Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2006

Hitguj » Living Abroad » General issues » परदेशात आपले मूल वाढवताना.. » Archive through February 28, 2006 « Previous Next »

Supermom
Saturday, February 18, 2006 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुताटकी, बाकी सगळं ठीक आहे ग, पण हे असं नाव का ग घेतलस?

Bee
Saturday, February 18, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहे आहे लय आहे English मधील पाढ्यांना देखील. मी माझ्या पुतणीकडून English मधले पाढे शिकलो. पण आपण बेचे पाढे जसे भरभर गीतांजलीच्या वेगानी म्हणतो तसे जलद english मधील पाढे म्हंटल्या जात नाही.

परवचे म्हणून पण एक प्रकार आहे ना गणितात. मी कधी शिकलो नाही पण परवचे असतात असे वाचले कुठेतरी.

मातांनो चर्चा फ़ार छान चालली आहे. माझ्या बहिणीची मुलगी माझ्या आईला एक दोन आणि बाराखडी शिकवते आहे. एकदा तिला सांगितले की आज्जीला शाळेत कुणीच पाठविले नाही ग. त्यादिवसापासून ती आईला रोज पाटी पुस्तक आणि लेखणी देते नि छान शिकवते. आईला आता तिचे नाव पण लिहिता येते आणि सर्वात उपयुक्त म्हणजे फ़ोनवरचे सगळे क्रमांक तिला कळायला लागले. जे काम आम्हाला जमले नाही ते पहिल्या वर्गातील मुलीने करून दाखविले ह्याबद्दल three cheers!!!! ती रोज शाळेतून आली की आईला सगळे काही सांगते नि शिकविण्याचा प्रयत्न करते.

एक अनाहूत सल्ला द्यायचा होता. संकृत श्लोक स्तोत्र शिकविल्यानी वाणी खरच स्वच्छ होते. मुलांना आपले स्तोत्र शिकविल्या जायला हवेत. अर्थासहीत!


Bee
Saturday, February 18, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच ह्यांनी हे भयभीत करणारे नाव का घेतले कळले नाही. रात्री अपरात्री मायबोलि access करताना अशी नावे वाचली की भिती वाटते मला :-)

Bhutataki
Monday, February 20, 2006 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Seema, ajun tari kahi craft cha prakar kela nahiye, pan w/end la tatadine glue aani papers gheun aaley. Aaj tech karu aamhi.

Supermom, aga mi tashich aahe asa mhanatat sagale. Ethehi majhe chote-chote probs ghun yenare aani tyanchi uttara milalyashivay tumachya manguti sodnar nahiye lakshat thevaaaa
ha:ha:ha:ha:.....Bhoooooot
>:-) >:-)

Bhutataki
Monday, February 20, 2006 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee,
ratri aparatri kashala ho kahihi karat basave, nivant zopave shahanya balasarakhe...;) :-)

Bhutataki
Monday, February 20, 2006 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee,
Sanskrit shloka shikavinyacha salla far changala aahe. Majhi mulgi kahi mahinyanchi asalyapasun mi tila zopavitana Shubhamkaroti, Atharvashirsha aani Raamraksha mhanun zopavate.Tiche ucchar kharokharach changale aahet, bobde far kami bolte aani rrr suddha mhanate....shivay Shubhamkaroti path zale aahe ha added bonus.
Tiche ucchar tyamulech spashta zale asavet he kahi aattaparyant lakshat aale navate, aata matra tyat khand padnar nahi yachi kalji gheu.


Gajanandesai
Tuesday, February 21, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, ही वाक्य जरा खटकली. कदाचित अशी वाक्य माझ्या ऐकण्यात/वाचनात आली नाहीत म्हणून असेल...

पाढे म्हंटल्या जात नाही.

स्तोत्र शिकविल्या जायला हवेत.

ज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जाऊ शकतो.

चूक आहे असे म्हणायचे नाही पण जाणून घ्यावेसे वाटले म्हणून विचारतोय. विदर्भात वगैरे असे बोलले जाते का?


भुताटकी, तुमची पहिली पोस्ट वाचल्यावर मला सगळ्यात आधी हे वाटले की या नावाला तर
तुमची छोटी बावरत नसेल ना?
:-)

हे खरे आहे की लहान मुले जेवढ्या वेगाने नवी भाषा आत्मसात करतात तेवढे आपणही करू शकत नाही. माझी काही भाच्चे कंपनी बडोद्यात जन्माला आली. शिकायला इंग्रजी माध्यमात, घरी मराठी आणि खेळायला चोवीस तास गुजराती मुलांच्यात. शिवाय हिंदी आहेच. आम्हाला वाटले आता यांच्या भाषेचे खोबरेच होणार. पण त्यांना एकाच वेळी तीन-चार भाषा शिकायला अजिबात अडचण आली नाही.
सुरुवातीला काही शब्दांची सरमिसळ करून मजेदार वाक्य बोलायची ती. पण जशी वाढताहेत तसे हे चूक आहे हे त्यांच्या आपोआप लक्षात येते. आता लहान भावाने असे काही वाक्य बोलले की मोठी त्याला सांगते, अरे असे नाही म्हणायचे असे म्हण. ती गुजराती अस्खलीत बोलते(शब्द साठा मोठा नसला तरी व्याकरण, हेल या दृष्टीने). मुले ज्या वातावरणात वाढतात तिथली भाषा ते अनायासे शिकतात. त्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागत नाहीत.

अर्थात US मध्ये किंवा कुठल्याही भिन्न संस्कृतीच्या देशात मुले एकमेकांत किती मिसळायला किंवा खेळायला सोडली जातात त्यावरही अवलंबून आहे.


Bee
Tuesday, February 21, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, वरचे पोष्ट चांगले लिहिले आहे. माझ्या मतानुसार भाषा ही तिथेच चांगली शिकल्या जाते जिथे तिचा वापर शुद्ध होतो. जिथे भाषेचे वेगवेगळे हेल आणि अपभ्रंश झालेले शब्द ऐकतो आणि मग आपण तसेच शिकतो, बोलतो तिथे भाषेचे खोबरे होते. पण तरीही अशा अशुद्ध समजल्या जाणार्‍या भाषेची एक गोडी असते. अशा भाषा आपापल्या ठिकाणीच ऐकायला बोलायला बर्‍या वाटतात. मी जर इथे वर्‍हाडी भाषेत लिहायला गेलो तर ते मला लाजिरवाणे वाटेल इतके अशुद्ध आहे. पण तेच वाक्य वर्‍हाडात बोलताना कसलाच कमीपणा वाटत नाही. मी जर मराठी माध्यम घेऊन शिकलो नसतो तर माझ्या मराठी भाषेची किती वाट लागली असती ह्याची कल्पनाही मी करू शकत नाही. बरेच विद्यार्थी English medium घेऊन शिकतात. मातृभाषेतील एखादा जर साहित्यीक शब्द आपण वापरला तर ती गडबडतात. ह्याचा अर्थ शुद्ध भाषा, चांगली समजली जाणारी भाषा ही जास्तितजास्त आपण पुस्तकातून शिकतो.

असो.. मला वाटत विषय कुठेतरीच भरकटतो आहे.

गजानन, वर तू दाखवली चूक आज माझ्या लक्षात आली. मला अजूनही ती वाक्य बरोबरच वाटतात. पुढल्या वेळी जपूण लिहीन.


Maitreyee
Tuesday, February 21, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, विदर्भात तसे बोलतात. हिन्दीच्या प्रभावामुळे असेल.
बी, वरील वाक्ये
पाढे म्हटले जात नाहीत.
स्तोत्रे शिकवली जात नाहीत.
पुरस्कार दिला जाऊ शकतो.
भाषा शिकवली जाते.
अशी हवीत. पाढे, पुरस्कार, स्तोत्रे यांचे जे लिंग आहे तेच पुढच्या क्रियापदाला वापरले जाते.


Bhutataki
Tuesday, February 21, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BaalGeete, badbadGeete yanche Mp3/Audio asalelya sites koni link karu shakel ka? kinva personally konakade tracks asatil tar plz. pathavane shakya aahe ka?
Kadachit similar request aadhi aaleli asel tar tyachi link dili tari chalel.Ha msg. ya thread la pan post karate aahe--->

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » marathi gaaNaI » vishayapramane » baalgeete,badbadgeete

Dhanyavaad.


Sunidhee
Tuesday, February 21, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी च्या भाचीचे कौतुक वाटले.

Storvi
Tuesday, February 21, 2006 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर आता मूळ विषय आरोही, भुताटकी ची मुलगी आणि सीमा ची मुलगी काय काय करतात याकडे वळवावा का? :-O

Prajaktad
Tuesday, February 21, 2006 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baby einstien videos ,नर्सेरी राहिम पण छान असतात.मुल अगदि रंगुन जातात.श्रेया तर खुप enjoy करते.
.


Storvi
Tuesday, February 21, 2006 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ते baby einstein videos अजिबात नाही आवडले. आरोही ला पण नाही आवडले. मी Baby Van Gogh आणि neighborhood animals आणले होते सगळे छान म्हणतात म्हणून पण त्यात commentary नसते नुसतीच चित्र इकडुन तिकडे जातात. neighborhood animals जर बरं होतं पण कलर्स चं अगदीच बंडल निघालं. त्या पेक्षा baby einstein चे animal cards खुपच चांगले निघाले.

Seema_
Wednesday, February 22, 2006 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलीला सगळ्यात baby genious च्या DVDs आवडतात. award winning आहेत.त्यांच्या nursery rhymes,chldren's songs , आतापर्यंतच्या dvds मध्ये मुलीला सर्वात आवडल्या.
मी net वर बरच शोधुन त्या मागवलेल्या कारण त्या shops मध्ये नाही दीसल्या कधी.
baby einstein पण चांगल आहे. पण somehow आमच्या मुलीला नाही फ़ारस आवडल. may be त्यात दंगा कमी आणि शिकायच जास्त असत म्हणुण वाटत


Bee
Wednesday, February 22, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, धन्यवाद खरच. मला बरोबर काय हे विचारायचे बळच आले नाही. तू आपणहून लक्ष दिले त्याबद्दल शतशः आभार आणि परत एकदा गजूभाऊचेही.

सुनीधी धन्यवाद!

शिल्पा, व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व.. आता छान आरोहीचे गुणगाण गा पाहू :-)

भुताटकी तुझ्या मुलीच नाव काय? तुझ्यासारखेच एखादे का :-) ~D


Bhutataki
Wednesday, February 22, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Majhya mulicha naav Ria aahe. Mulga asata tar 'Pimplavarcha Munja ' naav thevala asata pan mulisathi kahi majhya naavala shobhelsa horrifying naav sapadala nahi. :-)

Mi deshatunch tichyasathi baryach VCDs aanalya aahet pan TV chi jaast savay lagu naye mhanun audios prefer karate. Tase week madhun ek-donada baghayala permission asate tila. Baby Einstein ekade kadhi pahile nahi, bahutek Us madhunach magavave lagel.Seema, tu kuthalya site varun magavalyas ?
Pan Marathi MP3s aahet ki nahi sanga ki konitari.


Mbhure
Wednesday, February 22, 2006 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले बरेच दिवस मी ही चर्चा वाचतो आहे. Really good one मला असे वाटते की सध्याची पिढी मुलांच्या सायकॉलॉजिचा बराच विचार करते. ही माझी काही मते आणि अनुभव्(पटली तर....)

१. मुलांना वेगळे झोपवण्याबद्दलः आमचा एक मित्र आम्हाला हसायचा कारण माझी मुलगी जवळ जवळ ७ - ८ वर्षांची होईपर्यंत आमाच्या जवळ झोपायची. तशी ती Sleep Over ला कोणा मैत्रीणीकडे गेली तर एकटीच असते पण घरी.... मला आणि बायकोला एव्हढेच वाटायचे की जर हिला वेगळे झोपवले आणि भीती वाटली किंवा काही दुखलखुपल तर तिला एकटीला कळून्(झोपेत असल्यामुळे) आमच्याकडे येईपर्यंत असहाय्य वाटेल. मुख्य म्हणजे ईथे(अमेरीकेत) बर्‍याचा वादळ होते. अगदी मोठा कडकडात आणि गडगडात होतो. त्यामुळे आम्हीही फार कधी आक्षेप घेतला नाही.

पुढे एकदा स्टीव्हन स्पिलबर्गच्या मुलाखतीत ऐकले की Poltergeist ह्या चित्रपटातील खिडकीतुन दिसणारे झाड आणि तो जोकर त्याने प्रत्यक्ष अनुभवले होते आणि वादळरात्री त्यांच्या सावल्यामुळे त्याला फार भिती वाटायची.

मात्र अगदी पहिलीपासुन ती दोन घर सोडुन असणार्‍या मैत्रीणीकडे Sleep Over (एक अमेरीकन कॉनसेप्ट) ला जायची. त्यावेळी तिला कधीच प्रोब्लेम आला नाही.

२. TV बघणेः जर अमेरिकेत मुलांनी TV बघु नये असे वाटत असेल तर एकतर त्यांना खेळायला मुल तरी हवीत किंवा निदान ४ - ५ तासतरी त्यांना डे केअरमध्ये ठेवावे. आपण त्यांच्याशी खेळणे(अगदी त्यांच्या मनाप्रमाणे आपल्याला वाटले तरीही) ही एक प्रकारची जबरदस्तीच आहे. तशातच तुम्ही थंड प्रेदेशात असालतर, थंडीत तो एक विरंगुळा असतो नाहीतर YMCA वैरेला जाणे हा एक प्रयाय...

तशी मुलेही ठराविक वयात ठराविक प्रॉग्रम्स बघतात. ते बघणेही जरुरीचे आहे. सतत अभ्यासात्मक कार्यक्रम त्यांनी का बघावेत? ऐकावेत? किंवा करावेत? आपणदेखिल लहानपणी काय न्युज चॅनेल पहायचो का? तसेच बर्‍याच त्यांच्या कार्यक्रमात टेबल मंनर्स, Impotance of Sharing किंवा वाचनाची महती वगैरे दाखवलेले असते.

माझ्या एका मित्राने घरात केबल घेतले नाव्हते. का तर म्हणे अमेरिकेत PG rated कार्यक्रमातही जरा जास्त मोकळीक असते. पण त्यामुळे त्याचा मुलगा मात्र नेहमी ODD MAN OUT ह्यायचा.

३. शिकवणीः लहान असताना थोडासा नियमीत अभ्यास घ्यावा. त्यामुळे अभ्यासाची गोडी लागायला मदत होते. भारतात मात्र अभ्यास जरा जास्तच घ्यावा लागतो.

माझ्या मुलीला मी साधरण ५ वर्षाची असल्यापासुन पाढे शिकवले. म्हणजे रेग्युलर समजुन लिहायला लागल्यावर. कारण किता गिरवण्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे आठवड्याला २ टेबल्स. पाढे हे MUST आहेत असे मला नेहमीच वाटते. आता तिला २५ पर्यतंत सहज आणि २६ ते ३०चे पाढे धडपडत येतात.

गाणी वगैरे मुल शाळेतच शिकतात. शिल्पा म्हणते तसे आपल्यालाच त्यांच्याकडुन शिकायची पाळी येते.

माझा एक मित्र म्हणाला होता की आपल्यामुलांना ' कमीत कमी ' भगवतगीता यायला हवी. मला असे कधीच वाटले नाही. कारण उगीचच श्लोकाचा अर्थ विचारला तर.... :-) मराठे बोलता येणे हे मात्र महत्वाचे. त्यामुळे त्यांना भारतात प्रोब्लेम होत नाही आणि Communication gap पडत नसल्याने भारतात जायला त्यांना कंटाळा येत नाही. एक वाईटातुन चांगला अनुभव म्हणजे, Z आणि Sony Channel घेतल्यामुळे आणि हिंदी सिनेमा बघितल्यामुळे मुलीला हिंदीही चांगले कळते आणि बोलताही येते. त्यामुळे इतर हिंदी भाषिकांबरोबरही तिची चांगली मैत्री आहे. (पुर्वी हिंदी माझी आणि बायकोची कोड लॅंगवेज होती)

एकुण काय शिस्त जरुर लावावी, बंधनही असावीत. पण " जो जो जब जब होना है, वो वो तब तब होता है.... " उगीच प्रत्येकवेळी कोंबड झाकण्यात काय हशिल?

टीपः तुमची मुल Comparatively बरीच लहान आहेत. त्यामुळे इतक्यात उगाच काळज्या नकोत. Just Enjoy & Let Them too
आम्हाला आता दुसर्‍या काळज्या आहेत.


Arch
Thursday, February 23, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Impotance of Sharing >>
हे काय प्रकारच sharing आहे?

Seema_
Thursday, February 23, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mbhure नेहमीप्रमाणेच छान लिहिलय तुम्ही. तुमचे अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
भुताटकी अगं amazon वरुन त्या DVDs येतील तुला मागवता.मराठी cd, vcd मी भारतातुन येताना आणलेल्या त्यामुळ mp3 वगैरे नाही ग मला तरी माहित.


Bhutataki
Monday, February 27, 2006 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mbhure, kharach practically vichar karun sangitlay tumhi, arthat tumacha swanubhavahi aahech tyat.

Kharach aajachya parents na suruvatipasunach mulanna kase vadhavayache yacha vichar karava lagato. Tyamage sadhyache vadhate sofistication aani competition ya goshti tar aahetach, pan dusare karan ase asel ki bahutek vela aapali close family aani aapale culture aapalyabarobar/around nasate , tyamule pratye lahan-sahan goshti mule shikatat tyala parents ch javabdar asatat.Nahitar majhi mulgi bhajya khat nasel tar 'Kedar kakane bari sarakhi chocolate, biscuits khanyachi savay lavali aahe' asa mhanun kaka var sagala blame takayala agadi bara vatel mala :-)

Aani,mbhure dabun pathantar aani likhan karanyache mahatva pan ekdam manya. Jo paryant logical understanding develop hot nahi tovar pathantarala paryayach nahi.Accounts che ratta marun path kelele Debit/Credit che rules janmabhar visarane shakya tari aahe ka :-)zopetun uthvun vichara bara..


Storvi
Tuesday, February 28, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually मला सध्या वेगळाच प्रश्ण पडलाय आरोहीची स्मरणशक्ती फ़ारच चांगली आहे, पण त्याचे काही problems मला आता दिसू लागले आहेत. उदा. मी तिला सगळ्या गोष्टी एका rythm मध्ये सांगत असते. त्यामुळे तिला गोष्टी फ़ार आवडु लागल्या आहेत, ( आणि इतरांची वाचन शैली आवडेनाशी झालिये :-) ) पण आता एका गोष्टीत त्या आजीने पिवळी शाल घेतलेली असते. गोSःत वाचुन दाखवताना रंग प्राणी point out करताना आजीने yellow शाल घेतलिये असे मी सांगते, तर दोन दिवसाने तिच सांगु लागली. मला वाटलं वा वा yello रंग तरी ओळखु आला.. कसलं काय नी फ़ाटक्यात पाय :-) उद्या त्या शालीला लाल रंग दिला तरी आमचं उत्तर ठरलेलं.. त्यामुळे आता रंग कसे शिकवावेत हे मला कळेनासं झालंय. चित्र काढुन झाली blocks आणुन झाले. पुस्तकातले रंग दाखवले तरी वरच्या प्रमाणे तिला खरंच रंग नाही कळला तरी उत्तर बरोबर येणार :-) काही टीप्स असतील तर द्या हो जरा कोणी तरी :-)

Lalu
Tuesday, February 28, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याना सुरवातीला रन्ग' हा concept च कळत नाही. तू जी शाल दाखवते आहेस ना त्या वस्तूचं नाव ' यलो शाल' आहे असं तिला वाटत असणार, त्याचा रन्गाशी काही संबन्ध नाही. :-)
रन्ग शिकवायला पुस्तक मिळतात 'color' नावाची, बोर्ड बुक्स. ती आण. त्यात एकाच कलरच्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतात. ते शिकवताना पहिल्यान्दा त्यांच्यात काय साम्य आहे ते मुलान्च्या लक्षात येतं. माझा मुलगा ' सेम कलर, सेम कलर' म्हणायचा. मग स्वतः घातलेला शर्ट आणि दुसरी एखादी वस्तू यांचा रन्ग सारखा आहे हे पण सांगायला लागला. पण त्याला रन्गांची नावं माहित नव्हती तेव्हा. एकदा हे कळलं की मग रंगांची नावं शिकवणे. :-)


Sashal
Tuesday, February 28, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं पण रंग कळायला कदाचित अजून लहान असेल ती .. अद्वैत ला सुध्दा रंग कळत नाहीत अजून ..

या बाबतीत एक किस्सा म्हणजे त्याला fire engine खूप आवडतं आणि त्याचा रंग red हे त्याला माहित आहे .. लाल रंग त्याला कळत नाही पण fire engine red असतं एव्हढंच माहित आहे .. परवा आम्ही TGI Fridays मध्ये गेलो होतो आणि तिकडच्या table वर red and white stripes असतात .. त्याला मजा म्हणून stripes चा रंग विचारला तर red उत्तर मिळालं .. ते ऐकून मी अवाक् आणि खुष .. पण नंतर लक्षात आलं की कुठलाही color विचारला की तो red हेच उत्तर देतो .. आणि त्याला शिकवायचं तर त्याला अजून खरंच कळत नाहीत वेगवेगळे रंग .. त्याला ABC..'s सगळं छन ओळखता येतं पण numbers आणि colors मात्र कळत नाहित अजिबात .. मलाही वाटलं होतं ABC .., ज्या pace ने pick-up केलं तर हेही करेल .. पण तसं झालं नाही .. पण मग मला वाटतं की अजून लहान आहे तो .. कळायचं असेल तेव्हा कळेल .. मुद्दाम efforts करून घोकून घेण्यात काही अर्थ नाही .. ह्याचा अर्थ हा नाही की आपण दुर्लक्ष करायचं कारण माझा यावर पुर्ण विश्वास आहे की आपण जेव्हढे stimulii provide करू तेव्हढं ते pick-up करतील .. पण जोर धरून होणार नाही असं वाटतं ..


Sashal
Tuesday, February 28, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे ! मला वाटतंय मी छान lecture दिलं sto ला .. तीने tips विचारल्या आणि मी सांगितलंय की force करू नको म्हनून .. पण मला हे सांगायचं होतं की perhaps she is too young to understand different colors .. दुर्लक्ष कर गं मझ्या post मधल्या उपदेशाच्या tone कडे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators