Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
विडंबने

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » विनोदी साहित्य » विडंबने « Previous Next »

Yog
Friday, March 10, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशव्यची माफ़ी मागून...
मूळ काव्य
इथे

आपापल्या पोटातील वायू
शोधत फ़िरत रहातात बोटे
बेम्बीच्या वेटोळ्या वळणान्वरून
कुणि ऍपेन्डिक्स माळावे तसे
कायमचूर्ण गोळ्यान्चे सकाळी घेतलले डोस
माझे पोटदुखणे सम्पत नाही
म्हातारा चणेवालाही खवट हसतो आहे
मॅरेथॉन रेस सारखे
पुन्हा पुन्हा पळायचे
आणि एखाद्या तोल जाणार्‍या क्षणी
खाली बसताना
दाराच्याच कडीकडे आधार मागायचे
शरण आलेल्या शत्रूने गुडघे टेकावेत तसे



Chinnu
Friday, March 10, 2006 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... योग, अगदि rofl :-). पंत छान..

Devdattag
Thursday, March 16, 2006 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ गाणे: मन मनास उमगत नाही


मन खाण्यास धजतच नाही, आहार कसा शोधावा
तापातील त्या कोंबड्यांना, हातही कसा लावावा

त्या नवापूर गावात, सर्वच बावरलेले
हे बर्डफ्लूचे ध्यान, जळगावी अवतरलेले
मन गरगरते ऐकून, क्षीणे हालचाल, येई थकवा

आता पोल्ट्रीचा रे धंदा, त्यास मंदीची चाहूल
हाती बसले घेउन, ते रिकामेच बाऊल
तुटक्या फुटक्या खोलीत, हा धंदा कसा चालावा

तो विषाणूही फ़्लूचा, कुणी कधी पाहिला नाही
क्षणी आयुष्याचा तरीही, ह्याचेवीण दुसरा नाही
ह्या उडणार्‍या पक्षाला, कुणी कसा भरवसा द्यावा







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators