Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 25, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » काव्यधारा » कविता » Archive through January 25, 2006 « Previous Next »

Pkarandikar50
Sunday, January 22, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, मूड फारच गम्भीर झल्यासारखा वाटतोय. एक जरा लाईट कविता.

खर प्रेम

एके दिवशी, फुरन्गटुन, ती म्हणाली,
'माझ्यावर खर प्रेमच नाहीय तुझ'
तो म्हणाला, ' अग वेडे,
प्रेम एक असत तरी किंवा नसत तरी.
त्यांत खर, खोट, अस काही नसत.'
डोळे बारीक करून, त्याच्याकडे रोखून पहात,
तीने विचारले, 'ते सोड, आधी सान्ग बघू मला,
परवा गेलो होतो आपण सिनेमाला,
त्यावेळी मी नेसलेली साडी,
कोणत्या रन्गाची होती?'
डोके खाजवून बराच वेळ, तो म्हणाला,
'हरलो.खरच, नाही बुवा आठवत.
पण एका प्रसंगांत,
तुला अनावर रडू कोसळल,
तेंव्हा मी माझा रूमाल
दिला काढून, तुला डोळे पुसायला.
तो घेताना, अगदी हळूवारपणे,
तू माझा हात दाबलास
आणि एकीकडे रडता रडता,
तू छानशी हसलीस.
तेवढ मात्र नक्की आठवतय मला.

बापू करन्दिकर.



Vaisanty
Sunday, January 22, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप्ती फारच सुन्दर कविता!

Paragkan
Sunday, January 22, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली, किती वर्षांनी दर्शन?
आहे का ओळख? :-)

कवितेवर तुझ्या शैलीची मुद्रा अर्थातच आहे पण लिहिण्याची सवय मोडलीस कि काय?


Vaibhav_joshi
Sunday, January 22, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तांनो ...
बापू ... सुंदर ... light म्हणता म्हणता भिडत गेली ...
दोन वैशाली ... एक दिप्ती ... अन एक सलिल ... सगळ्यांच्याच मस्त आहेत.
मावळा ... साधेच शब्द जास्त भावून जातात असं माझं मत आहे ... जशी सुचेल तशीच लिहा ...
गिरी ... फोन वर बोलल्याप्रमाणे , तुझी " तिचं येणं " ही कविता .... आणि " रिमझिम गिरे सावन " वरचं तुझं आणि चिन्नु चं लिखाण वाचून त्या दिवशी सुचलेली ही कविता ...


Vaibhav_joshi
Sunday, January 22, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती अशी ....

ती अशी येवून जाते पावसाच्या पावलांनी
अन पुन्हा भिजतेच माती , काळजाची , आसवांनी

झिरपते रंध्रातुनी का , कोंब का फ़ुटती नवे
रिक्तता फ़ुलते तिच्याविण , साहता ना साहवे
स्पर्श ते कोमेजलेले , चुंबिते गेल्या क्षणांनी
अन पुन्हा भरतेच ओंजळ , का मनाची , आठवांनी

बरसते , छळते , जीवाला आग ती लावून जाते
वेदना देते , नव्याने याद ती ठेवून जाते
आजही ना सावरे मी , आजही डोळ्यांत पाणी
अन पुन्हा देवून जाते , लाघवी , सलती निशाणी

कोणते नाते असे हे पावसाचे अन तिचे
दूत का होवून येती मेघ सारे श्रावणाचे
मानसी झंकारते ती , चिंब ओलेत्या स्वरांनी
अन पुन्हा छेडून जाते , आर्तहळवी , ती विराणी

वैभव !!!



Pkarandikar50
Sunday, January 22, 2006 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुरेख. दूत का होवून येती मेघ श्रावणाचे अगदी समर्पक.
बापू.


Dhruv1
Monday, January 23, 2006 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहरानंतरच सुरु होतात
पानगळींचे भरगच्च सोहोळे
निजपुंज हिवाळ्यांच्या पार्श्वभुमीवर
पुर्णाहुतींचे यज्ञ
जगण्याच्या आकांक्षांचा
एक अनिवार कोसळ
सळसळत झोकुन देत रहातो
हिमपातांच्या, जोमदार वार्‍यांच्या थपडांवर अंग
मला ही असतो एक ऋतु
संवेदना गोठण्याचा एक ऊत्सव
निरंगीपणा अंगांगावर चढवत नेणारा
शांततेचे एक वादळ
एक अरण्य वेगानं वणव्यासारखं पसरवणारा

अन म्हणुनच,
नाही येऊ शकत तुमच्या जवळ मी
वणव्यातुन वाचलेल्या शरीरानं जवळ येऊ नये म्हणतात
स्वतःच्या जळण्याचे संदर्भ असे कोणाशी जोडु नये म्हणतात...


Salil_mirashi
Monday, January 23, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेल्यावरी मी
राख माझ्या
अस्थिकांची
उधळून द्या वार्यावरी
पूर्ण होईल स्वप्न माझे
आकाश होण्याचे


Salil_mirashi
Monday, January 23, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नाळू दोळ्यांना
कुठे जाग्रुती असते?
उरात वादळे दाटली असता
वादळांची कुठे भिती असते?


Diiptie
Monday, January 23, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ध्रुव फार अवघड जात अशा कवितेतुन स्वत्:ला बाहेर काढण

Diiptie
Monday, January 23, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू हसता हसता खोटी भान्डण आठवली
सलिल..... पुन्हा थोड्स उदास वाटल


Pkarandikar50
Monday, January 23, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलील, तुझीच चारोळी जरा वेगळ्या शब्दात, खुल्लम खुल्ला चोरी.

स्वप्ने दाटल्या डोळ्यांत कशाला
डोकावते जाग निष्फळ उगा
वादळे भरल्या उरांत कशाला
धडकतो वारा चुकार पुन्हा?

बापू.


Vaishali_hinge
Monday, January 23, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिप्ती माझ्या मनातले बोललीस ध्रुव, वैभव सलिल पर्टिक्युलर्लि आकाश होण्याचे स्वप्न बापु सगळ्यांच्या छान आहेत....

Vaishali_hinge
Monday, January 23, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परागकण पण मी आपल्याला ओळ्खले नाही.

Priyasathi
Monday, January 23, 2006 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Priyasathi
Monday, January 23, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Priyasathi
Monday, January 23, 2006 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Priyasathi
Monday, January 23, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Priyasathi
Monday, January 23, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Priyasathi
Monday, January 23, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Priyasathi
Monday, January 23, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My self Gururaj Garde.
Priyasathi is my Username for maayboli.com
If have any problem..., Compliments...,
Plz call me on my Mobile No 9225522988
Thank You

Ninavi
Monday, January 23, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, हलकीफुलकी कविता मस्त.
वैभव
!!!

Paragkan
Monday, January 23, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धृवा, कविता आकळली म्हणता म्हणता कुठेतरी हरवली रे.

गुरुराज, ' माझी मालवणी' मालवणीतच का नाही लिहिलीत हो? :-) पावसाचं दान आवडलं.



Peshawa
Tuesday, January 24, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ध्रुव शेवटची ओळ वाह! पण build होत नाही कविता...


Vaisanty
Tuesday, January 24, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परागकण, खरच बर्‍याच वर्षानी आलेय, पण ओळख नक्कीच नाही विसरले. वेळ होत नाहीये काही लिहायला, एव्हढच. लिखाणाची सवय मोडली आहे का ते मात्र ह्या कवितेवरुन तूच ठरव.......भेटू लवकरच

Vaisanty
Tuesday, January 24, 2006 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ती अशी.......मस्तच! कल्पना, लय आणि बन्ध.... सगळच उत्तम जमलय.....लिहीत राहा असाच....

Vaishali_hinge
Tuesday, January 24, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी कवीता चुकुन झुळुक वर दिली...आसो
वैभव फ़ारच छान...


Vaishali_hinge
Tuesday, January 24, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्तित्व

माझे गाणे तु होतास
माझे हसणे तु होतास,

माझे मन तु होतास..
माझे अवघे विश्वच तु होतास,
पण तुझ्या विश्वात मी कुठेच नव्हते

माझ्या श्वासात तु होतास
माझ्या ह्रुदयात तु होतास,
माझ्या रोमारोमात तु होतास,

अन तुझ्या अणुतही मी नव्हते!

तुझ्या नजरेत मी कधी दिसलेच नाही,
तुझ्या स्पर्शात मी कधी जाणवलेच नाही,
तुझ्या अश्रुत मी कधी भिजलेच नाही,
तुझ्या भावनेत मी कधी ओथबलेच नाही,
तुझ्या हसण्यात मी कधी उमललेच नाही
तुझ्या श्वासात कधी हुंकारलेच नाही,
तुझ्या स्वप्नात कधी मी जगलेच नाही,

कदाचित मी तुझ्यात सामावले होते म्हणुन.....
माझे अस्तित्व तुला कधी जाणवलेच नाही


Priyasathi
Tuesday, January 24, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank You for all of the readers of my Poems.


Priyasathi
Tuesday, January 24, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व सदस्याना माझा नमस्कार.

Sarya
Tuesday, January 24, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक कविता छान आहे. खुपच सुरेख लिहिलय सगळ्यांनी...

Sarya
Tuesday, January 24, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

    अवेळीचा सडा

प्राजक्ताच्या सड्याने भरून जाणारं
माझं काळकुट्ट अंगण,
आणि फिकट केशराचा टिळा लावलेलं
गोबर्‍या गालाच आभाळ.
यांच्यामध्ये उभा असलेला,
हिरवट काळपटलेला माझा मित्र;
जस चंदनावर पडलेल्या वाळवीच चित्र.
आतून पोखरलेला असतानाही;
त्याच अस पहाटवेळ बहरणं...
जस तेल संपलेल्या निरांजनीच
शेवटच प्रखरणं...


सारंग


Bee
Tuesday, January 24, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धृव, पहिले कडवे मला आवडले. शेवटच्या कडव्यातल्या ह्या वाक्यासाठी काही संदर्भ मिळेल का? कुणी लिहिले आहे असे?

वणव्यातुन वाचलेल्या शरीरानं जवळ येऊ नये म्हणतात

Dhruv1
Wednesday, January 25, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अंगांगावर
तुझे दाटती
स्पर्श देखणे
गोड शहारे

कुणी रोखले
अधरांवरती
चंद्रकांतीचे
चांदण सोहोळे

श्वासांतुन अन
धमन्यांमधुनी
भिरभिरणारे
वादळवारे

या सार्‍या
भ्रमात आणिक
जीव अनावर
तुझ्याच साठी

तुझ्याच साठी
झुलते अंबर
चंद्र नभीचा
प्रशांत सुंदर

असेच काही
ऊमलुन येते
मनामनाच्या
कांगोर्‍यांवर

असेच काही
विरुन जाते
विस्मरणाच्या
पडद्यामागे

अन अनामीक
हुरहुरणारी
ऊरात ऊरते
एक वेदना


Dhruv1
Wednesday, January 25, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baI
to Asaca ilahIlaM hÜtM
kÜNaI mhMTlaolaM naahIyao.....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators