Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Panchamrut

Hitguj » Health » Panchamrut « Previous Next »

Ashdeo
Tuesday, January 09, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला पंचामृताचे(दूध, दही, मध,साखर,तूप) फायदे माहित आहेत का?

Manakawada
Tuesday, January 09, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहीत असलेले थोडे फ़ायदे:
१. स्मरणशक्ती वाढते
२. शरिर निरोगि रहते

पण सर्व पदार्थ योग्य प्रमाणात असावेत


Psg
Wednesday, January 10, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३. acidity साठी उत्तम उपाय
४. शक्तिवर्धक आहे


Ashdeo
Wednesday, January 10, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच फायदे आहेत म्हणायचे...मला कोणीतरी सांगितले की स्मोकिंगचे दुष्परिणाम देखील याने कमी होतात. याबाबतीत कोणाला काही कल्पना?


Psg
Friday, January 19, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, इकडे येऊन सांगणार होतीस ना पंचामृताचे फ़ायदे? मी पंचामृतात साखर घालत होते, तर एकीनी त्या ऐवजी गूळ घालायला सांगीतले आहे. कितपत बरोबर आहे? प्लीज सांगतेस का?

Ashwini
Friday, January 19, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचामृतात गूळच घालतात ग. साखर घातली तरी हरकत काही नाही. पण साखरेपेक्षा गूळ कमी processed असतो ना म्हणून गूळ चांगला साखरेपेक्षा.

Prajaktad
Friday, January 19, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण सर्व पदार्थ योग्य प्रमाणात असावेत >>>>
मग काय आहे योग्य प्रमाण?कुणाला माहित असेल तर लिहा.

Sashal
Friday, January 19, 2007 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुर्वेदातली पंचामृताची definition पूजेसाठी जे पंचामृत वापरतात त्यापेक्षा वेगळी आहे का? पूजेसाठी असतं त्यात साखरच असते ना?

Vaidyabavadekar
Wednesday, January 24, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात ज्ञान प्रबोधिनी मध्ये यावर अभ्यास
केला आहे. अवश्य सम्पर्क करा.


Puneri_njkar
Friday, January 26, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मग काय आहे योग्य प्रमाण?कुणाला माहित असेल तर लिहा.
----
सकाळ मधे फ़ॉमिली डॉक्टर मधे बालाजी ताम्बे ह्यानी दिलेली पन्चाम्रुत बद्दल माहिती
घटक द्रव्ये
साखर १ चमचा
मध १ चमचा
ताजे दहि १ चमचा
साजुक तूप २ चमचे
कोमट दुध ४-५ चमचे
(वरील प्रमाणात आणि वरील क्रमाने)
हे रोज घेतल्यास, शरीर शक्ति, स्फ़ुर्ति, स्मरणशक्ती वाधते,
कान्ति उजळते, ह्रदय मेन्दु ह्यान्चे पोषण होते. वात्-पित्त-कफ ह्या त्रिदोषान्चे सन्तुलन होते.

ह्या पन्चाम्रुत मधे चिमुट भर केशर घातल्यास अजुन फ़ायदेशिर.
केशर रक्तधातू वाधवनारे आणि रक्त शुध्दी करणारे आहे.


Ashwini
Thursday, February 01, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचामृत

पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त तूप किंवा मध समप्रमाणात घेऊ नये. दोहोंपैकी एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे.

दूध - गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे.
शेळीचे दूध हे ही पथ्यकर असते.
म्हशीचे दूध पचायला जड असते.
- दूध तापवून प्यावे.
- दूध कुठल्याही आंबट फळाबरोबर, मासे, खार्‍या पदार्थांबरोबर घेउ नये. त्यामुळे शरीरात विषारे उत्पन्न होतात.

दही - दही खाताना थंड असले तरी पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते.
गोड, व्यवस्थित लागलेले दही पुष्टीकर असते. अर्धवट लागलेले किंवा आंबट दही रक्त दुषित करून त्वचाविकार निर्माण करते, सूज वाढवते.
- दही गरम करू नये.
- दही रात्री खाउ नये.
- सर्दी, खोकला असताना दही खाऊ नये.

तूप - तूप भूक वाढवणारे, स्मृति, बुद्धी वाढवणारे, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांची आग होणे, दुखणे, चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त.
- अजीर्ण असताना तूप खाऊ नये.
- पोट साफ होण्यासाठी रात्री झोपताना गरम दूध + तूप घ्यावे.
- नाक लाल होऊन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे.
- डोळ्यांसाठी तूप, मध साखर रोज खाल्ल्याने फायदा होतो.

मध - मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे.
- मध गरम करून अथवा उष्ण पदार्थांसह खाऊ नये.
- डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो.
- मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते.
- तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या.

साखर / गूळ - तहान कमी होते.
- खडीसाखर सगळ्यात श्रेष्ठ आहे.


पंचामृताचे फायदे :

- शरीर पुष्टी करते
- पोटात आग पडणे, जळजळ थांबवते
- मानसिक शांति देते
- Stress कमी करून चिडचिड कमी होते
- बुद्धीवर्धक
- वजन वाढते
- सकाळी उठल्याबरोबर घेतले तर अर्धशिशीवर उतार मिळतो



Avv
Thursday, February 01, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, एक ते सव्वा वर्शाच्या बाळांना हे द्यावे का? टॉनिक म्हणून.

Psg
Friday, February 02, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक अनेक धन्यवाद अश्विनी.. अगदी डीटेल माहिती दिलीस.. :-)

Bee
Friday, February 02, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचामृत, कधीही करुन खाल्ले तर चालते का.. मी फ़क्त सत्यनारायणाच्या दिवशीच पंचाकृत खाल्लेले आहे.

पंचामृताचा दुसरा एक प्रकार देखील आहे ज्यात चिंचेचा कोळ, भाजलेले शेंगदाणे, शिमला मिर्ची, खोबरे घालतात. पण ह्या दोन्हीपैकी नक्की पारांपारीक कुठले हे माहिती नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators