Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 28, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Saturday, February 25, 2006 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसं नाही रे हार्टवर्क , चांगलीच आहे कविता म्हणून सुध्दा .. गझल होण्यासाठी पहिल्या दोन ओळीत काही मात्रा कमी वाटल्या ..
असो .. पण मला उत्तर देता देता सुध्द्दा एक सुंदर चारोळी लिहीलीस , वा !!!
माझा कसला दर्जा दोस्ता , खरं सांगायचं तर ...

तेच ते हे शब्द सारे
काव्यही जेमतेम आहे
वाटते तुम्हांस अपुले
डोळ्यांत तुमच्या प्रेम आहे




Ninavi
Saturday, February 25, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हार्टवर्क, मस्तच रे.

वैभव, मला वाटलं तू नवीन आयडी ( विनय) घेतलास की काय!
आणि बंदिनी मस्तच आहे बरं का.

बापू, ती कविता छानच आहे. धन्यवाद. अजून असतील तर टाका ना.


Pkarandikar50
Saturday, February 25, 2006 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Heartwork \dev2 {kavitaa kharech} heart-work आहे. त्यामुळे ती गझल होते किंवा नाही ते महत्वाचे नाही. मात्रा आणि यमके यान्च्या जुळार्‍यंनी ते ठरवावे.कुणाला ती चालीत बसवावीशी वाटलेच तर मीटर साम्भाळण्यासठी थोडीफार तोड-फोड करता ये ईल. वैभवची आणि तुझी, दोन्ही चारोळ्याही खूप छान आहेत.
बापू.


Sanghamitra
Sunday, February 26, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसांनी आले. आधी माझी कविता पोस्ट करते मग निवांत वाचेन.

कुणीतरी सांगत होतं...

ती हल्ली इथेच असते, कुणीतरी सांगत होतं.
आता बरीच प्रौढ दिसते, कुणीतरी सांगत होतं.
घरदार, पाव्हणेरावळे, संसारपसारा मोठा आहे
तिची काहीच तक्रार नसते, कुणीतरी सांगत होतं.
दुरून दर्शन घ्यावं तर ती घराबाहेर पडत नाही.
क्वचित कधी अंगणात बसते, कुणीतरी सांगत होतं.
माझं नाव निघालं की ती काहीच बोलत नाही म्हणे.
फक्त एकदा खिन्न हसते, कुणीतरी सांगत होतं.

- संघमित्रा


Ninavi
Sunday, February 26, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, सन्मे!!
बरेच दिवसांनी दर्शन?


Sumati_wankhede
Monday, February 27, 2006 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन मी राधा...

तुझी नेहमीचीच सवय...
माझी अलवार स्वप्नं..
पाव्याच्या सुरांनी..
उधळून लावण्याची.

आणि माझी...
त्या विखुरलेल्या स्वप्नान्ना...
अंतर्हृदयाच्या शिम्पल्यात...
जपून ठेवण्याची.

शेवटी तू कृष्णच...
अन मी राधा.


Vaibhav_joshi
Monday, February 27, 2006 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंत ....

पुंजक्या पुंजक्याने उभी गर्दी
पांढरे कपडे , काळे गॉगल्स ..
अन मानसिकता देखील ...
ह्या दोन्हीपैकीच कुठल्या तरी एका रंगाची
हलक्या आवाजात चाललेली कुजबूज
" नाहीतरी काय हो , असून नसल्यासारखाच होता "
कुणी म्हणावं ...
" असं नाही , अधूनमधून डोळ्यांत जिवंतपणा यायचा ..
जेव्हा त्याच्या खिशात , एखाद्या नवीन कवितेचा
कागद असायचा .. "
कशाकशाची जाणीव नव्हती तिला ...
एका हट्टी निग्रहाने ओठ मिटलेले ..
डोळे चितेवरच्या त्याच्या ...
चेहेर्‍याकडे लागलेले ...
म्हणूनच .. अग्नी द्यायच्या वेळी
अचानक ..
जेव्हा त्याने श्वास घेतला ...
धावतच गेली ती ..
अन त्याचा हात हातात घेऊन म्हणाली
शेवटी सुचली ना रे कविता ??
ऐकव तरी .. खास असणार काहीतरी ...
कारण ...
अक्षरश: अंत पाहिलाय तिने
माझा ... अन मुख्य म्हणजे
तुझा ...


Sanghamitra
Monday, February 27, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



हो गं निनावी. सुचतच नव्हत्या. :-)

धग

कोण जाणे किती काळ...
राखेवरून चालताना, लक्षात आले कधीतरी.
अजून थोडी आग आत उरली आहे कुठेतरी.
युगं लोटली स्वशोधाची इच्छा संपून
मग अजूनही कशी जाणवते ती धग अधूनमधून?
उफाळून येतात जुन्याच प्रेरणा रक्तातल्या..
कुणीतरी खूप पूर्वी रुजवलेल्या.
देश, संस्कार, परंपरा आणि आचार विचार
यावर कुणी तावातावाने बोलू लागते.
तेंव्हा चेहर्‍यावर येणारे दबते हसू
कधीकधी मावळते आणि वाटते...

हे असेच होते का? मीही अशीच नव्हते का?
मग ती आग कुठल्या पाण्याने निवली?
ती स्वप्नं नसतीलही खरी उतरली.
पण..

पाणी घातले तर उमलून येईल
कोमजलेला हिरवा पालव.
फुंकर मारली तर घेईलही पेट
पुन्हा धमन्यातला तप्त द्रव.
कारण...

राखेखाली का होईना ती धग अजून शिल्लक आहे.
ती धग अजून शिल्लक आहे...

- संघमित्रा



Sarang23
Monday, February 27, 2006 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचता वाचता अचानक " वाह!!! " आलं. वैभवा, तुझ्या प्रतिभेला साजेशी आहे एकदम...

Kmayuresh2002
Monday, February 27, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,सन्मे,सुरेख... सध्या एकदम सही कविता वाचायला मिळत आहेत इथे:-)

Sumati_wankhede
Monday, February 27, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अंती काहीच....

हवं होतं जेव्हा खूप
तेव्हा काही भेटलं नाही
हवं तसं रूप माझं
मनात तुझ्या साठलं नाही

आता सारखा म्हणत असतोस,
'अस जरा... हस जरा...
गच्च बंद ओठान्ना...
खोल जरा... बोल जरा...'

करतेच आहे प्रयत्न
गाठ खोलायचा नि बोलायचा
गारठलेल्या जाणिवान्ना
नव्याने ऊब देण्याचा

पण.. खरं सान्गू.. आता ते
झरे आतून वहात नाही
स्वप्नान्ची राख झाली की
अंती काहीच उरत नाही.


Devdattag
Monday, February 27, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, संघमित्रा, हार्टवर्क, सुमतिजी सुरेख कल्पना आणि अप्रतिम कविता

Jayavi
Monday, February 27, 2006 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, आज बर्‍याच दिवसांनी संघमित्रा आणि सुमती :-) बहुत इंतजार करवाया यारो.......... पण एकदम सही आगमन हं ! इतकी वाट बघायला लावू नका गं !

Pkarandikar50
Monday, February 27, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav
नेहेमीप्रमाणे नाविन्यपूर्ण.
sanghamitra
छानच आहे कविता.
बापू.


Pkarandikar50
Monday, February 27, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, युगांपूर्वी संपलेली धग स्वशोधाची होती का आविष्काराची होती? स्वशोधाची ऊर्मी नाहीशी झाल्यावर कविता होणे जर दुरापास्रच नाही का?
बापू.


Pkarandikar50
Monday, February 27, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, युगांपूर्वी संपलेली धग स्वशोधाची होती का आविष्काराची होती? स्वशोधाची ऊर्मी नाहीशी झाल्यावर कविता होणे जर दुरापास्रच नाही का?
बापू.


Pkarandikar50
Monday, February 27, 2006 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, वा. रा. कान्तांची एक सुप्रसिद्ध कविता आहे आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. तीचे पूर्ण शब्द कुणाला माहीत आहेत का?
बापू.


Moodi
Monday, February 27, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू इथे आहे बघा. मात्र अनुक्रमणिकेत आ नावाने शोधा.

http://www.aathavanitli-gani.com/ .

Giriraj
Monday, February 27, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा, क्या बात है! 'धग' अगदी सही!

सुमति,राधा सहीच!


Swaroop
Monday, February 27, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मनाचा खेळ हा
की भावनांशी ही फितुरी
मी असा का वागतो
सांग ना तू तरी

हितगुज मी जे बोलतो
नसे ते माझ्या अंतरी
फसतो की मी फसवितो
सांग ना तू तरी

एक माझा चेहरा अन
लाख मुखवटे त्यावरी
का लपवितो मी स्वतःला
सांग ना तू तरी

साथ तुझी मजला हवी
पण मोह मी तो आवरी
का दुरावा हा असा
सांग ना तू तरी

- स्वरुप


Chinnu
Monday, February 27, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ार सुंदर कविता सन्मी.. येत जा ग, खरच खुप वाट पहायला लावलीस..

Pkarandikar50
Monday, February 27, 2006 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi
धन्यवाद. सापडली.
बापू.


Pkarandikar50
Tuesday, February 28, 2006 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sumati
अंती काहीच ही सुन्दर कविता वाचून मला वा. रा. कांतांची कविता आठवली. मूडिने लिन्क पुरवली आहे.जरूर पहा ती कविता.
बापू



Heartwork
Tuesday, February 28, 2006 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,प्रभाकर,देवदत्त धन्यवाद
निनावी, स्मितहास्याबद्दल आभार.


Sumati_wankhede
Tuesday, February 28, 2006 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू,
कविता वाचली. वा. रा. कान्तान्च्या कवितेची सर माझ्या कवितेला येणे शक्य नाही. तरीही तुम्हाला ती आवडली, त्याबद्दल आभारी आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators