Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
डोळे

Hitguj » Health » डोळे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 16, 200620 09-16-06  2:45 pm

Sonu_aboli
Saturday, September 16, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवि,
LASIK जरी खूप ADVANCED असले तरी त्याला बर्याच मर्यादा आहेत.
तुमच्या वडिलांचा चष्म्याचा नंबर नाही सांगितला तुम्ही..या आधी सांगितल्याप्रमाणे
cornea चा कोणताही आजार नसावा लागतो.मोतीबिंदू, cornea ची जाडी कमी असणे,काचबिंदू,कोणतेही इन्फ़ेक्शन,ड्राय आय या वाढत्या वयाच्या तक्रारी विचारात घेउन सर्व तपासण्यात पास व्हावे लागेल तुमच्या वडिलांना.


Rahul16
Sunday, September 17, 2006 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks sonu.

Mi sarkhe shekat hoto....ymule manjoli mothi zali nahi.


Sonu_aboli
Friday, October 06, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या दिवसात डोळे येण्याची शक्यता जास्त असते. दमट वातावरण, परागकणाची ऍलर्जी, व्हायरल कंजंक्टीव्हायटीस
काळजी घ्या


Meggi
Friday, October 06, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळे येऊ नये म्हणुन घ्यायची महत्त्वाची काळजी म्हणजे डोळे चोळू नयेत, डोळ्याना हात लावु नये. कारण हा जंतु संसर्ग direct contact मुळे होतो. डोळे आलेल्या वक्ती कडे बघितल्याने संसर्ग होतो ह चुकिचा समज आहे अजुन माहिती सोनु देईलच.

Sonu_aboli
Wednesday, October 11, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळे हे जीवाणू ( बा.क्टेरिया ) विषाणू (व्हायरस)मूळे होण्याची या दिवसात जास्त शक्यता असते.
व्हायरल कन्जंटीव्हायटिस हा रुग्णाजवळ असलेल्या व्यक्तींना लवकर होउ शकतो,रुग्णाचा रूमाल वापरणे, दूषीत हात लागणे यामूळे तो आपल्याला होउ शकतो.


Sonu_aboli
Thursday, October 19, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळीच्या असंख्य शुभेच्छा!
दिवाळी आनंदाने साजरी करा पण जपून... दिवाळी प्रकाशाचा उत्सव आहे,आवाजाचा नाही...
फटाके उडवताना काळजी घेणे.त्यातील दारू विषारी असते ती डोळ्यांवाटे,नाकावाटे किंवा तोंडावाटे शरीरात जाउ शकते ज्यामुळे त्रास होतो.
डोळ्यात त्यांचा धूर,कण जाऊ देऊ नये.जर डोळ्यांत काही गेले आहे असे लक्शात आल्यास
१)अजीबात म्हणजे अगदी १ सेकंद ही न वेळ वाया घालवता आधी भरपूर स्वच्छ पाण्याने (२-३ लिटर) डोळे धूवावेत.जोरात पाण्याचे हबकारे मारावेत.
२)लागलीच हॉस्पीटल मध्ये न्यावे.
३)आपल्या मनानेच कोणतेही औषधोपचार करू नयेत.
४)फटाक्यांच्या जास्त जवळ जाऊ नये,हातात उडवू नयेत,त्यावर वाकून पेटवू नये.
५)जास्तच सैल कपडे वापरू नका.ओढणी, शरारा, साडी चा पदर
शर्टाच्या बाह्या सांभाळाव्यात.


वरील गोष्टी माहीतच आहेत सगळ्यांना तरीही
remind करून देत आहे.

सर्वांना ही दिवाळी शुभ,सम्रूद्ध आणि सुरक्शीत जाओ!


Sayuri
Thursday, October 26, 2006 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Soft/Semi soft Contact lenses जर दिवसभर कोणी वापरत असेल (उदा. नोकरी करणारे, साधारणपणे सकाळी lense लावतात आणि मग त्या direct संध्याकाळी किंवा रात्रीच काढल्या जातात.) तर बराच काळ असं केल्याने, overall डोळ्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का? Especially, does such lifestyle in young age likely to have repercussions on the health of the eyes when one gets old?

Kalika
Friday, October 27, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello all,
mazhya chasmyacha no jast ahae, tari to kami karnyasathi aapan kahi suchau shakta ka?
ani maaz as aaiknyat aal ki permanent lense basvle jatat tar tyane kahi side effect vagaire tar hot nahi na? plz aapan yavar kahi margadarshan karal ka?

Dhanyawad.

Sonu_aboli
Friday, November 17, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार. प्रश्नांना उशीरा उत्तरे देतेय. क्शमा असावी.बरेच शब्द इंग्रजी भाषेत असल्यामुळे मराठी लिहीत नाही (cbdg)
Sayuri,
1) the materials,designs and techniques of contact lenses are continuously going on advancing for patient's complete satisfaction, comfort and care.
2)contact lenses(CL) are not suitable for everyone.You need to get thorough eye check up done from ophthalmologist to know which type of CL suites your eyes.There are many contraindications like-diseases of lids,eyelashes,corneal surface disorders,infections of all the structures of eye,patients unable to handle or take proper care of CL and so on.In short a proper chioce of CL in the begenning will definitely prevent problems which can trouble in future.
3)Trial CL are available in the market for those who want to use CL regularly.This helps us to learn and understand the use of CL.Proper training is given by ophthalmologists to first time users.
4)It is mandatory to clean the lens with proper cleaning solutions available in market and follow the instructions strictly.
5)There are CLs which can be used for a day,15 days, a week, a month ( disposable and extended wear lenses)
6)Now coming to your question of hazards of long term use of soft CLs.
Again, a proper choice of CL suitable to your lifestyle matters a lot.
Few people suffer from following problems caused by soft contact lens wear,
toxic and allergic-keratopathy,giant papillary conjunctivitis, intolerance, sterile keratitis.
7)All above problems can be prevented by a regular follow up with your doctor.
8)Last but not the least, soft contact lenses are best alternative to spectacles when used with caution and can be used for a long time safely !



Sonu_aboli
Friday, November 17, 2006 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते कलिका,
तुमचा चष्म्याचा नंबर जास्त आहे म्हणजे किती आहे? जास्त असलेला नंबर कमी करण्यासाठी 'लॅसिक ' ही शस्त्रक्रिया आहे हे मी यापूर्वी सांगितलेले आहे.

permanent lens हे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यावर बसवत असतात जे वयाच्या ५० वर्षानंतर साधारणपणे करतात, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी नव्हे.


Sonu_aboli
Wednesday, November 29, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक डॉक्टर म्हणून जेव्हा मी समाजात अनुभवते ती तफ़ावत म्हणजे,शहरी आणि ग्रामीण भागात नेत्रदानाविषयी असणारी माहिती,अज्ञान,समज आणि गैरसमज.
शहरी माणूस समंजस असतो,अगदी द्रुष्टी जाइपर्यंत तो बसून रहात नाही,
याउलट अज्ञानामूळे अशिक्शीत गरीब माणूस अगदी लास्ट स्टेज मध्ये पोहोचतो.
गरज आहे ती जाग्रुतीची.आपल्यासारख्या शिकलेल्यांनी गरजूंसाठी केलेली. जास्त नव्हे पण कमीतकमी अशा लोकांना योग्य सल्ला देणे,योग्य मार्गदर्शन करणे आणि महत्वाचे म्हणजे नेत्रदानाचे महत्व आणि त्याचा लाभ समजवून सांगणे एवढे केले तरी पुरेसे आहे.
मरणोत्तर नेत्रदानाने २ अंधांना हे जग पाहता येइल,
नेत्रदानासाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जेथे नेत्रदान स्वीकारले जाते,एक अर्ज भरून द्यावा लागतो बाकी काही नाही.
मित्रांनो,या जगात अशी कितीतरी लहान लहान मुले आहेत जी आजही प्रकाशाची वाट पहात आहेत जो त्यांचे आयुष्य उजळवेल,मग त्यातील कुणी डॉक्टर होईल,कुणी तुमच्याप्रमाणे इंजिनीयर,आर्किटेक्ट,शिक्शक होईल,
कोण जाणे एखाद्याला द्रुष्टी मिळाली तर तो मायबोलीकर होउन तुमच्या पोस्ट वाचू शकेल!.....
तर मग करणार ना नेत्रदानाचा संकल्प?


Zakki
Thursday, November 30, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नेत्रदान करायला, किडनी दान इ. सर्व दान करायला तयार आहे. पण माझे डोळे नि माझ्या किडनी, नि माझे यक्रुत हे सगळे खूप दारू प्यायलाने काही चांगल्या स्थिथीत नाहिये. मग कय उपयोग त्याचा?

Mahaguru
Thursday, November 30, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki, मरणोत्तर अवयव इतर कुणाला जरी नाही वापरता आले तरी ते शरीर वैद्यकशाळेत शिक्षणासाठी वापरु शकतात. दान कधी व्यर्थ जात नाही.


Sonu_aboli
Friday, December 01, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरू, अगदी योग्य बोललात. झक्कीकाका, तुम्हाला जरी नाही जमले तर दुसर्‍यांना तरी याचे महत्त्व समजावू शकता ना तुम्ही! }

Kalika
Monday, December 11, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते अबोलि
माझा चष्म्याचा नंबर राइट ७ तर
लेफ़्ट ५.५ आहे
धन्यवाद आपण समजावल्याबद्दल

yevdha jast number kami hoto ka? ki vadhatach jato ani asel tar me konti kalji ghetli tar number thoda phar kami karta yeil

Sonu_aboli
Monday, December 11, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार कलिका,
तुमचा हा नंबर जर गेले एक वर्ष तोच असेल, बदललेला नसेल तर तुम्ही
contact lens वापरू शकता.योग्य काळजी घेतली तर अगदी वर्षानूवर्षे तुम्ही त्यांचा वापर करू शकता.
शेवटी
LASIK हा पर्याय आहेच.ते जरासे खर्चीक आहे.इतर काही नंबर कमी करण्याच्या शस्त्रक्रियादेखील आहेत.त्याही तुम्ही योग्य सल्ला घेउन करू शकता.
एवढा जास्त नंबर कमी होणे शक्य नाही.
regular follow ups,healthy diet,proper rest will help your eyes stay healthy

Vedika_ka
Thursday, December 21, 2006 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namste sonu_aboli,
Mala pan thodishi mahitee havi hoti , karan as a computer operator me roj kamit kami 10 tass computer samor basate, mala atta
number ahe -0.25 doni dolyana to vadu naye yasathi kay kalgi ghyavi? kiva konatya vishist prakarache glass che spects vaparave.
ani thodishi shi Eye exercise baddal pan mahitee dili tar uttam.
Dhanyawaad.

Sonu_aboli
Thursday, December 21, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते वेदिका,
-०.२५ हा सगळ्यात कमी असा नंबर आहे,जो नॉर्मलच समजला जातो.कॉम्प्यूटर जास्त वेळ वापरणार्‍यांनी घ्यायची काळजी 'संगणकाशी दोन हात करताना' या
health च्या एका बीबी वर गजानन देसाई यांनी चित्रांसहीत अगदी सुंदर समजावून सांगितलेली आहे. ती अवश्य पहावी.

Zuluk
Monday, June 18, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या वडीलान्च्या डोळ्याला रान्जन्वाडी आली आहे. त्यामुळे त्यान्ना डोळा नीट उघडता येत नाही. ते सध्या भारताबाहेर आहेत. मेडीकल इन्शुरन्स नसल्याने त्याना डॉक्टर कडे जाता येत नाही. रान्जन्वाडी बरी होण्यासाठी कोणाला काही घरगुती उपाय माहीत आहेत का? रान्जन्वाडीला इन्ग्लिश मधे काय म्हणतात? ते समजल्यास मी नेट वरही शोधू शकेन.

Maanus
Wednesday, March 19, 2008 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे कोठेतरी डोळ्याखालील काळी वर्तुळे असा बातमी फलक होता, तो कोठे गेले.

इतके प्रखर नाहीत, पण कमी झोपेमुळे जरा जरा काळसर पणा जाणवु लागला आहे


Dhanu66
Tuesday, June 03, 2008 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या डोळ्यांखालचा भाग फ़ुगीर झाला आहे. ( बहुदा त्याला पोट येणे म्हणतात )
काय उपाय करता येईल?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators