Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आई,बाबांनी इथे वेळ कसा घालवावा?? ...

Hitguj » Living Abroad » US related » आई,बाबांनी इथे वेळ कसा घालवावा?? « Previous Next »

Amruta
Friday, September 14, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे सासरे येत्या w/e ला US मधे पहिल्यांदा येत आहेत. मी त्यांना हितगुजची चटक लावायचा प्रयत्न करीनच तरी आणखी काही युक्त्या असतील तर चला पटापट सांगा. :-)

Zakki
Friday, September 14, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, अहो, त्यांची नात आहे ना? ती आजी, आजोबा नि आणि कुणि काका, मामा आले तरी त्या सगळ्यांना भरपूर काम पुरवेल. शिवाय शाळेतल्या इतक्या गोष्टी, ज्या कुणाला माहित नसतात, (माईकचे बाबा सिगरेट पीतात, एरिकाची आई खूप लठ्ठ आहे, आणि कुणाची गाडी नविन आहे, वगैरे) त्या ती त्यांना सांगेल. त्यामुळे त्यांच्या ज्ञानातहि भर पडेल.


Maitreyee
Friday, September 14, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, घरीच वेळ घालयण्यापेक्षा बाहेर फ़िरायला जाता येईल त्यांना. चालत रोज फ़िरल्याने, किंवा जुईबरोबर बाहेर पार्क मधे रोज गेल्यामुळे आजूबाजूला ओळखी पण होतील. माझे आई बाबा तीन वेळा इथे येऊन गेलेत. ते रोज २ वेळा बाहेर फ़िरायला जायचे, माझ्या लेकीला घेऊन जवळच्या पार्क मधे जायचे. तिथे त्यांना समवयस्क मित्र मंडळी भेटायची. देशी आणि अमेरिकन्स सुद्धा! अगदी एक्मेकाकडे भेटणे,पार्क मधे पॉट्लक GTG सुद्धा झाले होते त्यांच्या ग्रुप चे. आजूबाजूच्या परिसराची जरा माहित्ती झाल्यावर आईबाबा जवळपास बस ने फ़िरायचे. सिनियर सिटिझन साठी बस ने बर्‍याच ठिकाणी पिकप ड्रॉप ऑफ़ वगैरे बर्‍याच सोयी असतात. माझ्या घरापासून लायब्ररी, बॉर्डर्स, मॉल वगैरे ठिकाणी बस ने जायला सोयीचे होते, तिथे पण खूप आवडायचे त्यांना. छान वेळ जायचा त्यांचा. आणि फ़िरल्याने (आणि नातवंडांनी व्यायाम दिल्यामुळे!) तब्येत, शुगर वगैरे अगदी नॉर्मल राहिले दोघांचे! :-) बाकी घरात कॉम्प वर वर्तमान पत्रे, टीव्ही वगैरे आहेच शिवाय अजून म्हणजे मी जवळच्या देशी दुकानातून त्यांना हिन्दी, इन्ग्रजी old classic movies आणून द्यायचे, एरव्ही तिथे बिझि शेड्युल मधे बघायचे राहून गेलेले बरेच सिनेमे इथे पाहून घेतले त्यांनी.

Amruta
Friday, September 14, 2007 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की :-)) पण जुई ९ ते ३:३० शाळेत जाते. त्या वेळी काय कराव?? :-) त्यांना देशात असताना computer शिकवण जमल नव्हत आता ते अगदी जमविनच.

मैत्रेयी, अग माझ्या सासर्‍यांचा मुख्य problem म्हणजे त्यांना ऐकायला थोड कमी येत. पण फ़िरायच्या बाबतीत मात्र super आहेत ते. पण आता थोड्या दिवसात थंडी सुरु होइल मग काय कराव प्रश्ण आहे. त्यांना home depot नक्कि आवडेल. त्यातुनच काहितरी खाट्खुट करायला आणाव का?? बाकी त्यांना खाटखुट करायला भयंकर आवडत. :-)


Radhadeshpande
Sunday, September 16, 2007 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता netflix ची membership घेतली आहेस का?
आई बाबा आले की खूप फ़ायदा होतो ह्या membership चा. माझे आई-बाबा आले होते तेव्हा ५ महिन्यात त्यानी भरपूर movies पाहिल्या. बाकी park ची रोजची visit अगदी छान वाटते त्याना. आणि हो नातवंडे बरीच busy ठेवतात हो आजी-आजोबाना


Amruta
Monday, September 17, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐकायच्या problem मुळे ते फारसे movies पहात नाहीत. हो बाकि फ़िरायला वेगवेगळ्या जागा त्यांना नक्किच दाखवेन.

Arch
Monday, September 17, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, library एकदम आवडते आईवडिलांना. माझया आईला मी आठवड्यातून एकदा घेऊन जायचे ती बरीच पुस्तकं आणायची मग मुलं घरात नसताना छान वेळ जातो. एकट्याने TV बघण्यात किंवा सिनेमा बघण्यात तेवढी मजापण वाटत नाही. पुस्तकं एकदम best . home depot तले classes Michaels मधले classes पण छान असतात.

Amruta
Monday, September 17, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थांकु सगळ्यांना, .. आता जरा इथे जा पाहु. :-)

/hitguj/messages/103388/1529.html?1190042707#POST1001214

Karadkar
Monday, September 17, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, अग अचानक आठवले अत्ता. HGTV किंवा DIY Network वर बरेच home improvement projects दाखवतात. त्यात करण्यासरखे बरेच असते. आणि त्यांच्या वेबसाईटवर पण माहीती असते. तुझ्या सासर्‍यांना खाटखुट करायला आवडते म्हणालिस ना म्हणुन लक्षात आले.
ज़ुईसाठी डॉलहाउस वगैरे बनवु शकतील. किंवा मग drawing easel वगैरे.
त्यांना पेंटींगची वगैरे आवड असेल तर seniors साठी क्लासेस असतात. इथे बर्‍याच वयस्कर मंडळीना कानाचा प्रॉब्लेम असल्याने तिथे शिक्शक पण समजुतदार असतात.

किंवा लायब्ररीमधुन त्यांना do it yourself टाईपची पुस्तके आणुन पण करता येइल काहीतरी.

hope this helps


Amruta
Monday, September 17, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks ग.. काहितरी असच करायचा विचार करु. home depot ज़िंदाबाद. आजच library मधे जातेच आहे.. लगेच शोधण सुरु करते. :-)

Seema_
Monday, September 17, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Recreation center मध्ये woodworking चे classes असतात . senior citizens साठी बरेच classes असतात तीथे . तुमच्या area मध्ये आहेत का चौकशी करा . छोटी birdhouse , small table वैगरे शिकवतात करायला .
pottery gardening वैगरे पण शिकता / करता येईल .


Amruta
Monday, September 17, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW अस काही मिळाल तर फार बर होइल. त्यांना खरच आवडेल. कुठे चौकशी करावी? सध्या net वर पहाते काही मिळतय का ते..

Seema_
Tuesday, September 18, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता park and recreation आणि तुमचा zipcode google करुन पहा . हा class नाही मिळाला तरी इतर बरेच classes मिळतील senior citizens साठी .

ही एक दुसरी site मिळाली . CT मध्ये दिसतहेत त्यांचे classes

http://www.woodcraft.com/education.aspx

Amruta
Tuesday, September 18, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks सीमा, मी google केल, wood craft नाही मिळाल पण ceramic, art classes आहेत. मी पुढे चौकशी करेन.
तु दिलेल्या site वर जे classes आहेत ते जरा लांब आहेत आमच्या पासुन.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators