Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
BHARTABAHER RAHATAANA VEGLA GANAPATI ...

Hitguj » Living Abroad » US related » BHARTABAHER RAHATAANA VEGLA GANAPATI BASAVAVA KI NAAHI? « Previous Next »

Grihini
Tuesday, August 08, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात रहात अस्ताना गणपती स्थापना करावी की नाही ह्या सन्दर्भात सल्ला हवा आहे. कोकणात घरागणीक एकच गणपती असतो. वेगळा बसवता येत नाही गणपती साठी प्र्यत्येक वेळी भारतात जाता येइलच असे नाही लवकर सल्ला हवा य.

Kedarjoshi
Tuesday, August 08, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते काहीच हरकत नाही. आम्ही पण घरी गणपती बसवतो.
जरी भारतात मोठ्या घरी गणपती असेल तरी ईकडुन तिकडे दरवेळी जान होईल असे नाही. मुळात गणपती दैवतच तसे उत्साहवर्धेक असल्यामुळे तो उत्साह येथे परदेशात आणायला काय हरकत आहे? वाटल्यास तुम्ही भारतात गेल्यावर परत थांबवु शकता. ( मी आईला विचारल्यावर ती म्हणाली की सलग ५ दा तरी बसवावा) पण या म्हणन्यात मला कर्मकांडाला जास्त भाव दिल्या सारखे वाटते. (नेमके मागच्या गणपतीत मी देशात होतो तेव्हा ईकडे बसवता आला नाही.)
शिवाय घरी मुल असतील तर त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख पण होईल. १० दिवस एक वेगळेच चैतन्य घरात राहील.


Grihini
Tuesday, August 08, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार धन्यवाद. मी दोन वर्शानपासुन देव्हार्यातला गणपती वेगळा आसनावर बसवुन दहा दिवस पुजा करते आहे. पन मला ह्यावेळी वेगळा गणपती बसवायचा आहे. मुर्ति जर विसर्जन न करता फ़क्त दहा दिवस पुजा करुन थेवली तर चाल्ते का? गेली पाच वर्श आम्ही भारताबाहेर आहोत. अजुन कीती वर्शे राहू सान्गू शकत नाही. मुलाना ह्या सगळ्याचा कधी अनुभव मिळ्णार असा विचार मनात येतो.

Kedarjoshi
Wednesday, August 09, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्याच घरी मूर्ती पुढच्या वर्षी विसर्जीत करतात. मी मात्र एखाद्या तळ्यात गुपचुप रात्री विसर्जन करतो.
मला अगदी शास्त्र्तीय उत्तर माहीती नाही पण मुळ मुद्दा भक्तीचा त्यामुळे तुम्ही गणपती बसवायला हरकत नसावी.


Lalu
Thursday, August 10, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी विसर्जन नाही करत, म्हणजे अगदी पाण्यात नेवून सोडत नाही, पण बाकी सगळं करते, नन्तर मूर्ती ठेवून देते. माझ्याकडे एक वेगळी मूर्ती आहे(देव्हार्‍यातली नव्हे) तिचीच दरवर्षी प्रतिष्ठापना करते. ही मूर्ती देव्हार्‍यातली असू नये. वेगळी असावी. कारण विसर्जनापूर्वी जी पूजा होते त्यात प्राण प्रतिष्ठा किंवा प्रतिष्ठापनेच्या उलट क्रिया होते, म्हणजे त्या मूर्तीतून देव निघून जातो असे म्हणतात. हे मी ऐकलेले सांगते आहे. कोणाला शास्त्रातली माहिती असेल तर लिहावी.

Mahesh
Thursday, August 10, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोशींनी लिहिले आहे त्याप्रमाणे, भक्तीभाव असला की कर्मात काही कमी जास्त झाले तरी चालते.

पुजा करताना संकल्प असतो, त्यात म्हणले आहे,
यथा ज्ञानेन, यथा मिलित उपचार द्रव्यै :
म्हणजे जे ज्ञान आहे आणी जी काही पुजेसाठी द्रव्य, साधन सामग्री मिळाली आहे त्यामधे पुजा करेन.

तसेच पुजेच्या शेवटी असे म्हणले जाते
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तीहीनं सुरेश्वर
यत्पुजितं मया देव परीपुर्णं तदस्तु मे
आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चनम्
पुजां चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर

देश काला प्रमाणे रूढींमधे बदल करून भक्तीभाव, संस्कार जपायला आणी पुढच्या पिढ्यांना ते द्यायला काहीच हरकत नाही.
चूक होईल या भितीने जर काहीच केले नाही तर हे हस्तांतरण होणार नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators