Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 08, 2006

Hitguj » Health » मनाचे आरोग्य » Archive through July 08, 2006 « Previous Next »

Sas
Friday, December 30, 2005 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाररिक आरोग्या ईतकेच मानसिक आरोग्य हि महत्वाचे असते.
मन शांत,प्रसन्न कसे ठेवायचे?
विचार करत बसणे, कुढणे, भुतकाळ आठवुन दु:ख
करत बसणे, चिडचिड, राग, आरडा-ओरडा ह्या मानसिक
व्याधिंवर उपाय कोणते.
मनाला ह्या सर्वांपासुन मुक्त कसे ठेवायचे.
Please share your views, thoughts, suggestions and remedies.






Moodi
Friday, December 30, 2005 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संप्रदा यावर तुला प्रतिसाद मिळणे तसा कठिणच आहे. मुळात मानसीक आरोग्य हाच निरोगी स्वास्थ्याचा पाया आहे हेच सर्व विसरतात अन त्यातुन हे सर्व निर्माण होते.

देशात सर्वत्र मिळुन मिसळुन रहाणारी व्यक्ती देशाबाहेर लग्न झाल्यावर अथवा नोकरी वा शिक्षण याकरता म्हणुन येते तेव्हा स्वतला खुप एकाकी समजते त्यातुन जर ती मुलगी असेल अन लग्नानंतर अमेरीकेसारख्या परक्या देशात आली असेल तर जास्त कठिण, कारण H4 आणी अन्य अश्या व्हिसा प्रकारात तिला नोकरी करता येत नाही, मार्केट वगैरे सोडले कुठे जाऊ शकत नाही आणी तिच्या आधुनीक शिक्षणाचाही उपयोग करता येत नाही यातुन नैराश्य येते.

या साठी काही वेळ जाऊ देणे महत्वाचे. लायब्ररी, सामाजीक संस्था, आसपासची मित्र मंडळी यात स्वतला रमवुन घेणे. नवीन भाषा, कला यात रस घेणे हा उपाय तर आहेच पण सध्या तुला दुसरा उपाय सुचवतेय. बघ करता आले तर, मागे मी तुला अध्यात्माविषयी सांगीतले होतेच.

तुझ्या जवळ पास जर Homeopathy किन्वा वनौषधी / पुष्पौषधीचे उपचार करणारे डॉक्टर्स असतील तर त्यांच्याकडे यावर उपचार घे. पुष्पौषधी मध्ये डॉ. बाख यांची औषधे लोकप्रिय आहेत, अन आता भारतातही पुण्यात डेक्कन जिमखाना व कोल्हापुरातही पुष्पौषधीचे उपचार करणार डॉक्टर आहेत.

अमेरीकेत तर असतीलच. एकदा ती औषधे घेऊन बघ. कुठल्याही मेडीकलमध्ये ही औषधे असली तरी स्वतच्या मनाने घेऊन वापरु नकोस, याकरता डॉक्टरचाच सल्ला घे. मात्र पुष्पौषधीचे नाही मिळाले तरी Homeopathy चे डॉक्टर तुला नक्कीच भेटतील. बघ प्रयत्न कर.

सायकॉलॉजीला मी खुप महत्व देते. मला भविष्यातील सांगता येत नसले तरी मनाचे आजार अन व्यथा का असतात ते ज्योतिष्यशास्त्रामुळे माहित आहेतच.

तुझ्या मेलला मी उत्तर देणार आहेच. मात्र आधीच्या ३ मेलना उत्तर देऊ दे. Take care


Sas
Monday, January 02, 2006 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Moodi

Thanks a lot for kind reply n I m waiting for your mail.

I am searching for Homeopathy Doc. in USA;
from long time but I got noone till today.

स्वास्थ्य विभागात जर हि thread टाकली तर response मिळेल कदाचित अस वाटतय मला.
So I m starting this thread there also.

This is really important issue for me n for many people.





Ekanath
Tuesday, January 03, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार मोठे मानसिक आजार नसतील तर लगेच डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता नाही.

भारताने जगाला योगाभ्यासाचे अमूल्य वरदान दिलेले आहे. नियमित योगाभ्यास आणि प्राणायाम केलात तर मोठ्या प्रमाणावर मनशांती मिळते आणि विनाकारणची चिडचिड कमी होते.
स्वानुभावाने सांगतो, गेली १५ ते २० वर्षे मी नियमित सूर्यनमस्कार घालित आहे. शारिरिक व्याधींबरोबरच मानसिक तणावांपासून मोठ्या प्रमाणावर मुक्ती मिळते. एकाग्रता वाढते.

पोटात घेण्याच्या औषधांनी मानसिक तणावाला तात्पुरता फायदा होतो. शिवाय त्याचे दुष्परिणामही संभवतात. त्यापेक्षा योगासने आणि प्राणायाम उत्तम! परंतु, या प्रकाराने गुण येण्यास कमीत कमी ३ महिने वाट पहावी लागेल. तेवढा संयम आणि नियमितपणा हवा.

योगाभ्यास शिकण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावे लागेल. इंटरनेट किंवा पुस्तके वाचून जमणार नाही.


Bee
Wednesday, January 04, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर एकनाथ.

मी जेंव्हा योगा करायला सुरवात केली तेंव्हा मला पहिला फ़ायदा हाच जणवली की मी आधीपेक्षा अधिक आनंदी राहतो आहे. आहे मनोहर तरी मज गमते उदास ही जी भावना वाढीस लागली होती ती नष्ट होत गेली. योगा करताना फ़क्त एकच आसन करून चालत नाही. योगाची काही आसने, श्वसनाचे प्रकार नियमित केल्यानी त्याचे अनेक अनेक फ़ायदे आहेत आणि हे भारतीय मनुष्याला पटवून सांगून त्यानी ते न करणे ही फ़ार खेदाची गोष्ट आहे. आपल्या भारतात आयुर्वेद, योगा ह्या दोन गोष्टींची निर्मिती झाली आहे ह्याचा मला खूप अभिमान वाटतो.

सास, तु योगावर नक्की विचार कर.


Giriraj
Wednesday, January 04, 2006 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ध्यान हा उत्तम प्रकार आहे.
" विपश्यना " नावाची एक ध्यानपद्ध्ति इगतपुरि तसेच इतरही काही शहरांत शिकवली जाते.त्याचा खूप फ़ायदा होऊ शकतो. तुरुंगातही याचे वर्ग घेतले असता,मोठमोठ्या गुन्हेगारांनाही बदतांना पाहिले आहे!

अधिक माहीतीसाठी

विपश्यना

Moodi
Wednesday, January 04, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संप्रदा बर्‍याच दिवसापासुन मी हा बीबी शोधत होते तो मला मिळाला. एकनाथजी, बी अन गिरी यानी खुपच छान उपाय सुचवलेत, योगा तुला आधीच येत असेल तर उत्तम नाहीतर शिकुन घे.

अन आर्चने सुरु केलेला अन तिची अन इतर वाचकांची चांगली मते असलेला हा खालील लिंकमधील बी बी बघ, याने तुला अन आपल्या सर्वाना फायदा होईलच.

/hitguj/messages/644/50525.html?1059856088

Renushahane
Thursday, January 12, 2006 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi,tu ithe US madhe alelya mulincha manasik swasthyabaddal je lihilela ahes,te agdi majhya baddal kuni lihila ahe asach vatata.mi US madhe geli 4 1/2 varsha gharat basliye..masters degree ahe engineering madhe..mula nahiyet ajun..roj navin udyog kadhun swatala ramvaycha hech chalu ahe..divas kadhi palattil mahit nahi..pan ya 4 varshat khup ayushya baghitla..mi punyat ,markal la vipassana keli ahe..ithe matra roj vipassana hot nahi..karan ,kahihi nahi..kantala,manane tharvala tar sagla hota..aaj karin udya karin madhe hotach nahi...manala ubhari yenyakarita kahi suchavlas tar nakki chalel..
thanks
renu

Sas
Friday, January 13, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi, Girija, Bee, Eknath....
सर्वांचे खुप खुप आभार.
Moodi 'Anger Mgt' चा लेख खरच खुप उपयोगी आहे.
विपश्यना च्या प्रकारांची माहिती कोणी टाकलि तर खुप छान होईल.
Once again Thanks a lot to all.


Arch
Friday, January 13, 2006 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संप्रदा, आणखी एक उपाय माझ्या बहिणीने सांगितला आहे आणि तो खरच उपयुक्त आहे. आपला काही राग धुमसत रहातो म्हणजे खूप वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी आठवूनपण चिड येत रहाते. तर यावर रात्री झोपायच्या आधी थोड्यावेळ वज्रासनात बसून दिवसभर केलेल्या गोष्टी आठवायच्या अगदी सकाळी चहा प्यायला पासून आणि थोडा विचार करायचा. मग जाणवत की काही गोष्टी इतक्या निरर्थक असतात ज्याला आपण उगाचच महत्व देतो आणि चिडत रहातो. बघ कस वाटत

Meggi
Monday, January 16, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas , विपश्यना म्हनजे विशेष पश्यना. आपल्याच शरिराकडे अनि मनाकडे विशेष म्हनजे वेगळया नजरेने बघणे. शरिराच्या प्रत्येक संवेदनेकडे सजग पने बघणे.

थोडं अजुन सोप करुन सान्गायच प्रयत्न करते. विपश्यना हे अनेक meditation techniques पैकि एक आहे. हे technique गोउतम बुद्धांनी शोधले आहे.

meditate करण्यासाथी चित्त एकाग्र करण्याची गरज असते. शरिरात vibrations कंपने) तयार होण्याचि गरज असते. ते २ प्रकारे करता येते.

१. External vibrations : ओम चा उच्चार. या प्रकार च्य meditation मध्ये ओम च्य उच्चाराने कंपन निर्मिति होते. अनि मग मन एकाग्र करुन, कंपनां च्य आधारावर meditation करत येते

२. Internal vibrations : विपश्यना या meditation technique मध्ये मोडते.
या प्रकारात सर्व प्रथम, श्वासावर concentrate करायल शिकवतात. पहिले ३ दिवस केवल श्वास observe करायचा. म्हणजे श्वास हळु घेतोय कि भराभर हे फ़क्त observe करायचं. काहिही control करायचा प्रयत्न करायचा नाही.

एकद का मन शान्त होऊन onservation चि सवय लागली की ३ दिवसांनंतर हळुहळु शरिराच्या प्रत्येक भागावर concetrate करायला शिकवतात. त्यामुळे शरिराच्य प्रत्येक भागावर होनार्य संवेदना आपण observe करु शकतो. उदाहनार्थ, गरमी, घाम, जळ्जळ, खाज, मुंग्या येणे अस कहिही. पण हे कहीहि contol न करता फ़क्त observe करा

प्रत्येक संवेदना फ़क्त अनुभवायची. त्यवर काहि react करायचा नाही. म्हणजे मुंग्या आल्या कि लगेच बैठक बदलायची नाही.

अश्य रितीने आपल मन शरिराच्य प्रत्येक भागावर concetrate करुन संवेदना अनुभवायच्या, काहीही react न करता. त्यामुळे कंपन निर्मिति होते. आणि या कंपनां च्या आधारावर meditation करतात.

मी विपश्यनाच्या steps फ़क्त माहिती साठी सान्गितल्या. फ़क्त वाचुन विपश्यना किंवा कुठल्याहि प्रकारचे meditation करने अशक्य आहे.

'शरिराच्या तसेच मनाच्या संवेदनांवर react न करता, या संवेदना केवल observe करणे', हा विपश्यना चा पाया आहे. त्यामुळे आयुष्या ही आपण कुठल्याहि गोष्टीवर पटकन react न करता ति गोष्ट observe करतो आणि मग decision घेतो.
उदहनार्थ, राग आला कि आपण लगेच त्यावर react करतो, समोरच्या ला काहिबाही बोलुन बसतो. पन तेच आपण राग आल्यावर लगेच react न करता, त्या रागाला थोडं observe केला, तर थोड्या वेळाने तो राग शान्त होतो आणि मग आपलिच चिडचिड, आरडा-ओरडा टळतो. आणि तेच विपश्यनाच तत्व आहे.

I hope मि तुम्हाला अजुन confuse केलं नाही. कोणाला अजुन काहि जास्त माहिती हवि असेल तर मला कधिहि विचारु शकता. ही विपश्यना centers भारतात इगतपुरी, पुने आनि बरेच ठिकाणी तसेच USA मध्ये आहेत. १० दिवसाचा residencial course आहे. जेवण्या रहाण्याची free व्यवस्था असते. इथे अनेक देशातुन लोक येतात. भारतात इगत्पुरि हे main center आहे.

रेणु, तु जरी आधी विपश्यना केलं आहेस तरि USA मध्ये पण जे विपश्यना centers आहेत, तिथे जाऊ शकतेस. मला वाटतं, तुला जर गोएंका गुरुजींचि cassette मिलालि तर तुला घरि meditatoin करणे सोपे जाइल.




Renushahane
Monday, January 16, 2006 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

meggi,chaanch mahiti dilis vipassana baddal..mi thle centers baghitle ahet..tyanchya site carun adhik mahiti kadhin..caseette chi idea avadli..paryatna karin milvaycha..
renu

Meggi
Wednesday, January 18, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणु, तुज़ नाव खरचं रेणुका शहाणे आहे, की मराठी अभिनेत्रि रेणुका शहाणे वरुन inspire होउन ठेवलस.
आगाऊ प्रश्न.. रेणु, दिवे घे



Renushahane
Wednesday, January 18, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

adnaav shahane ahe..pan renu mala avadla mhanun ithlya sathi thevla..nantar lakshat ali similarity..:-)

Sas
Monday, January 23, 2006 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Megi thanks a lot
CA,USA त आहेत का centres.

Anush
Thursday, January 26, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bara vatala Vipashana baddal eikun, Varshatun 1 tari 10days residensial course karawa...Aajkal 10 diwas sutti milavana avghad ahe pan Shakyato Priority theun karayala harkat nahi,Mi khup lahan asatanach course la suruvat keli..ani tyacha dainandin jeevanavar farach parinam hoto, Recenty mi Japan madhe course kela...Agadi Pune/egatpurisarakha conduct karatat..

Nakki kuthe kuthe centres ahet he pahayacha asel tar
http://www.dhamma.org/ hi official website ahe. Baryach centre sathi Online application chi soy ahe...



Meggi
Saturday, January 28, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas , तुल विपश्यना centers चि माहिती online मिळेल. काहि ठिकाणी १-२ वर्ष number लावावा लागतो असं ऐकलयं. त्यामुळे त्याप्रमाणे center निवड.

Moodi
Monday, February 06, 2006 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संप्रदा खाली लोकसत्तामधील एक लिंक देतेय ती नोट कर. मला चांगली वाटली.

ती नीट वाच.

http://www.loksatta.com/daily/20060206/viva04.htm .

Upas
Wednesday, May 10, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
मनाची उपासना करण्याची आवश्यकता ओळखून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिलेत. त्यांच्या वाचनाने मनात चांगले आणि सकारात्मक विचार येण्यास मदत होते..


Deepsp
Saturday, July 08, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Anakhin ek upay jo halli mi karate to mhanaje ....jya goshti cha raag yeto ti goshta 3 varsha nantar mi kashi baghen, tyala kharach kaay mahatva aasel ha vichar karate. Nothing is useless as far as it works for one.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators