Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 25, 2006

Hitguj » Health » गर्भारपण आणि स्त्रीयांचे आजार » गर्भारपण.. Pregnancy » Aahar during pregnancy » Archive through July 25, 2006 « Previous Next »

Deepa_s
Monday, May 15, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय, मला आत्ताच कळल आहे की मी आई होणार आहे.
मला खालील प्रश्नांची उत्तर हवी आहेत
१. हिमोग्लोबिन आणि आयर्न वाढविण्यासाठी काय खावं? उदा. बीट, गूळ, खजूर आजून काय?
२. मला भरपूर दूध पी असा सल्ला दिला जातोय. गाईच दूध प्यायल तर चालत का? की म्हशीच्या दूधात जास्त कल्शियम असतं?
इतर काही सूचना, सल्ले वा अनुभव असल्यास जरूर शेअर करा.


Moodi
Monday, May 15, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा हा लोकप्रभातील लेख बघ. अन रेसेपी तसेच पाककृतीमधील आहारशास्त्र हा बीबी वाचुन काढ.

http://www.loksatta.com/lokprabha/20060407/drushti.htm .

Chiku
Monday, May 15, 2006 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम तुझे अभिनंदन

१. डॉक्टरांना विचारुन डेली व्हायटामिन्स चालु कर. त्यात पुरेसे आयर्न आणी गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक फ़ॉलिक असीड असते.
२. आतापासुनच व्यायामाची सुरवात कर.
३. दुध पाहिजे तितके पी. त्याने फायदाच आहे. गाईचे दुध नाक्किच चालते. खुप दुध आवड्त नसल्यास तीन पैकी एका वेळेस ताकपण चालते.
४. फळांबरोबर, नट्स बदाम, अक्रोड, शेंगदाणे इ. पण घेत जा.

चिकु



Bee
Tuesday, May 16, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा, अभिनंदन! गर्भ असताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे Folic acid which is nothing but B complex . तर ह्या गोळ्या तू नियमित घेत जा. तुला तुझ्या gynecologist नी दिल्याच असतील. दुध दोन्ही वेळेस घेत जा. फ़क्त पपयी वगळता सगळे काही खायला चालते. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले धान्य जास्त खा असे Dr सांगतात. तसेच ज्यात fibre म्हणजे कोंडा आहे अश्याही वस्तू खात जा. पहिले तीन महिने स्वतःला जपाव लागत. बाकी इथले मुद्दे माहिती म्हणून लक्षात घेत जा. जे काही अमलात आणायचे आहे ते आधी तुझ्या gynecologist ला विचारून कर. तिला हवे तितके पडतील ते प्रश्न विचारत जा. माझी ताई मला म्हणाली इथली gyneco खूप लवकर आटोपुन घेते की काही विचारायचे असेल तर मन होत नाही. पण नंतर नंतर तिने सुरवात केली तर gynecologist स्वतः तिला म्हणाल्यात असे प्रश्न सहसा कुणी विचारत नाही. तुम्ही चांगले काम करत आहात की माहिती घेत आहात, शंकाचे निरसन करत आहात. तर दीपा be open in front of ur doctor and do not hesitate. They know much better than people here. One more increast ur water drinking capacity more from first trimester onward. Pregnancy period is divided into 3 trimester. So in 2nd and 3rd month u need to keep ur water level more than usual. During winter days we generally drink less water but u do not do this. More the amneotic fluid inside uterus, more easier will be ur delivary!

Moodi
Tuesday, May 16, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा प्रथम हे सांग की तू सध्या कुठे आहेस? म्हणजे भारतात की भारताबाहेर? जर भारतात आहेस तर आई, सासुबाई किंवा मोठी अशी अनुभवी व्यक्ती तुझ्या घरात किंवा शेजारी अशी असेलच. मग आधी त्यांना अन मग तुझ्या डॉक्टरांना विचार. ही माहिती तुला प्रत्यक्ष समोरासमोर मिळु शकेल. पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.

Deepa_s
Tuesday, May 16, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांचे आभार.
मी भारतातच आहे. आई, सासूबाई यांचा एक प्रॉब्लेम असा की त्या म्हणतात आम्ही असले प्रश्न विचारले नाही. जे कर सांगितले ते केले. म्हणजे गाईच दूध चालेल का? असा प्रश्न विचारायचा नाही. सरळ म्हशीच दूध प्यायला लागायचं. पण आपल्या पिढीला हे जमत नाही.
मी गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेते आहे. पण इथेली अनेक पोस्ट वाचून अस लक्षात आल की मंडळी बहुश्रुत आहेत. मला अस वाटत की नैसर्गिक पद्धतिने आपल्याला लागणारे घटक पोटात जावेत. म्हणजे गोळ्या घेणे सुरू ठेवून आपण अजून काय काय करू शकतो याचा विचार करावा. वैद्यकिय सल्ल्याशिवाय उगाच काही आगाऊपणा करण मला ही पटत नाही. पण मला बहीण, वहिनी अस जवळचं माझ्या वयाच कोणई नाहीये म्हणून तुमच्याशी मोकळेपणाने बोलले.
डॉक्टरांशी बोलण्याविषयी चा तुमचा सल्ला नक्की अमलात आणेन.
परत धन्यवाद.


Moodi
Tuesday, May 16, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा तू मुंबई किंवा पुण्यात आहेस का? शक्य झाले तर मग एकदा मुंबईत डॉ. गीतांजली शहा किंवा इतर चांगले तज्ञ यांचे याबाबतीत मार्गदर्शन घे. नटस जास्त खाऊ नकोस कदाचीत जर तुला बदाम काजू अन पिस्ते यापैकी एखाद्यामुळे जर त्रास होत असेल तर आधी डॉ. ना विचार. अंडी जर खात असशीत तरी विचारुन घे कारण तशी अंडी प्रकृतीने गरम असतात. जे तुला सोसेल असे खात जा. दुध जास्त आवडत नसेल तर खिरीत घालुन घे. खारका, मनुका खात जा अन मुख्य म्हणजे पोट साफ ठेव. त्याने तुला बराच आराम मिळू शकेल. चालण्याचा सुद्धा व्यायाम ठेव. बाकी डॉक्टर सांगतीलच.

Mukman2004
Tuesday, May 16, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा, congratulations!!
पहिले ३ महीने स्वता ला जपले पाहिजे.
आहार मधे नेहमी रंगित भाज्या like पाले भाज्या फ़ळभाज्या (लाल भोपळा, दुधी etc ) , गाजर, बिट, मोड आलेल्या उसळी, शक्य तितक्या सगळ्या भाज्या खा. folic acid च्या गोळ्या घेत असशिलच पण पालक, बटाटा, कोबी, छोले is a good source of folic
मी preganent असतांना एक लेख आला होता eat rajamaa and chawaLI regurarly during preganency म्हणुन.

आणि हो सध्या उन्हाळा आहे तर रोज शहाळ्याचे पाणी पी. एक तर ते थंड असत आणी बाळाची Skin पन छान होते :-)
बदाम, केसर सध्या जास्त नको घेउस जरा जपुन, खायचेच आसतिल तर बदाम १०-१२ तास पाण्यात भिजौन मग खा
चहाकोफ़ी कमी कर. पाणी भरपुर पी
avoid पपयी for 4-5 months at least
calcium सठि capcium कोबी, dairy products खा
प्रोटीन्स साठि, सगळ्या डाळी, protinex दुधा सोबत असे घे.
ईडली, veg उपमा असे पदार्थ breakfast ला घे. Avoid तेलकट, spicy food

बराच उपदेश केला का ग? :-)
चल take care


Mita
Tuesday, May 16, 2006 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपा, खालील लिंक बघ.मागे एकदा इकडेच कोणीतरी(बहुतेक लालु किंवा आर्च) दिली होती.
http://www.tarladalal.com/Pregnancy.asp

Bee
Wednesday, May 17, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा, तुझ्या Gynecologist ला हे विचार की इथे कुठे pre-natal course आहे का? मागे कुणी तरी असे म्हंटले होते की though pre-natal course is not that great but we share same kind of worries to each other and that helps a lot to keep our mental balance perfect. I truly agree with this!

बाकी भोपळा, काशिकवळ हे खरच छान फ़ळ आहे. अवश्य खा. हंगामी जे जे पिकत ते ते खाव म्हणतात.

नैसर्गिक रित्या पोटात सकस अन्न गेलं पाहिजे हा विचार चांगला आहे. पण folic acid च्या गोळ्या मात्र घ्याव्याच लागतात.


Maudee
Wednesday, June 14, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच चर्चा करताना मी असं ऐकलं की prgnancy च्या पहिल्या महिन्यात बाळाचा brain तयार होतो.
पहिला प्रश्न - हे ख़रय का?
पण मुळात conceiving झालय हेच मुळी १ महिन्याने कळत. त्यामुळे brain तल्लख़ होण्यासाठी विशेश काही प्रयत्न केले जात नाहीत. पहिल्या महिन्यात भिजवलेले बदाम आणि मनुका ख़व्यात असं मी ऐकलं.
दुसरा प्रश्न - हा आहार योग्य आहे का?


Deepa_s
Tuesday, June 20, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वंशवेल मधे सुचवलं आहे की कात चुना घालून विडा खा.
पण सविस्तर माहिती दिली नहिये. मला सध्या ३ रा महिना सुरू आहे मी रोज विडा खाल्ला तर चालेल का? त्याने काही फ़ायदा होईल का? मी विड्यात चूना, कात, अगदि थोडी कुटलेली सुपारी आणि गुलकंद घालते आहे. यात काही बदल करू का?
सल्ला द्या.


Lalu
Tuesday, June 20, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maudee ब्रेन 'तयार' होण्याची प्रक्रिया चालू होते पण त्याची development ही उलट शेवटच्या ३ महिन्यात होते. आणि ती जन्मानन्तरही चालू राहते. :-)
शेवटच्या trimester मधे omega 3 fatty acids(fish) घ्यावेत.
दीपा, त्यानी calcium साठी चुना सांगितला असेल. बाकी विड्याची पाने, कात आणि तो रोज खाणे याबद्दल काही माहिती नाही.


Moodi
Tuesday, June 20, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा पान जर खायचेच असेल किंवा तुला आवडले असेल तर त्यात चुना अन कात याचे प्रमाण जरा कमीच ठेव. चुना उष्ण असतो, तो पानाला जास्त लावु नकोस, अगदी पुसटसर लाव. वेलदोडा म्हणजे हिरव्या बारीक वेलचीचे दाणे त्यात घालु शकतेस, तसेच किसलेले सुके खोबरे पण घाल.

हे बघ मी इथे एक सुपारी लिहीलीय. तू पानात सुपारी घालतेस ना, ती घालु नकोस. त्या ऐवजी मी जे दिलेय ते करुन चिमुटभरच घाल. माझ्या काकुने लिहुन दिलीय. माझ्या मैत्रीणीने ही ती प्रेग्नंट असताना केली अन नेहेमी खात होती. या सुपारीने पोटातला गॅस कमी होवुन दुखणे पण थांबते. पण आवडली तरी जास्त खाऊ नकोस.

मी तिथे प्रेग्नंट मुलींनी एकदम ट्राय करु नये असे लिहीले कारण त्यात ओवा अन तीळ आहे, मात्र ते न घालता करु शकतेस.

/hitguj/messages/103383/94293.html?1137098564

या वरच्या लिंकमध्ये एकदम आधीच बघ आहे ती.

बाळंतशेपांनी पोटातील वात म्हणजे गॅस कमी होतो.

बडीशेपेनी अन्नाचे पचन होते.

वेलदोड्याने तोंडातील वास जातो, पचन पण होतेच.

खोबरे पण मुलाच्या वाढीला चांगले असते.

पण लक्षात ठेव, जास्त खाऊ नकोस.

या सुपारीत तीळ घालु नकोस. अन ओवा पण घालु नकोस.


Nigudker
Monday, June 26, 2006 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deepa
As you are in India I suggest that do not take much medicine depend on natural food as most of the Indian Doctors suggest many medicine to get good commission from the chemist as I am ambulance operator my experence is those ladies take more medicine during the pregnancy there babies have lot of problem speically hole in heart or lungs I carry around 2 to 3 babies every month to Cochin or Bangalore for the operation

Bhagyjeet
Friday, July 07, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,

Last week madhe mazi pregrancy test positive aaliey aani doctors ni medicines dilet aani parat 10-15 divsanni bolavala aahe sonography karnyasathi..

pun magchya 2-3 divsanpasun mazya potat kahich rahat nahiey ometting mule.. divsatun 2 da tari ometting hote aani prachand jeev ghabarato..

haa asa tras saglyanna normally hoto ki kahi specific karnanmule.. gas, acidity pun vatate kadhi kadhi.. hyavar upay kay... me 4 vela thoada thoda jevate doctors mhanale ekdun jeu naka tyapramane.. dudh aani fruits mainly apple, orange rojach khatey..


Hemantp
Friday, July 07, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निगुडकर : तुमची साईट पाहीली. तुम्ही चांगले कार्य करत आहत. तुमचे अनुभव का लिहित नाहित ?
फीज USD मध्ये का बरे ?


Bhramar_vihar
Tuesday, July 11, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bhagyajeet, congrats! हा त्रास आधी सर्वानाच होतो. २-२ तासानी थोड थोड खात रहा आणि panic होऊ नकोस. this is absolutely normal माझ्या बायकोला तर ५ व्या महिन्यापर्यांत त्रास झाला. थंड दूध पी, पाणि भरपूर पी. फळ, खजूर खा. मुख्य म्हणजे आनंदी रहा! all the best

Saloni
Thursday, July 20, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala ithe bharpur mahiti milali pregnancy baddal pan US madhe aslya karnane aayurvedic aushade karne shakya nahi. mi ithe indian grocery stores madhe javun pahile kahi available nahi.

Tumhi mala sangala ka ghuti baddal aani Methi ladu aani dinkache ladu kase karavet te karan mi ithe ekatich aahe. majhi malach kalaji ghyavi lagnar aahe. Shatavari kalp milat nahi tar Asparagus walmart madhun aanun khale tar chalel ka....krupaya reply karava.

Sayalimi
Tuesday, July 25, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala aharabaddal thodi mahiti havi hoti. Mala gestational diabetes detect jhalay. So aata diet control aahe. I am in US. Aapale indian kay padartha chaltat khallele? koni madat karu shakel ka?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators