योग लवकर पुर्ण कर ना ही कथा...

Muktchanda
Friday, June 16, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग कथा खूप आवडली. पुढील भागाची आतुरतेने वाट बघते आहे

Yog
Monday, June 19, 2006 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ध्यास, ही खर तर मनाची एक अवस्था, जिथे आपल्या भोवतीच्या सर्व भौतिक, ऐहीक अन चराचराचा विसर पडतो अन फ़क्त एकाच विचारात मन गुन्तलेले असते अन कळत नकळत घडणारी प्रत्त्येक कृती ही त्या एका ध्यासानेच प्रेरीत झालेली असते, मग दृष्टीपथात असतो तो फ़क्त अन्त, त्या पर्यन्त पोचण्याची धडपड करायच बळ अपोआप येत अन त्या अन्ताच्या जवळ जाताना प्रवासात टाकलेल प्रत्त्येक छोट पाऊल देखिल मोठ होवून जात, प्रवासात वेचलेल्या सर्व बारीक सारीक गोष्टी महत्वाच्या होवून जातात, इतक्या की कधी सकाळी उठल्यावर एखाद्या व्यक्तीच्या हातच्या गरम चहाची गोडी कायमची जीभेवर रेन्गाळत रहाते अन मग तो एक घोट मिळाला नाही तर दिवस जणू सुरूच होत नसतो...
शलाकाच्या मनात असाच एक ध्यास निर्माण झाला होता. यावेळी आपल्या भावनाना न्याय द्यायचा, प्रेमाचा योग्य तो अन्त पहायचा अन त्या निमित्ताने कुठेतरी रजत अन स्वताच्या प्रेमकहाणीस एकप्रकारे न्याय मिळवून देण्याचा ध्यास तिला कधि लागला सान्गता येत नाही. अभी ने त्या दिवशी रिमी बद्दल प्रश्ण विचारला कदाचित तेव्हाच त्या ध्यासाच बीज रुजल होत, आणि कुठेतरी तिच्या मनात "yes, this is possible" हे शब्द घट्ट जमले होते.

रिमी ला नकार दिल्यानन्तर खर तर अभी आणि रिमी मधल नाजुक नातं सम्पल होत, प्रत्त्येक वेळी नन्तर तीच्यासोबत असताना कहाणि एकाच गोष्टीवर येवून थाम्बे अन त्यातून दोघान्च्या वाट्याला येणार थोड दुख्ख अन हताशपणा यातून सुटका व्हावी या भावनेने अभी कदाचित शलाकाकडे अधिक ओढला गेला, आपसूक, त्याच्याही नकळत.
प्रत्त्येक सरणार्‍या दिवसाबरोबर अन रोजच्या लहान सहान गोष्टीन्मधून अभी अन शलाका जवळ येत होते. सकाळी शाळेत जाण्यापासून, दुपारचे जेवण, एकत्र अभ्यास, बाहेर जाणे, weekends ना एकत्र काही plans करणे अन नाहितर मोकळ्या वेळेत निवान्त शलाकाच्या गझल्स कलेक्शन चा दोघानि मिळून आस्वाद घेणे.. शब्दात कधी व्यक्त न केलेल ते नात अन प्रेम दोघ अनुभवत होते. शलाकाची सकाळी दारावर पडणारी थाप अन रात्री तीच्या घरी गप्पा मारून पुन्हा निघताना अभीने म्हटलेले "Good Night!" , त्यान्च्या दिवसाचे उगवणे अन मावळणे जणू या दोन गोष्टीन्भोवती गुन्तले होते.
शलाकाने या नव्या कहाणीचा अन्त तिच्या वहित लिहूनच ठेवला होता, आता फ़क्त पाने उलटायची वाट पहायची होती. अभीला मात्र शलाकाच्या सहवासात नव्याने गवसलेल आपल अस्तित्व अन व्यक्तीमत्व तस नविन होत अन पहिल पाऊल उचलल असल तरी शेवटापर्यन्तचा प्रवास नविन होता.

ध्यास जसा मुद्दामून लावून घेता येतो तसा नो नकळतही लागतोच..

त्या दिवशी खर तर नेहेमीच्या वेळी अभी शलाकाच्या घरी गेला अन ती सलिल बरोबर बाहेर गेली आहे इतकच कळल. एरवी शलाका घरापासून दोन रस्ते ओलान्डून गेली तरी अभीला माहीत नाही अस झाल नव्हत अन आज अचानक त्याला न सान्गता ती गेली सुध्धा. त्याच्या चेहेर्‍यावरील राग, बेचैनी, चिन्ता, possessiveness सर्व प्रियाला, शलाकाच्या रुमीला स्पष्ट दिसत होत अन शलाका येईल तेव्हा इथे वादळ होणार याची तिला चाहुल लागली. खरच ते दोन तास जणू वादळापूर्वीची शान्तता अनुभवत होते.. शलाका घरी आली अन अभीचा लालबुन्द चेहेरा पाहून काय घडणार आहे याची कल्पना आली.

कुठे गेली होतीस..? काही सान्गून जाण्याची पध्धत? किती वेळ वाट पहातो आहे तुझी? हा सलिल कोण..? कुठे गेला होता तुम्ही? तुझा मोबाईल देखील बन्द होता? अभीचा बान्ध फ़ुटला..
अरे माझ ऐकून तरी घेशील का..? शलाकाच्या विनवण्या.
नको, कशाला तुला वेळ आहे का सान्गायला, अभी तीच काहिही न ऐकताच निघाला सुध्धा...
आता मात्र तीच्या डोळ्यात पाणी आल, तिने त्याला हाताला धरून खाली ओढल आणि रडक्या स्वरात विचारल,
why you miss me so much Abhi...?
तिच्या डोळ्यातील बान्ध आपल्या ओठात आडवत तो उत्तरला...
cause I can not live without you even for a minute.......
शलाका ने त्याला घट्ट मिठी मारली अन आजवर दोघ जे एकमेकास शब्दात उघडपणे बोलू शकले नव्हते, किम्बहुना जी गोष्ट उघड व्यक्त करायची गरज भासली नव्हती ते शब्द त्या घट्ट मिठीत कायमचे कोरले गेले. अभीचे ते शब्द शलाका ला अनपेक्षित नव्हते, पण असे अचानक अन सहज बाहेर पडतील याचे आशचर्य वाटत होते.
शलाकाच्या वहितील पुढचे पान आज अभीने उलटले होते अन त्या एका क्शणात तिच्या मागच्या सर्व कटू आठवणी, बोच, जखमा विरघळून गेल्या.
पण अभीच काय? नकळत शलाकाचा जडलेला ध्यास त्याला कुठवर नेणार होता? प्रेमाचा पहिला शहारा अनुभवताना तो जितका सुखावह वाटत होता तितकाच तो पेलण्याची ताकद अन जिद्द त्याच्याकडे होती?
मनाने शलाका त्याच्या बरोबर अनेक योजने चालून पुढे गेली होती तिथे शरिराने किती सोबत भोगली हे गौण होते पण त्या सुखद अन्ताचा तिच्या मनातील ध्यास अन शलाकाच्या सोबतीचा, प्रेमाचा, स्पर्शाचा नुकताच गवसलेला अभीच्या मनातील ध्यास. एकाच मिठीत दोन वेगेळ्या विश्वात रमलेल्या त्या जीवाना, कहाणीच्या पुढील पानान्वर हक्क सान्गणार्‍या वर्तमान अन भविष्यातील घटनान्ची फ़िकीर नव्हती. शलाकाची पुढील पाने " लिहीण्याची " जिद्द, विश्वास तर कुतुहलाने ती फ़क्त " उलटण्याची " अभीची ची ओढ, thats all mattered at that moment....


(क्रमशः)

Rupali_rahul
Tuesday, June 20, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, सगळे मनातले इतक्या अचुकपणे कसे शब्दात उतरवतोस रे...

Ninavi
Tuesday, June 20, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW! xxx xxx xxx xxx

Yog
Tuesday, June 27, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

5. क्षणभन्गुर.

From that moment on शलाकाच सम्पूर्ण आयुष्यच बदलून गेल होत अन पुढील प्रत्त्येक सहवास अन सोबतीत अभिषेक च्या स्पर्शात स्वताच शरीर, मन, अस्तित्व याचा तिला नव्याने उलगडा होत होता. अभिषेक च्या मनात मात्र कुठेतरी एक छोटीशी भिती कायम होती, त्याची आई. आईब्बदल प्रचन्ड प्रेम अन कायम काळजी मनात बाळगून शलाकाच्या प्रेमाला प्रतिसाद देताना कधि कधि हात आखडता घेतला जात असे अन मग स्वताःच मनाला समजवायचे.

लहानपणीच अभिषेक चे वडील गेले तेव्हापासून त्याच्या आईने त्याला अन त्याच्या बहिणीला तळहातावरील फोडागत जपलेले. अनेक कष्ट, रोजची नोकरी अन शिवाय इतर छोटे मोठे घरगुती उद्योग करत वडिलान्च छत्र नसलेल्या त्या चार भिन्तीतून तिने एक छोट गोड कुटुम्ब उभ केल होत. स्वताच्या सर्व इच्छा, आकान्क्शा, सुख सोयि, सुविधा बाजूला ठेवून हाती असलेली दोन मुले घडवण्यात तिच्या आयुष्याचे सोनेरी दिवस कधिच उलटून गेले.
अभी वयात आला तेव्हापासून त्या कुटुम्बासाठी आपल्या आईने खाल्लेल्या खस्ता, सोसलेले जाच, अवेळी प्रसन्गातून केलेला प्रवास, सर्व तर त्याने आपल्या डोळ्याने पाहिल होत. कुठलीही गोष्ट करताना आईच्या सुखाचा विचार मनात सहज येत असे. इतर मुलान्सारखे कधि दिवाळित फ़टाक्याचा हट्ट करायचा नाही, कधि पॉकेट्मनी साठी पैसे मागायचे नाहित, स्वताच शिक्षण घेताना छोट्या मोठ्या शिकवण्या करत इतर खर्चाचे पैसे जमवायचे, स्वताच्या चैनीला मुरड घालायची हे तर अगदी त्या वयापासून त्याच्या अन्गात मुरलेल. ते सर्व करता करता अन बहिणिच लग्न पार पाडताना अभिषेक त्या घराचा एक जबाबदार पालकच होवून गेला. इतकी वर्ष धड्पड करत स्वताच आयुष्य अन भविष्य स्वताः घडवत असताना सुखाचे चार दिवस वाट्याला आले ते परदेशात गेल्यावरच. जणु एखाद्या खोल गर्तेत अडकून पडल्यानन्तर अचानक उन्च डोन्गर गाठून जाण्याची पायवाट समोर असल्यागत परदेशात उच्चशिक्षणाच्या निमित्ताने समोर अनेक सन्धि दिसत होत्या.
अन तरिही कुठेतरी आईचा विचार, काळजी कधिच सम्पत नव्हती.
अभी रोज रात्री डोळे मिटून काय प्रार्थना करतोस रे? असे एकदा शलाकाने सहज विचारले होते. अर्थात त्यावर त्याने दिलेल्या उत्तराने खर तर ती पुरती हबकली होती अन अभीच्या जीवनात त्याच्या आईच स्थान हे इतर सर्व गोष्टीन्पेक्षा वरच आहे याची तिला जाणिव झाली.
काही नाही ग, i just remember my mom and pray to god that give me all her pain and sorrow and keep her happy.
त्याच्या उत्तराने तिच्या डोळ्यात पाणिच आल होत, आईबदलचा त्याचा आदर अन प्रेम याबद्दलच कौतुक पण कुठेतरी आपल्या इतका जवळ असूनही मनाने स्वताच्या आईत इतका गुन्तलेला याबद्दल थोडी असुया. त्याच्या बद्दल, त्याच्या प्रत्त्येक गोष्टिबद्दल वाटणारा possessiveness, insecurity या सर्वाच कुठेतरी थोडस दडपण.
अभीला खात्री होती त्याच्या प्रेमावर, अन विश्वास होता की आजवर त्याने कसलाच हट्ट केला नाही तेव्हा त्याच्या आयुष्यातील ही एक गोष्ट आई कधिच नाकारणार नाही.

शलाका, आईला पटल नाही तर...? त्याने एकदा सहज बोलून दाखवल होत.
अभी मि त्याना समजावून सान्गेन, i will convince her की मला फक्त एक सन्धी द्या, बघ आई नक्की ऐकेल.

त्या उत्तरात अभीसाठी एक भितीयुक्त दिलासा होता अन शलाकासाठी एक अट्टहास!


Yog
Tuesday, June 27, 2006 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पपा पण माझ ऐकून तर घ्या..
गेल्या वेळची गोष्ट वेगळी होती. रजत पन्जाबी कुटुम्बातील मुलगा होता, त्यान्च्या अन आपल्या घरातील चालिरिती पध्धती सर्व वेगळ आहे हे मलाही जाणवल होत. पण अभीच्या बाबतीत तेही नाही.
पण तरिही त्यान्ची जात आपल्यापेक्षा वरची आहे पोरी. त्यान्च्या घरी चालेल का..? तुला माहितच आहे मला आबाना अन इतराना उत्तर द्यावे लागेल...
पपा तुम्ही देखिल आबान्चे सर्व नियम बन्धने झुगारून शहरात आलात. आबान्च्या मागे हातात नान्गर धरून वडिलोपार्जीत शेती चालवायला तुम्ही नकार दिलात अन शहरात येवून स्वताच विश्व उभ केलत मग तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला योग्य वाटेल तेच केलत अन आज मात्र मला तुम्ही माझ्या इच्छेविरुध्ध करायला सान्गता आहात? हा कुठला न्याय? तुमच्यावरील प्रेम अन आदराखातर मि खर तर आजवर अनेक गोष्टी मनाविरुध्ध केल्या, पण यावेळी नाही पपा. मला फ़क्त थोडा वेळ द्या, I am sure things will work out fine!

तू काय म्हणते आहेस ते कळतय मला बेटा पण आम्हाला तुझी काळजी आहे, उद्या अभीच्या घरून विरोध झाला तर? उभ आयुष्य अस विरोधात काढण सोप नाही पोरी अन या सर्वात अभिषेक तुझ्या बरोबर उभा राहील का?
पपा त्यालाही वेळ द्यायला हवा ना, तुमच्या सारखेच कदाचित त्याच्याही घरच्यान्चे प्रश्ण असतील...
lets wait...
आपली पूर्विची शलाका आता बदलली आहे, थोडी matured झाली आहे या भावनेने पपना कुठेतरी आनन्द होत होता पण या नाजुक गोष्टी झेलण्या पेलण्याची ताकत अजून तिच्यात आहे वा नाही याबद्दल त्याना चिन्ता होती.

ठीक आहे, बेटा, आम्हाला अभीबद्दल काहीच हरकत नाही, पण एकदा त्याच्या घरच्यान्ची रीतसर सम्मती मिळाली की आम्हि सुटलो.
शलाकाने पपाना हळुच एक मिठी मारली. खूप खूप काळ लोटल्यावर आज पुन्हा एकदा तिला पूर्वीचे पपा गवसले होते. ती लहान असताना ते ऑफ़िसमधून येईपर्यन्त ती वाट बघत असे अन घरी आले की त्यान्च्या पायाला मिठी मारून आज काय खाऊ आणलात म्हणून हट्ट करत असे. आज जणू पुन्हा तसाच तिचा हट्ट त्यानी पुरवला होता.

शलू, पपाना तुझी काळजी वाटते अन मला तर वेगळीच चिन्ता आहे. रागावू नकोस पण एक विचारते, तू आणि अभी एकमेकाच्या खूप "जवळ" आहात का? तू आता मोठी झाली आहेस पण मुली, बाईचा जन्म अवघड असतो, जपून रहा.

त्या रात्री आईचे ते शब्द तिच्या मनात घुटमळत राहिले अन अभी बरोबर खूप पावले पुढे चालून गेलो आहोत याची नव्याने जाणिव झाली...
पुन्हा परत सुट्टी सम्पवून शाळेत जावू तेव्हा अभीच्या कुशित तिला अनेक प्रश्णान्ची उत्तरे शोधायची होती.

.....
.....

अभिषेक हे काय करून बसलास? तुझ्याकडून माझ्या खूप वेगळ्या अपेक्षा होत्या, आहेत. शलाका आपल्या जातीतली नाही हे तुला महित होत ना? मला ते पटत नाही हेहि तुला माहित आहे, मग तरी का?
आई मि तस शलाका ला सान्गितल होत आधी की तुला या गोष्टी पटत नाहीत, पण मुद्दा वेगळा आहे. आज तीच मुलगी आपल्या जातीतली असती तर तुला पसन्त पडलीच असती ना? मग केवळ त्या एका कारणासाठी तिला नाही कस म्हणणार? प्रेम काय जात बघून करता येत का? व्यक्तीच्या स्वभाव, गुणधर्माची काहीच किम्मत नाही का? तिच्यावर तिच्या आईवडीलानी चान्गलेच संस्कार केले आहेत ना का इत्तर जातीचे आई वडील तसे करत नाहीत? आणि आम्च काही उथळ प्रेम नाहीये, आज शलाका योग्य सहचारीणी वा सून आहे किव्वा नाही याचा पुरावा नाही देता येणार पण तो एक विश्वास आहे, जिवन्त अनुभव आहे अन त्या विश्वासावर सर्व कायम आहे. माझ्या विश्वासावर तुला खात्री असेल इतकीच माझी अपेक्षा होती.

ते मला माहित नाही अभी, ती तुझ्या योग्य नाही. गेल्या वेळी तू तिची भेट करून दिली होतिस तेव्हाच मि ओळखल होत की काहितरी गडबड आहे पण केवळ तुझ्यावर विश्वास होता की तू अस काही करणार नाहीस म्हणून मि बोलले नाही. पण now its too late.... जर मला आवडणार नाही हे तुला माहित होत तर आता माझ मत घेवून काय फ़ायदा?

तस नाही ग मला तुला दुखावता येत नाही, पण माझी ही एकच गोष्ट तू समजून घेशील अस वाटल होत...

त्या दिवशी कदाचित वडिल असते तर या एका विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी आल. कदाचित वडिलानी आईला हक्काने, रागावून, प्रेमाने काहीही करून समजावल असत. आपण आजही आईला दुखावू शकत नाही किव्वा हक्काने तिच्यावर रागवू शकत नाही याची त्याला पूर्णपणे जाणिव झाली होती. अचानक इतके दिवस सहज साध्य वाटणारी गोष्ट अप्राप्य भासू लागली.
खर तर का नको, का नाही, या सारख्या प्रश्ण उत्तरातून काही निष्पन्न होणार नव्हत कारण शेवटी आईच मन आपण कुठल्याही परिस्थितीत अन कुठल्याही किमतीवर दुखावू शकत नाही याची जाणीव झाली तिथेच, स्वप्न अन सत्त्य यातील सीमारेषा स्पष्ट झाल्या होत्या.

...
...


सुट्टी सम्पवून शलाका परत आली अन कधि एकदा अभीला भेटून आपल्या आई पपान्ची सम्मती कळवते या विचाराने अधीर झाली. एक आठवड्याने अभी परत आला ते सात दिवस जणू सात युगे लोटल्यागत भासले तिला, कधिही त्याची इतकी आतुरतेने वाट तिने पाहिली नसेल.

अभी, पपाना मी समजावलय, आई पपा तुझ्या उत्तराची वाट बघत आहेत. तुझी आई काय म्हणली?
शलाका, आपण इथेच थाम्बूया. आई यासाठी कधिही तयार होणार नाही अन सर्वपरीने आपण एकमेकास योग्य असलो तरी तिच मन दुखावण्याइतक बळ माझ्यात नाही. आज मला इतकच माहित आहे, पुढे काही वेगळ घडू शकेल याची शाश्वती नाही अन त्या प्रवासात तूच जास्त भरडून निघशील. काय करू, दोन प्रीय व्यक्तीन्च्या पैकी एकीचा आनन्द निवडावा लागेल अस कधीच वाटल नव्हत... and when that moment came, I realised what I will choose... मला माफ़ कर!
अभी त्या क्षणी कशा परिस्थितीत अडकला आहे अन त्याला किती यातना होत असतील हे फ़क्त शलाकाच समजू शकत होती... afterall, she had come to face the same moment back in time... only this time, she was a mute spectator!
कदाचित नियतीने हा तिच्यावर उगवलेला सूड असावा, रजत च्या भावनान्ची अशी परतफ़ेड करायची होती?

why me...? कदाचित हा प्रश्ण त्यावेळी दोघान्च्याही मनात कायम होता...

उन्हाळ्याच्या दिवसात त्या रात्री अवेळीच पाऊस दाटून आला अन कडाडणार्‍या वीजान्बरोबर नुसता धो धो बरसत राहिला... त्या वीजान्च्या लखलखाटात समोर सर्व अधिकच अन्धुक होत होत. अभीच्या मिठीत त्या दिवशी तिच्या मनातील अट्टहास असाच फ़ाटून बरसत राहिला, मूक, पण अनेक सवाल जवाबान्ची बरसात करणारा...


Yog
Tuesday, June 27, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते क्षण अन आजचा एक क्षण, ते अनुभव आज फ़क्त एक यादी बनून राहिले. हो यादीच! अपार्ट्मेन्ट सोडून शेखर कडे जाताना गेले वर्षभर अभीच्या सोबतीचे क्षण अन घडलेल्या घटनान्ची शिल्लक यादी मान्डीवर घेवून ती एकटीच बसली होती.
केसाच्या हेयरपिन सेटपासून भिन्तीवरील एका पेन्टिन्गपर्यन्त सर्व सर्व गोष्टी तीच्या अवतीभोवती जमल्या होत्या, प्रत्त्येकाची एक कहाणी..
"अभी जरा केसाला पिन लाव रे माझे हात कणकेत माखलेत", स्वैपाक करताना तिने केलेल्या त्या विनवणीवर त्याचे ते लडीवाळपणे जवळ येवून तिच्या केसाना कुरवाळत जवळ घेणे..
शलाकाच्या मर्जीविरुध्ध त्याने तीला घेतलेला लो नेक टि ईशर्ट अन वर तो घालून ति लाजताना तिच्या नकळत काढलेला फोटो..
त्यान्नी एकत्र केलेल्या सहलीन्चे अलबम्स..
पूल च्या खेळात दोघानी पैज लावून जिनकलेल्या वस्तू..
कधिही न चुकता रोज Friends चे एकत्र वेचलेले भग अन संवाद..
कधि या ना त्या पार्टीच्या निमित्ताने त्यन्च्या आव्डत्या धूनेवर एकमेकान्च्या मिठीत हळुवार्पणे झुलवलेल्या काही स्टेप्स.. "तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा"..
स्वताच्या savings मधून शलाकाची आवडती घेवून दिलेली सायकल..
प्रेमाच्या नव्याने बहरलेल्या प्रत्त्येक ऋतू ची साक्ष असणारी कुन्डीतील वेली अन रोपे..
अभीचे नाजुक स्पर्श वेचलेले गाऊन्स, अन अजून बरेच काही....

त्या अपार्ट्मेन्ट मधे, एकटीच ते सर्व क्षण गोळा करताना ती पार घुसमटून गेली. घरातील प्रत्त्येक चीज, वस्तूत, अन भिन्तीत त्यान्च्या प्रेमाचा ओलावा कायमचा मुरला होता. अजूनही आपण हे सर्व सोडून शेखर कडे जात आहोत यावर विश्वास बसत नव्हता.
दरम्यान खूप काळ सरला होता पण ते क्षण अजूनही मनात जिवन्त होते.. अगदी जसेच्या तसे..
.. त्या दिवशी अभीने दिलेले उत्तर त्यानन्तर काढलेला रखरखित उन्हाळा.... नकळत पुन्हा आई पपाना दुखावल्याची बोच... पपान्ची खरी ठरलेली भिती, प्रत्त्येक वेळी पुन्हा अभिशी बोलतना, त्याच्या सोबतीत राहताना स्वताच्या अस्तित्वाबद्दल वेचलेले प्रश्ण... सरत्या काळाबरोबर त्यान्च्यात वाढलेला ताण, दुरावा.. अभीने आईला समजावायला पुन्हा पुन्हा केलेली धडपड... त्यातून होरपळलेल त्यान्च प्रेम.. दर वेळी नव्याने मनात उभारी घेणारी स्वप्ने.. आज ना उद्या सर्व ठिक होईल हि एक वेडी आशा.. फ़क्त एका सन्धिसाठी सोसलेल दुख्ख.. अभीबरोबर त्याच्या परिवारात कधिही एका छताखाली राहता येणार नाही याची बोच अन या सर्वातून कुठेतरी गमावलेला स्वतावरील विश्वास.. हळू हळू काळ सरत होता तशी शलाकाच्या वाढत्या वयाची आई पपाना लागलेली काळजी.. त्यातून मग हो नाही करता करता शेखर च आलेल स्थळ. शरिराने अन मनाने खर तर अभीपासून कधिही स्वतःला दूर न करू शकणार्‍या शलाकाच मग शेखर ला भेटण अन अगदी ऐन मोक्याच्या वेळी पुन्हा फ़िरून नियतीने खेळलेला एक डाव..
शेखर ला भेटल्यावर त्याच्याशी साखरपुडा करायच निश्चित ठरल तेव्हा न राहून तिने अभीला केलेली मेल, I am getting engaged..
त्या रात्री अभीचा आलेला अनपेक्षित फोन.. शलाका, आईने शेवटी होकार दिलाय, आता फ़क्त तुझ्या आई पपान्शी भेटून सर्व ठरवुया..
त्यावर शलाकाच्या वडीलानी दिलेल उत्तर.. अभिषेक तू खूप उशीर केलास, आता सर्व ठरल आहे, दोनच दिवसात साखरपुडा होईल, शल्का कशिबशी सर्वातून सावरलीये तिला शेखर आवडलाय, ते कुटुम्ब सर्व परिने योग्य आहे, तेव्हा एकच विनन्ती करतो "आता यावेळी तिचे पाय ओढू नकोस".. she has decided to move on please help her...
तयवर अभीची विनवणी, पपा मला शलाकाशी बोलाय्च आहे..
शलाका is this true, that you have liked him and you have decided to move on...?
Yes !!!!
please shalu , नीट विचार कर.. इतके वर्ष याच साठी आपण झगडत होतो अन आज हा एक क्षण पुन्हा आपला आहे तो असा वाया घालवू नकोस.. please..
नाही अभिषेक, मि विचार केला आहे, shekhar is nice guy, our families like each other.. I am moving on...

शलाकाच उत्तर ऐकल तेव्हा त्यान्च्यात उरलेला तो एक सुन्न क्षण अन तो व्यक्त करण्यास न उरलेले शब्द.

Good Luck ! अभीने ने फोन ठेवला.
That was the last word they shared.....

सर्व सर्व आज तीच्य डोळ्यासमोर पुन्हा उभ होत. शेखरकडे जाण्याआधी घराच्या भिन्ती बरेच काही बोलू पहात होत्या अन त्या सर्व आठवणीना अन वस्तूना गुन्डाळून बन्द करून त्यान्ची वासलात लावायची होती, प्रश्ण इतकाच होता की वस्तू फ़ेकून दिल्या तरी ते क्षण सम्पणार होते का..?
अभीने दिलेली एक फोटो फ़्रेम बराच वेळ स्वताच्या हृदयशी घट्ट धरून त्या ओक्या घरात ती एकटीच बसून राहिली. जणू पुन्हा एकदा तो काळ घट्ट मिठीत पकडायचा होता.

अभी तर कधीच निघून गेला होता.. कधि कुठे, केव्हा, काहीच पत्ता नव्हता. शेखर शी लग्न ठरल्यावर शलाकाची फ़क्त एकच अपेक्षा होती, अभीशी एक शेवटचा रीतसर निरोप, त्याच्या मिठीत शेवटचे काही शब्द सान्डायचे होते पण may be it was too much to expect !! अभी कायमचा दूर गेला होता उरले होते फ़क्त काही क्षण..

मॅडम, ते अमेरिकेतून तुम्हीच आला आहात ना? दादा वाट पहात आहेत!
आश्रमातील त्या शान्त परिसरात ते शब्द ऐकून ती भानावर आली, एखाद्या स्वप्नातून कुणितरी आपल्याला हलवून जागे करावे तशी.

ते सारे क्षण सम्पले होते अन ज्याची ती आतुरतेने वाट पहात होती ते क्षण आज येवून ठेपले होते. ती हळूच उठली अन दादान्च्या खोलीची वाट चालू लागली.

(क्रमशः)


Maitreyee
Tuesday, June 27, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे शेवटचे काही भाग 'हा माझा मार्ग एकला' मधून घेतल्यासार्खे वाटले :-)


Yog
Tuesday, June 27, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

6. मुक्त.

दादान्च्या खोलीचा दरवाजा तसा थोडा उघडाच होता. शलाका आत शिरली. खोलित अगदी मोजकेच सामान आणि वस्तू पण सर्व नीट नेटक्या लावलेल्या. एक छोटासा शुभ्र चादर घातलेला पलन्ग, टेबलवर येणार्‍या ज़ाणार्‍यान्ची नावे ठेवलेली नोन्दवही, एका कोपर्‍यात जमवून ठेवलेली काही पुस्तके, खेळणी, आणि वार वेळ दिवसाचा हिशेब ठेवणारे एक घड्याळ अन कॅलेन्डर. पायर्‍यान्वर पुन्हा तीच शुभा फ़ुले अन एक मन्द सुवास.
त्या छोट्याश्या चार भिन्तीतही एखाद वेगळ व्यक्तीमत्व रहात असल्याचा एक भास होता. या आश्रमासाच्या निमित्ताने त्याचे चालक दादान्बद्दल तिने ऐकल होत इतकच पण कधि भेट झाली नव्हती.

"दादा, तुमच्याकडे कुणितरी काकू आल्या आहेत.." तेथेच जमिनीवर मान्डी घालून काहितरी वाचनात मग्न असलेल्या श्रीयाने दादाना हाक मारली.
बाथरूम मधून तोन्ड धुवून दादा बाहेर आले अन इतके वर्ष एकही शब्द न बोलता निघून गेलेल्या अभीला तसे समोर उभे पाहून शलाका आवाक झाली.

अन्गावर एक सफ़ेद कुडता लेन्गा, हातात शुभा उपरणे, डोळ्यान्वर चढवलेला बारीक फ़्रेमचा काळा चष्मा, अन सम्पूर्ण व्यक्तीमत्वातून प्रकट होणार प्रेम, शान्ती, अन समाधान.

अभी तू....? शलाकाच्या तोन्डचे तेव्हडेच शब्द.

त्याच्या फ़क्त एका हाकेने कदाचित त्यावेळी तिचे सर्व बान्ध फ़ुटले असते. स्वताला कसे बसे सावरत ती फ़क्त बसून राहिली.

दादानी श्रीयाला नेहेमीच्या लाडाने विनवले..
बेटा जा मिथिलेश ला सान्ग मावशी आल्या आहेत चहा पाणी पाठवून दे.

समोरच्या खुर्चित बसलेल्या बाईन्च्या डोळ्यातील पाणी श्रीयाच्या नजरेतून लपल नव्हत अन या कोण मावशी? हा एकच प्रश्ण मनात येत होता.

हो सान्गते म्हणून ती बाहेर गेली.

दादा शान्तपणे पलन्गावर बसले. त्या छोट्याश्या खोलीतही जणू अनेक युगान्च अन्तर दोघान्च्यात कायम होत.

"शलका तू इथे काय करते आहेस"?

इतक्या वर्षानी अस अचनक भेटल्यावर अभिषेक ला फ़क्त एव्हडच विचारायच होत? किती प्रश्ण होते तिला. किती गोष्टी पुन्हा बोलायच्या होत्या, मोकळेपणाने सर्व फ़क्त सान्गायच होत, अन अभीचा फ़क्त एकच प्रश्ण. तीचा पूर्वीचा अभी खरच खूप बदलला होता, मन मानत नव्हत पण सत्त्य समोर होत.
well , कशासाठी येणार? माझी मानसकन्या इथे आहे तिला न्यायला आले आहे, तुला माहित आहेच, एखाद्या मुलीला दत्तक घ्यायच माझ स्वप्न होत, अजूनही आहे.
म्हणजे श्रीयाला तू दत्तक घेणार आहेस? दादान्चा आवाज आता मात्र गहिवरला.
श्रीया? कोण श्रीया?
आत्ताच तर तुझ्यासमोर होती इथे..
ओह! ती..... आणि नाव काय म्हणलास, श्रीया?

आता मात्र तिचा बान्ध फ़ुटला... ती पूर्णपणे कोसळली.

(अभी, माझ एक स्वप्न आहे, मुलगी दत्तक घेण्याच.. माझ्या आयुष्यात मि जेजे करू शकले नाही, ते सर्व तिला उपलब्ध करून देण्याच. मला तिच्यातून पुन्हा एकदा स्वतःला जगायच आहे, तिला मि फ़ुलासारख जपीन, वाढवीन, अन कुठलेही कुम्पण न घालता मुक्तपणे तिला आयुष्याचा आनन्द उपभोगून देईन. जे माझे आई पपा करू शकले नाहित ते तिच्यासाठि सर्व आपण करु.. ती आपली मुलगी असेल, आपल्या रक्ताची नसली तरी आपल्या प्रेमाची, आपल्या स्वप्नान्ची. समाजाने निराधार केलेल्या अशा मुलीला मला एक नविन अस्तित्व द्यायच आहे.. आपला एक छोटस सुखी कुटुम्ब, तू, मि आपला मनु, अन आपाळि बेटि श्रीया.
माझ स्वप्न पुरवशील ना रे..?
त्या रात्री शलाकाच्या डोळ्यात श्रीयाचा जन्म अभीने बघितला होता अन तिच्या त्या भावनेचा आदर अन कौतूक त्याच्या होकारार्थी स्पर्शातून तिने अनुभवल होत.)

तोच अस्श्वासक स्पर्श अन तोच जिव्हाळा पुन्हा तिच्या सोबत होता. तिचे अश्रू पुसत दादानी तिला समोर बसवले.
काय सान्गू, कुठून सुरुवात करू? तू सोडून गेलीस अन सर्व एकाच क्षणात सम्पल.
पाटल तुला भेटाव, विचाराव, उत्तरे मागावीत, आपल्या घरच्याना जाब विचारावेत पण त्या सगळ्याला काय अर्थ होता? माझा निर्णय मि घेतला होता अन तू तुझा, उरल होत फ़क्त जर तर.
खूप काळ गेला, माझ एकट रहाण आईला पहावेना अन तिच दुख्ख मलाही कळत होत. तिच्या सुखात स्वतःला पूर्णपणे हरवून टाकल, तिला आवडलेल्या मुलिशी लग्न ठरवल तरिही मनातील शलाका सापडत नव्हती, प्रत्त्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून शलाकाचा ध्यास जन्म घेत होता, कितिही मन मारून जगायच ठरवल तरी वाट्याला होरपळच येणार होती, लग्न मोडल, अन नन्तर जीच्यासाठी माझ्या सुखाच्या व्याख्या बदलून टाकल्या ती आई हे जग सोडून मला कायमच एकटी सोडून निघून गेली. तिच्या मृत्त्यूने जणू सर्व संसाराची आसक्तीच सम्पली, कसल्याच भोगाची वान्चना अन सुख दुख्खाचा ध्यास उरला नाही. पण एक बोच शिल्लक राहिली, आयुष्यातील आपल्या प्रिय व्यक्तीना दुखावल्याची, त्याना सुख न देवू शकल्याची. आयुष्यभर माझ्यासाठी खपलेली माऊली, माझ्यावर आईइतकच जीवापाड प्रेम केलेली शलाका अन एका निष्पाप मुलीच्या वाट्याला आलेल लग्नमोड. स्वतःला कुठेतरी दूर एकान्तात नेवून सोडल असत तरी ती बोच सम्पणारी नव्हती. ही कहाणी मिच लिहिली होती का कुणी माझ्यासाठी आधीच लिहून ठेवली होती माहीत नाही पण तशातच "बाबा" भेटले, जीवनाचे श्रेयस आणि प्रेयस यातून सत्त्याचा मार्ग चालण्याची हिम्मत आणि दृष्टी त्यानी दिली, अन मनःशान्तीच्या त्या मार्गावर चालताना हा आश्रम उभा राहिला. एकच ध्येय शिल्लक होत, एखादी तरी श्रीया घडवण्याच. पण बाबानी सान्गितल तसाच हा मार्ग अजूनही खडतर होता कारण प्रत्त्येक श्रीयातून एक शलाका नव्याने भेटणार होती. नव्हे तर माझी श्रीयाही तशीच आहे हट्टी, मानी, पण तितकीच संवेदनाशील, दुसर्‍यावर जीव ओतणारी.
अन आज ती श्रीया देखिल तूझ्याबरोबर दूर जाणार...
कदाचित हाच मुक्तीचा मार्ग "बाबा" नी रचला असावा. एखादी गोष्ट विसरून, दूर करून किव्वा नष्ट करून त्यातून मुक्ती मिळत नसावी तर ती गोष्ट पूर्णपणे घडवून जोपासून स्वताच्या हाताने त्याच केलेल दान.
तुझी श्रीया, आपली श्रीया तुला परत देत आहे.. यात मान नाही, खूप शान्ती आहे, आजवरची वाटचाल सफ़ल झाल्याच समाधान आहे. शलाका, श्रीयाला अजून खूप घडवायच आहे, आपल स्वपन तुला पुर करायच आहे, मला खात्री आहे तू ते करशील.

इतक्यात श्रीया आत आली.. दादाना डोळे पुसताना बघून त्याना मिठी मारत विचारल,
दादा काय झालं?
काही नाही बेटी आजपासून तू या मावशीबरोबर रहायच आहेस, ती तुला न्यायला आली आहे, तिच घर छन मोठ आहे, खूप लाड करेल तुझे अन माझ्यापेक्षा जास्त प्रेमही देईल. मी अधून मधून येत जाईन भेटायला.
श्रीया दादान्च्या पायाला घट्ट मिठी मारून "मि नाही जाणार" म्हणून रडू लागली.

अभी आणि शलाकाच्या त्या हट्टी श्रीयाला दुसर कोण समजावू शकणार होत? शलाकाने हळूच तिच्या केसान्वरून हात फ़िरवला अन तिला आपल्या कुशीत घेतल. तिच छोट कुटुम्ब पूर्ण झाल होत मनू, श्रीया अन अभी.

आश्रमातील सर्व कागदपत्रे अन सोपस्कार आटोपून शलाकाने दादान्चा निरोप घेतला. अनेक वर्षे राहून गेलेला निरोप घेताना आज सुख आणि दुख्ख दोन्ही तिच्या पदरात होते. अगदी मनात जपलेली जशीच्या तशी श्रीया अन आनन्दाने तिला शुभेच्छा अन निरोप देणारा अभी. Good Luck! अभीचे आजचे प्रेमाचे ते दोन शब्द तिच्या पुढील संसारासाठी पुरेसे होते, हवेसे होते.
जाण्या आधी दादानी हळूच श्रीयाच्या हातात एक डायरीचे पान दिले अन म्हणले, बेटी मि तुला काय देणार? ही एक छोटीशी आठवण, तुला सान्गितलेली चन्द्रवाटान्ची कविता पूर्ण केली आहे बघ. मावशीला वाचून दाखवशील ना?

विमानात श्रीयाच्या हातात दादानी दिलेला कागद शलाकाने कुतुहलाने पाहिला..

चन्द्रवाटा.

काळ्या टपूर शाईट ओघळली
त्यान्च्या काळीजाची नक्षी,
अखेरच्या भेटीत उडाले
शब्दान्चे गलबल पक्षी.

वेचून त्यान्ची नभांगणे
दिशान्चे गळले हात,
सन्दर्भांचे धृव विरघळले
शिल्लक उत्तर रात.

वचनांची भावपालखी
पेलतात अजून हे शहारे,
अनोळखी रेषात वसले
मेन्दीचे नवे निवारे.

सरणावर उद्या पेटतील
अनेक त्यान्चे जिव्हाळे,
ध्यास निजले राखेत जरी
मनात शिल्लक उन्हाळे.

"तू येशील परतूनी
माळून भरतीच्या लाटा,
नौकेस परी उमगले
बुडतात चन्द्रवाटा"!

शलाकाने पुन्हा हळूच तो कागद निवान्त झोपलेल्या श्रीयाच्या हातात ठेवला अन तिला आपल्या कुशीत घेतले, कायमचे, पुन्हा कधीच न सोडण्यासाठी.

त्यान्च्या चन्द्रवाटान्चा लपन्डाव आज सम्पला होता.



समाप्त.



Lopamudraa
Wednesday, June 28, 2006 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या रात्री शलाकाच्या डोळ्यात श्रीयाचा जन्म अभीने बघितला होता अन तिच्या त्या>>>naukes paree umagale budataat chandra vaataa..cha.ndravaataa >>>> chaan ihilay!!!

Jyotip
Wednesday, June 28, 2006 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग खुप सुरेख़.. आणी कविता तर मस्तच

Maudee
Wednesday, June 28, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ख़ूपच सुरेख़,अप्रतिम.....
छान लिहिलय सगळं:-)


Rupali_rahul
Wednesday, June 28, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, एक अप्रतिम कथा...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators