Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » विनोदी साहित्य » मायबोलीवर एक C & V » Archive through March 01, 2006 « Previous Next »

Rahulphatak
Wednesday, March 01, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नम्र सूचना : पुढील लेखात वापरण्यात आलेले काल्पनिक user IDs आणि मायबोलीकरांचे खरे user IDs ह्यात काही साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा. कुठल्याही ID अथवा व्यक्तीचे हे विडंबन नसून V&C वर काही वेळा होणार्या दंग्याची आणि विषय भरकटत जाण्याच्या प्रसंगांची ही अतिशयोक्ती आहे. धन्यवाद.

Rahulphatak
Wednesday, March 01, 2006 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर एक C&V होते.. म्हणजे C for ‘चर्चा’ व V for ‘विचारप्रदर्शन’ ! विषय असतो :
'हिंदी चित्रपटांचा समाजावर होणारा परिणाम'


sakhol:
चित्रपटासारखे प्रभावी आणि प्रभावशाली माध्यम अनेकांच्या मनावर खोलवर परिणाम करते, विशेषत: हिंदी चित्रपट ! दुर्दैवाने आजकाल हिंदी चित्रपटांचा दर्जा खालावला आहे.. हिंसा, अश्लीलता ह्याने थबथबलेले चित्रपट समाजाला कुठे घेउन जात आहेत ? समाजातल्या प्रत्येक स्तर आणि थर ह्यावर त्यांचा अनिष्ट परिणाम होत आहे.. त्याची चर्चा करण्यासाठीच हा BB आहे.

pp20:
हिंदी पिच्चरचा काय परिणाम होतो ? एकतर बोर होतात नायतर मजा येते अजून काय?

ashakya:
'हिंदी' मधे भोजपुरी येतात का ? आजकाल फार परिणामकारक भोजपुरी ट्रेलर्स दाखवत असतात. ‘सजनवा हमार’

sakhol:
मला इथे गंभीरपणे चर्चा करायची आहे.

kishorkumar:
मी ह्यावर अधिकारवाणीने बोलू शकतो. सांगलीला माझ्या घराच्या समोरच टॉकीज होते.. पण त्यामुळे शाळेत चोरून पिक्चरला जाता यायचे नाही. कारण पडवीत आमचे आजोबा बसलेले असायचे नाहीतर पिताश्री ! खर म्हणजे हा विषय ‘समाजाचा चित्रपटगृहाच्या गर्दीवर होणारा परिणाम’ असा होईल. माझे पोस्ट बरोबर नसेल तर उडवून टाका.

tatya:
चांगला विषय आहे, चित्रपट हे समाजभिमुख असावेत का ? हा उपप्रश्न आहेच.

jagan:
ते माहीत नाही. प्रेक्षक स्क्रिनभिमुख असावेत.. पण त्यानी चित्रपटांकडे पाठ फिरविली आहे. काय रद्दड पिकचर काढतात हल्ली.

ultimate:
कुनी गोविंदाचा अखियोसे गोलि मारे पाहला का. फूल टाइमपास. आम्ही नवीन आला की पिक्चर पहातोच..

chintan:
कूणी नुकत्याच झालेल्या स्वाहीली महोत्सवातला ‘आयेचा मगारशी’ पाहिला का ? आशय विषय सादरीकरण नेपथ्य सगळ्याच बाबतीत उजवा

bhayan:
नाही पाहिला ! गेलो होतो पण आम्ही पाचही मित्र गाढ झोपलो होतो… अत्यंत रद्दी पिक्चर.

sampatambardekar:
ये जीवन है इस जीवन का यही है हे गाण कुणाकडे आहे का?

pethi:
चित्रपटाला नेपथ्य ? ATN

madhavpethe:
खूपच करुणेचा विषय आहे. माझ्या शाळेत शिकणाऱ्या मुलाला झाडाला पाणी घाल म्हटल साध तर तो ‘डाल दूंगा !’ अस म्हणतो.. कुठल्या अर्थाने म्हणतो कुणास ठाऊक.. हे जळजळीत वास्तव पचवायला जड जात आहे.

shikar:
करुणेचा ? तुम्हाला जिव्हाळ्याचा म्हणायचय का ? ATN म्हन्जे काय

sau_joshi:
माझ्या कुत्र्याचे केस गळतात. कुणी उपाय सांगू शकेल का ? मी फॉल व पिको चा व्यवसाय करते. तसेच २ तासात ७ प्रकारे कटाची आमटी शिकवली जाईल. फी १०० रुपये फक्त (घरून कट करुन आल्यास ९० रुपये)
संपर्क : सौ. जोशी, ‘व्युत्पत्ती’ बंगला, प्रभात क्रॉस लेन ३
zimma@hotmail.com
(दुपारी १ ते ३ मधे इमेल करु नये)

asmani:
मला ठोकळे दिसत आहेत.

ashakya:
होय, इथली चर्चा ठराविक चौकटीत चालू आहेत त्याचच प्रतिक आहेत ते ठोकळे.

bhimsen:
आजकाल आपल्यातली सहिष्णुता संपत चालली आहे का ? त्याच चाकोरीबद्ध चर्चा करुन आपण आपले समाधान करुन घेणार आहोत का ? चित्रपटांच्या घसरलेल्या दर्जावर एक सुंदर लेख आला आहे तो इथे पहा !

pakshimitra:
ATN = ऐकावे ते नवलच. जोशी बाई जागा चुकली. आणि तुम्ही हा मेसेज अजून १५ BB वर टाकला आहे.. this is too much !

kanyaka:
लेख कुठे पाहू ? दिसत नाहीये !

bhimsen:
‘इथे’ ह्या शब्दावर टिचकी मारा

saapeksha:
मी इथे नवीन आहे. मी एक कविता केली आहे ती चांगली आहे असे माझे हितचिंतक म्हणतात. कुठे पोस्ट करु ?

kranti:
समाजाचा चित्रपटावर परिणाम हा होतोच. चित्रपट समाजाचे प्रतिबिंब आणि समाज चित्रपटाचा आरसा असतो ! नट मंडळी काही बेटावर रहात नाहीत समाजाचाच एक भाग असतात. अलिकडे अशी टिका करायची फॅशन आली आहे. हे कधी बदलणार ?

bhimsen:
अहो विषय नीट वाचा वर ! आणि ते बेटाच कुणी म्हटल तरी आहे का?

kranti:
छे छे इथे तरी असभ्य वयक्तिक टिका होईल असे वाटले नव्हते !

bhimsen:
वयक्तिक नाही वैयक्तिक !

kanyaka:
खूप वेळा मारली काहीच झाले नाही

shikar:
तुम्ही कोणाशी आणि काय बोलताय ?

kanyaka:
मी खूप वेळा टिचकी मारली. मॉनिटरची काच फुटायला आली. मायबोलीवर टच स्क्रीन वगैरे केलाय का.. काहीच होत नाहीये प्लिज पुन्हा एकदा सांगा !

jagan:
अहो टिचकी म्हणजे माऊस ने क्लिक करा. चांगले Tax software कुणाला माहीत आहे का?

Anya:
जगन मिरजला होता रे तू ९८ साली ? माझ्या रुममेटचा मित्राला छेड काढल्याबद्दल थेटरात लई मार पडला होता त्याचेही नाव जगनच होते.

Moderator_99:
कृपया टाईमपास नको.

sahi_re_sahi:
आजकाल पिक्चर कम्युनिस्ट झाले आहेत. म्हणजे ज्यात त्यात कोयते घेऊन मारामारी करतात.. काय तो हलचल पिकचर . आणि स्पेलिंग तरी नीट करायचे ना.. hulchul काय ! हुलचुल वाटत ते !

vidvan:
त्यात काय झाल? hulchul काय आणि halchal काय ! सारखच !

sahi_re_sahi:
हो का ? मग तुमच्या पद्धतीने हे लिहा बघू हे रोमन मधे : ‘कल्ले वाढून हनवटीपर्यंत आलेत, कात्रीने कापा’

bachchoo:
सत्तू तुला पूर्ण अनुमोदन

Amolshastri:
hi frends, this is Amol from usa. resently I got in usa liking here but mising india.

sakhol:
अमोल इथे गंभीर चर्चा चालू आहे. तुम्ही वाचून सहभागी होऊ शकता. समाजाची जागरुकता वाढवली पाहिजे.

sahishnu:
चूकीच इंग्लीश लिहिण्यापेक्षा मराठित का नाही लीहित लोक !

bachchoo:
सत्तू लेका मेसेज डिलीट केलास आता माझा अनुमोदनाचा मेसेज डिलीट करता येत नाहीये.

jagruk:
हा या बिबीचा विषय नाही. पण आमच्याशेजारचे मोठ्या आवाजात टिव्ही लावतात नवीन पिक्चर आणला की. आमची जागरुकता शब्दश: वाढत आहे. काल २ वाजेपर्यंत हैदोस चालला होता. पुण्यात ध्वनिप्रदूषणाची तक्रार कुठे करायची ?

pethi:
तुम्ही पुण्यात कुठे रहाता ?

jagruk:
नाही मी इचलकरंजीला असतो. सहज चौकशी केली. पुण्यात कदाचित बदली होणार आहे.

ashakya:
शेजाऱ्यांची पण का ?

ponkshe:
समाजाच मन इतक म्हणजे इतक बथ्थड होत चालल आहे की त्यावर कशाचाच परिणाम होत नाही.

aundhati_nagpurkar:
आमचा भाजीवाला दर वेळी वजनात मारतो आता हे त्याने कुठल्या मुव्ही मधे पाहिल असेल ? वाईट माणस वाईटच वागणार आणि चांगली माणस चांगलीच वागणार.

leela_jamenis:
आज मटार स्वस्त आहेत, पण कांदे काही उतरत नाहीत. लालू प्रसादला चौकात मारल पाहिजे.

sakhol:
कृपया विषयाला धरुन बोला.

sweekar:
शश्ठी मधला श कसा लिहायचा ? विषयाला सोडून असेल तर कृपया हा संदेश काढून टाका.

ashakya:
अहो तुम्ही ष लिहिला आहे की ! तुम्हाला ह्या बीबीवर षष्ठी का लिहायच आहे ? बच्चन ला ६० पूर्ण होऊनही बराच काळ झाला.

babugenu:
मला वाटत भ्रष्टाचाराच्या नवनवीन आयडिया पिक्चरमधून मिळतात.

leela_jamenis:
माझ्या ओळखीत एका मुलीने एका मुलाला तो गोविंदासारखे कपडे घालतो म्हणून लग्नाला नकार दिला. अस सामाजिक भान असणाऱ्या मुली किती आहेत ?

leela_jamenis:
जोशी बाई, मी सोसायटितल्या चार जणी घेउन आले तर डिस्काउंट देता का ?

Moderator_99:
चर्चा भरकटल्यामुळे हा बीबी बंद करण्यात आला आहे.




समाप्त !

Gandhar
Wednesday, March 01, 2006 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल फूल टू धमाल!!!!

Kandapohe
Wednesday, March 01, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर टच स्क्रीन वगैरे केलाय का>>
कन्यकाने हस्याचे फवारे उडवले रे राहूल.

Rajkumar
Wednesday, March 01, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल्या राहुल,जबरी... exact निरीक्षण!! .. ..

Shyamli
Wednesday, March 01, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल.. .. .. ..

Moodi
Wednesday, March 01, 2006 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल पोट दुखले रे वाचुन. ' कल्ले कापुन हे रोमनमध्ये लिहा ' अरे बापरे!!! अगदी अगदी मायबोलीच..

Limbutimbu
Wednesday, March 01, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल, झकास
कान्द्या अगदी अगदी, आधि मला कळ्ळाच नाही, थोड्या वेळाने पुढची पोस्ट वाचल्यावर कळ्ळा


Pha
Wednesday, March 01, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकृत सुटलायस!!    

Ankushsjoshi
Wednesday, March 01, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या लेखातिल सर्व Characters अगदी मायबोली वर आढळतात.
कुणी राग मानु नये त्यामुळेच मायबोली... मायबोली आहे.
&#३४;आज मटार स्वस्त आहेत, पण कांदे काही उतरत नाहीत. लालू प्रसादला चौकात मारल पाहिजे.&#३४;
राहुल मस्तच...:-)


Psg
Wednesday, March 01, 2006 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, उच्च!! एकदम hhvp . फारच छान

Madhurag
Wednesday, March 01, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, gr8 too good

Limbutimbu
Wednesday, March 01, 2006 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> विकृत सुटलायस!!
अरे फ, काहीतरीच काऽऽय बोल्तोस?
विकृत शब्द येवढा स्वःस्त अन सोपा हे का?
हा शब्द म्हणे, ठराविक उच्चशिक्षित, उच्चभृ, उन्च लोकच ठराविक अर्धशिक्षित, अडाणी, खुज्या लोकान्साठी वापरु शकतात!
DDD

Kmayuresh2002
Wednesday, March 01, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रहुल्या, TOO GOOD रे...:-)

Sanghamitra
Wednesday, March 01, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> २ तासात ७ प्रकारे कटाची आमटी शिकवली जाईल. फी १०० रुपये फक्त (घरून कट करुन आल्यास ९० रुपये)

राहूल सही रे


Milindaa
Wednesday, March 01, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आहे

Badbadi
Wednesday, March 01, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, महान आहेस
कामातून मस्त ब्रेक मिळाला


Lalu
Wednesday, March 01, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

       

Anilbhai
Wednesday, March 01, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉनिटरची काच फुटायला आली. >>
‘डाल दूंगा !’ >>

अशक्य आहे रे बाबा तु
ह्या ID ची खर्‍या ID शी लिंक लावा बघु :-)

Maitreyee
Wednesday, March 01, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच
कन्यका आणि सौ जोशी तर अति जबरी आहेत!!:-)


Mahaguru
Wednesday, March 01, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही लिहले आहे :-)
दुपारी १ ते ३ मेल करु नये :-))


Vinaydesai
Wednesday, March 01, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकृत मधला ' क्रि' कसा लिहायचा..

राहूल, लाजवाब


Pama
Wednesday, March 01, 2006 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल.. जबरी रे!!
हसून हसून पोट आणि तोंड दुखायला लागल..
सहज म्हणून या id's कुठल्या खर्‍या ID's ना बसतात का ते जुळवून बघितल, पुन्हा एकदा सगळ वाचल आणि आता तर जास्तच धमाल आली रे वाचताना.. सकाळी सकाळी हे वाचल्यावर आता अख्खा आठवडा मस्त जाणार..


Maanus
Wednesday, March 01, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए अरे अजुबाजुचे सगळे लोक माझ्याकडे बघतायत... हा माणूस अस एकटाच का हसतोय म्हणुन... मस्तच. अजुन पुर्ण वाचुन नाही झाले पन.

Moodi
Wednesday, March 01, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी किती वेळा वाचल तरी परत परत हसुन पोट दुखतय.

बच्चुचे पात्र मस्त.. " सत्तु तुला अनुमोदन. "





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators