Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 18, 2007

Hitguj » Health » केसांचे आरोग्य » Archive through May 18, 2007 « Previous Next »

Sanghamitra
Saturday, January 20, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप छान माहिती दिलीय इथे. मनकवड्या तू लिहिलेले खूप आवडले. तेल लावा वगैरे कळकळीने सांगितलेयस अगदी.
मझे केस खूप गळतायत आणि कोरडे पण झालेत खूप. आधीच कुरळे आहेत. ते तेलाचा नियमित मसाज केला तर कमी होतील हे माहीतीय मला.
पण एक प्रॉब्लेम आहे.
तेल लावले की शॅंपू जास्त वापरला जातो कारण शॅंपू वापरला किंवा शिकेकाई वापरली तर तेल नीट निघत नाही.
आणि केसही स्वच्छ झालेत असं वाटत नाही.
असे अर्धवट तेल निघालेले केस मग जास्तच गळतात.
प्रदूषणाने मळलेल्या केसांना तेलही लाऊ वाटत नाही धुवायच्या आधी.
केस धुवून थोडेसे तेल लावले तर छान वाटते पण मग लगेच त्यावर धूळ माती आणि घाम याचे संस्कार(?) होऊन अजून वाट लागते.
थोडक्यात काहीही केले तरी माझे केस खूप गळतायत अर्धे झालेत.
plz help


Tulip
Saturday, January 20, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा.. दरवेळी केस धुवायच्या आधी केसांना तेल लावायची गरज नाही. पंधरा दिवसातून एकदा कोणत्याही तेलाने स्काल्पला बोटांच्या टोकांनी वर्तुकाळाकार मसाज करुन तेल लाव (केसांच्या मुळांना जोरजोरात चोळून तेल लावत असशील तर तसं करु नकोस) आणि सकाळी प्रोटीनयुक्त शांपूने केस स्वच्छ धू. हवं असेल तर आणि वेळ असेल तर तेल लावून झाल्यावर केसांना स्टीम दे (घरच्या घरी उकळी येईपर्यंत गरम केलेल्या पाण्यात टर्कीश टॉवेल मधोमध बुढवून पाणी पिळून टाक आणी तो टॉवेल डोक्याला बांध. असे दोनतीन वेळा कर). केस धुतल्यावर तेल पूर्ण गेले पाहिजे. तेल पूर्ण गेलेच पाहीजे. इतर वेळी केस धुताना ज्या कंपनीचा शांपू वापरशील त्याच कंपनीचा कंडिशनर न चुकता लाव. केस अजिबात कोरडे पडणार नाहीत आणि गळणेही कमी होईल. तुझे केस कुरळे असल्याने तर कंडिशनर लावणे मस्ट आहे. ज्या दिवशी तेल लावशील त्यादिवशी केस धूवून झाल्यावर शक्य्तो कंडिशनर लावू नकोस. गरज भासत नाही कारण तेलाने केस मऊ पडलेले असतात.

केस बरेच गळत असतील तर कॉडलिव्हर ऑइलच्या गोळ्या अथवा डॉक्टरांच्या सल्ल्याने विटामिन ई आणि ए च्या गोळ्या सुरु कर. आहारात पालेभाज्या आणि प्रोटीन्सचे प्रमाण जाणीवपूर्वक आत्ता आहे त्याच्या दुप्पट कर. मका, बीट, गाजर वगैरे almost रोज जेवणात include कर. खूप फरक पडलेला दिसेल.

केसांना अरोमा ट्रीटमेन्टने पण खूप फरक पडतो. महिन्यातून एकद पार्लरमधे जाऊन केसांना शास्त्रशुद्ध मसाज केला तर योग्य ते प्रेशर पॉइन्ट्स दाबले गेल्याने रक्ताभिसरण वाढते आणि केस गळायचे कमी होते. घरच्याघरी बेडच्या कडेवरुन डोके खाली सोडून निदान पंधरा ते वीस मिनिटे झोपलीस तरी रक्ताभिसरण सुधारते.

आत्ता मिळतात का माहीत नाही पण पूर्वी केमिस्टकडे गुटिका केशरंजना म्हणून साबुदाण्यासारख्या गोळ्यांची एक छोटी बाटली आणि त्यांचेच तेल मिळे. ते नियमीत घेतलेस तर खरच फरक पडलेला दिसेल. कॉलेजात असताना माझ्या केसांना चूकीच्या पद्धतीने straightening करुन घेतल्याने माझे केस खूप damage झाले होते. बात्रा म्हणून एका ट्रायकॉलॉजिस्टची मी त्यावेळी ट्रीटमेन्ट घेतली होती. खूप हेल्दी झाले माझे केस त्यानंतर. अर्थात ट्रायकॉलॉजिस्टकडे जाणे हा अगदी extreme conditions मधला उपाय आहे.


Zakasrao
Thursday, January 25, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे केस गळण्याचे प्रमाण गेल्या २ वर्षात वाढले आहे. कोणी उपाय सांगेल का? मी पुरुष आहे हे लक्षात ठेवुन उपाय सांगा. तसेच केस किती वेळा धुवावे, त्यांना मसाज कसा करावा, ते कोरडे कसे करावे ई. माहिती मिळाल्यास बरे होइल. मी हेल्मेट वापरतो.त्याचा काही परीणाम होतो का?
माझे जर असेच केस गळाले तर ३-४ वर्षात कदाचीत पुर्ण टक्कल पडेल असे वाटते. माझे वय २६ पुर्ण आहे.


Zakasrao
Saturday, January 27, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसेच माझ्या केसात खुप कोंडा झाला आहे. केसांच्या मुळाची skin फ़ाटल्यासारखी दिसते.

Sanghamitra
Monday, January 29, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स ट्युलिप.
करून बघेन मी हे.
खरंतर कंडीशनर, प्रोटीन शॅंपू, स्टीम वगैरे ट्राय केलेय. केशरंजना पण. पण मला वाटते consistency कमी पडतेय.
कॉडलिव्हरच्या गोळ्यांची सवय लागते म्हणतात. पण बाकी सांगितलेले नक्की ट्राय करेन.


Manakawada
Thursday, February 01, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry for the late reply... हं तर एकंदर केस गळतात...
केसान तेल तर नक्किच लाव पण मी म्हणेन की केसत धूळ,घाण नसतानच तेल लाव नहितर धुळ,घण अणि तेल असे एकत्र होउन चिकट होते आणि कोन्डा वाढतो..तसेच डोक्यात खाज सुटते...
म्हणुन जर जमले तर २ weeks नी ज्या वेळेस केस धुशिल त्या नंतर ते नीट वाळले कि मग तेल लाव... बघ पटते का...

तसेच जेवणात स्निग्ध आणि पौश्टिक पदार्थ वाढव... घरचे साजुक तूप, तजे लोणि (खरच खावुन पह कधि with साखर... मस्त लागते :-)), दूध हे नियमित घेत चल...
वजन वढत नहीइ यने... :-)
महत्वाचे म्हणजे रोज पोट साफ़े होते यकदे लक्श ठेव.ंअसेल तर रत्रि झोपतान त्रिफ़ळा किंवा कोमट पाण्यातुन तूप घेउन बघ....
याने नक्कि केस गळायचे प्रमण कमि होइल...

जागरण टाळ...
टुलिप ने म्हणल्याप्रमणे गरम टोवेल ने शेक पण घे... फ़ायद होतो... पण जस्त गरम नको...
केसना अज्जिबात जस्त गरम पणि वपरु नये..

रोज जमले तर सकळि,संध्याकळि दोन्हि हतचि नखे एकमेकन घसवि.. ५ मि...
याने पांढरे केस हळु हळु कळे होतात... केस वढतात....
पण continuity महत्वाचि...


Patilsmita
Saturday, February 03, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार, माफ़ करा. खुप दिवसानी परत येत आहे. मनकवडा, तुम्ही सान्गितलेला उपाय सुरु केला आहे. थोडा फ़रक पडतोय, पण तरी कोरडेपणा खुप त्रासदायक वाटतो. असो, मला अजुन पण शिकेकाई सापडली नाही. मी सगळ्यात माइल्ड शाम्पू वापरतेय. पण आता जरा आशा आहे की फ़रक पडेल. आभारी आहे.

Sunidhee
Monday, February 05, 2007 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, २-३ तेलं एकत्र करुन डोक्याला लावल्याने काय फायदा होतो?

तसेच, डोक्याला तेल लावून २,३ वेळा वाफारा घेउन लगेच थंड पाण्याचा पण टाॅवेल गुन्डाळावा, ह्यामुळे उघडलेली छिद्रे बंद होतात. हे मला माझ्या इथल्या पार्लरवालीने सांगितले.


Paradkaranagha
Wednesday, February 07, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi to all

best is aawal powder. roj ratri zoptana 1 cup water + 1 spoon aawala powder.

try karun paha. it works very fast.

anagha

Sia
Wednesday, February 07, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Paradkaranagha
आवळा पावडर केसान्ना लावायचि का पोटातून घ्यायची

Paradkaranagha
Thursday, February 08, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry sia!

potatun ghe ne

Maku
Thursday, March 01, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या केसांना चूकीच्या पद्धतीने स्त्रैघ्तेनिन्ग करुन घेतल्याने माझे केस खूप दमगे झाले होते. बात्रा म्हणून एका ट्रायकॉलॉजिस्टची मी त्यावेळी ट्रीटमेन्ट घेतली होती. खूप हेल्दी झाले माझे केस त्यानंतर. अर्थात ट्रायकॉलॉजिस्टकडे जाणे हा अगदी एक्ष्त्रेमे cओन्दितिओन्स मधला उपाय आहे >>>>>>>>>>>>>>>

टुलिप मला त्यांचा पत्ता मिळु शकेल का ?
मि त्यांचे नाव एकले आहे पण मला त्यांचा अनुभव नाहीये. कारण माझे पण केस खुप खराब झाले आहे.


Pendhya
Saturday, March 10, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केस गळतात म्हणुन माझा एक मित्र, ' Regen Hair Vitalizer ' नावाचं तेल, वापरतो. त्याला ह्याचा फ़ारच फ़ायदा झाला आहे. त्याने सांगितले की हे तेल oily अजिबात नाहिये, ऊलट अगदी पाण्यासारखं आहे. हे १०० % हर्बल प्रॉडक्ट आहे. तयार करणारी कंपनी, मेघालया मधे आहे.


Me_sakhi
Wednesday, March 14, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,संघमित्रा,
तुम्हि सगळ्यानि खुप छान माहित दिली आहेत वेळोवेळी.
माझ्या माहिति प्रमाणे
१)निलगीरीच्या तेलामुळे केस लवकर पांढरे होतात.
२)केसात कोंडा झाला असेल तर ताकामधे लिंबु पिळुन ते मिश्रण केसांच्या मुळांना आंघोळिच्या आधी १ तास लावुन ठेवावे आणि नंतर केस शांपु करावेत
३)फ़ार कोंडा असेल तर महिन्यातुन एकदा astringent केसांच्या मुळाशी लावावे आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवावेत.
४)केसांना फ़ार घाम येतो तेंव्हा 1ltr distelled water + lavender oil 10 drops हे मिश्रण रोज सकाळि केसांच्या मुळांशी लावावे
५)महिन्यातुन २ वेळा तरि मेंदि लावावी.

तुमची
"सखि"


Vkashikar
Friday, April 06, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नुकतेच स्त्रैन्गिन्ग करुन घेतले आहे आता माज़े केस खुप गळत आहेत. मला उपाय सांगा.

Apsuthrave
Thursday, April 12, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I am having a lot of root pain lately especially in the crown area, not in the center but at the two ends of the center. I am losing my hair in that area and am getting really concerned about it. Please help me!!

Me_mastani
Thursday, May 17, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाबर वाटिका शांपू वापरण्याचा कोणाला अनुभव आहे का? यू.एस मधे मिळणारे ईतर माईल्ड शांपू कोणते आहेत?

Prady
Friday, May 18, 2007 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डाबर वाटीका shampoo अजीबात वापरू नकोस मस्तानी. त्याच्यापेक्षा Detergent बरा अशी परिस्थिती आहे.



Disha013
Friday, May 18, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो,वाटिका बेकार आहे. मी एथे us मधे ' herbal essences ' वापरते. चांगला आहे.
स्वच्छ होतात केस.
dove पण वापरलेला. तेल अजिबात निघत नाही त्याने.


Suniti_in
Friday, May 18, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अयुर च्या products चा काय अनुभव आहे. सध्या बाजारात खूप आलेत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators