Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 18, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » काव्यधारा » कविता » Archive through January 18, 2006 « Previous Next »

Sarang23
Monday, January 16, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नको ग श्यामली अस लिहु...

Abhimanyu
Monday, January 16, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिमन्यु


मी कोण? प्रश्न हा तसाच राहुन गेला
जो आला तो याचे उत्तर देऊन गेला..
उत्तरे लाख पण लाखात असा एक....
मी मायबोलीकर अभिमन्यु फ़क्त एक



Shyamli
Monday, January 16, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय करु आज केदारवरच्या प्रसगामुळे परत सगळ आठ्वत आहे

Seemad
Monday, January 16, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शामलि डोळे ओले झाले ग.इतके आर्त नको लीहु.
अमेय अनामिक उरन सुन्दरच


Zaad
Monday, January 16, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे बिलगले मला ते
तुझेच सूर होते
धुके वितळण्याआधी मी
लोटीले दूर होते.

झाडास पालवीचे
उगवणे कळाले नाही
जळाले रानच जेव्हा
डोळ्यांत धूर होते.

जखमेवर फुंकर कशाला
भडकेल अजूनच ज्वाला
निखारे उचलताना
करपले उर होते.

स्वप्नांची रचिली माळ
राउळे जशी ओळीने
प्रार्थनेत संध्याकाळी
रात्रीचे काहूर होते.

Diiptie
Monday, January 16, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskaara baapuu ,
shabdaanchaa kheL mee kavitaanchyaa baabateet mhaNala naahii
kavitaavarachyaa pratikriyaanbaddal mhanala !
......


Diiptie
Monday, January 16, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please tell me how to post it in devnagari
i have again commited some mistake

Devdattag
Monday, January 16, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिप्ती खाली देवनागरी असे लिहीलेल्या बटनावर टिचकी मार.. नंतर त्या खिडकीत लिहीलेल्या माहितीप्रमाणे करणे. you can edit your post using the edit icon at the top of your post



घर

पडक्या भिंतींच बंदिस्त घर
ओट्यावरती, अडती पाय

गोठ्यात वासरू व्याकूळ फ़ार
सदा गाभण, दुभति गाय

ओलेत लाकुड कोमट आग
दुधावरचि सडते साय

थकले शरीर, भटके मन
पड पालथा, नात्याचं काय?

डोक्या मळवट पसरलेलं
चुलीसोबत, रडते माय


Ameyadeshpande
Monday, January 16, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो

दिप्ती तू देवनागरी मधेच लिहीलं होतंस...फ़क्त कनवर्शन राहिलं होतं...

फुलण्यासाठी
वाट पाहे अजुनही
कळ्यान्चा मळा
दवबिन्दुन्च्या माळा
सुगन्ध दाटलेला
पानोपानी...

आषाढ वर्षावाची
वाट पाहे अजूनही
वैशाख तापलेला
गुलमोहर झळा
झुम्बराचा बहर
बहाव्याचा...

क्षणामागुनी क्षण
वाट पाहे अजूनही
मागण्यावर मागणे
स्वप्नाचे सारे थाट
उणावलेले
कुणामुळे? कुणासाठी?
..............



Mmkarpe
Monday, January 16, 2006 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओल...

काळी कसदार जमीन
नांगरुन पडलेली
पावसाच्या हट्टापायी
मशागत अडलेली..

सारी दग्धता तिच्या
अंतरात दडलेली
विहिरिंनाही तिने
कोरड पाड्लेली...

रानात गवताची
काडीही न उरलेली
जनावरांची पोटे
खपाटीला गेलेली..

ढग येताहेत अन
जाताहेत न बरसताच
जमीन तशिच
अजुन तहानलेली...

उभ्या रानावर अशी
अवकळा पसरलेली
पाहुन त्याच्या कोरड्या
डोळ्यांना ओल फुटलेली....


Ameyadeshpande
Monday, January 16, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यावरून जगजीतच्या गज़लच्या २ ओळी आठवल्या...

उम्र भर प्यासा रहा पर उसने इतना तो किया...
मेरी पलकोन्की कतारोन्को वो पानी दे गया...


Paragkan
Monday, January 16, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ... good going public!

Supermom
Monday, January 16, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, खूप रडवलस ग आज!

Salil_mirashi
Monday, January 16, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank u Sarang.धन्यवाद सारन्ग. असेच प्रोत्साहन मिळत रहिले तर ही निरुद्योगी बोटे कदाचित केव्हतरी काहितरी अविस्मरणीय घडवतील.



Salil_mirashi
Monday, January 16, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलीने अगदी सोप्या शब्दात अन्तःकरणाला हात घातला. हेच खर्‍या कविचे प्रतिक असते.

देव्दत्तान्चि घरही मन हेलवून गेली.


Dineshvs
Monday, January 16, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, हल्ली मला चक्क कविता कळु लागल्यात. तुझ्या कवितेतल्या दुसर्‍या चौथ्या ओळीत, ती शब्द हवा होता का ? कि व्रुत्तात बसत नाही तो.

Sarang23
Monday, January 16, 2006 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, तो शेर असा आहे...
खैर मै प्यासा रहा पर उसने इतना तो किया
मेरी पलको की कतारो को वो पानी दे गया

सहीच लिहील आहे सगळ्यांनी...


Abhaybhaiyya
Tuesday, January 17, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहरमधे मी नवीनच.... तेंव्हा जरा समजून घ्या!

काल एक मी फूल पाहिले
हासत अलगद फुलताना
जसे फुलावे हास्य कुणाच्या गाली,
स्वप्नी झुलताना

दरवळला मग सुगध गगनी
न्हाली धरा सुवासाने
विश्व जाहले स्तभित क्षणभर
इवल्याश्या त्या दानाने

फूल कालचे नाही आता
उरे आजचे उद्या कुठे?
परी तयाचा गध चिरतन,
घेणा-याच्या मनामधे!


Moodi
Tuesday, January 17, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह!! सुरेख. असाच सुगंध दरवळत ठेव कवितांच्या रुपाने.

Pkarandikar50
Tuesday, January 17, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


श्यमली, अगदी र्‍हुदयस्पर्शी कविता. अशा कवितांना दुसरे कुठलेच निकष लावायचे नसतात.
अमेय, मोजकेच पण छान लिहितोस. झुम्बराचा बहर, बहाव्याचा ह्या ओळीतला बहाव्याचा ह्या शब्दाचा अर्थ मला कळला नाही. प्लीज शब्दार्थ सान्गशील का? भावार्थासाठी आग्रह नाही धरणार.
देवदत्त, तुझी घर कविताही टचिन्ग आहे. तीच्यावरून मला माझ्या एका कवितेची आठवण झाली ती पोस्ट करतो आहे. पहा भावते का? मला वाटते की आपल्या एन आराय मित्रान्ना ती जास्त जवळची वाटेल.
बापू.



Ninavi
Tuesday, January 17, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, बहाव्याचं झाड असतं. पिवळ्या रंगाच्या फुलांचे घोस लगडतात याला.(पिवळा गुलमोहोर आणा डोळ्यांसमोर). बाकी दिनेशदा सांगेल. आणि कविता कुठाय तुमची?

अभयभैया, छान सुरुवात केलीत.

दिनेशदा,'ती' नाही बसत वृत्तात.(... उभीसुद्धा नाही रहात!!)


Dineshvs
Tuesday, January 17, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताई आपण सांगावे, आणि आम्ही ते न करावे !
बहावा हा खास लिंबु रंगाच्या फ़ुलांचे घोस अंगभर मिरवणारा वृक्ष. आता फ़ुलायला लागेल. ही झुंबरे बरेच दिवस झाडावर असतात. त्यावेळी पाने बहुदा नसतात. मी फोटो पोस्ट केले होते मागे. पाकळ्या अत्यंत नाजुक असतात. हिंदीत अमलताश म्हणतात. केरळमधे पण खुप फ़ुलतो हा वृक्ष. त्यांचा एक सण या फ़ुलानीच साजरा होतो.
पाने फ़ताडी आणि फ़ुलाना न शोभणारी असतात. त्यामुळे पाने फ़ुले एकावेळी झाडावर नसतात.
ऊदबत्तीच्या डबीसारख्या लांब गोल शेंगा लागतात. गर गुळमट लागतो. खाल्ला तर चालतो. अतिसारावर औषध आहे. माकडाना, अस्वलाना खुप आवडतो हा गर.
आई गं, काय चालयय माझे या बीबी वर. ताई मला क्षमा कर.


Devdattag
Tuesday, January 17, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, अमेय, अभयभैय्या, कर्पे मस्त कविता
दिनेश.. अत्यंत उपयुक्त माहिती
पण
>> Kallaa tr caalatÜ.
कोण चालतो? :-)

Pkarandikar50
Tuesday, January 17, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


घर,माझे.

[१]
मऊ फरशी, गुळगुळीत शहाबादी,
वासे भक्कम, जोत जुनी सागवानी.
ठेंगणे, स्नेहल वृन्दावन तुळशीचे,
महिरपीस मांडव जाई जूईंचे.
खुलती सोनचाफे पुढल्या दारी,
परसदारी पारिजात कण्हेरी.
लख्ख सारवल्या नितळ आन्गणी,
सुबक रांगोळ्या छान मिरवती.
लपंडाव, फुगड्या, म्हणतो शिवाजी,
भोंडले, परवचे,अन शुभम करोती.
सणावारी उल्हास ओसंडे उत्साही,
किणकिणती कांकणे, भरल्या हाती.
लगबगती पैठण्या, लफ्फे खानदानी,
झळाळती तबके, निरांजने,अत्तरदाणी.
गजबज केवढी आल्या-गेल्यान्ची,
अगत्य ऊठबस पै पाव्हण्यांची.
मांडल्या पन्गती, सुवास दरवळे,
गर्जत उठती श्लोक वामनाचे,
साश्रू नयने देती निरोप लेकीन्ना,
भरा ग ओट्या, माहेरवाशिणी आल्या.
बाळंतिणी विडे तेरा गुणी, मन्द धुपारे,
बारशी मुन्जी, वाजवा रे सनई-चोउघडे.
[२]
हवी उच्च विद्या,हवी उच्च राहणी,
मिसळलो लोंढ्यात, गाठण्या पर्वणी.
घेऊन बाड-बिस्तरा, केली मुलुखगिरी,
भेण्डोळी पदव्यांची, ग्रीन कार्डाची कल्हई.
घर नव्हे काही, राहण्याची जागा,
तुमची ओळख हीच, तुमचा पत्ता.
हिरवळ केवढी,स्विमिन्ग पूल केवढा,
मोटारीन्चे गोठे किती, न्हाणीघरे किती?
कुठवर आलो,काय साधले,कोण जाणे,
मोठे घर, मोठे कर्ज, मोठी प्रतिष्ठा.
[३]
गावाकडे म्हातारा चुलत-चुलत काका,
रखवाली करून घराची,एकटा थकला.
पोचती करतो, रक्कम मी, धन्य होतो,
ऋणानुबन्धाचे मोल, दरमहा चुकते करतो.
थरथरती कापरी, त्याची अक्षरे,
'एकदा तरी येऊन जा रे बाबा.
लाव काही विल्हेवाट, तुझ्या घराची,
आता नको धरू माझा भरवसा.'
मुले म्हणाली, 'यन्दा नको ईण्डिया,
केव्हाच ठरले, ही सुट्टी यूरोपला.'
ती म्हणाली,'बरोबर आहे मुलान्चे,
तुम्हीच का नाही जाऊन येत एकदा?'
[४]
कुठे विरली रे वर्दळ सारी?
भरून ऊरली निर्जन पोकळी.
फुटले पन्ख तशी उडाली पाखरे,
देशी-विदेशी एकेकाचे घरटे.
पेटली पणती, क्षीण भगभगते,
रांगोळी पारोशी, उदास कुढते.
अवघडली तुळस सोडून उसासे,
चाफे निष्पर्ण, तेही हताश झडले.
बन्द कुन्द दालने, कुबटली जाजमे,
अन्धुकल्या तसबिरी,फिक्कट आठवणी.
उडाले रंग कुठे,ओघळले पोपडे,
माजली निर्लज्ज तणे, आक्रसल्या आंगणी.
[५]
नाही, नाही, नव्हेच हे, घर माझे.

बापू करन्दिकर.



Ninavi
Tuesday, January 17, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रांगोळी पारोशी..
व्वा बापू!!


Supermom
Tuesday, January 17, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच छान. मन उदास झाले. परदेशात आपण किती मोठी किंमत देऊन राहतो असे वाटून गेले.

Devdattag
Tuesday, January 17, 2006 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू..
माजली निर्लज्ज तणे, आक्रसल्या अंगणी बहोत अच्छे


Ninavi
Tuesday, January 17, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, देशातही आता यातलं काही राहिलेलं नाही. हे स्थळापेक्षा त्या काळाचं वर्णन आहे म्हण.. आणि वाईट वाटून घेऊ नको.

Ameyadeshpande
Tuesday, January 17, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Paragkan
Tuesday, January 17, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह बापू .. !!

Chanakya
Wednesday, January 18, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझल सदृश लिहायचा हा पहिलाच प्रयत्न
गझलेच्या नियमात बसते की नाही हे माहित नाही. कृपया जाणकारांनी सांगावे!!!

भजती कशास रामा जनमानसात अजुनी
बनुनी शिळा अहिल्या जर बंधनात अजुनी

मदतीस धावण्याला न उरला हरी समर्थ
वसनास द्रौपदीच्या खल फ़ेडतात अजुनी

रामात राम नाही राहिला जगात आज
जळते आगीत सीता, घराघरात अजुनी

सत्यवान जिंकला रे मरणा कडून सतिने
तिजला पतीच लावे नरड्यास तात अजुनी

दांभिक समाज ज्याचा, दिसला नवा मुखवटा
बनविती स्त्रीस बंदी, जन मंदिरात अजुनी






Moderator_2
Wednesday, January 18, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Priyasathi urf Meghana Pitre
हा विभाग स्वताः लिहीलेल्या कवितांसाठी आहे. दुसर्‍यांच्या कविता इथे पोष्ट करु नये .

Moodi
Wednesday, January 18, 2006 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू डोळ्यात पाणी आणलत.

Pkarandikar50
Wednesday, January 18, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, सुपरमॉम, देवदत्त, परागकण,मूडि,धन्यवाद.
निनावि म्हणते ते एका अर्थाने खरे आहे. ह्या कवितेतला नोस्टाल्जिया आणि परात्मता भारतातच राहून, लहान गावातून मोठ्या शहरात मायग्रेट झालेल्यान्नासुद्धा अनुभवाला येतात. एक कालखण्ड तुटला, एक लाईफ्-स्टाईल कायमची अन्तरली, यामुळे येणारी ती खिन्नता किंवा हरपल्याची भावना असते. मीहि हे अनुभवलय, परदेशात स्थायिक न होता.
बापू.


Mavla
Wednesday, January 18, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक नविन वाचक.
इथे सर्वच छान छान कविता करतात. सर्वांच अभिनंदन.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators