Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Aroma Therapy : for Health and Beauty

Hitguj » Health » सुंदर मी होणार.. » Aroma Therapy : for Health and Beauty « Previous Next »

Tulip
Thursday, August 18, 2005 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍरोमा थेरपी चे उपचार साधारणत : ब्यूटीशिअन्स पुरतेच मर्यादीत असतात. स्पर्श व सुगंधाच्या सहाय्याने केले जाणारे हे उपचार स्वास्थ्य व सौंदर्य ह्या दोन्हींसाठी अतिशय खात्रीलायक व कायम स्वरुपी गुण देणारे असतात. ह्या करता वापरली जाणारी essential oils फ़ार महाग असल्याच्या समजाने, व उपचार फ़ार complicated असतात वगैरे समजातून बहुतेक जण ह्याच्या वाटेला जात नाहीत. मला स्वत : ला ऍरोमा थेरपी बद्दल जी माहीती आहे ती तुमच्या पर्यंत पोचावी, तुमचे अनुभव शेअर करता यावेत म्हणून हा बीबी.

हल्ली coloring, perming, straightening तसेच शांपू आणि अनेक कारणांनी केसांवर harmful effects होत असतात. skin पण बर्‍याच जणांची healthy नसते. तेव्हा त्या साठी सर्वात आधी इथे लिहूयात.



Moodi
Thursday, August 18, 2005 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरुर ट्यु तुझे अनुभव तर लिहिच.मीही काही माहिती देते.
सर्वाना आजकाल ह्याची सर्वसाधारण माहिती असतेच असे गृहीत धरुन लिहितेय.

aromatherepy लहान बाळापासुन वयस्करांपर्यन्त वापरली जाते.
लहान बाळांना जोजोबा,लवेंडर इत्यादी तेले मसाजकरता वापरतात. अजुन माहिती उद्या देईन.

लवेंडर,जिरेनियम,रोज,युकेलिप्टीस, जास्मीन, लाईम, ऑरेंज,जोजोबा, yalang yalang , ज्युनीपर अन अजुन बरीचशी तेले वापरली जातात. ही तेले अत्यंत गुणकारी आहेत.
पण हे सर्व शरीरावर direct वापरुन चालत नाही. त्याची reaction येऊ शकते.
म्हणुन ही तेले बेस तेलात म्हणजे तीळ, खोबरे तेल, ग्रेपसीड तेल, ऑलिव्ह तसेच बदाम तेलात योग्य प्रमणात mix करुन वापरावीत.

बाथ घेताना तर खुपच गुणकारी विशेषता स्त्रीयंसाठी अडचणीच्या दिवसात अन गरोदरपणात अन नंतर ही उपयोगी.
बाकीची माहिती उद्या.


Moodi
Sunday, August 21, 2005 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

e T\yau ha baIbaI tu caalau kolaasa naaÆ maga ilahI naa Ajauna kahItrI. ka maaJyaakDo saupud- kolaoya ho Kato ta%purtoÆ

Tulip
Monday, August 22, 2005 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aga hÜ vaIkonD laa ilaihNaar hÜto tr vaoLca Jaalaa naahI. tu ilahI naa puZca tÜ pya-Mt. Cana ilaiht Aahosa

Moodi
Monday, August 22, 2005 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ok अन Thank You .

त्वचेचे सामान्य, कोरडी अन तेलकट असे तीन प्रकार सर्वांना ठाऊक आहेतच.
म्हणुन मालीश करतांना खालील सुचना बघाव्यात.

सामान्य त्वचेसाठी बदाम, ऑलिव्ह, तीळ + खोबरे तेल वापरावे.

कोरड्या त्वचेकरता बदाम, ऑलिव्ह, तीळ ही तेले वापरावीत.

तेलकट त्वचेकरता खोबरेल तेलाचा किन्वा ऑलिव्ह तेलाचा बेस चालतो.

या aromatherepy मधील तेलांमध्ये गुलाब ( रोज ), चंदन ही तेले अत्यंत गुणकारी असुन ती कोरड्या त्वचेला मालीश करता वापरावीत.

संत्रा सालीचे तेल ( orange ), lime ही तेले सामान्य अन तेलकट त्वचेकरता चांगली आहेत. त्वचेतील अतिरीक्त तेल जाऊन त्वचेचा गुणधर्म चांगला ठेवतात.

ज्युनीपर हे तेल सांधेदुखी अन स्नायुदुखी यावर गुणकारी आहे. थोड्याश्या खोबरे वा तीळ तेलात हे तेल 3-4 थेंब टाकुन नीट मिक्स करुन मग वरुन मालीश करावी. आहारात मात्र डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

जोजोबा हे तेल लहान बाळाच्या रोजच्या मालीशकरता चांगले आहे परंतु आधी त्याची टेस्ट केल्याशिवाय वापरु नये, बाळाच्या कातडीवर पुरळ, फोड असे काही उठल्यास ते लावणे बंद करावे.

बाकी माहिती उद्या.


Sayonara
Monday, September 05, 2005 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मूडी, ट्यु, मला शांत झोप लागायला चांगला उपाय सांगा. हल्ली फार प्रॉब्लेम झालाय. कितीही दमलं असलं तर झोप काही लागत नाही आणि लागली तरी पटकन मोडते. ह्यामुळे मला डोकेदुखी आणि पित्त होतं आणि मग pain killers . हा सिलसिला कसा संपवू?

Moodi
Monday, September 05, 2005 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saayaÜ maola caok kr jamalyaasa.

Tulip
Monday, September 05, 2005 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायो... झोप न लागण्याची शारिरीक व मानसिक दोन्ही कारणे असू शकतात. जसे गॅसेस, ऍसिडीटी मुळे किंवा मानसिक ताणा मुळे.
शारिरीक कारण असेल तर ते दूर व्हावे म्हणून रात्रीचे जेवण हलके व ८ च्या आत घ्यावे. कcच्या भाज्या काही दिवस टाळाव्यात. अन्^न चावून चावून खावे कधी भुके मुळे, कधी वेदनांमुळे, थकव्याने, जास्त प्रमाणातील चहा कॉफ़ी मुळेही ही समस्या उद्भवते.
मानसिक आण कमी करण्यासाठी ऍरोमाथेरपी तेले मदत करतात. रात्री झोपायच्या आधी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात लॅव्हेंडर, कॅमोमाईल किंवा क्लेरीसेज ह्यापैकी एकाचे ३ थेंब टाकावेत.
मसाज साठी क्लेरीसेज ५ थेंब, लॅव्हेंडर ४ थेंब, व्हेटिव्हर ३ हेंब आणि व्हॅलेरियन १ थेंब मिसळून ह्यातील २ थेंब तेल १ टीस्पून साध्या तेलात ( तीळ, कॉर्न, किंवा बदाम तेल ) मिसळून त्याचा मसाज करावा. मसाज शक्यतो दुसर्‍या कोणाला तरी करायला सांग व तो पाठ, मान, खांदे, चेहरा असा कर. ह्या मसाज बद्दल मी स्वतंत्र पोस्ट मधे लिहीते.
तळपायालाही ऍरोमा बाथ दिल्यास झोप चांगली लागते. एका छोट्या टब मधे कोमट पाण्यात २ थेंब लॅव्हेंडर, ३ थेंब कॅमोमाईल आणि २ थेंब मार्जोराम घालून त्यात पाय बुडवून १० मि. ठेव.


Tulip
Monday, September 05, 2005 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍरोमाथेरपी हा स्पर्श व सुगंधाच्या साहाय्याने केला जाणारा उपचार असल्याने ह्यात मसाज ला फ़ार मह्त्व आहे. हा मसाज वेगवेगळ्या प्रकारांनी केला जातो. ह्यात कठीण काहीच नाही. कोणीही आपल्या कुटुंबियांवर, स्नेह्यांवर वा स्वत : वर करु शकतो.

१ ) इफ़्लुराज Effleurage

ऍरोमाथेरपितली सगळ्या उपयुक्त अशी ही मसाजक्रिया आहे. हलक्या हाताने सुखद लयबद्ध वरचेवर strokes दिले जातात ज्यामुळे essential oils शरीरात मुरुन शरीराचा व मनाचा ताण हलका करतात. ह्या पद्धतीत संपूर्ण तळहात वापरायचा असतो ( नुसती बोटेच नाहीत ) . ते stroke लांब किंवा आखूड, हलके किंवा दाबूनही असतात. ह्यामुळे स्नायु relax होतात, मजातंतुंची टोके soothe होतात, रक्ताभिसरण वाढते, tension कमी होते आणि शरीरातल्या मांसल भागात सौम्य उष्णता निर्माण होते. बहुधा हे strokes वरच्या दिशेला ह्रुदयाकडे असतात. खालून वर जावयाचे व हलक्या हाताने परत starting point कडे यायचे अशी लयबद्धता असते. तळहाताचा स्पर्श सतत होत असतो. मध्येच हात उचलायचा नसतो. प्रत्येक मसाजच्या सुरुवातीला आणि शेवटी हे strokes दिले जातात. साधारं ६ ते १२ वेळा.

२ ) peTrIsaaj Petrissage

ह्याला आपण कणिक मळण्याची action म्हणू या. बहुधा जिथे फ़ॅट आहे तिथे हा केला जातो मांसल भागाला तळहाताने दाबणे, थोडेसे उचलणे, रोल करणे हे लयबद्धतेने केले जाते. जरी प्रेशर मधूनमधून दिले जाते तरी लय राखली जाते. ह्यामुळे स्नायू relax होतात, त्यांचा रक्त पुरवठा वाढतो, त्या जागेचे लिम्फॅटिक ड्रेनेज चांगले होते, तसेच जी विषे Toxins जमलेली असतात त्यांचा निचरा होतो.

३ ) घर्षण Friction

बहुतेक वेळा अंगठ्याने त्वचेवर घर्षण करीत त्वचा त्याच्याखालच्या हाडापासून उचलली जाते. गोलाकार अश्या ह्या movements होतात. ह्या घर्षणामुळे त्या जागेतले tension कमी होते. शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढून अशुद्ध रक्त व विषे उत्सर्जित केली जातात.

ऍरोमाथेरपी मध्ये जेव्हा कधीही मसाज चा उल्लेख येईल तेव्हा तो ह्या तीनही पद्धतिंनी ज्या भागावर ही तेले वापरायची त्या जागेच्या ठेवणी नुसार करावा.



Tulip
Monday, September 05, 2005 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप थंडीमुळे जेव्हा स्कीन ड्राय होते तेव्हा खालील फ़ॉर्म्युला प्रमाणे तेल बनवून घेऊन वापरावे. त्वचा अत्यंत मुलायम रहाते.

चंदन तेल १० थेंब
जेरॅनियम तेल १० थेंब
रोझवुड तेल ५ थेंब
yelang yelang तेल ५ थेंब
व्हीटजर्म तेल १० ml

हे सर्व 50 ml. च्या तिळाच्या तेलात मिसळून घ्यावे व त्यातील जरुर तेव्हढे घेऊन रोज संध्याकाळी मसाज करावा. अति रुक्ष त्वचे साठी केड ऑईल वापरावे.

Day skin moisturiser असे बनवावे.

कॅमोमाईल तेल ४ थेंब
चंदन तेल ६ थेंब
रोझ तेल ६ थेंब

हे सर्व 50 ml. बदाम तेलात मिसळून ठेवावे. आंघोळी नंतर ह्यातील थोडेसे तेल चेहरा, मान, गळा ह्यावर अलगद चोळावे.

Night skin moisturiser

जेरॅनियम तेल १२ थेंब
रोझमेरी तेल १० थेंब
कॅमोमाईल तेल १० थेंब
व्हीटजर्म तेल 10 ml.

50 ml. ऍलो व्हेरा जेल मधे हे एकत्र मिसळून घ्यावे. चेहरा स्वcछ धुवून घ्यावा व नंतर हे जेल चेहर्‍यावर अलगद चोळावे.


Sayonara
Tuesday, September 06, 2005 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow Ê iktI Cana maaihtI ilaihilasa. tuJaa kÜsa- vagaOro Jalaaya ka ga aroma therapy caaÆ

Bee
Tuesday, September 06, 2005 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tulip- तेलाची नावे कठीण वाटलीत पण तू दिलेली माहिती कौतुकास्पद आहे. खरच काही कोर्स केला आहे का की वाचनातून गोळा केली इतकी छान माहिती? आणि स्वतच स्वतला मसाज कसे करायचे? पायांना हाताला मानेला ठीक आहे पण कंबरीपासून मानेपर्यंत मसाज नाही जमनार.

जेवनानंतर आंघोळ करू नये असे म्हणतात. त्यापेक्षा घरी आले की छान गार पाण्याचा शावर घ्यावा. थकवा दूर होतो. आणि गरम गरम कुठलेही सूप प्यावे. हलका आहार दिवसा रात्री केंव्हाही चांगलाच असतो. शक्यतोवर टीव्हीवरचे हलके फ़ुलकेच कार्यक्रम बघावेत जर TV बघणे टाळू शकत नसाल तर. तसेच आपल्या आवडीच पुस्तक वाचता वाचता छान डुलकी येते. लाईटाचे बटन आपल्या शेजारी असले की लगेच डुलकी येता बंद करता येते. जर बंद करायला उठलो तर tempo जातो. झोपताना संगीतही ऐकता येते. एखादे जूने लाऊड नसलेले सुगम संगीत ऐकले तर मन रमते आणि झोप लागते. मोझार्ट नाहीतर बाखपण छान वाटतो ऐकायला रात्री.

GOOD NIGHT :-)


Sayonara
Tuesday, September 06, 2005 - 3:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

baIÊ masaaga naahI ro ‘masaaja’

Bee
Tuesday, September 06, 2005 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saayaÜÊ kolaya naITÊ caukUna ja eovajaI ga TMkIt Jaalaa.

Tulip
Tuesday, September 06, 2005 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो. मी भारतात असताना डॉ. उर्जिता जैन ह्यांचा ऍरोमा थेरपी चा पूर्ण कोर्स केला आहे. वरिल बहुतेक सर्व त्यांच्या notes मधीलच आहे.
एकतर ऍरोमा फ़ेशीयल मला खुप आवडायच आणि त्या साठी भरमसाठ पैसे मोजण जिवावर यायच म्हणून केला होता एका कॉलेजच्या सुट्टीत. मी ह्या वेगवेगळ्या essential oils च्या शुद्ध सुगंधांची अगदी वेडीच आहे म्हण ना. इथे मी बर्‍याच जणांना ह्या थेरपी बद्दल फ़ुकटचे सल्ले देत असते आणि त्यांना ते उपयोगीही पडतात चक्क :-P . ही oils हल्ली सगळीकडे मिळतात फ़क्त त्याच्या शुद्धतेची खात्री हवी. महाग असली तरी त्यांचे प्रमाण अगदी थेंब ह्या स्वरुपात लागत असते आणि परिणाम अगदी छान व without any side effects असतो.

बी.. शक्यतो मसाज दुसर्‍या व्यक्ती कडून करुन घ्यावा विशेषत : पाठ, मान वगैरे ठिकाणचा. जवळच्या व्यक्तीच्या स्पर्शातून खुप चांगली positive energy transmit होत असते. जसं की आई आणि मुलं, पती पत्नी, बहीण भाऊ. तेव्हा जवळच्या नात्यातल्या व्यक्ती कडून तो जरुर करुन घ्यावा. चेहरा, गळा, केस वगैरे भागांवर तो स्वत : सहज करता येतो.


Bage
Monday, September 12, 2005 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tulip,
Hya mahitibaddal thanks .
hee sagali tela kuthe milateel.



Anjalisavio
Tuesday, October 11, 2005 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

TuilapÊ maUiD Cana maaihtI dot Aahat.

Gsayali
Monday, November 07, 2005 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tulip,
he oils u.s. madhe miltil ka ani kuthe?

Deepanjali
Sunday, November 20, 2005 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gsayali ,
US मधे easily available आहेत Essential oils .
मला Aveda चे products आवडतात.
कुठल्याही Mall मधे Aveda, Origins, Bath and body works अशा ठिकाणी मिळतील Essential oils .
शिवाय 'Trader joe's , 'Whole Foods' (Organic product special grocery stores) also display Essential oils/related cosmetic grade products.
More about
Essential oils



Maku
Thursday, March 01, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deepanjali तु course केला आहेस का जर कुठे असा चांगला course असेल तर please मला सांगते का? पुन्यामध्ये असेल तर चांगले

Anamikaa
Wednesday, May 02, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्यु बी
तुम्ही दोघी खुप छान माहिति देत आहात मला जरा मदत कराल का?माझी धाकटी लेक ४ वर्षाची आहे पण तिच्या अंगावर खुप लव आहे.जन्माच्या वेळेस इतकी दिसत नव्हती पण आता दिसु लागली आहे.मी तिची लव कमी करण्यासाठी काय करु शकते?
मी स्वतः १ वर्षापुर्वी डॉ जैन यांच्या कडे गेले होते त्यांना देखिल मी हा प्रश्न विचारला होता त्या म्हणाल्या कि आपोआप कमी होईल.पण मला तरि तसे काहि अढळत नाही आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या स्वतःच्या अंगावर बर्‍यापैकी लव आहे. माझ्या लेकीला भविष्यात 'लव 'असल्याने कुठल्याही प्रकारचा त्रास होवु नये अशी माझी इच्छा आहे.तुमच्या उत्तराची वाट पहातेय.
"अनामिका"


Aryamira
Tuesday, November 06, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MAZE LIPS KALE ZALE AAHET KAHI TARI UPAYA SANG

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators