Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » झुळूक » Archive through May 22, 2006 « Previous Next »

Smi_dod
Monday, May 22, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनात ओल्या सरी असतिल
तर...
मात्र न बरसताच
चिंब भिजवतिल
पण....
सरीच ओल्या नसतिल तर
धो धो बरसुन पण
कोरड्याच रहातिल


Shyamli
Monday, May 22, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे कोणं हीशेब ठेवतय?
मीच दीले आणि मीच घेतले
असे असतानासुधा........
माझ्याचसाठी सारेच का संपले?

श्यामली!!!


Kashi
Monday, May 22, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya bat hai shamli...bohot badhiya

Smi_dod
Monday, May 22, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देण्या घेण्यातल्या
हिशेबाचे प्रेम कधिच नसते
असतो तो फक्त जमाखर्च
जमा ही माझेच
खर्च ही माझाच


Meenu
Monday, May 22, 2006 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नव्हतं गं त्याला,
दुखवायचं तुला.
क्षणी एका बेसावध,
अपघाताने जवळी आला.
वर्तमानाचे भान पण,
राखावेच लागले त्याला.
विसरणं त्याला,
नसेल जमणार तुला.
आणी तुला साथ देणं
नव्हतं जमणार त्याला.
प्रेमात खुप वेळा,
हे असचं घडतं.
धीरानी प्रेम स्विकारणं,
खुप कमी पुरुषांना जमतं.


Princess
Monday, May 22, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, अतिसुंदर... अप्रतिम....

स्मि_दोड, मीनु... सुरेख...

आजकाल ऑफिसला आल्या आल्या मायबोलि ला आधी भेट देते आणि मग काम सुरु करते. तुम्ही लोक अगदी खासच आहत. दिवस खुप छान जातो जर तुमच्या कविता वाचल्या तर...तुम्हा सर्वांचे आभार.

इथे कोणी माझ्या खान्देशातले नाही का? मी जळगाव जिल्ह्यातली.

लिहित राहा, लोकहो. तुमच्या कविता कित्येक मराठी लोकांचा दिवस छान करतात.

प्रिन्सेस.



Smi_dod
Monday, May 22, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु छान मांडलय ग.. धन्स प्रिन्सेस.. मला स्मिता म्हणालीस तरी चालेल

Princess
Monday, May 22, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमात दिल्या घेतल्याचे,
हिशेब मी ठेवले
जमा खर्च देउ म्हटले तर
हिशेबाचे कागदच हरवले

काहिच्या काही कवितात टाकायला हवी का?
तुमच्या सर्वापेक्षा कवितेच्या क्षेत्रात खुप्पच लहान आहे मी. पण तुमच्या कविता वाचुन आमच्या सारख्या सामान्य लोकानाही कविता लिहायची खुमखुमी येतेच ना :-)


Shyamli
Monday, May 22, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुष्यात खरं प्रेम खुप
कमीजणांना मिळतं
आणि मिळाल तरी
पचवायला काळिज मोठ
असाव लागतं

श्यामली!!!

हाय मीनु...



Shyamli
Monday, May 22, 2006 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि...
छान लिहीतियेस ग!
प्रीन्सेस....स्वागत तुझं
आणि धन्यवाद...

मीनु क्या बात है!


Smi_dod
Monday, May 22, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, अग तु एवढे छान लिहितेस कि ते वाचुन लिहिण्याची उर्मी येते.. बाकी काय

Meenu
Monday, May 22, 2006 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरचं सांग
यात काय गैर आहे
प्रेम केलं त्याच्यावर,
म्हणजे का वागणं स्वैर आहे
वार्‍याला का बांधता येईल
सीमारेषांमधे
भावनाहि मग कशा
बसणार नियमांमधे..


Meenu
Monday, May 22, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्न झालयं ना तुझं, याचा अर्थ नीट समजुन घे..
दिलाय तुला एक पुरुष
रागवायला, प्रेम करायला, चिडायला, लढायला..
थोडक्यात आता तु, यंत्रासारखं वागायचस
आपल्या वाट्याच्या, job कडेच फक्त बघायचस
लग्न होऊनही तु माणुसच राहीलीस
मुक्तपणे आवडेल त्यावर प्रेम उधळीत गेलीस
आणी वर परत आनंदाची अपेक्षा केलीस....


Princess
Monday, May 22, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे प्रेम कसे ओळखायचे ते,
मला कळलेच नाही.
खरेच वाटले मला ते,
जे होते प्रेम खोटे,
खरे पचवले असते पण,
खोटे प्रेम पचवण्या इतके,
नव्हते काळीज मोठे.

प्रिन्सेस


Princess
Monday, May 22, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु,

क्या बात है किती गांव बक्षिस हवीत बोल?



प्रिन्सेस


Shyamli
Monday, May 22, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गैर आणि स्वैर हे का कुठे उरते
प्रेमात पडल की ह्या सगळ्याच्या
अगदि पार नियती घेऊन जाते

श्यामली!!!


Jayavi
Monday, May 22, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, जियो!!!!!!
श्यामली, Princess , मस्त चाललंय :-)


Princess
Monday, May 22, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमात पडले तेव्हा वाटले की,
हे कदाचित गैर आहे...
मंगळसुत्राकडे बघताच समजले,
नाही नाही, हे स्वैर आहे.



Smi_dod
Monday, May 22, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठरवुन प्रेमात पडता आले असते तर..
काय छान झाले असते
गैर आणि स्वैरचे
बंधनच गळाले असते
पण ठरवता येत नाही
बंधन काही चुकत नाही


Princess
Monday, May 22, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमात पडताना गैर आणि स्वैर
काही काही कळतच नाही,
समाजाच्या नजरांना मात्र
नजर आपली मिळत नाही.

समाजमान्य तो एक पुरुषच
फ़क्त आपले प्रेम असतो...
ठरवुन रोज त्याच्याच प्रेमात पडण्याचा
आपल्याला परवाना असतो
कारण
गैर स्वैर च्या बंधनातुन तोच फ़क्त मुक्त असतो...


प्रिन्सेस





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators