Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
हे वाचलंत का?

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » हे वाचलंत का? « Previous Next »

 
'मी वाचलेले पुस्तक' या विभागातल्या माहितीचे संक्षिप्त स्वरूपातले संकलन. मूळ विभागातली माहिती आणि पुस्तकांविषयीची चर्चा अतिशय वाचनीय आणि उपयुक्त आहेत. हा BB उघडण्यामागे ती मूळ माहिती बाद ठरवण्याचा हेतू नाही. तर यादीच्या स्वरूपात ही माहिती उपलब्ध व्हावी, सहज शोधता यावी, यासाठी हा प्रयत्न. थोडक्यात, या BB मागची कल्पना अशी आहे की, सविस्तर माहिती 'मी वाचलेले पुस्तक' मध्ये लिहावी अणि इथे केवळ संक्षिप्त माहितीचे संकलन करण्यात यावे.'मी वाचलेले पुस्तक' मधल्या मूळ माहितीचा URL इथे 'इतर माहिती, अभिप्राय' या शीर्षकाखाली लिहिता येईल.

नवीन माहिती लिहायची असल्यास आपण कुणीही नवीन post लिहू शकतो. फक्त, आधी लिहिलेल्या माहितीत भर घालायची किंवा सुधारणा करायची असेल तर नेमस्तकांना विनंती करावी.

संकलन करताना काही चुका, उणीवा राहिल्या असतील तर कृपया लक्षात आणून द्या.

  Thread Posts Last Post
Archive through August 30, 200534 08-30-05  10:07 am

Swapnapurti31
Tuesday, September 27, 2005 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala ahilyadevi holkar yanchya jiwnawar lihlelei pustake hawi ahet kuni tyanchi nawe sangu shakel kay?

Milindaa
Monday, December 05, 2005 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

smk , पुढचे कलेक्शन येउदेत आता :-)

Paragkan
Monday, December 05, 2005 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी ती तर येऊ देत. मग पुढच्या कलेक्शनचं बघू. :-)

Anuli
Friday, January 06, 2006 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuni "what color your parachute is" he pustak vachle ahe ka? mala abhipray hava ahe.

Poorva
Friday, December 08, 2006 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Original Shakespeare vachayacha asel tar kuthala book vachava? He kuni vachala aahe ka? English sahitya na vachanarya majhyasarkhiala umajel ka?
http://search.barnesandnoble.com/booksearch/isbnInquiry.asp?z=y&EAN=9780760759394&itm=1

Shonoo
Sunday, December 10, 2006 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

save that money. go to your local library and see what books they have. If you are seriously new to English literature and shakespeare, try to find Shakespeare in the young adults section or try to find 'Cliff Notes'. Shakespeare is Shakespeare even without leather binding and gilted edges.......

Pooh
Sunday, December 10, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

or better yet read shakespeare and others online here..

http://onlinebooks.library.upenn.edu/webbin/book/lookupname?key=Shakespeare%2c%20William%2c%201564%2d1616

Pooh
Sunday, December 10, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

also check this website for online books

http://www.readprint.com/online-books

Raina
Monday, December 11, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yup agree with Ms. Shonoo.Shakespeare is Shakespeare even without leather binding and gilted edges.......>>>
इंग्रजी साहित्य जास्तं वाचलं नसेल- तर एकदम समग्र शेक्सपिअरला हात न घालणे चांगले. जरा धसकायला होतं शब्दार्थातच माणूस रक्तबंबाळ झाला की आशयातील गोडी संपते आणि मग्- नको रे बाबा शेक्सपियर असे होते.
-आधी लहान मुलांसाठीचे adbridged versions वाचावे. पुणे, मुंबईतील फुटपाथ अथवा पुस्तक प्रदर्शनात मिळतील. त्यातही जरा सोप्प्या- comedies पासून सुरवात करावी.उदा- midsummer night's dream etc.. (बहुदा याचे मराठी रुपांतर ऐन वसंतात अर्ध्या रात्रि या नावाने आलयं). किंवा As you like It .
मग हळूहळू Tragedies कडे वळावे. सोप्पे म्हणजे- Romeo and Juliet - त्यानंतर हळुहळु- Othello, mcbeth, hamlet, King Lear ह्या चढ्त्या भाजणीने अवघड पण सर्वोत्कृष्ट मानल्या जाणा-या रचना.
I am still talking about the abridged version only. This version is easy to read as it is without the archaic language . एकदा आशय समजला, भिडला- की हळूहळु तेच नाटक ( original )परत एकदा वाक्य न वाक्य करत शब्दा शब्दाची अवघड वळणे पार करत वाचावे. त्या साठी- e-tutor किंवा सदेह Tutor ची मदत घेणे अपरिहार्य.
Shakespearle Lovers groups पण असतात शहरा शहरामध्ये.
एक Tragedy घेऊन पिंजून काढायची अक्षरश:- प्रत्येक शब्दाचा अर्थ Etymology आणि Reference to Context , त्या काळाचे ऐतिहासिक, राजकिय संदर्भ वगैरे वगैरे...
एकदा का शब्दांचा गड ओलांडला आणि summit वर जाऊन खाली पाहिल्यासारखं जे सबंध नाटकाची दरी दिसते पट दिसतो ते अवर्णनीय आहे- ह्याच साठी केला होता अट्टाहास
एकदा एक नाटकाचा किस पाडला की पुढची आपोआप सोप्पि होतात.
मग sonnets कडे वळावे.

दुसरी method
adapted, original कुठलीही नाटकंसिनेमे पहावे (शेक्सपिअर च्या नाटकांवर आधारीत). त्यातही Royal Shakespeare company चे पहायला मिळाले तर सोडु नये. नाटकसिनेमा पाहिल्यावर मग संहिता वाचायला घ्यावी. मग follow the steps mentioned above


Raina
Monday, December 11, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात शेक्सपिअर का वाचावा असे वाटते ह्याचे उत्तर पहिले शोधावे.
उदा.
१. ईंग्रजी भाषा सुधारायची म्हणून ( then best to concentrate on the vocab and dictionery, use lexicographer's help as guidance in this quest)
२. वाचले की- यु नो- शेक्सपियर म्हणजे आम्हाला किनई- किंवा बरका भगिन्निंनो वगैरे style किंवा cocktail parties मध्ये तोंडी लावायला.. आपण कित्ती कित्ति बहूश्रूत आहोत हे दाखवायला. etc.etc. you get the drift!. In this case no need to read the original- abridged version and a few dialogues would help in creating the right impression. पुलंच्या लखू रिसबूड सारखा व्यासंग.
३. आहे तरी काय ह्या शेक्सपिअर मध्ये- का मेल्याचा एवढा उदो उदो? then follow the path I recommended
४. Potboilers and spies chasing each other all over digital divide असलं सगळं वाचून वाचून आता जरा असली जर्दा चाखून पहावा म्हणून. Literature किस झाड की पत्ती है ह्याचा शोध घेण्यासाठी.
५. वेळ घालवायला मात्र सर्वार्थाने निरुपयोगी. म्हणजे तोक्यो वरुन दक्षीण आफ्रिके पर्यंतचा किंवा Dallas पासून पुणे पर्यंतच्या भीषण प्रवासात वाचायला म्हणुन समग्र शेक्सपिअर घेतलात तर this is a bad idea . अगदी नेहरुंसारखा तुरुंगवास किंवा पांडवांसारखा अज्ञातवास घेऊन राहणा-यालाच केवळ वेळेचा सदुपयोग करण्यासाठी उत्तम.
६. इंग्रजी बी.ए किंवा एम.ए ला सक्तिचे म्हणुन. प्राध्यापकांना रवंथ करता यावा म्हणून. canteen मध्ये बसून शेक्सपिअर च्या शब्दांवर झिंगून एक कटिंग (उधार) चाय वर मनुष्य स्वभाव आणि दैवावर वाद घालता यावा म्हणुन... बाकी सगळे जग झूट- आणि ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है- असले समज करुन घेता यावे म्हणून

वगैरे... वगैरे... १०१ कारणं


Laalbhai
Monday, December 11, 2006 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेक्सपिअर का वाचावा?? ईंग्रजी भाषा सुधारायची म्हणून

>>>

एकदम खरे आहे! काय सुंदर आहे हो भाषा. आमच्या वडलांनी कॉलेजात गेल्यापासून धोषा लावला होता शेक्स्पिअर वाचा म्हणून. शेवटी कॉलेजातून बाहेर पडल्यावर नोकरी मिळेपर्यंतच्या ३, ४ महिन्यात वाचून काढले आणि पाच सहा वर्षे फुकट घालवली ह्याचा पश्चाताप झाला! (माझी मुलगी मात्र आनंदाने वाचते, ह्यात आनंद आहे. मुलांशी आपली आवड जुळण्यासारखा मोठा आनंद नाही बघा!)

माझ्यामते केवळ ईंग्रजीच नाही तर एकुणच भाषेबद्दल प्रेम निर्माण करायचे असेल तर शेक्स्पिअर वाचन आवश्यक आहे. बाकी त्यातले नाट्य, हुशारी त्याच्या भाषिक सौंदर्यापुधे मला तरी फिके कमी महत्वचे वाटले. (अर्थात, ही अतिशय वैयक्तिक आवड!)


Shonoo
Monday, December 11, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखीन एक मार्ग आहे.शेक्स्पियर च्या बर्‍याच पुस्तकांची मराठी दिग्गजांनी भाषांतरे केली आहेत. ती वाचली तर कथानक, पात्रे इत्यादींची ओळख होते. मग इंग्रजीतून वाचताना शब्दभांडाराकडे पूर्ण लक्ष देऊन वाचता येईल.

शिरवाडकरांचे ऑथेल्लो आणि पाडगावकरांचे टेम्पेस्ट ( वादळ) दोन्ही वाचनीय.

या संदर्भात एक किस्सा आठवला.

माझे मामा सांगतात की त्यांना बीए ला असताना मॅक्बेथ शिकवत असत. जवळजवळ दोन तीन महिने मॅक्बेथ चा अभ्यास झाल्यावर सरांनी ' लेडी मॅकबेथ अमक्या वेळी काय म्हणाली?' असा प्रश्न विचारला. त्यावर वर्गातल्या एक मुलाने ' येन सर, लेडी मॅकबेथ हेन्गसा?' ( काय सर लेडी मॅक्बेथ काय बाई होती का?) असं विचारलं होतं


Robeenhood
Monday, December 11, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे म्हन्जी समदं रामाईन ऐकूनशान माघून रामाची शिता कोन व्हती म्हंता आसं इचारल्यागत झालं म्हना की!!!

Poorva
Monday, December 11, 2006 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nemakya margadarshanabaddal sagalyanche manapasun aabhar.
Shakespeare ka vachayachay? Ithe ameriket marathi vachanachi phar upasmar hote, deshatun books anali tar purat nahit, online vikat ghyayala paravadat nahi, rasik chi library pan 2 varsha ghetali pan samadhan hot nahi, mag Englishch reading - classic literature pasun suruvat karavi mhatala. Mag kuthun suruvat karavi asa vichar aala- tar lahanpanapasun thora-mothyanchya likhanat vachalela shakespeare vachayachi iccha zabardasta aahe, pan kalnar nahi mhanun pustaka bhaghun thevun det hote- nidan tyachya kavita tari zepat nasat- college chya pustakatil. mhanun Raina ne dilela salla amalat anate. Tumha sarya shakespeare rasikanche parat ekada abhar.

Aaspaas
Thursday, March 01, 2007 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे लिहीणे बरोबर आहे कि नाही माहित नाही. पण साधारण ८८-८९ साला पूर्वीची शालेय पुस्तके भाषा, हिंदी, इतिहास इ. कुणी ठेवली आहेत का? कुणाकडे मिळतील? अगदी पहिली पासून. किमान पाहायला तरी मिळतील का? बालभारतीत आहेत असे एकले आहे, पण विकत मिळत नाहीत.

Aaspaas
Thursday, March 01, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा. हे काही शोधत आहात? मधे टाकायला हवे

Shonoo
Thursday, March 01, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे खरोखर धक्का दायक आहे



http://www.loksatta.com/daily/20070225/lr05.htm



Zakasrao
Friday, March 02, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू खरेच हे धक्कादायक आहे.
news channel वाले सलमान वैगेरे celebraties चे अगदी live coverage दाखवत होते. अशावेळी मात्र काहिच पुढाकार घेणार नाहित. खरोखरच १६ वर्ष त्या माणसाच्या उमेदीचा काळ कोण परत आणु शकत नाही. तसेच त्यावर केलेले अत्याचार. नको नको वाटत होत.

Bee
Friday, March 02, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेलमधे हे सर्व घडत हे मी इतर पुस्तकांमधुन खूपदा वाचलं आहे. पण तरीही नव्यानी वाचताना तिच intensity होती..

Bee
Thursday, March 08, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नईर मुर ह्यांचे The perfect Man ह्या पुस्तकाला नुकताच 'राष्ट्रकुल' असा एक पुरस्कार मिळाला. एका Anglo Indian मुलावर आधारीत ही एक कादंबरी आहे. मी गूगल वर शोध घेतला review वाचण्यासाठी पण मला नईर मुरच्या spelling mistake मुळे नक्की लिंक मिळत नाही. कुणाला ह्या पुस्तकाच्या लेखकाचे correct spelling देता येईल का?

Milindaa
Thursday, March 08, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.amazon.co.uk/Perfect-Man-Naeem-Murr/dp/009945002X

बी, तू नईर लिहीलंस तेव्हा मला खात्री होती की ते नईम असणार :-)

Bee
Friday, March 09, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा तुझ्या हुशारीबद्दल मला यत्किंचितही प्रश्न नाही :-)

मदतीबद्दल धन्यवाद :-)


Milindaa
Friday, March 09, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तू ते खिलाडू वृत्तीने घेतलंस यातच सगळं आलं :-) माझे आणि बी चे असे प्रेमळ संवाद ऐकून बेशुध्द होऊ नका *



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators