Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
डिलेव्हरी नंतरचे व्यायाम ...

Hitguj » Health » व्यायाम » डिलेव्हरी नंतरचे व्यायाम « Previous Next »

Gautami
Monday, December 19, 2005 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा आता ३ महिन्याचा झाला. मी exercise सुरु केला आहे. mainly treadmill करते. पण ab साठी काही विशेष व्यायाम प्रकार कोणी सुचवू शकेल का?

mod, how to display the title in marathi?


Suniti_in
Tuesday, January 24, 2006 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शरीरातील अनेक स्नायू गरोदरपणात ताणले जातात. नियमित व्यायामाने ते पूर्वस्थितित येऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे डाॅक्टरच्या सल्ल्यानेच व्यायामाला केव्हा व कशी सुरूवात करायची हे जाणून घेणे उत्तम.
नैसर्गिक प्रसुती असेल तर सुलभ व्यामानाने सुरूवात करावी व वेळही हळू हळू वाढवत जावी. मात्र सिझेरियन असेल तर १ महिना तरी विश्रांती घ्यावीच. व ३० दिवसांनतर डाॅ. सांगतील तसा व्यायाम करावा.
शरीराला जास्त ताण देऊ नये. दिवसातून थोडा वेळ विश्रांती घ्यावी. पाठीच्या कण्याला वेडावाकडा ताण देऊ नये. त्याकरता बसताना ताठ बसावे. सरळ उभे रहावे. जड वस्तु उचलू नये. एकाच कडेवर मुलांना घेऊन तिरके चालू नये. ८-१० दिवसांनी पोटाचे व पाठीचे व्यायाम टाके भरले असतील शीण गेला असेल तर सुरू करावे.
प्रसुतीनंतर माकडहाडाच्या पोकळीतील स्नायू सैल पडतात. गर्भारपणात चालण्यात, उभे राहण्यात फरक पडलेला असतो. नतर रक्ताभिसरण वाढण्यासाठी व रक्तातील गुठळी टाळण्यासाठी साधे लांब श्वसनाचे व पायांचे व्यायाम करावेत. वस्तु उचलताना गुडघ्यात वाकून उचलावी. डाॅ. शोभा जोगळेकरांनी सांगितलेले काही व्यायामाचे प्रकार पुढच्या पोस्ट मधे सविस्तर टाकते.


Nalini
Wednesday, January 25, 2006 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

CINDY CRAWFORD: A NEW DIMENSION (Fitness)
ही DVD आणुन ह्यात सांगितलेले व्यायाम करावेत. हि
www.ebay.com वरुनही विकत घेऊ शकता. माझ्या इथल्या एका मैत्रिणीने सुचविले आहे.

Suniti_in
Friday, February 03, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DVD मिळली तर उत्तमच. प्रत्यक्ष पाहून करणे कधिही चांगलेच. तरी काही सोपे प्रकार इथे लिहिते.
१) जमिनीवर एका अंगावर कुशीवर झोपा. वरचा पाय वर उचला, नंतर खालचापाय आवर उचला, ६ सेकंद तसेच धरा. मग खाली आणा तसेच दुस-या बाजूने करा.

२) पाठीवर झोपून गुडघे वाकवून घ्या. मान उचलून दोन्ही हात एकदा उजव्या गुडघ्याच्या बाजूला लावा एकदा डाव्या व तसेच ५ सेकंद ठेवा.

३)जमिनीवर पाठीवर झोपा. गुडघ्यात पाय वाकवा. गुडघे जोडून एकदा डाव्या व एकदा उजव्या बाजूस जमिनीला चिकटून ठेवा. यामुळे मणक्यांना व पोटाच्या स्नायूंना उपयोग होतो व पाठदुखी होत नाही. असेच रहा व गुडले खाली दाबून ठेवून पोट डाव्या व उजव्या बाजूस फिरवा.

४)खाली जमिनीवर पाठीवर झोपा. गुडघे वाकून पाऊले जमिनीवर ठेवा व हात कोपरात वाकवून छातीवर ठेवा. हळूहळू श्वास घ्या व सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर छातीवरील हात वर खाली होतील असे १० वेळा करा.

५) वरचाच प्रकार हात पोटावर ठेवून करा. पण आता पोटातून श्वास घेतल्याने पोटावरचे हात वर खाली हलले पाहिजेत. १० वेळा करा.


Prady
Monday, February 27, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी जाणकार मन्दळी प्रेगनन्सी प्लान कशी करायची, म्हणजे आहार विहार, काही औशधे आणी गर्भ सन्स्कार या वर माहिती देवू शकतील का?

Suniti_in
Monday, February 27, 2006 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pradnya शक्य असेल तर Dr. विक्रम शहा व Dr. गीतांजली शहा यांचे सुप्रजेसाठी गर्भसंस्कार हे पुस्तक मागवून घे. तुला हवी असलेली माहिती यात व्यवस्थित दिली आहे.

Prady
Friday, March 03, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Suniti,

Kuni yenar asel India tun tar nakki magaween.

Renushahane
Friday, March 03, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady मी प्रेगनन्सी चा विचार करत असल्यामुळे मला असलेली महिती मी देते.पहिलं म्हणजे मी डाॅकटर ला भेटून सगळी तपासणी करून घेतली,सगळं नाॅर्मल आहे की नाही बघायला.त्या नंतर मी विटामिन्स सुरु केले.३ महिने आधी घ्यावे असे म्हणतात. ह्या विटामिन्स मध्ये फ़ोलिक आॅसिड असते जे गर्भासाठी आवश्यक असते.
आहर मधे मुख्य म्हणजे थोड्या प्रमाणात दिवसातून ६-७ वेळा खात रहाणे.सकाळी नाश्ता,१०:३०-११ ला एक सनॅक,मग लण्च,४ ला परत एक सनॅक,जेवणा आधी एखादं फ़ळ अणी मग रात्रीचं जेवण.जेवणात काय काय असावं इत्यादी हवं असल्यास मला मेल कर.
घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे पुस्तक वाच,गर्भ सन्स्कारावर आहे.


Renushahane
Friday, March 03, 2006 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

internet var dekhil khup mahiti ahe.check babycenter.com
aaharsathi malati karwarkar chi pustaka refer kar.
pregnancy week by week ani what to expect when ur expecting hi pustaka chaan ahet

Prady
Monday, April 03, 2006 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Renu.maze inlaws may madhe yetahet ikade tewha pustaka magawata yetil. And thanks for all the info.

Moodi
Sunday, April 16, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही एक चांगली लिंक जरूर बघा.

http://www.loksatta.com/daily/20060416/lr07.htm . दिसत नसल्यास लोकसत्ताचा मिलेनियम वरूण हा font download करुन घ्यावा.

Maudee
Wednesday, August 16, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady ,
मी बर्‍याच ठिकाणि असं वाचलं आहे की गर्भारपणात रामायणाचे वाचन करावे. किमान ऐकाव तरी. यामुळे होनारं बाळ सद्गुणी आणि उत्तम माणुस म्हणुन जन्माला येतं.(हा विचार मी बर्‍याच पेशवेकालीन पुस्तकात वाचला आहे.)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators