Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 23, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » काव्यधारा » कविता » Archive through February 23, 2006 « Previous Next »

Arnika
Saturday, February 18, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार मायबोलीकर!
श्यामली, या आठवड्यात कॉलेज ला सुट्टी आहे ना, म्हणून टाईप करण्याएवढा वेळ मिळाला... :-)
प्रसाद_शिर, सहीच, नेहमीप्रमाणे...खूप दिवसांनी वाचली तुझी कविता. तुझ्याच भाषेत... अशक्य!
पमा, बापू... मस्त!!


Dhondopant
Saturday, February 18, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारत?... हा कोण बुवा? आर हां!!.. ईन्ड्या म्हनायचे आसल.

Meenu
Tuesday, February 21, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नको मोडूस

नको मोडूस वाक तू

आठव ते कष्ट जे घेतले होते जोडण्यासाठी
म्हणून म्हणते विचार कर परत एकदा मोडण्याआधी
माहीतीये मला अवघड आहे म्हणून तेच कर तू
नको मोडूस वाक तू

मोडण्यासाठी पुरे होईल एक क्षण
विखरून जातील सुखद स्मृतींचे अनमोल कण
कण कण विखुरलेला बघता होशील उदास तू
नको मोडूस वाक तू

अपमानाचे, अन्यायाचे सारे बोल
माहीतीये मला लागले असतील आत खोल
स्यमंतकाचे दु:ख हे जाण तू
तरीसुद्धा नको मोडूस वाक तू


Zaad
Tuesday, February 21, 2006 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार मंडळी.
निनावी, गज़ल छानच.
अर्निका, शब्दांचा रुसवा दूर झाला की नाही?
पमा, जिद्द मस्त आहे.


Zaad
Tuesday, February 21, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जे बिलगले मला ते तुझेच सूर होते
धुके वितळताना मी लोटीले दूर होते.

झाडास पालवीचे उगवणे कळाले नाही
जळाले रानच जेव्हा डोळ्यांत धूर होते.

स्वप्नांची रचिली माळ राउळे जशी ओळीने
प्रार्थनेत संध्याकाळी रात्रीचे काहूर होते.

मिठीतली ओली काया जळाली मंद गतीने
नीतीने जे उधळले पापाचे खूर होते.

मी एकटेपणाचे मागितले दान जेव्हा
परडीत तेव्हा फुलांचे बहर चूर होते.

भुलावण्या स्थळांना भुलूनही टाळले मी
वळूनि पाहता मागे ते गाव दूर होते.

जे घडले होते ते इतक्या सहजपणे
निघताना रडूनही डोळ्यांत नूर होते...

जे बिलगले मला ते तुझेच सूर होते...



Vaishali_hinge
Tuesday, February 21, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळाली आम्हाला तुझी ही कविता
लिहीलेले शब्द, शब्द नव्हे भावनांचा पुर होते


Mmkarpe
Tuesday, February 21, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहेवाचं लेणं'

आज पुन्हा बाप दारु पिउन परतला
सैतानच होता त्याच्या अंगात उतरला
येताच सुरु झाली त्याची आदळआपट
सावरता सावरता आईची ससेहोलपट
नुकतच मिसरुड फुटलेलं पोर तापट
पाहत होतं केविलवान बनुन नेभळट
घेतला तरुण रक्तानं हळुहळु पेट
डाफरलं पोरगं बापावर घेउन हाती सोट
पाहुन लागली आईच्या काळजाला ठेच
म्हनाली'याआधी करायचं होतंस मला देवाघरी पोहच'
हे देवा! कसं जलमलं माझ्या पोटी हे असलं बेणं
येड्या! कसही असलं तरी हेच माझं'अहेवाचं लेणं'


Pama
Tuesday, February 21, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना धन्यावद.:-)
मीनू, झाड.. छान आहेत कविता.


Ankulkarni
Tuesday, February 21, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

meenu ......apratim kavita lihili aahes ... farch chan g
mala vatat best ...........of meenu's
aahe . excellent
नको मोडूस


Mmkarpe
Wednesday, February 22, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आरक्षित......

मी एक तुमच्यातलाच नाही कोणी गैर
धरुन असे वैर नका वागवू मला....
चालतो लावुनी तुमच्या खांद्यास खांदा
विसरुनी पायरीला म्हणुनी नका रागवू मला...
ईथवरचा खडतर प्रवास मुश्किलिने साधलेला
तरीही आरक्षित म्हणुनी नका हिणवू मला...
सुप्त एक निखारा आत्म्यात कोरजलेला
घालुन त्यावर फुंकर नका चेतवू मला...
स्वप्नात आहे मी नका जागवू मला
वास्तवाच्या विखाराने नका नागवू मला....


Meenu
Wednesday, February 22, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद पमा, amkulkarni, Mmkarpe आरक्षित छान...

Pkarandikar50
Wednesday, February 22, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी, एक माणूस

बहुतेकदा, जन्मदत्त नात्यांनी बन्दिस्त गोतावळ्यात,
मी एक कर्तव्यदक्ष सगा-सोयरा, भाईबंद असतो,
किंवा सर्वसम्मत व्यवहाराच्या रेट्याने जुळवलेला,
विश्वासू सहकारी, मित्र आणि शेजारी अचूक असतो.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

मी एकतर भाबडे गरजू गिर्‍हाईक,
किंवा आशाळभूत मतदार असतो.
आगा-पीछा हरवलेल्या गर्दीतला एक थेम्ब,
फलाटावर, मोर्चात किंवा वारीत धक्के खातो.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

दिवसा-उजेडी, जगात रीतसर वावरताना,
किंवा रात्री, बिछान्यात शिरल्यावर,
माझे आपले अगतिक स्खलन होतच असते.
कशाचेच मुळी सूतक मला कधी लागतच नाही.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

कुणी हाकलले, डिवचले म्हणून किंवा सवयीने,
मी पुन:पुन्हा उभा रहातच असतो.
एकेका दशकानन्तर शाबूत असलो,
तर न चुकता मोजला, मापला जतो.

मी कुठे नि केंव्हा माणूस असतो?

उम्बर्‍याशी येऊन यमदूत दार ठोठावतो,
तेंव्हा एकदा, शेवटचा.
आणि त्या आधी, कविता लिहितो,
तेंव्हा दुसर्‍यान्दा, अधून-मधून.

बापू.





Zaad
Wednesday, February 22, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, बाप कविता लिहिली आहे! सलाम!!

Ninavi
Wednesday, February 22, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुक्ती..

हे असं तीळ तीळ तुटणं काही खरं नाही..
वार कसा सपकन झाला पाहिजे..
पातं कसं अजूनच लखलखून बाहेर आलं पाहिजे..
त्याला हे असे
काही ओलसर श्वास.. काही चुकार भास..
चिकटून येऊ नयेत..
त्यावरून गळू नये अद्याप उष्ण असलेला एकही थेंब..
नाहीतर मग तिथेच ती अदृष्य आशाही असते माखलेली..
पुन्हा सांधलं जायची..

अरे, जोडता आलं नाही इथपर्यंत ठीक आहे,
नीट तोडताही येऊ नये...???


Shyamli
Wednesday, February 22, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>नीट तोडताही येऊ नये
वा वा खासच ग!


Pama
Wednesday, February 22, 2006 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, फारच सुरेख!
निनावे.. :-)


Vaishali_hinge
Wednesday, February 22, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mukti, mast g! ninavi..........................

Mavla
Thursday, February 23, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह क्या बात है, सहिच.

Meenu
Thursday, February 23, 2006 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi

निनावी तूझ्या मुक्ति ला उत्तर द्यावस वाटल म्हणून ही भक्ती....

भक्ती

तुटू दे जीव तीळ तीळ
त्याच्यासाठी तुटला तर
ज्याच्यासाठी तुटेल तो माझाच कोणी असेल
त्याशिवाय का त्याच्याशी ओले श्वास जडले असतिल?

माझ्याच अंशावरती सपकन वार करु म्हणतेस?
त्याच्यावर वार करुन तळपेल गं पातं लखलख
थोडा वेळ मरेल आतल्या सैतानाची वखवख
पण फक्त थोडा वेळ....

आशेवरती राणी सारी दुनिया कायम आहे
दृष्य अदृष्याची सीमा तिनेच तर सांधली आहे

जे नाही जोडलेलं सांग ते तोडशील कशी?
तोडशील तर सिद्ध करशील हेच की जोडलं होतं...

मानापमानाच्या खोट्या कल्पनांना बळी पडू नकोस
तूही माझिच कोणी म्हणून सांगते तोडू नकोस


Ja_wadekar
Thursday, February 23, 2006 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

inanaavaIÊ mau>I Cana Aaho

Shyamli
Thursday, February 23, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु मस्तच ग!
वाटच बघत होते कुणितरी असही लिहाव म्हणुन


Vaishali_hinge
Thursday, February 23, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bhakti sudhaa mast , ajun yeu dyaa!



Vaibhav_joshi
Thursday, February 23, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्तांनो ....

दोस्तांनो आज खूप एकटं वाटतंय ...
खिडकीबाहेरचं जग ... सळसळतंय
रस्ते ... वाहने ... माणसं ... गर्दी ...
सगळं आहे .... आहे तसं
मग आतलं जग का असं कोलमडतंय
दोस्तांनो आज खूप ...

स्पर्श सारे सोबतीला ... आठवणी वळचणीला ...
जुनं सारं चंदनागत दरवळतंय
श्वास येतोय ... श्वास जातोय ...
तरीदेखील जीवघेणं गुदमरतंय
दोस्तांनो आज खूप ...

कुणाचीही वाट नाही , चाहूल नाही , साद नाही
मग इथे कोण असं घुटमळतंय ?
वार नाही कुठेसुध्दा .. घाव नाही एकसुध्दा
मन मात्र उगाचच कळ्वळतंय

दोस्तांनो आज खूप ...

दोस्तांनो SSS ...........




Devdattag
Thursday, February 23, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वेड रे भो

अब तो ये आलम हैं के
साकी ने पिलाना छोड दिया
ये अलग बात हैं के हमें
शाम्-ए-तनहाई ने जलाना छोड दिया


Meenu
Thursday, February 23, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव मनाला भिडला तुझा एकटेपणा




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators