Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
US मध्ये लग्न ...

Hitguj » Living Abroad » US related » US मध्ये लग्न « Previous Next »

Manuswini
Friday, February 22, 2008 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणी मला नीट माहीती देइल का खालील गोष्टींची??

१. US मध्ये देवळात लग्न कोणी केले आहे का?(शक्यतो NJ, Boston area .
२. किंवा साखरपुडा इथे US मध्ये केला आहे का??

३.साधारण कीती खर्च येतो?

४.कुठले हॉल उपलब्ध असु शकतात NJ,Boston मध्ये


कृपया कोणी केले असेल तर pls detailed माहीती द्या.


तळटीप : कृपया टिंगळ टवाळी करण्याच्या हेतुने पोस्ट्स नकोत, त्यासाठी इतर बीबी आहेत. :-)



Aaftaab
Friday, February 22, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी,
you can check in the Ashland New England Hindu temple - about 25 miles from Boston - about the same. All the best


Shonoo
Friday, February 22, 2008 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने
आधी बातमी दे, पेढे दे सगळ्यांना अन मग प्रश्न विचार. एन जे मधे चिकार देसि रेस्टॉरंट मधे लग्नासाठी हॉल आहेत. तू एन जे बी बी वर विचार ना.

बरं ते अभिनंदन म्हणायचं राहिलंच की :-)

मिक्सर ग्राईंडर पाटे वरवंटे कुठे रजिस्टर करणारेस ते पण सांगून टाक


Zakki
Friday, February 22, 2008 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रिजवॉटरच्या देवळाचा नंबर ९०८ ७२५ ४४७७ आहे. तिथे एकच लग्न लागलेले पाहिले. नवरा बायको दोघेहि हिंदूच होते.

नंतर अनेक भारतीय-अमेरिकन लग्ने पाहिली पण देवळात नाही. बहुधा मॅरियट किंवा भारतीय रेस्टॉरंट्स मधे होतात. बहुतेक अमेरिकनांना भारतीय जेवण आवडते, नि त्यांना ते पसंत पडते.

माझ्या मुलीचे लग्न
Palace of Asia, 2389 Rout 70 West,
Cherry Hill, NJ 856-773-1200
इथे झाले. ते बरेच स्वस्त होते, पण १७५ लोकच मावले. नि तिथले डेकोरेशन पण यथा तथाच होते. पण बाकी सोयी चांगल्या होत्या.

मुळात माझ्या मुलीला फक्त लास व्हेगासला लग्न करायचे होते, नि इथे भारतीय पद्धतीचे घरच्या घरीच करायचे होते. पण आमच्या घरचेच १५० लोक होते, नि त्यांच्या घरचे आठवून आठवून २५ जमले.
(मग LV च्या बेलाजियो मध्ये पण लग्न झाले.)

मुख्य खर्च हॉल, डेको (काही भारतीय दुकाने, जेव्हढे पैसे द्याल तसे पूर्ण मंडप व लग्नाच्या हॉलचे डेको करून देतात.) जेवण (त्यात अनेक प्रकार, किती दारू, किती प्रकारचे पदार्थ, बॅंड इ.), गुरुजींची दक्षिणा. आपले बंडू फडके आहेत तिकडेच कुठेतरी खड्ड्यात, दक्षिण जर्सीत कुठेतरी!
आम्ही ऑक्टोबरपासून हॉल, जेवण, डेको इ. च्या चौकश्या चालू केल्या. तेंव्हा मग ऑगस्टमधे लग्न झाले. सुदैवाने आमच्या व्याह्यांच्या काहीहि अटी नव्हत्या. (त्यांना माहीतच नाही, नवर्‍या मुलाकडचे लोक मुलीकडल्या लोकांना किती छळू शकतात!) पण आम्ही निर्णय घ्यायला प्रचंड वेळ वाया घालवतो. नक्की काय करायचे ते ठरले असेल तर एक दोन महिन्यात तयारी होऊ शकते. हॉल मिळण्यावर आहे.

डेको, हॉल याबद्दल माहिती सापडली तर कळवीन. पण आम्ही बहुधा इंटरनेटवर जे दिसले तेव्हढेच पाहिले. पायपीट केली नाही.

साखरपुडा परत तुमच्यावर आहे. आमच्या जावई, मुलीला नको होता. सौ. च्या भीशीच्या मैत्रिणी अति उत्साही. त्यांनी घरच्या घरीच म्हणून साठ सत्तर लोकांना बोलवून केळवणे ( banana forests?! ) केली, ते वेगळे. शिवाय पेढे करणे, हार करणे, इतर काही, यात त्या मैत्रिणींनी मोठ्या उत्साहाने मदत केली. सौ. प्रोजेक्ट मॅनेजर असल्याने व तिची बहिण मुंबईहून दोन महिने आधी पासून आल्याने मी क्लायंटसारखा स्वस्थ बसून होतो.

२५ ते ३० हजार कमीत कमी! मग एक बॉस्टनला, एक जर्सीत अशी दोन दोन लग्ने, लग्नात हत्ती किंवा हेलिकॉप्टरमधून नवरामुलगा येतो, असे काही (असेहि करतात हो!)नि इतर काही करत बसलात तर जास्त.



Manuswini
Friday, February 22, 2008 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना धन्न्यवाद मनापासून...
पेढे काय लाडू काय सगळे देइन. पण हे असे आहे की लग्न ठरायचे आहे अजून पण भटजी आधी शोधतो आमच्यात असेच उलटे सुरु असते. :-)

पण आधीच गूड गेस चालला आहे सर्वांचा.

पण नक्केच लवकर माझ्या मायबोलिकरांना खबर देइन.

शूनू,

ते पाटे वरवंटे सांगून खुप मदत होइल मात्र नक्की... :-) थॅक्स परत.


कोणी आणखी काही सांगेल का? specially NJ मध्ये


Lalu
Friday, February 22, 2008 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पण भटजी आधी शोधतो आमच्यात असेच उलटे सुरु असते

मग नवरा मुलगा कधी शोधणार? :-) अंतरपाट धरल्यावर?? ~D~D
शुभेच्छा गं!


Arch
Friday, February 22, 2008 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, आधी ठरवाव किती खर्च करायचा आहे आणि त्याप्रमाणे लग्न plan कराव. म्हणजे कुठला hall किती लोकं ते ठरवता येतं भटजीचा खर्च वगैरे fixed expenses पण बाकीचे variable expenses . ते आपल्या budget प्रमाणे adjust करता येतात. कमीत कमी २० ते ३० हजाराची काही गरज नसते. घराच्या back yard मध्येपण छान reception होतं.



Prajaktad
Friday, February 22, 2008 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हे असे आहे की लग्न ठरायचे आहे अजून पण भटजी आधी शोधतो आमच्यात असेच उलटे सुरु असते.

>>>मने! तु स्वल्पविराम( , ) पुर्णविराम(.) का वापरत नाही बाळ? असो शिकशिल आता लवकरच!..
बर गुड गेस खरा ठरुन लवकर पेढे लाडु दे बरं जरा..
बॉस्टन च ashland टेंपल तस लहानच आहे जरा..शिवाय कार्यक्रम झाल्यावर जेवणाची सोय करायला जवळपास धड Indian हॉटेल नाही.
lowell ला एक टेंपल आहे, बघ नेट वर माहिती मिळते का ते..
आर्चला अनुमोदन!


Manuswini
Friday, February 22, 2008 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks to all for help and good wishes together.

हे सगळे प्रकरण दिसतेय मला, म्हणजे ठरवाठरवी.
प्राजे,
दिला की नाही बघ स्वल्प्वीराम वरती. सुधारतेय ग...


Shonoo
Friday, February 22, 2008 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कनेक्टिकट मधे मिडल टाउन टेम्पल आहे ते पण छान आहे. हार्टफ़र्ड पासून जवळ आहे. हार्टफर्ड मधले रेस्टॉरंट वाले तिथे जेवण पुरवतात. पण शाकाहारी जेवणच चालतं तिथे.

एन जे मधे रूट १ वर एक अकबर ( किंवा असंच ) काही तरी रेस्टॉरंट आहे एडीसन च्या जवळ. तिथे लग्नाची सोय आहे, लग्न पार्टी सगळ, काही तिथे करता येईल. रूट १ वरच प्लेन्सबोरोच्या थोडं उत्तरेला चटणी मॅनर म्हणून जागा आहे. त्यांच्या कडे तीन्-चार हॉल आहेत. जेवण अन सर्व्हिस दोन्ही चांगले आहेत.
लॉरेंसव्हिल भागात एक सॅम माणेकशॉ नावाचा पारशी मनुष्य पॅलेस ऑफ़ ईन्डिया म्हणून रेस्टॉरंट चालवत असे. तो लग्नासाठी १०० एक मैल पर्यंत कुठल्याही हॉलवर जेवण पुरवत असे. ते रेस्टॉरंट त्यांनी विकलं असं ऐकलं होतं

एन जे ते बॉस्टन म्हणजे उत्तर दक्षिण जवळ जवळ साडे तीनशे ते चार्शे मैल होतात. तुला नक्की कुठल्या जागा सोयीच्या पडतात ते ठरव अन त्यानुसार शोध.


Manuswini
Friday, February 22, 2008 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually NJ चांगले पडेल. सगळे relatives आहेत नवरीचे.( नवरा कोण पण?)
पण शूनू खुप माहीती दीलीस गं. धन्यवाद खुप खुप.
एवढी माहीती कशी ग तुला?
हे सर्व आधीच विचारलेले बरे,नंतर हात पाय मारायला नको ना म्हणून खटाटोप.
परत एकदा thanks


Manuswini
Friday, February 22, 2008 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुम्ही वर्षभर हीच चौकशी?

कारण वर लिहिलेय ऑक्टोबर मध्ये सुरवात मग ऑगस्ट मध्ये लग्न?????


Zakki
Friday, February 22, 2008 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग काय तर? जर्सीत चॉइसेस भरपूर, नि मुलगी, सौ. व मी यांचे एकमत कधीच होत नाही. शिवाय अनेऽक हितचिंतक होते सल्ला द्यायला, कल्पना सुचवायला. मग हळू हळू मीच माघार घेतो. पण तुम्ही नक्की काय करायचे ते ठरवले असल्यास फक्त हॉल मिळाला की बाकीचे झटपट होईल.

Shonoo
Friday, February 22, 2008 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॅम मानेकशॉ नी आमच्या रिसेप्शनचं केटरींग केलं होतं. I woiuld highly recommend him if he is stilldoing this stuff. अकबर अन चटणि मॅनोर मधे मी एक दोन वेळा गेलेय.



Supriya19
Wednesday, March 05, 2008 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा तुमचं post वाचलं आणि काल trainmadhye एका magazine मध्ये Garden Falls restaraunt chi advertise पाहीलि. आता फोतोस वरुन तर जागा सुंदर वाटली.
www.gardenfalls.com अशी website आहे. मला स्वत:ला काही reviews or experience माहीत नाही या जागेचा. पण एक नज़र नक्कि टाका.

Manuswini
Saturday, March 08, 2008 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रिया, धन्यवाद. कृपया कोणाला आणखी माहीती असेल तर कळवा.
जसे इथे ज्यांने विधीपुर्व लग्न केले आहे NJ मध्ये.

भटजी व्यवस्थीत मंत्र वगैरे सांगून लग्न करतात असे.



Savani
Saturday, March 08, 2008 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,
माझ्या नवर्‍याच्या मित्राचं NJ मध्ये अगदी विधिवत लग्न झालं होतं ६ वर्षांपुर्वी. मी त्याच्याकडून माहिती घेऊन तुला माहिती देउ शकेन. पण तुला नक्की काय काय माहिती हवीयं हे जरा सांगशील का? मला मायबोलीवरुन मेल केलीस तरी चालेल.


Sayonara
Saturday, March 08, 2008 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, milanbanquet.com ह्या साईटवर जाऊन पहा बरं. आजच कमर्शियल पाहिली त्यांची.

Manuswini
Sunday, March 09, 2008 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सायो नी सावनी,

Mahen_kulkarni
Thursday, March 27, 2008 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1. Lakshmi temple, Ashland 25 miles north of Boston. check
http://www.nehti.org
2. Hotel Dakshin in Framingham. Very near to above place. We usually do our company get togethers here and they charge somewhere around 150

Pinku
Friday, March 28, 2008 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टुड़ट असाल तर युनिवसीटी चे औडिटोरीयम घेता येईल (१००-१२५ माणसे आरामात मावतात). तिथे स्टुड़ट discount पण मिळतो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators