Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » झुळूक » Archive through May 23, 2006 « Previous Next »

Jaaaswand
Tuesday, May 23, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या माझ्या भेटीं सखे
शब्दांतरीच्या चारोळ्या
आता स्तब्धतेतच उरतात
राईतल्या त्या आरोळ्या

जास्वन्द...


Princess
Tuesday, May 23, 2006 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सानिया छान लिहितेस.... पहिल्यांदा लिहितेस वाटतच नाही. लिहित राहा.


Devdattag
Tuesday, May 23, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते भेटणे राईतले
अन श्वास अब्द अब्द
मी अन तू
उरती फ़क्त शब्द


Shyamli
Tuesday, May 23, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा राजे उगवले का?
कुठे झाली म्हणायची स्वारी?

बाकी मंडळी छान चालुये


Rmd
Tuesday, May 23, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्द तरी उरले कुठे
अन उरले कुठे श्वास
राइमध्ये राहिले आता
आपले फक्त आभास...


Vaibhav_joshi
Tuesday, May 23, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह .... मस्तच
सुरेख चाललंय


Jaaaswand
Tuesday, May 23, 2006 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लय भारी रे देवा..

राईतल्या भेटींत तुझे
श्वास मोजले आहेत मी
माझेही घे..पण येऊन जा
चार दोन रोखले आहेत मी


जास्वन्द...


Devdattag
Tuesday, May 23, 2006 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तो आभासही
जगण्यासाठी श्वास आहे
भेटणे नाहिच सत्य
तरीही वेडी आस आहे


Devdattag
Tuesday, May 23, 2006 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये बात.. मजा येतोय.. और आने दो..
वैभव.. श्यामलि व्हा जॉइन


Jaaaswand
Tuesday, May 23, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय श्यामली, वैभव...
काय म्हणताय..

श्यामली काहि नाही ग... स्वारी सद्ध्या soccer mania मधे दंग आहे :-)

आज मी तोडून पाश
माझ्या मधेच धुंद आहे
कोरडे केले मी मन तरी
तीची आठवण कुंद आहे

जास्वन्द...


Rmd
Tuesday, May 23, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदाच भेट व्हावी तुझी
अजून काही मागणे नाही
तुझ्याविना श्वास थांबले
तुझ्याविना जगणे नाही





Devdattag
Tuesday, May 23, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समजाव रे अपुल्या दिलाला
आता असेच आहे व्हायचे
पाअश तोडले कितीही
मन त्यातच आहे गुंतायचे



Sania
Tuesday, May 23, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे वळून पाह्ताना
आज प्रथमच जाणवले
धावताना शर्यतीत आयुश्याच्या
जगणेच राहून गेले


Shyamli
Tuesday, May 23, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राईतल्या भेटी अश्या ह्या
घडल्याच का नाही पुन्हा?
ऊतरले शब्दात नाही
हा असे का माझा गुन्हा?

श्यामली!!!


Devdattag
Tuesday, May 23, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ऐसे नाहिच की
आम्ही पुन्हा ना भेटलो
फक्त भेटलो आम्ही असे की
पूर्वी कधी ना भेटलो


Vaibhav_joshi
Tuesday, May 23, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ... देवा !!!
RMD मस्तच ...
श्यामली ... जास्वंद .. सानिया ... सुटलायत सगळे


Lopamudraa
Tuesday, May 23, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,जया,पूजा,रुचिता,प्रिन्cएस....... काहितरिच तुमचे...!!!!

देवदत्त,श्यामली... जास्वंद....सनिया, रुप..
अहा.. हा...!!! टाळ्या.... बर का!!!


Jaaaswand
Tuesday, May 23, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



व्वा देवा, श्यामली, सानिया, रूपा :-)

प्रत्येक वेळी नव्यानेच तू
मला कळत राहिलीस
म्हणूनच एवढ्या भेटींतही
खरी भेटायचीच राहिलीस

जास्वन्द...






Devdattag
Tuesday, May 23, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तुझे ही भेटणे
मज वाटे कुठे खरे
मोहणे ते नव रुपाने
मन कैसे मग सावरे

श्यामलि, रुपा, राजे सानिया, वैशाली छानच
आता कटण्याचा समय आला.. तुम्ही चालु द्या



Shyamli
Tuesday, May 23, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुंतवावे आपणच आणि
पाशही त्या म्हणावे
हे असेच होणार आता
या कसे आवरावे?

श्यामली!!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators